एक गोंधळ - टिप कोणाला? किती द्यावी? वा देऊ नये? हे कसे ओळखावे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 September, 2016 - 11:51

आजच्या तारखेला !

जेव्हा मी एकटाच नाक्यावरच्या हॉटेलात जातो आणि हलकाफुलका नाश्ता करतो तेव्हा एकही पैसा टिप देत नाही.

जेव्हा मी एकटाच जातो आणि जेवल्यासारखे हादडतो तेव्हा पाच रुपये फक्त/- टिप ठेवतो.

जेव्हा मी मित्राला घेऊन नाश्ता करायला जातो तेव्हा दोघांचे मिळून एक जेवण असा हिशोब करत पाच रुपये टीप ठेवतो.

जेव्हा मित्राला घेऊन जेवण करायला जातो तेव्हा एकूण दहा रुपये टीप ठेवतो.
अर्थात पाच मी देतो. पाच मित्राला द्यायला लावतो.

आता गर्लफ्रेंड Happy

गर्लफ्रेंडबरोबर जेव्हा केव्हा एखाद्या साध्या हॉटेलात जातो, आणि साधी चहा पिऊन बाहेर येतो (जे आजवर कधीच झाले नाही ती गोष्ट वेगळी) तरीही टिपची किमान मर्यादा पाचची दहा मध्ये बदलते.

जेव्हा तिच्याबरोबर जेवण करायला जातो, तेव्हा टिपची किमान मर्यादा दहाची वीस मध्ये बदलते.
(आता कळलं गर्लफ्रेंड असली की पैसे कसे खर्च होतात)

जेव्हा मी गर्लफ्रेंडबरोबर एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जातो, म्हणजे जिथे जेवायला बसल्यावर मांडीवर पांघरायला फडके आणि जेवण झाल्यावर हातपाय बुचकळायला गरमागरम लिंबूपाणी आणून देतात, जिथे पिण्याचे पाणीही ‘साधा की मिनरल वॉटर?’ असे अदबीने विचारतात, आणि आपण निर्लज्जासारखे ‘साधा’ म्हटले तरी काचेच्या वळणदार ग्लासातून थंडगार पाणीच आणून देतात, जिथे समोरच्याला ईंग्रजी ‘ई तरी येतो की नाही याचा जराही तपास न घेता ‘काय जेवणार?’ सारखे क्षुल्लक प्रश्नही ईंग्रजी भाषेत विचारतात, जिथे जेवणात एखादा केस आला तरी दिसू नये ईतपत अंधारमय वातावरण करतात आणि फोकस ताटावर नाही तर खाणार्‍यांच्या तोंडावरच राहील याची दक्षता घेतात, ईत्यादी सोयीसुविधा न मागता पुरवणार्‍या मोठ्या हॉटेलात जेव्हा जातो, तेव्हा हा किमान दहाचा आकडा किमान वीस ते तीस मध्ये बदलतो. कारण बिलाचा आकडा फुगवत त्या तुलनेत दहा वीस रुपयांची टिप ठेवायला आपल्यालाच लाज वाटावी याची काळजी हॉटेलवाल्यांनी स्वत:च घेतलेली असते.

जेव्हा आम्ही एखाद्या स्पेशल ओकेजनसाठी सेलिब्रेट करायला जातो तेव्हा टिपचा आकडा गर्लफ्रेंड स्वत:च ठरवते. तो दरवेळी चढत्या क्रमाने वेगवेगळा असतो.

आजकाल तर मी तिला किती ओळखू लागलोय याची परीक्षा घ्यायला जेवण झाल्यावर तीच मला लाडात विचारते, "रुनम्या, आज किती टिप ठेवशील?"
आणि जर मी तिच्या मनातला आकडा बरोबर ओळखला तर ती खुश होत मला आलिंगन देते.

हल्ली खरेच मी वरचेवर तिच्या मनातला आकडा ओळखू लागलोय हे आलिंगनाच्या वाढलेल्या संख्येवरून (आताच हे वाक्य लिहिता लिहिता) मला जाणवले आहे.

असो, तर बिल छोटे की मोठे त्यानुसार टिपही छोटी की मोठी ही मेंटेलिटी आम्हा दोघांचीही आहे. भले आमची छोट्यामोठ्याची व्याख्या भिन्न का असेना.
पण बेकार सर्विस दिली तर टीप कमी द्या किंवा देऊच नका हे माझे मत आहे. जे तिला कधीच पटत नाही.
तिच्यामते टीप आपण आपली शान जपायला देतो. सर्विस कशीही असो, आपली शान तर कायम तीच असते ना. मग झालं, टीप सुद्धा त्याला साजेशीच द्यावी.

होम डिलीव्हरीबाबत बोलायचे झाल्यास, दहा रुपये हा आजच्या तारखेला माझा फिक्सड् आकडा आहे. त्याला टिप न समजता संबंधित व्यक्तीला आपल्या घरापर्यंत एक फेरी मागावी लागते त्याचा मेहनताना म्हणून मी ते देतो.

हे झाले हॉटेलचे,
आता थोडक्यात ईतर

टॅक्सीवाला भला माणूस वाटला तर त्याचे बिल राऊंड अप करत चार-आठ रुपयांची शिल्लक न घेणे हे टीपसदृश्य काम मी करतो.

रिक्षावाल्यांना मी कधीच टिप देत नाही. किंबहुना एक सुट्टा रुपयाही सोडत नाही.
कदाचित दक्षिण मुंबईकर असल्याने टॅक्सीवाल्यांबद्दल एक आत्मीयता वाटत असावी जी रिक्षावाल्यांबद्दल वाटत नसावी. बाकी विशेष काही कारण नाही.

सलूनमध्ये आयुष्यात एकदाच टीप दिली आहे.
का? केव्हा? कशाला उगाच ..
ते या लेखात तुम्ही वाचू शकता. - http://www.maayboli.com/node/53197
हिला माझी रिक्षा ऐवजी टॅक्सी म्हणालात तर जास्त आवडेल.

बाकी चायपाणी हा वेगळा विषय आहे. ते कोणाला किती द्यायचे हे ना मला समजत, ना माझ्या गर्लफ्रेंडला. घरी असलो तर मी माझ्या आईच्या किंवा वडिलांच्या तोंडाकडे बघतो. तेच काय ते ठरवून देतात.

असो, तर ही झाली प्रस्तावना,

आता एक ताजा अनुभव ज्यामुळे हा धागा सुचला.

पुन्हा शीर्षक लिहितो,
एक गोंधळ - टिप कोणाला? किती द्यावी? वा देऊ नये? हे कसे ओळखावे?

ऑनलाईन शॉपिंगच्या फंदात मी हल्लीच पडू लागलोय. बरेचसे पार्सल कामाच्या दिवसांमध्येच येतात जेव्हा मी ऑफिसला असतो. ते आई कलेक्ट करते. गेल्या रविवारी मात्र मी एकटाच घरी होतो. पार्सल आले. मी स्वत: साईन करून घेतले. खरेदी करताना कॅश ऑन डिलीव्हरी सिलेक्ट केले होते. तर त्याचे ३९५ रुपये फक्त झालेले. मी चारशे रुपये, शंभरच्या चार नोटा त्या कुरीअरबॉयच्या हातात सरकावल्या आणि राहू दे म्हणालो. तरी तो पाकिटात पाच रुपये चिल्लर शोधू लागला. मला वाटले, त्याला माझे ऐकू आले नसावे. म्हणून मी त्याला पुन्हा मोठ्याने म्हणालो, अरे राहू दे. तसे तो आणखी त्वेषाने पाकिट शोधू लागला आणि कुठल्याश्या कोपर्‍यातून त्याने पाच रुपयांचे नाणे शोधून काढलेच. बस्स त्याच त्वेषात मग त्याने ते माझ्या हातात कोंबले. अगदी माझ्या भावी सासर्‍याने माझ्या गर्लफ्रेंडचा हात माझ्या हातात द्यावे तसे अगदी माझा हात आपल्या हातात घेत त्यावर टाळी मारल्यासारखे ते चिकटवले. अर्थ साफ होता. त्याला माझे हुशारी मारत टिप देणे आवडले नव्हते आणि त्याला मला हे आपल्या कृतीतून दाखवून द्यायचे होते. माझा त्याला दुखवायचा हेतू नक्कीच नव्हता, पण तरीही तो दुखावला होता आणि त्याचा बदला म्हणून त्याने मला दुखावले होते. आय मीन माझा हात दुखावला होता.

एकंदरीत वाईट वाटले. अश्यावेळी सॉरी तरी काय आणि कसे बोलावे हे समजले नाही. माझे नेमके चुकले म्हणावे तर पुढच्यावेळी एखादा गरजू खरेच अश्या सर्विसच्या बदल्यात टिपची अपेक्षा ठेऊन असेल आणि मी याच भितीने त्याला दिली नाही, तर त्या बिचार्‍याचे उगाच नुकसान व्हायचे. तर उलटपक्षी पुन्हा असा प्रकार करताच आणखी एखादा दुखावला जायचा. बस्स म्हणूनच नेमकेपणा ठरवायला हा धागा काढलाय. टिप कोणाला? किती द्यावी? वा देऊ नये? हे कसे ओळखावे?

आयुष्यात कधीतरी कोणालातरी टीप दिली असेल, वा कोणाकडून घेतली असेल तर ईथे जरूर प्रतिसाद द्या.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेत बिलाच्या १० ते २० टक्के टीप देणे अनिवार्य आहे. म्हणजे सगळे नॉर्मली देतातच..मला ते फार जड वाटायचे पहिले पहिले. पण मी आता ती पदार्थाची किंमतच समजत्ये.

तो घायल नाही ती दामिनी.
>>>>
हो माहीत होते. सनीपाजीचे सारे चित्रपट सारखे वाटायचे हे दाखवण्यासाठी मुद्दाम केलेली चूक होती ती :.)
स्टाईल आहे आपली..

आंबटगोड,
आपल्याकडेही सर्विस टॅक्स म्हणत बिलातच काही रक्कम जोडली असते. ती तिथे अमेरीकेत जोडत नसावेत मग.. लोकंच समजून उमजून देत असावेत.. आपल्याकडे तर त्या बिलाच्या ताटलीतील पाचचे नाणे पटकन कोणाचे लक्ष नाही बघत उचलणारे महाभाग मी पाहिले आहेत.

जेवण झाल्यावर हातपाय बुचकळायला गरमागरम लिंबूपाणी आणून देतात

जेवल्यानंतर हात बरोबर पाय सुद्धा बुचकळायला गरम पाणी देणार्या ईतक्या मोठ्या हॉटेलात मी अजुन गेलेलो
नाही म्हणुन माझा पास !!

Biggrin

पियू,
बुभुळे >> ईट इज ए ब्लॅक होल ईन ए आय !

कृष्णा,
शेवटचा प्यारा वाचा की, गोंधळून त्यात गेलो आहे. द्यावी की न द्यावी. टू टिप ऑर नॉट टू टीप..

मिलिंद,
हो ती चूक झाली. ऑफिसातून आल्यावर लिहित होतो. आईने तेवढ्यातच रुनम्या हातपाय धुवून घे अशी हाक मारल्याने तोच शब्द पटकन डोक्यात बसला आणि सबकॉन्शिअस माईण्डमध्ये लिहिला गेला.

{{{ ईट इज ए ब्लॅक होल ईन ए आय ! }}}

अ‍ॅन आय फॉर अ‍ॅन आय अ‍ॅण्ड अ होल फॉर अ होल विल मेक अ व्होल मायबोली ऋन्मेष.

४० / ४५ वषापुर्वीची गोष्ट आहे. माझे काका ,मला घेवुन , धुळ्यातील ,' राज मटन होटेल ' मध्ये घेवुन जात असत.
कारण घरी मटन , मासे खाण्याची बंदी होती. तेथे गेल्यावर ,सर्व्हीस देणार्‍या वेटरला , ते एक सिगारेट देत असत , त्या बदल्यात , मटणाचा रस्सा, तो वेटर, आम्हाला दोन वेळा देत असे. बाकीच्या सर्वांना , रस्सा एकदाच मिळत असे.अर्थात बालवय असल्याने , सिगारेट देणे ह्यालाच ' टिप ' देणे म्हणतात, हे त्यावेळी कळत नसे.

बाकी चायपाणी हा वेगळा विषय आहे. ते कोणाला किती द्यायचे हे ना मला समजत, ना माझ्या गर्लफ्रेंडला. घरी असलो तर मी माझ्या आईच्या किंवा वडिलांच्या तोंडाकडे बघतो. तेच काय ते ठरवून देतात.

चायपाणी म्हणजे काय

जयंतजी, आपण म्हणत आहात त्याला टीप म्हणण्यापेक्षा आपण त्या वेटरला फितवून त्याच्या मालकाच्या नकळत एक्स्ट्रा रस्सा मिळवायचा. त्याचाही फायदा तुमचाही फायदा आणि मालकाचे नुकसान.

मी कॉलेजवयात मेसला होतो तेव्हा असेच तेथील एका पोर्‍याला फितवून एक्स्ट्रा ऑमलेट (अंड्याचे) आणि दही (दूधाचे) लाटायचो.

वरिजनलपेक्षा विडंबनावर जास्त प्रतिसाद, ये बात कुछ हजम नही हुई>>>

गिरिकंद, ह्या धाग्याचे विडंबनच काय तर त्या 'छोट्याश्या प्रेमकथे' वर जास्त प्रतिसाद आलेत ह्या धाग्यापेक्षा!! Wink

गिरिकंद, ह्या धाग्याचे विडंबनच काय तर त्या 'छोट्याश्या प्रेमकथे' वर जास्त प्रतिसाद आलेत ह्या धाग्यापेक्षा!!

>>> वही तो! ऋन्मेषच्या शानमे गुस्ताखी नाही का ही? मग?

गिरीकंद, सहमत आहे. हि गोष्ट नक्कीच हसण्यावारी नेण्यासारखी नाही. पुढच्या वेळी मला माझ्या धाग्यात विडंबन करायचे पोटेंशिअल दिसताच चोवीस तासाच्या आत स्वत:च एक विडंबनाचा धागा काढावा लागणार. आपण हे माझ्या लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद Happy

चायपाणी म्हणजे काय>>>>> टिप टेबलाच्या वरून देतात. आणि चायपाणी टेबलाच्या खालून एव्हढाच फरक. बाकी ऋन्मेष जास्त योग्यप्रकारे समजावू शकतो.

मला माझ्या धाग्यात विडंबन करायचे पोटेंशिअल दिसताच चोवीस तासाच्या आत स्वत:च एक विडंबनाचा धागा काढावा लागणार.>>>>>

का आमच्यासारख्या छोट्यामोठ्या लेखकांच्या पोटावर पाय देतोयस ? कधीच्या काळी आमच्या एका धाग्याला थोडेफार प्रतिसाद मिळाले तर डोळ्यात खुपलं व्हय रे तुमच्या...... Proud

कधीच्या काळी आमच्या एका धाग्याला थोडेफार प्रतिसाद मिळाले तर डोळ्यात खुपलं व्हय रे तुमच्या...

>>> हे मात्र खरेय. दुसर्‍याच्या धाग्याचा टिआरपी वाढलेला सहन झाला नसणार त्याला. त्यामुळे वरिजनल धागा पण मीच काढणार, विडंबन पण मीच करणार. हे चुकीचे आहे.
ह्या प्रकारच्या एकाधिकारशाहीचा मी निषेध करतो. २०१४ पासुन ही प्रवृत्ती वाढीस लागली आहे. विचारस्वातंत्र्याची गळचेपी आहे ही. Lol

(जमलं का हो मला धाग्याचा रोख वळवायला? Wink )

({टिप टेबलाच्या वरून देतात. आणि चायपाणी टेबलाच्या खालून एव्हढाच फरक. }

पण या दोन्ही प्रकारामध्ये भारत सरकारला कर मिळत नसल्याने आदरणीय मोदीजी टीप देणे किंवा घेणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरवणार आहेत. निव्वळ संशयावरून देखील पोलीस कोणासही अटक करू शकतील याची खबरदारी घेण्यात आली आहे. पोलिसांवरील कार्य भार बघता टीप प्रतिबंधक स्वयंसेवकांची फळी उभारण्यात येईल. नमो नमः

रुन्मेश यान्ना १ प्रश्न नेहमिच विचारावा वाटतो....भाउ, तुम्हि नक्कि कुठे न काय कामाला आहात? जॉब, गफ्रे, फ्यामिलि वगेरे सगळ साम्भाळुन इकडे इतके active असता....यावर जरा टिप द्याच राव. (इतकच छापायला १० मि. घातले....चूका करुन तेहि.)

"असलेला जॉब कसा साम्भाळावा? " यावर नविन लेख लिहिलात तर उत्तम....

बघा ! आणि काहीजण म्हणतात , कु. ऋ . सारखे धागे पाडतो .
लोकच त्याला असं उसकवतात आणि त्याला लोकांच मन दुखावणं आवडत नाही .

Pages