कंबरबॅचला लावलेले प्रेम अर्थात Cumberbitching आरोग्याला अपायकारण असते का?

Submitted by भास्कराचार्य on 23 August, 2016 - 09:57

हल्ली सगळीकडेच जो कंबरबॅच आपल्याला दिसतो, त्यावर प्रेम होऊ लागलेले दिसते. माझ्या कॉलेजमधील चायनीज मुली इंग्लिश फारसं काही बघत नाहीत, पण असे केल्याने आयुष्यातील रस आणि मजा निघून जाते. पण, कंबरबॅचवर जे प्रेम जडलेले असते, ते डोक्यात जात नाही.

खरेचं हे प्रेम आरोग्याला हानीकारण असते का? मी तर कुठलाही भाग कट न करता तसेच एपिसोड्स बघतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कंबरबॅचला फारसं पाहिलेलं नाही. त्याच्याबद्दल वाचण्यात मला फारसा इंटरेस्ट नाही.

मग तुम्ही शहाण्या आहात. बर्‍याच जणांना तेव्हढी समज नसते.

मी कंबरबॅचला फारसं पाहिलेलं नाही. त्याच्याबद्दल वाचण्यात मला फारसा इंटरेस्ट नाही.

स्वानुभवावरून सांगतो - तुमचे काSहि बिघडले नाही. विचारात परिपक्वता आली असल्याचे लक्षण आहे ते.

सोनू गूगल तर सगळेच वापरतात. पण मला मायबोलीवर विचारायला आपलेपणा वाटतो. येथे माणसे आपली वाटतात.

साधना, मी पाच मिनिटे गरम पाण्यात ठेवून पाहिले. कुठलेही प्रेम निघाले नाही.

काहीही Happy एकदम मुपी फील आला प्रतिक्रिया वाचून. Happy

आणि अपायकारण आणि हानिकारण हेच शब्द बरोबर आहेत. पण भास्कराचार्य कंबरबॅच तामसी आहे त्याचा जपून वापर करावा. त्याने योगाला अडथळे येउ शकतात (जर तुम्ही करत असाल तर). आता लगेच काही आयडी ह्याचा पुरावा मागतील. सध्या कामात आहे नंतर देइन पुरावे.

प्रेम बघायला मानवी डोळे चालत नाहीत, मन कि आँखे पाहिजेत. तुम्ही गरम पाण्यात टाकून प्रेमाला वितळवलेत, ते वितळलेले प्रेम पानी तेरा रंग कैसा करत ज्या पाण्यात वितळवलेत त्या पाण्याचे होऊन गेले. आता मानवी डोळे कसे बघतील हे प्रेम? आता नवीन बाफ उघडू नका प्लिज, प्रेम कसे बघावे यावर.

मी अझरबैझानला काम करायचो तेंव्हा हाच प्र्श्न मला लेबनेईज (हाच उच्चार बरोबर आहे) कलाकार मुस्ताफा ओलांदेच्या संदर्भात पडला होता. पण मी प्रसिद्ध गायिका सुलक्षणा कनमाडीकर यांची भक्तीगीते ऐकल्यावर त्रास कमी झाला. त्या माझ्या मामेबहिणीच्या शेजारी राहायच्या, त्याकाळी तिथे फणसाच्या मुळाची भजी अप्रतिम मिळायची.

आगाऊदा.,
कृप्या, कृप्या पुढच्या सोमवारी आफ्रिकन फणसाच्या मूळांची भजी, उरलेल्या भजीच्या पीठाचा झेकोस्लोव्हियन पराठा, उरलेल्या पराठ्याचे आर्मेनियन नूडल्स नक्की टाका.

आगाऊ अशी भे(स्)ळ नाही करायची...

स्वतंत्र धागा काढायच्या मटेरियल ला यथायोग्य न्याय दियाला होवा

हर्पेन तुम्ही कुणाच्या आदेशाने माझ्या चुका काढत आहात हे मला माहिती आहे. Proud

बाबो, आता हर्पेनला इंग्रजीतुन विपु येणार का ? Proud

आगाऊ | 24 August, 2016 - 16:01 नवीन
मी अझरबैझानला काम करायचो तेंव्हा हाच प्र्श्न मला लेबनेईज (हाच उच्चार बरोबर आहे) कलाकार मुस्ताफा ओलांदेच्या संदर्भात पडला होता. पण मी प्रसिद्ध गायिका सुलक्षणा कनमाडीकर यांची भक्तीगीते ऐकल्यावर त्रास कमी झाला. त्या माझ्या मामेबहिणीच्या शेजारी राहायच्या, त्याकाळी तिथे फणसाच्या मुळाची भजी अप्रतिम मिळायची.
प्रतिसादचक्रम | 24 August, 2016 - 17:14 नवीन
आगाऊदा.,
कृप्या, कृप्या पुढच्या सोमवारी आफ्रिकन फणसाच्या मूळांची भजी, उरलेल्या भजीच्या पीठाचा झेकोस्लोव्हियन पराठा, उरलेल्या पराठ्याचे आर्मेनियन नूडल्स नक्की टाका.>>> Rofl

आगाऊ, छान आठवण सांगितलीस तू. चक्रम, तू सांगितलेल्या पदार्थांची नावचं मी ऐकली नव्हती. तू करतोस का ते पदार्थ?

लंपन, कंबरबॅचला बघितलं, की माझा श्वास छातीतच अडकतो. ह्रूदय वरखाली होतं. म्हणून योगाला त्रास होतो. तुझं बरोबर आहे.

आगाऊदा.,
कृप्या, कृप्या पुढच्या सोमवारी आफ्रिकन फणसाच्या मूळांची भजी, उरलेल्या भजीच्या पीठाचा झेकोस्लोव्हियन पराठा, उरलेल्या पराठ्याचे आर्मेनियन नूडल्स नक्की टाका.>>> Rofl

ते कंबरबॅचला लावलेले वाचुन मला माझी मुलगी स्कुम युनिफॉर्म च्या कंबरेच्या पट्ट्याला जो बॅच / बक्कल लावते तेच नजरेसमोर येतंय सारखं.

सस्मित असाच मला खरा बेनेडिक्ट कंबरबॅच सारखा नजरेसमोर येतो. त्याच्या पालकांनी विचार केला नसेल का असे कन्फ्युजिंग नाव ठेवताना. ते जुने बर्थ सर्टिफिकेट आहे का कुठे अजून. Happy

अवनी, मुक्तपीठीय म्हणजे काय? मी विकतचेच पीठ वापरतो. इकडे कोसॅक व्यापार्‍यांच्या दुकानात छान मिळते.

आपली कंबर (म्हणजे कंबर हा शब्द) त्यांना माहित नाही म्हणुन असं नाव ठेवताना त्यांना काही अयोग्य वाटलं नाही जे आपल्याला कंबर माहित असल्याने वाटतंय.

Pages