कंबरबॅचला लावलेले प्रेम अर्थात Cumberbitching आरोग्याला अपायकारण असते का?

Submitted by भास्कराचार्य on 23 August, 2016 - 09:57

हल्ली सगळीकडेच जो कंबरबॅच आपल्याला दिसतो, त्यावर प्रेम होऊ लागलेले दिसते. माझ्या कॉलेजमधील चायनीज मुली इंग्लिश फारसं काही बघत नाहीत, पण असे केल्याने आयुष्यातील रस आणि मजा निघून जाते. पण, कंबरबॅचवर जे प्रेम जडलेले असते, ते डोक्यात जात नाही.

खरेचं हे प्रेम आरोग्याला हानीकारण असते का? मी तर कुठलाही भाग कट न करता तसेच एपिसोड्स बघतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंबरबॅचचा नविन चित्रपट येतोय डॉ. स्ट्रेंज .. नक्की बघा.

बाकी त्याच्यावर किती वेळ खर्च करायचा तो वैयक्तीक मामल आहे. एका वेळेस एकच पहावा एकदम ३ - ३ पाहिले तर अजीर्ण होण्याचा धोका संभवतो Wink

अहो सगळीकडे दिसत नाही हीच व्यथा आहे. डिसेंबरात दर्शन दिलं होतं त्यानंतर ८ महिन्याचा विरह झाला आहे!

मी कंबरबॅचवर पिअर प्रेशर असूनही अजिबात प्रेम केलेलं नाही. माझी काही हानी झाल्याचे जाणवत नाही.

पण तुम्ही दिवसातून तीनदा कंबरबॅचचा सिनेमा किंवा सिरिअल पाहता का? तरच तुमचा प्रश्न व्हॅलिड आहे.

सायो, मग कंबरबॅच वर अ‍ॅक्यु(ट्)प्रेशर मुळे काही फरक पडतो का बघायला सांगायला हवे भां ना.

भाचा तुम्ही आमेरिकेला रहाता ना. मग कशाला काळजी करताय?

आमेरिकन सरकार नक्कीच त्यांच्या नागरीकांची काळजी घेत असणार. तो कंबरबॅच जर आमेरिकेच्या टिव्हीवर बघायला परवानगी मिळत असेल तर नक्कीच प्रेम करायला योग्य असणार. तुम्ही व्यवस्थित चांगल्या एल सी डी टिव्हीवर बघून घेत असणार हे अ‍ॅझंपशन.

-- सोचा!

साती Lol

प्रेमाची लावणी करताना पाऊस आला तर डोक्यावर इरलं घ्या मग आरोग्याला काही होणार नाही अन्यथा सर्दी होण्याचा संभव आहे.

जेवण अन नाश्त्याच्या नंतर बघत जावा, म्हणजे कॅलरी इन्टेक कमी होणार नाही, बघुन मग जेवण /नाश्ता केल्यास खाण्यात लक्ष लागणार नाही हे गृहीत धरलं तर.

मी प्रेम न लावता बघतो. आपल्याकडं भरोसा नाही, केव्हा वीज जाईल, अन एपिसोड मिस होईल ते.

कंबरबॅच प्रेमाची लागण झाल्यामुळे योगा करताणा मान सदैव tv स्क्रीनकडेच वळते हा भारीच मोठा त्रास आहे. :p

चांगलेय ना मॅगी. मान टिव्हीकडे वळवण्यापेक्षा, टिव्हीकडे बघत राहुन अंग वळवून त्या त्या योगाची पोझ अचिव्ह करावी. खूप फायदा होतो. (भाउ नमसकर यावर व्यंगचित्र टाकु शकतील ;)).
अर्थात भ्रमरी प्राणायामाला तिलांजली द्यावी लागते, प्रेमात एवढा तरी त्याग हवाच.

कंबरबॅचला लावलेले प्रेम अर्थात Cumberbitching आरोग्याला अपायकारण असते का? >>> तो थोडा गणपत पाटील वाटतो . Proud

आमच्यात कंबरबॅच ला प्रेम बिंम चिकटलेले नसते, पूर्वीच्या काळी जेरेमी ब्रेट मिळायचे त्याच्यावर खूप प्रेम चिकटलेले असायचे, हल्ली तसे जेरेमी हल्ली मिळत नाहीत.
बाकी अपायकारक नाही.

साती, मी एलसीडीवरच बघतो, पण तरी इथले नागरिक साशंक आहेत. मी दिवसातून तीनदा एपिसोड्स बघतो. तुम्ही सगळेही कंबरप्रिय दिसता.

Pages