मी मध्यममार्गी ..

Submitted by केदार जाधव on 25 August, 2016 - 01:11

मी मध्यममार्गी ..

बरेच दिवस झाले हे लिहायच होत , पण राहून जात होत . गेल्या काही दिवसात एक दोन घटना अशा घडल्या की लिहावस वाटल .

तर होतय काय की आजकाल बर्याच (सगळ्याच ? ) गोष्टींवर बहुतेकांची( ऑनलाईन असो की समोरासमोर) फार ठाम अन् अगदी काळी/पांढरी मत दिसतात . अन अशावेळी सगळ करड्/ग्रे दिसणारा मी मलाच वेगळा वाटू लागतो . अन असही नाही की मी काही विचारच करत नाही , इन फॅक्ट मला दोन्ही बाजूनी विचार तटस्थपणे करता येतो ( अस मला वाटत Happy ). उदाहरण द्यायच झाल, तर माझ्या गावी मराठा आरक्षण हे किती चुकीच आहे , आपली अधोगती आपणच करून घेतली आहे हे माझ्या चुलतभावांसमोर अगदी तावातावाने भांडताना एक वेळ खरोखरची भांडण व्हायची वेळ येते. पण त्याचवेळी पुण्यातल्या मित्रांची सगळे मराठे अगदी श्रीमंत , मस्तवान ही समजूत ( पवार काका पुतण्यांमुळे मोस्ट्ली) बदलताना मी त्यांच्याही विरूद्ध असतो . होत काय की कुणीही अगदी टोकाची भूमिका घेऊ लागला की मला पटत नाही अन मग मी सगळ्यांच्याच विरूद्ध असतो. Sad
एकाला मी भक्त असतो अन एकाला हेटर असतो . एकाला मी अगदी मराठा विरोधी अन दुसर्याला अगदी धार्जिणा असतो .

आणखी काही उदाहरणे : काही अगदी स्फोटक तर काही अगदी साधी Happy
१. दहीहंडी अन गणेशोत्सव यांचे बाजारीकरण झालय , यात वाईट गोष्टी प्रचंड प्रमाणात शिरल्या आहेत , हे मला पटत पण मग अगदीच सगळ बंद करून २० फूट अन १८ वर्षाची अट हेही पटत नाही (अगदी शाळेतल्या दहीहंडी सुद्धा बंद Sad )
२. सगळे मुस्लिम दहशतवादी हा मूर्खपणा आहे हे मला अगदी पक्क माहित आहे , पण अगदी दहशतवादाला धर्म नाही हा आंधळेपणा ही मला पटत नाही
३. मी स्वतः देव मानत नाही , कुठल्या देवाला नमस्कार करत नाही पण वारकरी म्हणजे रिकामटेकडे , देव मानणारे मूर्ख असही माझ मत नाही
४. मला स्वतःला मोदी आवडतात , मला त्यांच्याकडून बर्याच अपेक्षा आहेत , पण ते काहीच चुकू शकत नाहीत हे मला पटत नाही . त्याउलट केजरीवाल मला अजिबात आवड्त नाही , पण त्याला उगाच टारगेट केलेल ही आवड्त नाही
५. सचिन चा मी फॅन नाही , त्याला भारतरत्न देण हे मला फार आवड्ल असही नाही , पण उगाचच त्याच्या मागे लागणे , त्याने क्रिकेटसाठी दिलेल योगदान विसरण , तो स्वतःसाठीच खेळला वगैरे बरळणे हेही मला पटत नाही
६. मी स्वतः कट्ट्रर मांसाहारी आहे . पण मी शाकाहार्यांचा अगदी मनापासून आदर करतो , त्याचे कित्येक फायदेही मला माहित आहेत . पण शाकाहारी म्हणजे गवत खाणारे हा जितका मूर्खपणा तितकाच मांसाहार करणारा म्हणजे मनुष्यच नाही असे म्हणणे हा ही मूर्खपणा अस मला वाटत
७. आरक्षण ही संकल्पना मला अगदी मान्य आहे अन वर्षानुवर्षे ज्यांच्यावर अन्याय झालाय त्याना ते देण ही बरोबर हे मला पटत . पण त्याचवेळी ते अगदी करोडपती लोकानाही देण पटत नाही (मी क्रिमि लेयर बद्द्ल नाही तर अगदी धनाढ्य बद्द्ल बोलतोय )

असंख्य उदाहरणे आहेत , कदाचित आठवतील तशी लिहित जाईन . पण सांगायचा मुद्दा इतकाच यात कुठेही मला सगळच बरोबर किंवा सगळच चुकीच वाटत नाही . आता मला हे आता आजच का वाटतय हेही लोक कदाचित विचारतील Happy ? पण खरच हा मुद्दा भाजप / इतर किंवा मोदी/इतर किंवा मराठा/ब्राम्हण/इतर नाहीच आहे . कदाचित अशा मुद्द्यावर मी समजू शकतो ही . पण शाकाहार , दहिहंडी , गोऱक्षक किंवा अगदी सचिन यावर इतक कट्टर असायची गरज आहे का ? की माझच काही चुकतय ? Sad
प्लीज आपली प्रामाणिक मते द्या Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येकालाच वाटतं की स्वतः मध्यममार्गी आहे आणि समोरचा टोकाची भूमिका घेतोय >>
टग्या , तुमचा मुद्दा कळला आणि काहीसा पटला .
पण आजकाल उलट टोकाची भूमिका घेण "इन" झालय अन फेसबुक अन त्यापेक्षाही व्हॉट्सअ‍ॅप जास्त मोठ कारण आहे अस मला वाटत .
शिवाजी महाराजांसारखी दाढी असण , त्यांचा फोटो "डीपी" म्हणून लावण अन त्यानुसार विशिष्ट समूहाला शिव्या तेणे म्हणजे आजकाल गावी ईन आहे . Sad
त्यांच कार्य , त्यांचा इतिहास याची याना काडीची माहिती नाही पण ८ दिवस शिवोत्सव करायचा आहे अन रोज मिरवणूका अन मग त्याचे फोटो अभिमानाने सोशल मिडीयावर Sad

आधी थोडेसे मध्यरात्रीचे तत्वज्ञान -
प्रत्येक गोष्टीला दोन वा दोनापेक्षा अधिक बाजू असतात वा असू शकतात हे प्रत्येकालाच मान्य असते.
प्रत्येक बाजूत प्लसमायनस, फायदे-तोटे, चांगले-वाईट असे कमी अधिक प्रमाणात असते हे देखील मान्य असते.
मग तुम्ही त्यातली जी एक बाजू निवडता ती तुमच्यामते कोणत्या बाजूला चांगल्या बाबींचे पारडे जड आणि वाईट बाबी कमी आहेत यावर अवलंबून असते.
आता ती बाजू सर्वांनी मान्य करणे, आचरणात आणने यामध्येच समाजाचे, देशाचे, स्वकियांचे, सर्वांचेच भले आहे या हेतूनेच तुम्ही त्या बाजूची तळी उचलून धरतात.
मग साहजिकच त्या बाजूचे चांगले गुणच लोकांसमोर आणून ते त्यांच्यावर ठसवले जातात. यात एकाच बाजूने विचार करणे असे काही नसून ओवरऑल योग्य बाजू वाटते तिच्या कमी महत्वाच्या दोषांना कमीच महत्व देत अतिमहत्वाच्या गुणांना हायलाईट करणे एवढाच हेतू असतो.

आता उदाहरण -
पोरगी एका प्रेमाच्या पोरात पडलीय हे बापाला समजते. आता तो बघतो कि पोरगा ईंजिनीअर आहे, हुशार आहे, कमावता आहे. पण तितकाच अट्टल बेवडा आहे, जुगारी आहे, बारा गावच्या भानगडी करणारा आहे. अश्यावेळी तो मुलीचा बाप त्या पोराची हुशारी काय चाटायचीय म्हणत पोरीला त्याचे दुर्गुणच वाचून दाखवणार.
तेच त्याच बापाने तितकाच हुशार, स्वत:च्या पायावर उभा असणारा कर्तुत्ववान मुलगा शोधून आणला जो रुपाने जरा डावा आहे. पण आता मात्र तो त्या हुशारीला प्राधान्य देत त्या पोराच्या कर्तुत्वाचे गुण गात आपल्या मुलीसमोर त्याचा प्रस्ताव ठेवणार.
अर्थात यात पहिल्या केसमध्ये, असलीच चार व्यसने पोराला तर काय बिघडते, पोरगा पोरीला ईतर कसली ददात पडू देणार नाही असा विचार करणारा बापही असू शकतोच.

आता मॉरल ऑफ द स्टोरी -
तर ग्रे शेड ही प्रत्येकाला मान्य असते. पण त्यातील काळा रंग कोणता आणि पांढरा रंग कोणता आणि कोणत्या प्रमाणात हे ज्याचे त्याचे जो तो ठरवतो आणि आपल्यामते ज्या शेडची मेजॉरटी आहे त्याला जगासमोर आणायचा प्रयत्न करतो ईतकेच.

आणि शेवटी सल्ला सूचना विनंती विशेष Happy -
जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत दोन बाजू अश्या दिसत असतील की त्यातील कोणत्या बाजूचे वेटेज जास्त हे तुम्हाला ठरवता येत नसेल तर इटस ओके.
पण हेच वारंवार आणि प्रत्येक गोष्टीत होत असेल, तर आपण ठाम मत बनवायला वा ठाम निर्णय घ्यायला कचरत आहोत का, आपल्याला आपले मत मांडायची आणि त्यानुसार समोरच्याशी वाद घालायची भिती वाटते का, आपण उगाचच कोणालाही न दुखावता फार डिप्लोमॅटीक विचार करू लागलो आहोत का, वगैरे वगैरे तपासून बघणे उत्तम Happy

पण हेच वारंवार आणि प्रत्येक गोष्टीत होत असेल, तर आपण ठाम मत बनवायला वा ठाम निर्णय घ्यायला कचरत आहोत का, आपल्याला आपले मत मांडायची आणि त्यानुसार समोरच्याशी वाद घालायची भिती वाटते का, आपण उगाचच कोणालाही न दुखावता फार डिप्लोमॅटीक विचार करू लागलो आहोत का, वगैरे वगैरे तपासून बघणे उत्तम >>>> धन्यवाद ऋन्मेष, आपण हा चांगला मुद्दा मांडलात. ह्यावर विचार होणे निश्चितच आवश्यक आहे.

बऱ्याच भारतीय लोकांना विचार करायला आवडत नाही आणि विनोदबुद्धी कमी असते. म्हणून दुसऱ्याने केलेला विचार/ मत ते आपलं मानतात. त्यावर स्वतः काही म्हणून विचार करत नाहीत.
विरोधी पार्टीने वेगळं मत मांडलं तर विनोद करूनही आपला मुद्दा मांडता येतो हे कळत नाही, त्यामुळे भावनेला दुखावतात.

आता व्यत्यास आणि कॉनट्रा पॉझिटिव्ह मांडू नका. Proud

.........पण हेच वारंवार आणि प्रत्येक गोष्टीत होत असेल, तर आपण ठाम मत बनवायला वा ठाम निर्णय घ्यायला कचरत आहोत का, आपल्याला आपले मत मांडायची आणि त्यानुसार समोरच्याशी वाद घालायची भिती वाटते का, आपण उगाचच कोणालाही न दुखावता फार डिप्लोमॅटीक विचार करू लागलो आहोत का, वगैरे वगैरे तपासून बघणे उत्तम ............

हे आपल्या रोजच्या जीवनतातल्या गोष्टींबाबत म्हणत असान, जीवनातील घ्यायच्या महत्वाच्या निर्णयाबद्दल म्हणत असान, मतदान करायाचंय तेव्हा म्हणत असान, वगैरे, तर ठीकच हाय. निर्णय घेणे तिथे महत्वाचे हाय, पुढे जाणे म्हत्वाचे हाय.

जगभरात प्रत्येक घडलेल्या गोष्टीत आपण लक्ष घालून त्यात आपले मत व्यक्त केलेच पाहिजे असे नाय, आणि करुच नये असेही नाय. केले तर आजच्या बाबतीत याची चूक अन त्याचे बरोबर, उद्याच्या बाबतीत मात्र त्याची चूक अन याचे बरोबर असे आपले मत बनत असेल तर त्यात काय वाईट किंवा चूक हाय? या अशा बाबतींमध्ये माझे मत जेव्हा कधी याकडुन अन कधी त्याकडुन बनते तेव्हा, लोक कधी मला या टोकाचा अन कधी त्या टोकाचा समजतात, प्रत्येकवेळी मी याचीच कड घेतली पायजे अशी त्यांची अपेक्षा. त्याने मी कन्फ्युज झालो असे लेखकाचे म्हणणे दिसून रायले. त्याने या बाबत काही उदाहरणे चांगली दिली हायेत. त्याची जी मते आहेत तीच ठाम असन्यात काही चूक नाही असे मला वाटते, एक टोक धरुन त्याचेच अनुकरण करत रहाण्याची आवश्यकता नाय.

वादविवादपटु होणे न होणे ही वेगळी गोष्ट हाय. त्यात आपले काही पन मत न बनवता आपन कधी या बाजून अन कधी त्याबाजून वाद घालु शकतो. लॉ कालेजांमधी, विद्यार्थ्यांना एक विषय दिला जातो. त्यावर त्यांना पूर्ण तयारी करायची असते. पण कोणत्या बाजुने बोलायचे, समर्थनात की विरोधात हे शेवटल्या क्षणी सांगितल्या जाते. पण हा विषय इथ लेखकाला अपेक्षीत हाय असं वाटत नाय.

पण हेच वारंवार आणि प्रत्येक गोष्टीत होत असेल, तर आपण ठाम मत बनवायला वा ठाम निर्णय घ्यायला कचरत आहोत का, आपल्याला आपले मत मांडायची आणि त्यानुसार समोरच्याशी वाद घालायची भिती वाटते का, आपण उगाचच कोणालाही न दुखावता फार डिप्लोमॅटीक विचार करू लागलो आहोत का, वगैरे वगैरे तपासून बघणे उत्तम >>
ऋन्मेऽऽष , मुद्दा बरोबर आहे . पण माझ्या मते तुझीही ठाम मत अन टोकाचे मत यात गल्ल्त होतेय

शाकाहार अन मांसाहार दोन्ही सारखेच चांगले . माणसाच्या आवडी , विचार , गरजा , रहायच्या जागा वगैरेवर अवलंबून ज्याला जे हवे ते खावे हा ठाम विचार असू शकत नाही का ?

आणखी एक उदाहरण देतो . माझ्या गावी राहणार्या शाळेतल्या मित्रांचा एक ग्रुप आहे . बाकी सगळ्या बाबतीत ते अगदी नॉर्मल असतात. पण मधूनच फिट असल्यासारख सगळे मुस्लिम पाकिस्तानी , त्यानी तिकडेच गेल पाहिजे वगैरे चालू होत , सपोर्ट म्हणून मॉर्फ्ड चित्रही असतात . दुसरया बाजूच काही ऐकून घ्यायची तयारी नसते . अशावेळी मला काय पर्याय उरतात ?
१. प्रतिवाद करणे : काही उपाय नसतो , कारण ते मुद्द्यावर बोलतच नाहीत
२. ग्रुप सोडून देणे : एक दोनदा करून झालय . मग कोणीतरी समजवायला येतो . मग मी ही विचार करतो की शेवटी मित्रच आहेत
३. दुर्लक्ष करणे : एवढ एकच हातात राहत . याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे मुद्दे नाहीत वा मी घाबरतो . पण खरच झोपेच सोंग घेतलेल्याला जाग करण "वर्थ" आहे अस वाटत नाही

इन फॅक्ट , तिसरा पर्याय प्रत्येक वेळी अवलंबता येत नाही , वा करावासा वाट्त नाही , कारण गाडी वाट्टेल तिथे भरकट्लेली असते , सगळ्यांच भारतातल्या (जगातल्या) सगळ्या समस्या त्यांच्यामुळेच हे एकमत झाल असत अन मला राहवत नाही . आणि मग गटात न बसणारा हा शिक्का बसतो Sad हाच तर खरा प्रॉब्लेम आहे

बा फ, त्यात व्यक्त झालेले विचार, तसेच प्रतिसादही आवडले.

“The problem with the world is that the intelligent people are full of doubts, while the stupid ones are full of confidence.” Charles Bukowski

आणि मग गटात न बसणारा हा शिक्का बसतो, हाच तर खरा प्रॉब्लेम आहे >>>> आणि मग आपणांस जाणीवपूर्वक वेगळे पाडले जाते. झुंडशाही करून, संबंध नसलेल्या गोष्टीतही मुद्दाम त्रास दिला जातो.

चांगला धागा . चांगली चर्चा.
साधारण आपण सगळे गद्धेपंचविशीत असताना काही बाबतीत टोकाची भूमिका घेणारे असतो व ती भूमिका हिरीरीने मांडत असतो. जसे आपले वय वाढत जाते तसे आपण हळूहळू मध्यममार्गी होत जातो. टोकाची भूमिका घेऊन बोलल्याने संपर्कातील माणसे दूराउ शकतात . ते टाळण्यासाठी आपण मध्यममार्गी होतो.

पण कधीकधी मध्यमवयात असेही वाटत असते की ज्या बाबतीत आपण पूर्ण विचारांती एखाद्या बाजूचे झालेलो असतो ( म्हणजे हो/ नाही ) ती बाजू आपण कधीच इतरांसमोर मांडायची नाही का ? तर इथे जरा सोयीने वागावे लागते. समजा आपल्याबरोबर चर्चा करणारी माणसे जर आपली अगदी जवळची नातेवाईक असतील किंवा आपल्या नोकरी-व्यवसायातील वरिष्ठ / ग्राहक असतील तर मात्र इथे नाईलाजाने मध्यममार्गी व्हावे लागते.

पण जरका अशी माणसे ही केवळ आपले सहप्रवासी अथवा तात्पुरत्या संबंधातील असतील तर मात्र आपल्या जिव्हाळ्याच्या विषयातली आपली जी काही आंतरिक भूमिका असते (जरी लोकांना ती टोकाची वाटली तरी ) ती मुक्तपणे मांडावी. अन्यथा आयुष्यभर सतत गुळमुळीत किंवा कुंपणावरचे राहण्यात तरी काय मजा आहे ?

आणि ....... अशा मुक्त अभिव्यक्तीसाठी तर आंतरजालावरची संस्थळे उपलब्ध आहेत ना !

श्रीयुत. केदार जाधव...लेखन आवडले.
मी पण याच पंथात.
सगळेच प्रतिसाद आवडले (वरिल न्यायानेच..दोन्ही बाजु पटतात)
१) रीयालिटी शो बद्दल हि असे काहिसे वाटते...उंदड झाले.. भारतीय फ़क्त गायक अथवा नर्तकच होणार काय? आणि टॅलेन्ट ला वाव ही मिळायलाच हवा असे हि वाटते.
२) कुठल्याही कार्यक्रमाला वेळेवर जावेच ..पण आपणच पहिले...मग यजमान ही वेळ पाळत नाहित याचा राग ही येतो. निवांत जावे तर ते ही पटत नाही.
३) २५ वर्षांनी भेटलेले शाळा सोबती ५ वेळेला प्रार्थना करतातच म्हणजे अगदी कट्टर असणार असे ही वाटते...मग स्वत: कडे पाहिले की वाटते आपणही आता देव देव करतोच की हे ही कळते.
४) कोणाला डोक्यावर घेतेलेले ही आवडत नाही आणि उगाच नावे ठेवणे ही आवडत नाही (मोदीही पटतात आणि मनमोहन सिंग हि...पण राजकारण च आवडत नाहि :))

म्हणुन मग आम्ही ही मध्यम मार्गी च Happy

बऱ्याच मुद्द्यांशी सहमत.
आपण एका बाजूला झुकतो, ही अडचण नसून, आपण ज्या बाजूचे आहोत तीच बरोबर आहे - ही खरी अडचण आहे. आपल्या बाजूचेच बरोबर, अशी धारणा स्वतःशी करून आपण अहंकाराला कुरवाळत बसतो.
अश्या गोष्टींपासून मनाला दूर ठेवायचे, तर स्वानुभवापेक्षा दुसरा चांगला उपाय नाही.

आपली मते बनतात, ती आपल्या अनुभवावरून. मग इतरांनी ढिगाने पुरावे दिले (मग ते कितीही खरे असेनात का), तरी आपले मन त्यादिशेने वळत नाही. अशा वेळी मग आपण विचार करावा, आपण त्या जागी असू, तर कसे वागू ?
आपण आपल्या भोवतालच्या परिस्थितीविषयी मते बनवतो, पण प्रत्यक्षात इतर असंख्य मतप्रवाह, वेगवेगळ्या ठिकाणचे/लोकांचे अनुभव, बदलणारा परिसर यांच्याविषयी आपल्याला जराही माहिती नसते.
आज मी जर मांसाहाराचा कट्टर समर्थक असेन , पण उद्या जगातला एकूण एक प्राणी नाहीसा झाला, तर मी काय करणार?? झक मारत मला शाकाहारी बनावे लागेल. आपल्या भोवतालची परिस्थिती बदलली, की हळूहळू आपली मते त्यानुसार बदलत जातात.

बऱ्याचदा कुठलीही बाजू मांडताना शतकांपूर्वीच्या इतिहासातले दाखले दिले जातात. पण असे संदर्भ फार कमी वेळा प्रत्यक्ष आताच्या वेळी जसेच्या तसे लागू करता येतात, कारण परिस्थितीत पडलेला आमूलाग्र बदल.
बदल हाच निसर्गाचा स्थायीभाव आहे, अन आपले नियम, तर्क आणि मते त्याच्याच अधीन आहेत. तेव्हा एकच एक मत सदासर्वदा धरून ठेवणे, निव्वळ अशक्य आहे.

माझ्या मते तरी मध्यममार्ग ही स्वतःच्या कट्टर तत्वांशी केलेली तडजोड नसून, इतर तत्वांबरोबर केलेली हातमिळवणी आहे.

केदारजी, तुम्ही अगदी योग्य मार्गावर चालला आहात. अध्यात्मात ह्यालाच योगसाधना म्हणत असावेत : Light 1

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः |
उभयोरपि दृष्टोsन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः |

अर्थातच ह्या मार्गावरून चालतांना मानसिक शांती अत्यावश्यक असते. अन्यथा तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येकाबरोबर तुमची भांडणं होच रहातील. पण ह्याची खात्री बाळगा की तुम्ही एकटे नाही, तुमच्यासारखे अनेकजण असेच दोन्ही बाजूच्या असहिष्णुतेला विरोध करत असतात. तुमची मतं अगदी जगावेगळी नक्कीच नाहीत. उदा. डिफेन्सवाल्यांचं आजच्या press conference मधलं स्टेटमेंट पहा. आमच्या गटातल्या काहींजणांना ही अगडबंब आकाराच्या सरदारजींनी मारलेली लोणकढी थाप वाटते, आता बोला ! Proud
http://supersamir.blogspot.in

Pages