कोंकण - हर्णे आणि केशवराज मंदिर

Submitted by भागवत on 29 August, 2016 - 08:13

काही प्रवास अचानक ठरतात. दोन आठवड्याखाली कोकणात जाण्याचा असाच योग आला. बऱ्याच दिवसांनी मित्र भेटला. दुसऱ्या मित्राच्या नातेवाईकाची कार प्रवासासाठी सज्ज झाली. ताम्हिणी घाटातून प्रवास योजला होता. मित्र ड्राइविंग सीट वर होता. ताम्हिणी घाटातून जाताना मन खुप प्रसन्न होत होते. मोकळा रस्ता.. बाजूला हिरवागार निसर्ग... ओळीनी जाणारे सायकल स्वार... मध्येच वाहणारे लहान-मोठे धबधबे, वर्षा विहारासाठी निघालेली कुटुंब... मित्र मैत्रिणी... वाटेत कोणी निसर्गाचा आस्वाद घेतोय... कोणी चहाचा... कोणी जेवणाचा... गप्पांचा आस्वाद... धबधब्या मध्ये एकमेक वर पाणी उडवून मैत्रीचा आस्वाद..

मला वाटते की माणूस जसा-जसा निसर्ग जवळ जातो तसा तणाव मुक्त होतो. कार मध्ये आमच्या गप्पा मस्त पैकी रंगल्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक पासून ते आयुर्वेद पर्यंत सगळ्या गोष्टीचा उहापोह झाला. हिलरी किती चांगल्या आहेत आणि ट्रम्प किती बेकार आहे ते आयुर्वेद, योगा आणि लंडन मधल्या आरोग्य सुविधा पर्यंत चर्चा झाली. आमचं काय विषय कोणता ही असो आपला मुद्दा सांगायचा. जसे कोकणात शिरत होतो तसे-तसे निसर्ग आपली विविध रूपे दाखवत होता.

आम्ही देव्हारे येथे एका शेतात गेलो. तिथे एका बाजूला गाव होते आणि एका बाजूला हिरवागार शाल पांघरलेला डोंगर. दूर वर भाताची शेत पसरली होती. टेकडी वर लहान मुलांचा खेळ रंगला होता. बाजूला प्रशस्त कुरण... आजूबाजूला भरपूर झाडे.... दूर वर पसरलेली हिरवळ मनाला प्रसन्न करीत होती. मी पहिल्यांदा कोकणातील शेती पहात होतो.

तेथून आम्ही हर्णे ला जायचे ठरवले. कड्या वरचा गणपती हे ठिकाण मिस झाले. मस्त परिसर आहे. खाडीच्या पुलावरून सूर्यास्त दर्शन झाले. सूर्यास्त मस्त एन्जॉय केला. तेथून पुढे टेकडीच्या वरून पॉइंट आहे पण आम्हाला तेथे थांबता आले नाही. मग हर्णे येथे रिसॉर्ट शोधून आमचा मुक्काम मुकाम झाला.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठून समुद्र स्नान करून परत आलो. मस्त पैकी नाश्ता झोडला. तिथे हॉटेल मालकाला विचारले एखादे प्रसिद्ध मंदिर जवळ आहे का? त्यांनी केशवराज मंदिराचे नाव सांगीतले. आम्ही आमचा मोर्चा केशवराज मंदिरा कडे वळवला.

असुद गावा जवळ हे मंदिर आहे. रस्त्या वरून हे मंदिर दिसत नाही.
आम्ही रस्त्याच्या बाजूला गाडी पार्क करून निघालो. मंदिरात जाण्यासाठी असुद गावातून रस्ता आहे. पुढे रस्ता गर्द झाडीतून जात होता. आजूबाजुचा रम्य परिसर... सकाळचे आल्हाददायक वातावरण... निरव शांतता... फक्त निसर्ग आणि आम्ही.
आम्ही पायऱ्या उतरत होतो. तेव्हा खळाळत्या पाण्याचा आवाज आला. झाडी येव्हडी गर्द होती गावातून नदी दिसलीच नाही. नदीवर सीमेंट काँक्रेटचा पुल बांधला आहे. बाजूला जुना लाकडी पुलाचे अवशेष दिसत होते. नदीतील पाण्याला भरपूर वेग होता. मंदिर आणखी दूर होत. आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. सकाळी-सकाळी पायऱ्या चढून घाम फुटला. आपल्याला व्यायामाची किती नितांत गरज आहे हे आम्हा तिघा मित्रांना समजले. तिघा मध्ये दिगंबर पुढे जाऊन पोहोचला.
मंदिरात प्रसन्न वातावरण होते. अभिषेक संपून आरती चालू होती. गर्भ गृह काळोखात बुडाले होते. मला पूर्ण मूर्ती दिसत नव्हती. तेथील माणसाने सांगीतले पांडव कालीन मंदिर आहे. मंदिराची रचना सुंदर आहे. परिसरावर निसर्गाने सगळी संपत्ती उधळून टाकली होती. मंदिरा समोर गोमुख आहे. मित्राने माहिती काढली. मंदिरा समोर डोंगरात अखंड झऱ्यातून पाणी येते. त्यांनी आम्हाला वर जाण्यास सांगीतले. आम्ही डोंगरावर पाण्याच्या स्तोत्र पाहण्यासाठी गेलो आणि अचंबित झालो. तिथे खुप मोठा कातळ/खडक होता. त्या आधी आंब्याचे झाड होते. पाषाणाला कोरून झऱ्यातील पाण्याला मार्ग आखून दिला होता. पाषाण पासून ते गोमुखा पर्यंत दगडी मार्ग काढून पाणी नैसर्गिक पद्धतीने आणले आहे. सतत बाराही महिने पाणी गोमुखातून वाहत असते. ही जुनी आणि सुंदर पद्धत पाहून मन एकदम प्रसन्न आणि आनंदी झाले. जणु काही दगडाची पाईप लाईन केलेली आहे. मंदिरा बाजूला छान बाग आहे. तिथे देवस्थान च्या लोकांची कामे चालू होती.

मंदिर दर्शन आटोपून आम्ही वरंधा घाट मार्गे पुण्याला रवाना झालो. घाटात मस्त धबधबे होती. रविवार असल्या मुले लोकांची गर्दी खुप होती. निसर्गाचे दुसरे रूप पाहून उत्साहीत झालो. नित्यनियमा प्रमाणे सर्वात उंची वरच्या पॉइंट वर फोटो काढण्याचा कार्यक्रम झाला. इथे लोकांचा उत्साह बघण्या सारखा होता. अश्या तर्‍हेने दोन दिवसांचा प्रवास पूर्ण झाला.

043__1472472340_103.27.171.61.jpg047__1472472237_165.225.104.86.jpg118__1472472546_103.27.171.61.jpg162.jpg118__1472472546_103.27.171.61.jpg162.jpg163__1472469974_165.225.104.86.jpg165__1472469998_165.225.104.86 (1).jpg170__1472470278_165.225.104.86.jpg172__1472470307_165.225.104.86.jpg174_dup__1472470333_165.225.104.86.jpg176_dup__1472470446_165.225.104.86.jpg183__1472470644_165.225.104.86.jpg186__1472470806_165.225.104.86.jpg189__1472470832_165.225.104.86.jpg190__1472470858_165.225.104.86.jpg192__1472470885_165.225.104.86.jpg193__1472471037_165.225.104.86.jpg198__1472471212_165.225.104.86.jpg199__1472471394_165.225.104.86.jpg201__1472471467_165.225.104.86.jpg205__1472471812_165.225.104.86.jpg208__1472471896_165.225.104.86.jpg211__1472472029_165.225.104.86.jpg218__1472471512_165.225.104.86.jpg219__1472471558_165.225.104.86.jpg223__1472472583_165.225.104.86.jpg227__1472472615_165.225.104.86.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users