पूर्वी हृतिक रोशन मला विशेष आवडायचा नाही. 'कहो ना प्यार हैं' हा एक 'जस्ट अनदर मूव्ही' होता आणि त्यातला हृतिकसुद्धा 'जस्ट अनदर स्टार किड'. पण नंतरच्या ३-४ सिनेमांत त्याने जरा वेगळेपणा दाखवला. मात्र लगेच पाठोपाठ ६-७ सुमार सिनेमेही केले. त्यामुळे त्याच्याबद्दल विशेष कुतूहल कधी वाटायचं नाही.
पण फरहान अख्तरच्या 'लक्ष्य' नंतर तो बदलला बहुतेक. त्यापुढचे त्याचे धूम, क्रिश, काईट्स, जोधा अकबर, जिंदगी ना मिलेगी दोबारा, गुजारीश मी आवर्जून पाहिले आणि मला तो आवडायला लागला. हो, 'बँग बँग' सुद्धा पाहिला मी ! आणि लगेच तो त्याला माफही करून टाकला ! हृतिकच्या अभिनयाला मर्यादा आहेत. तरीही तो स्वत:ला आव्हानं देण्यात कमी पडत नाही. नुसती आव्हानंच देत नाही, तर स्वत:च स्वत:ला दिलेल्या ह्या आव्हानांना यशस्वीपणे सामोरं जाण्यासाठी तो मेहनतही घेतो. भले त्यात त्याला यश मिळो अथवा न मिळो. पण त्याचा प्रयत्न मात्र कधी कमी पडलेला वाटत नाही.
ह्या आठवड्यात 'रुस्तम' आणि 'मोहेंजोदडो' एकत्रच रिलीज झाले. अक्षय कुमार आणि हृतिक दोघेही आवडते. दोन्ही सिनेमे पाहायचे होते. पण रिलीज होण्याआधीपासूनच 'रुस्तम'ची स्तुती आणि 'मोहेंजोदडो'वर टीका सुरु झाली. हे म्हणजे 'पोटात पोर अन् बाहेर बारसं' अश्यातला प्रकार होता. 'मोहेंजोदडो'चं अक्षरश: बिनडोक ट्रेलर पाहून खरं तर माझंही डोकं फिरलंच होतं.
'फर्क हैं महम, तुझे मोहेंजोदड़ो पर राज्य करना हैं और मुझे सेवा'
'इस नगर से कोई नाता हैं मेरा'
'यह मेरा नगर हैं. मोहेंजोदड़ो !'
असे सगळं कथानक उघड करणारे संवाद ट्रेलरमध्ये घेण्याचा मूर्खपणा कुणी कसं काय करू शकतं ? पण केला तर होताच. त्यामुळे लोकांची सिनेमाबद्दलची अर्धी उत्सुकता संपून गेली होती. त्यानंतर सिनेमातल्या पात्रांचे कपडेपट, इतर वेशभूषा, बोली, संगीत, नृत्यं वगैरे बाबींवर टीका करून ह्या 'पिरीयड ड्रामा' ची अगदी टिंगल केली गेली. इतकं, की हे सगळं जाणीवपूर्वक, ठरवून केलं जात आहे की काय, असा संशय यावा !
पण माझं नक्की ठरलेलं होतं. मी रुस्तम आणि मोहेंजोदडो, दोन्ही बघणार होतो. नेमकं शुक्रवार ते रविवार बाहेरगावी जावं लागल्याने ते वेळेत जमलं नाही. तरी परत आल्यावर दोन्ही सिनेमे आवर्जून पाहिले. माझे अंदाज खरे ठरले. 'रुस्तम'ला उगीच डोक्यावर घेतलं गेलं आहे आणि 'मोहेंजोदडो'ला उगीच लाथाडलं गेलं आहे. प्रत्यक्षात दोघेही सारखेच चांगले आहेत किंवा सारखेच वाईट आहेत. किंबहुना, दोघेही सारखेच 'सामान्य' आहेत.
'मोहेंजोदडो'चं कथानक सांगायची काही आवश्यकता नाहीच आहे. बिनडोक ट्रेलर्समधून ते आधीच सर्वांना समजलेलं आहे. तरी एक औपचारिकता !
'मोहेंजोदडो' ह्या नगरावर महम (कबीर बेदी) ची हुकुमत चालते आहे. ही सत्ता त्याने ती दगाफटका करून बळकावलेली असते. जवळपासच्या लहान लहान गावांतून व्यापारी, शेतकरी मोहेंजोदडो नगरात आपल्या व्यवसायासाठी येत असतात. तसाच 'आम्री' गावातून 'सर्मन' (हृतिक रोशन) येतो. ही कहाणी त्याचीच आहे. इथे आल्यावर त्याला दिसतं की ह्या अत्याचारी राजवटीमुळे इथला सामान्य माणूस खंगत चालला आहे. त्याला जाणवतं की ह्या जागेशी त्याचं काही तरी जुनं आणि घट्ट नातं आहे.
हे नातं नक्की काय आहे, हे आपल्याला आधीपासूनच माहित असतंच. पण ज्या प्रकारे ते उघड केलं जातं, ते इतकं बाळबोधपणे आहे की काय सांगावं ! भले तुमचा सस्पेन्स कितीही फुसका असला, तरी तो कहाणीचा गाभा आहे ना ? त्याला काही महत्व नको द्यायला ? ती गोष्ट खुद्द सर्मनला समजते तो प्रसंग तर बाळबोध आहेच, पण जेव्हा सर्मनचं सत्य सगळ्या नगरवासियांना सांगितलं जातं, तो प्रसंग तर अजूनच फुसका बार झाला आहे. एक तर असंच सगळं कथानक आपण आधी अनेकदा पाहून झालेलं आहे. नुकतंच 'बाहुबली'नेही हीच कहाणी मोठ्या रंजकतेने (अर्धीच) सांगितली आहे. त्यात तुमची प्रसिद्धी सपशेल गंडली आहे. त्यात तुमच्यावर उतावळी टीका होते आहे आणि असं सगळं असताना तुम्ही स्वत:च तुमच्या सादरीकरणात गटांगळ्या खात आहात. आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास !
खरं तर सिनेमाची सुरुवात खूप रोमांचक होते आणि एकंदरीतच सगळेच अॅक्शन सीक्वेन्सेस मस्त जमून आले आहेत. शेवटी शेवटी व्हीएफएक्स जरासं कमी पडले आहेत, पण तेही अगदीच पिचकवणी झालेले नाहीत. शेवट तर चांगलाच नाट्यमयही झाला आहे. 'पाण्यातून झेप मारुन बाहेर येणारी मगर' हाही एक विनोदाचा विषय झाला होता, पण तो प्रसंगही जबरदस्त झाला आहे.
जे प्रचंड फसलं आहे ते म्हणजे कथाकथन आणि संगीत.
कथानक त्याच त्या ठराविक वळणांनी जात राहतं. तेच ते पहिल्या नजरेत प्रेमात पडणं, तेच ते खलनायकाने प्रेयसी-प्रियकराच्या मार्गातला अडसर बनणं, तोच तो विश्वासघात, तोच तो जन-उठाव आणि तीच ती अच्छाई वि. बुराई अशी लढाई. पण एक चांगला दिग्दर्शक, एक नेहमीचंच कथानकही वेगळ्या प्रकारे सांगून रोचक, रंजक बनवू शकतो. गोवारीकरांचं गणित नेमकं काय होतं, कुणास ठाऊक !
संगीत तर रहमानसाठी लाजीरवाणं आहे, असंच क्षणभर वाटलं. पण पुढच्याच क्षणी मला 'जब तक है जान' आठवला. त्याहून जरा(संच) बरं, इतकीच समाधानाची बाब ! शब्द जावेद अख्तर साहेबांचे आहेत, ही अजून एक आश्चर्यमिश्रीत निराशा. खरं तर दोनच गाणी आहेत सिनेमात आणि एरव्ही ती दुर्लक्षितही केली असती. पण रहमान आणि अख्तर असताना ते जमत नाही. You expect something far better. गाणं सुरु झालं की कधी एकदा संपतंय, असं वाटणं ह्यासाठी रहमान आणि अख्तर जन्मले नाहीत. त्यासाठी इतर बरीच भुक्कड पिलावळ आहे की !
नवा चेहरा (हिंदीसाठी) पूजा हेगडे, 'चेहरा' म्हणूनच चांगला आहे. बाकी सगळा आनंदी आनंदच आहे. तर घसा खरवडून खरवडून बोलणारा कबीर बेदीही खूप थकलेला जाणवतो. अरुणोदय सिंग व इतर सहाय्यक कलाकार आपापलं काम व्यवस्थित करतात. विशेष लक्षात राहणारं असं कुणी नाही.
हृतिक रोशन मात्र पुन्हा एकदा त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांनी मन जिंकतो. हे काही त्याचं सर्वोत्तम काम म्हणता येणार नाही पण कुठे काही कमी तरी पडणार नाही, ह्याची त्याने काळजी नक्कीच घेतलेली आहे.
All in all, 'मोहेंजोदडो चांगला आहे की वाईट ?' Let's say, Average. तरी दोन गोष्टींवर बोलणं महत्वाचं वाटतंय -
१. मोहेंजोदडोवर झालेली प्रदर्शनपूर्व टीका
ही सगळी टीका पात्रांचे कपडेपट, इतर वेशभूषा, बोली, संगीत, नृत्यं वगैरे बाबींवर होती. त्या काळात कपड्यांना शिवण नसे, नुसतं एखादं कापडच गुंडाळत, नक्षीकाम, प्रिंटींग तर अगदीच नसे; ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहे. तरी सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून हे सगळं समजून घ्यायला हरकत नसावी. तर संगीत, नृत्यं ह्या तर खूपच किरकोळ गोष्टी आहेत. खरं सिनेमावर टीका करण्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत. बुळबुळीत कथानक, त्याचं बोथट कथन, काही लोकांचं सामान्य दर्ज्याचं काम ह्यांवर बोला की. मात्र त्यांवर बोलण्यासाठी आधी तो पाहायला तर हवा !
२. रुस्तम वि. मोहेंजोदडो
दोन्ही सिनेमे पूर्णपणे वेगळ्या धाटणीचे असले, तरी त्यांची तुलना स्वाभाविक आहे कारण बॉक्स ऑफिसवर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. उणीवा रुस्तममध्येही आहेत आणि मोहेंजोदडोमध्येही. 'रुस्तम' हा त्या मानाने कमी आव्हानात्मक विषय होता असं मी म्हणीन. त्याला एका सत्यघटनेची पार्श्वभूमी होती, त्यामुळे कथानक बहुतांश तयारच होतं. 'मोहेंजोदडो' जास्त आव्हानात्मक होता कारण सगळंच अगदी शून्यातून तयार करायचं होतं. 'पिरीयड ड्रामा' दोन्ही आहेत. संगीत आणि कथाकथनही दोन्हींचं फसलं आहे. पण दोन्हींचा विचार केला तर 'सृजनशील प्रायोगिकता' ही 'मोहेंजोदडो'मध्ये जास्त आहे. सत्यघटनांवर, पात्रांवर आधारित सिनेमांचं तर सध्या पीकच आलं आहे. रुस्तमने कोणता मोठा तीर मारला आहे ? धाडस एखाद्या अस्पर्श्य कथानकाला हात घालण्यात जास्त आहे. ते गोवारीकरांनी केलं आहे. एखादा ऐतिहासिक सिनेमा बनवणं वेगळं आणि एखाद्या अगदी प्राचीन काळाला पूर्णपणे improvise करणं वेगळं. हे भारतात तरी सहसा कुणी करायला धजावत नाही. कारण भरमसाट संदर्भ उपलब्ध असलेला ऐतिहासिक विषयच आपल्याला झेपत नाही. भन्साळीचा बाजीराव 'वाट लावली' करत मवाली नृत्य करतो आपल्याकडे !
असो.
एक मात्र खरं आहे, अजून खूप चांगलं करता आलं असतं आणि करायला हवंही होतं.
पण ह्या हिंमतीसाठी तरी दाद द्यायला हवी ना ?
मी तरी देतो आणि रुस्तमपेक्षा मोहेंजोदडोची शिफारस करतो.
रेटिंग - * * १/२
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/08/movie-review-mohenjo-daro.html
या न्यायाने भन्साळीला सुद्धा
या न्यायाने भन्साळीला सुद्धा हिमतीचे मार्क्स दिले पाहिजेत.
नाही दिले का ?
नाही दिले का ?
पण ह्या हिंमतीसाठी तरी दाद
पण ह्या हिंमतीसाठी तरी दाद द्यायला हवी ना ?
मी तरी देतो आणि रुस्तमपेक्षा मोहेंजोदडोची शिफारस करतो.> तुमचं वेगळंच कायतरी.
पण ह्या हिंमतीसाठी तरी दाद
पण ह्या हिंमतीसाठी तरी दाद द्यायला हवी ना ?
मी तरी देतो आणि रुस्तमपेक्षा मोहेंजोदडोची शिफारस करतो.>>>>>
तुलना नकोच .. त्यामुळे उगाच सगळ वादग्रस्त होतं
मग रुस्तम आवडणारे लगेच इथे येणार .. मोहेंजोदडो वाले बचाव करणार
रुस्तम आणि मोहेंजोदडो किती फरक आहे
एकत्र आले म्हणुन काय ना..
लोकं दोन्ही बघतिल की
सस्मित | 17 August, 2016 -
सस्मित | 17 August, 2016 - 16:28
पण ह्या हिंमतीसाठी तरी दाद द्यायला हवी ना ?
मी तरी देतो आणि रुस्तमपेक्षा मोहेंजोदडोची शिफारस करतो.> तुमचं वेगळंच कायतरी. स्मित
>>
असतंयच !
_आनंदी_ | 17 August, 2016 -
_आनंदी_ | 17 August, 2016 - 16:46
पण ह्या हिंमतीसाठी तरी दाद द्यायला हवी ना ?
मी तरी देतो आणि रुस्तमपेक्षा मोहेंजोदडोची शिफारस करतो.>>>>>
तुलना नकोच .. त्यामुळे उगाच सगळ वादग्रस्त होतं
>>
मान्य आहे. पण तुलना होणारच. जाणीवपूर्वक खच्चीकरण केल्यासारखं चालू आहे मोहेंजोदडोबाबत. अजून पहिला आठवडाही झालेला नाही सिनेमाचा आणि विकीवर अक्षरश: सीन-टू-सीन सिनेमा सांगितला आहे, अगदी शेवटासकट, शेवटाच्या शेवटापर्यंत !
एचडी प्रिंट तर कधीच लीक झाली आहेच.
Something is cooking for sure
(No subject)
काल ट्रेनमधे माझ्या बाजुची
काल ट्रेनमधे माझ्या बाजुची बाई मोबिल्यात मो दा बघत होती. मग मी पण शेजारी बसल्याचं कर्तव्य निभावुन जरा जरा अशी दोनदा डोकावले तर मला किशोरी शहाणे चक्क ऑफ शोल्डर (एकच शोल्डर ऑफ) वन पीस मधे दिसली. काय बोलत होती ते काही कळलं नाही (अर्थात हेड्फोन बाजुचीच्या कानात होते.) पण एकंदर हातवार्यावरुन हृतिक बहिरा आहे की काय चित्रप्टात अशी मला शंका आली.
हृतिक मात्र नेहमीसारखाच मस्त दिसतोय. हॅन्डसम हंक.
मी बघणार आहेच. पण सहज मनात
मी बघणार आहेच.
पण सहज मनात आले त्या काळातले कथानक तरी कुठे उपलब्ध आहे ? जे कथानक घ्यायचे ते काल्पनिकच असायला हवे, पण मग बाकिच्या तपशीलात काळ उभा करता आला असता, तिथे हा चित्रपट कमी पडला असे वाटते.
त्या काळात काका काकू हे नाते तरी मानले जात होते का ? निळीचे उत्पादन होत होते का ? उत्सव चित्रपटात जाणून बुजून निळा रंग कपड्यासाठी वापरला नव्हता, मग हा काळ तर त्यापेक्षाही जूना. उत्सव मधेही शिवलेले कपडे नव्हते.
मी अलिकडेच एका इंग्रजी चित्रपटात, पार्टींग ऑफ द रेड सी, चे अफलातून चित्रण पाहिले, त्या मानाने हा चित्रपट त्या बाबतीत कमी वाटतोय.
तरी पण बघणारच.
एचडी प्रिंट तर कधीच लीक झाली
एचडी प्रिंट तर कधीच लीक झाली आहेच. >> for Rustom also it is available. People doing Piercy don't discriminate
पहिल्यांदा रसप यांच्या
पहिल्यांदा रसप यांच्या परिक्षणाशी सहमत।।।
विकेंडला मुलांना घेऊन एखादा
विकेंडला मुलांना घेऊन एखादा सिनेमा बघायचा होता. रुस्तम बघण्याची इच्छा होती पण मुलांना कळणार्/आवडणार (खून बीन) नाही आणि मोहेंदोजारो कदाचित अॅक्शन वगैरेमुळे बरा वाटेल म्हणून मोदाला गेलो. मी कुठलंही ट्रेलर बघीतलं नव्हतं. जायच्या आधी रिव्ह्यूज पाहीले, त्यात मोहेंदोजारोला काही खास रिव्ह्यूज दिसले नाही. पण पाटी कोरी ठेऊन, अपेक्षा न ठेवता जायचं एवढंच ठरवलं.
चित्रपट किती सुमार असावा ह्यांचं चांगलं उदाहरण म्हणजे मोदा वाटलं. कुठे काही कशाचीही छापच पडत नाही. संगीतही __वा ई ट____. कथा फुलवत नेणं वगैरे सगळं बाद... सेट्स, कपडे वगैरेही आवडले नाही. हिरवीण मिरवण्याशिवाय काहीही करत नाही. गोवारीकरला शेवटी हिरोकडून काहीतरी इनोव्हेटीव्ह करुन घायला आवडतं त्यामुळे स्वदेस मध्ये मोहन जसा एलेक्ट्रीसिटी जनरेट करतो तसा इथे हिरो नदीवर पूल बांधतो. पण स्वदेसची स्टोरी कशी छान फुलवते नेली आहे, त्यात सगळ्यांकडून चांगली अॅक्टींग करुन घेतलीये तसं इथे काही वाटतंच नाही. सिनेमा सुरु होतो, रटाळपणे चालतो आणि संपतो.
त्यातल्या त्यात मोठ्याला सुरुवातीचा मगरीचा सीन, ती जोको बकर का बोका बकर का कोणी तरी बकर बरोबरची फाईट आणि शेवटाचा सीन आवडला हेच समाधान घेऊन आम्ही घरी आलो (एकाने तरी १०% सिनेमा एंजॉय केला एवढच काय ते).
त्या काळात काका काकू हे नाते
त्या काळात काका काकू हे नाते तरी मानले जात होते का ? निळीचे उत्पादन होत होते का ? उत्सव चित्रपटात जाणून बुजून निळा रंग कपड्यासाठी वापरला नव्हता, मग हा काळ तर त्यापेक्षाही जूना. उत्सव मधेही शिवलेले कपडे नव्हते. >>>>
सहमत. निळीचे उत्पादन खूप नंतरच्या काळात झाले. उत्सवमधे निळे कपडे नव्हते, तसेच मला वाटतं चंद्रप्रकाश द्विवेदींच्या चाणक्य मालिकेतही बहुतेक निळे कपडे नव्हते, बहुतेक कपडे पांढरे, करडे, पिवळे, केशरी अशा छ्टांमधले होते, त्यातही कपड्यांना शिवण नव्हती आणि तो काळ अस्सल उभा केला होता. मोहेंजोदारोला सर्व benefit of doubt देऊनही शिवलेले जरदोसी डिझायनर कपडे घातलेली, मॉड मेकप केलेली, केस shampoo, conditioner वापरून सेट केलेली अशी नायिका दाखवली तर चित्रपटाविषयी प्रथम मत काय होईल?
.
अरे वा ! बर्याच दिवसांनी
अरे वा ! बर्याच दिवसांनी रसपच्या परिक्षणाशी सहमत.
त्यातल्या गाण्यांच्या बाबतीत रहमान फिका पडला असला तरी जे लिरिक्स विरहीत नुसते आवाज आणि संगिताचे प्रयोग केले आहेत ते अगदी उच्च आहेत. ते खुप मस्त वाटतात. ते बर्याचदा बॅकग्राऊंडला येतात त्यामुळे इतके ठळकपणे कदाचीत कळणार नाहीत.
कुठलाही पिक्चर इतका नविन असताना थिएटर मध्ये जाऊन बघावा असे माझे प्रामाणिक मत आहे.
त्या काळात काका काकू हे नाते
त्या काळात काका काकू हे नाते तरी मानले जात होते का ? निळीचे उत्पादन होत होते का ? उत्सव चित्रपटात जाणून बुजून निळा रंग कपड्यासाठी वापरला नव्हता, मग हा काळ तर त्यापेक्षाही जूना. उत्सव मधेही शिवलेले कपडे नव्हते.
ह्या चित्रपटात खुप चुका आहेत वाचलेय. मला अर्थातच या विषयातले काहीही कळत नाही पण तरीही एक विचार मनात येतो की सिण्धु संस्कृती हा एक असा काळ होता ज्या काळातले आपल्याला काहीही माहित नाही. त्या काळानंतरच्या काळावर या संस्कृतीचा काय प्रभाव होता हेही माहित नाही. भाषा अजुन उलगडता आलेली नाही, ना तिचे कुठल्याही ज्ञात भाषेशी थोडेफार साधर्म्य आहे. असे असतानाही आपण त्यानंतरच्या काळात घडलेल्या घडामोडीं/बदल/शोध यांचा संबंध या संस्कृतीशी लावतो. एखादा शोध त्या काळान्ण्तर लागला म्हणजे त्या काळातही तो माहित नव्हता हे गृहित धरतोय. तिथल्या उत्खननात जे तुटपुण्जे सापडलेय त्यावरुन आपण त्या पुर्ण संस्कृतीबद्दल मते मांडतोय.
या विषयातले तज्ञ अर्थातच याच दिशेने तर्क मांडणार. ते पुराव्याशिवाय काही बोलु शकणार नाहीत हे माहित आहे.
पण एखाद्याने या सण्स्कृतीवर मनोरण्जनात्मक चित्रपट काढायचे ठरवले तर तो हवे ते स्वातंत्रय घेऊ शकतो ना? निळा रंग तेव्हा नव्हता याचा काय पुरावा आहे? उदा. मोडा मध्ये जी नगररचना आहे तशी नगररचना, तशी ड्रेनेजव्यवस्था त्यानंतरच्या काळात लगेचच दिसलेली का? ती आता उत्खनन झाले तेव्हा दिसली आणि अशी नगररचना तेव्हा होती त्यावर आश्चर्यही व्यक्त केले गेले. मग तेव्हा कपडे शिवत नसत/अन्गात घालत नसत, अमुक रंग अस्तित्वात नव्हते हे खरे कशावरुन? खरे जेव्हा बाहेर येईल तेव्ह येईल पण तोवर कोणी सिनेमॅटीक लिबर्टी म्हणून बर्याच गोष्टी ज्या त्यानंतरच्या काळात नव्हत्या त्या तेव्हा दाखवल्या तर त्याला कशाला नावे ठेवावी?
असा विषय निवडुन त्यावर चित्रपट बनवण्याचे धाडस केल्याबद्दल गोवारीकराचे खरे तर अभिनंदन करायला हवे. आता त्याने चित्रपट बनवताना तो अगदीच बाळबोध बनवला हे चुकलेच. त्याच्या जागी कोणी चांगला दिग्दर्शक असता तर कदाचित वेगळे दृष्य दिसले असते. चित्रपटाचे नाव जरी मोदा ठेवले तरी त्या काळात त्याचे काहीतरी वेगळे नाव दाखवायल हवे होते. कारण मोहेन्जोदडो हेही त्या काळानंतर दिले गेलले नाव आहे.
हल्ली कुठल्याही क्षेत्रात समतोल राहिलाचनाहीये. डोक्यावर घेऊन नाचायचे नाहीतर पायाखाली तुडवायचे. मधली स्टेजच नाही. एखादी गोष्ट पचवुन मग त्यावर विचारपुर्वक प्रतिक्रिया हा प्रकारच उरला नाहीय.
मोहेंजोदारोला सर्व benefit of
मोहेंजोदारोला सर्व benefit of doubt देऊनही शिवलेले जरदोसी डिझायनर कपडे घातलेली, मॉड मेकप केलेली, केस shampoo, conditioner वापरून सेट केलेली अशी नायिका दाखवली तर चित्रपटाविषयी प्रथम मत काय होईल? अरेरे .
गोवारीकर इथे पुर्णतः फसलाय. मी फक्त ट्रेलर पाहिलाय आणि तो पाहताना एकही क्षण आपण ३००० वर्षांपुर्वीचा काळ पाहतोय असे वाटत नाही. पुर्ण चकाचक हिरोईन आणि केस रंगवलेला हिरो. कदाचित तेव्हा असेही करत असतील, माहीत नाही पण सिनेमाच्या ट्रिटमेंटमध्ये असे काहीतरी करायला हवे होते ज्यामुळे काळ कळला असता.
निळ नव्हती? एन डी टि व्ही
निळ नव्हती?
एन डी टि व्ही इमॅजिन वरच्या चंद्रगुप्त मध्ये नुसते निळेच निळे कपडे आहेत सैनिकांना आणी चंद्रगुप्त ला.
त्यातला चाणक्य काय भारी आहे...एकदम क्रश मटेरियल.
त्या काळात काका काकू हे नाते
त्या काळात काका काकू हे नाते तरी मानले जात होते का ? निळीचे उत्पादन होत होते का ? उत्सव चित्रपटात जाणून बुजून निळा रंग कपड्यासाठी वापरला नव्हता, मग हा काळ तर त्यापेक्षाही जूना. उत्सव मधेही शिवलेले कपडे नव्हते. >> हे पूर्णपणे चूकीचे लॉजीक आहे. नीळ अस्तित्वात होती याचे पुरावे आहेत. उगीच आपले काहीतरी लॉजीक वापरून डायरेक्टरच्या रिसर्च ला शिव्या देणे चांगले नाही.
Archaeologists also recovered remnants of cloth dyed blue dated to 1750 BC from Mohenjo-Daro
( http://www.wildcolours.co.uk/html/indigo_history.html )
रसपः एक हिरो, एक हिरोईन, एक
रसपः एक हिरो, एक हिरोईन, एक व्हिलन अशी कथा , अत्यंत सुमार ट्रेलर, गाणी , काळाशी न जुळणारा कपडेपट, मगरींच्या उड्या इत्यादी असूनही तुम्ही हिम्मतीसाठी गूण देऊ लागलात म्हणजे यापुढे कुठल्याच चित्रपटावर टीका करायची नाही अशी 'कसम' घेताहात की काय?

(कारण कुठलाही चित्रपट असो, त्याचे तीन तास भरण्यासाठी हजारो तासाची मेहनत असतेच.)
आता यापुढे इम्रान हाशमीचे चित्रपटही 'एकदा बघावे' असे म्हणायला हरकत नाही...
मग तेव्हा कपडे शिवत
मग तेव्हा कपडे शिवत नसत/अन्गात घालत नसत, अमुक रंग अस्तित्वात नव्हते हे खरे कशावरुन? >>>ठीक आहे, आपण तेव्हा जरदोसी डिझायनरकला अस्तित्वात होती, सुई दोरा घेऊन व्यवस्थित कपडे शिवलेले असायचे अगदी चुणीदार, बायकांना अगदी ह्ल्लीच्या मॉडेलच्या तोंडात मारेल इतका छान मेकप करता येत होता, shampoo/conditioner नियमितपणे वापरात होते, लोकांना कोणी न शिकवता समूहनृत्यकला अवगत होती हे गृहीत धरू या.
असेलही. आणि हि
असेलही. आणि हि मोहेंजोदारो वर बनवलेली डोकमेंट्री नाही तर मनोरंजक चित्रपट आहे जो मनोरंजनाच्या बाबतीत पूर्ण फसलाय. बाकी जर्दोसी तर पेशवाईत पण होती.
हिंदी चित्रपटांकडून ऑथेंटिक
हिंदी चित्रपटांकडून ऑथेंटिक गोष्टींची अपेक्षा ठेवली जाते याचेच हसू येते. आजवर हा मापदंड लावून किती चित्रपट आलेत? जिथे ज्ञात इतिहासाची वाट लावली जाते तिथे लोक अज्ञात इतिहास, जो आपल्याला माहित नाही, तो तसाच दाखवला पाहिजे ही अपेक्षा ठेवताहेत. गोवारीकराने स्वतःकडून तरी ही अपेक्षा ठेवलेली का?
रसपशी सहमत. यापुढे इम्रान
रसपशी सहमत.
यापुढे इम्रान हाशमीचे चित्रपटही 'एकदा बघावे' असे म्हणायला हरकत नाही >>> ऑफकोर्स बघावेत. किमान एंटरटेनर तरी असतातच ते
मला वाटत इथ मुद्दा हा ज्ञात
मला वाटत इथ मुद्दा हा ज्ञात वा अज्ञात इतिहास...तो किती खरा वा खोटा दाखवला इ. इ. नाही...
चित्रपट वा कोणतीही कथा, कवीता या मध्ये सर्वात महत्वाच हे आहे की ती तुम्हाला त्या वेळेस (पाहताना/वाचताना) कितपत गुन्तवुन ठेवते... ती काल्पनीक आहे हे माहीत असुन सुध्दा आपण त्यावेळेस ती पुर्णपणे स्वीकारतो... S. T. Coleridge ने बोलल्या प्रमाणे Willing suspension of disbelief होण महत्वाच...
हा चित्रपट ते करण्यात यशस्वी होतोय का हे महत्वाच...
काही निरीक्षण...
१. रबर च्या मगरी
२. मगर उडी : मगरीच वजन, तीचा आकार, तीने पोहुन कापलेल अन्तर आणि ग्रविटी... हे कोणत्याही फोरमुल्या मध्ये टाका पण ती ५ फुट उडी मारने अश्यक्या...
३. कडक इस्त्री केलेले व टाइड मध्ये धुतल्या सारखे वाटनारे कपडे..
४. "तु है" गाण्या मध्ये (जे पुर्ण इन्डोअर आहे) लक्ख असणारा प्रकाश (४४० वोल्टचे हॉलोजन लावल्या सारखा)
५. शेवटी बान्ध फुटतानाचा सीन मध्ये पडनारा पाउस (म्हणजे त्याचे थेम्ब) proportion मध्ये खुप मोठे वाटतात / तो सीन खुपच फेक वाटतो...
आणि खुप काही आहे...जेव्हा आपण म्हणतो ५००० हजार वर्षापुर्वी चा काळ तेव्हा तो काळ खरच उभा राहतो का हे खुप महत्वाच आहे ... मग नीळ होती का हळद...घोडा होता की आजुन काही... हिंमत केली की नाही केली..
सेट किती मोठे होते... आभ्यास खुप दन्डगा होता....इ..इ.. हे थोडस गौण आहे...
टि.प.. : आपला प्रेक्षक वर्ग हा खुप हुशार आहे.. मॅट्रीक्स सारखा समजायला भयन्कर कीचकट चित्रपट जेव्हा तो १९९९ ला समजवुन घेतो, तो २०१६ मध्ये नक्कीच काही तरी बेसीक आपेक्षा ठेवुन असणार..!!!
इथे लगेचच इतर तद्द्न चित्रपट कसे स्विकारतो त्याचे सन्दर्भ नकोत..कारण धागा मोहेंजोदडो वर आहे...
'सरसरीया' गाणं निदान इकडे तरी
'सरसरीया' गाणं निदान इकडे तरी सिनेमात दाखवलं नाही. देशात दाखवत आहेत का?
कडक इस्त्री केलेले व टाइड
कडक इस्त्री केलेले व टाइड मध्ये धुतल्या सारखे वाटनारे कपडे.. >> हे पण कुठे दिसले नाहीत. सगळे मळकेच वाटत होते
मगर उडी : मगरीच वजन, तीचा आकार, तीने पोहुन कापलेल अन्तर आणि ग्रविटी... हे कोणत्याही फोरमुल्या मध्ये टाका पण ती ५ फुट उडी मारने अश्यक्या >> सिनेमा थिएटर मध्ये बघताना त्या सिन मध्ये इतके एन्ग्रोस व्हायला होते की ग्राविटी वगैरे विचार करायला वेळ मिळत नाही.
तो सीन खुपच फेक वाटतो... >> हो त्यातले व्हीएफएक्स गंडले आहेत. ते शुटींग जरा बरे असायला हवे होते.
इथे लगेचच इतर तद्द्न चित्रपट कसे स्विकारतो त्याचे सन्दर्भ नकोत >> असे म्हणायचे आणि त्याआधी मॅट्रीक्स चे नाव घ्यायचे
हे पण कुठे दिसले नाहीत >>>
हे पण कुठे दिसले नाहीत >>> ह्म्म... आता स्क्रिनशॉट नाहीत
सिनेमा थिएटर मध्ये बघताना त्या सिन मध्ये इतके एन्ग्रोस व्हायला होते की ग्राविटी वगैरे विचार करायला वेळ मिळत नाही. >> >>>
... in gross तो सिन काही केल्या engrossing नाही वाटला.. गवताच्या पेन्डिची नाव/होडी.. काय जोक करताय...!!
ते शुटींग जरा बरे असायला हवे होते >>> जरा बरे.. !!!.. बर..
मॅट्रीक्स च्या बाबतीत म्हाणाल..तर तो एक उत्तम सिनेमा होता.. समजायल अवघड असला तरी तो खुप चालला.. मुद्दा हा आहे.. की आजपवेतो प्रेक्षक वर्ग हा खुप बाळबोध असल्या प्रमाणे सिनेमाची बान्धनी केली जाते.. मोहेंजोदडो हा त्याला अपवाद नाही...
गवताच्या पेन्डिची नाव/होडी..
गवताच्या पेन्डिची नाव/होडी.. काय जोक करताय...!! >> म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय आहे? तशा बोटी आधीही होत्या आणि अजुनही लोकं वापरतात
१) https://en.wikipedia.org/wiki/Reed_boat
२) http://www.japantimes.co.jp/news/2016/07/17/national/history/straw-boats...
मॅट्रीक्स बद्दल मला फक्त तुमच्या पोस्ट मधला विरोधाभास दाखवायचा होता इतर काहीच अक्षेप नाही
वरचा पोस्टर बघून अग्नीपथचा
वरचा पोस्टर बघून अग्नीपथचा रुतिक वाटला.
आता परीक्षण वाचतो.
त्याच्या जागी कोणी चांगला
त्याच्या जागी कोणी चांगला दिग्दर्शक असता तर कदाचित वेगळे दृष्य दिसले असते.<<< अयाईगं. गोवारीकर चांगलाच दिग्दर्शक आहे हो. स्वदेससारखा अतिशय उत्तम सिनेमा त्याने दिलाय. बाजी पण अगदीच वाईट नव्हता.
लगान, जोधाअकबर हेदेखील बरेच होते.
त्याची व्हॉट्स युर राशी पासून अधोगती चालू झाली आहे. खेले हम जानसे तर कुणाला आठवतदेखील नाही. पीरीयड ड्रामा मध्येच अडकल्यामुळे असेल पण त्याच्या चित्रपटांमध्ये तोचतोचपणा येऊ लागलाय. कथेमध्ये काहीही नावीन्य नाही याहून भयाण गोष्ट ट्रीटमेंटमध्येही काहीही नवीन नाही.
ऐतिहासिक घोडचुकांपेक्षाही मला एक चित्रपट म्हणून त्या पटकथेमधल्या कित्येक बाबी खटकल्या आहेत. पूजा हेगडे या अभिनेत्रीला नक्की का घेतलंय. तिला अभिनय जमत नाही, तिच्या चेहर्यामध्ये फ्रेशनेस नाही. ती फार कृत्रिम दिसते. तिला नेक्स्ट दीपिका म्हणून प्रोजेक्ट केलं जातंय पण दिपीका पहिल्याच सिनेमामध्ये शाहरूखसारख्या अभिनेत्याला समर्थपणे टक्कार देऊ शकली होती. तिचे कपडे फार म्हणजे फारच गंडले आहेत. त्याच कय आजच्या काळामध्येही असे कपडे घालून कुणी फिरतं का? तिच्या डोक्यावर त्या फुलांच्या परड्या आणि पंखाचे पिसारे कशाला दिले आहेत? तिच्या केसांचा कृत्रिमपणा फार जाणवत राहतो. ह्रितिकचे रंगवेलेले केस तितके खटकत नाहीत कारण काही लोकांच तसे केस असूही शकतात, त्याचा अफगाणी चेहरा उलट त्या भागासोबत अधिक सुसंगत वाटत राहतो (परतः इतिहासवाले लोक म्हणतात की सिंधुसंस्कृतीमधले लोक काळेसावळे होते, तरी सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून आपण हे माफ करू शकतो) पण पूजाचे वळवलेले चमकीले केस आणि स्लिटवाले ड्रेसेस मात्र हॉरीबल दिसत राहतात. शिवाय तिला अभिनय अजिबात जमत नाही हेही एक आहेच. मला या हल्लीच्या मुलींची स्माईल देत, ओठ वाकडे न करता बोलायची पद्धत अजिबात आवडत नाही (मुली म्हटलंय, पण त्यात एक टायगर श्रॉफ पण धरा. तो तर भयाण्पद्धतीने बोलतो) . त्यापेक्षा तोंडं वेंगाडत बोलणार्या दिपीका, कंगना परवडल्या. किमान काय बोलतात ते समजतं तरी.
Pages