वांगमय-ए-मोहेंजोदारो

Submitted by rmd on 15 August, 2016 - 14:02

काल मोहेंजोदारो पाहिला. सिनेमा पाहून झाल्यावर त्याची वेगवेगळी व्हर्जन्स इमॅजिन करण्याचा मोह आवरला नाही. 'बे एरिया' च्या वाहत्या पानावर अशी काही व्हर्जन्स पोस्ट करताच तिथल्या बाकी मेंबर्सनी त्यात अजून भर घातली. ही सगळी गंमत इतर मायबोलीकरांसोबत शेअर करण्यासाठी आणि अशी अजून व्हर्जन्स यावीत म्हणून हा धागा.
(हेडर सौजन्य - मॅक्स)

** स्पॉयलर अलर्ट : खालील व्हर्जन्स वाचून कोणाला जर मोहेंजोदारो सिनेमाची खरी स्टोरी समजली तर आम्ही जबाबदार नाही Proud **

भन्साळी व्हर्जन (rmd)
------------------
संपूर्ण मोहेंजोदारो एकदम रंगीबेरंगी. कबीर बेदीचा महाल रंगीत काचांचा, झुळझुळ पडदे असलेला वगैरे. ह्रितिकची त्याच्या मूळ गावात एक मैत्रीण - उससे दिल लगाके बैठेली. मोहेंजोदारो मधे पूजा हेगडे. मग त्या दोघींची 'तू च कशी ग्रेट आणि ह्रितिकसाठी बेस्ट' टायपाची जुगलबंदी. ते पाहून ह्रितिक सिंधू नदीत उडी मारून आत्महत्या करतो.

जुगलबंदी गाणं -

संग संग संगिनी तू संग संग संगिनी
सरमनकी तू है रानी
नहीं वो तो तू है, चानी
आज हम नाचे मिलके
बरसे घटा से पानी

रोहित शेट्टी व्हर्जन (धनि)
-------------------
मोहेंजोदारो मधे बैलगाड्यांचा पाठलाग सिक्वेन्स. त्यात २-४ बैलगाड्या आपटून हवेत उंच उडतात आणि खाली पडतात. मग एक रथांची शर्यत. त्यात ह्रितिकचा आणि पैलवानांचा रथ एकमेकांवर आपटतात आणि सगळे खाली पडतात. मग हाताने मारामारी. ह्रितिकच्या उजव्या हाताच्या एका ठोश्यात पैलवान हवेत लांब उडून पडतो. ह्रितिक डाव्या हाताने दुसर्‍या पैलवानाला पंच मारतो तर तो थेट कबीर बेदीच्या पायाशी जाउन पडतो वगैरे.

केजो व्हर्जन (rmd, धनि)
-------------
ह्रितिकचा काका त्याला लहानपणीच लंडनला घेऊन गेलेला असतो आणि स्थायिक झालेला असतो. ह्रितिकला मोहेंजोदारो बद्दल कळल्यावर तो तिकडे जायला निघतो. इकडे मोहेंजोदारो मधे त्याची आई सिंधू माँ की पूजा करत असते आणि अचानक तिला पानांची सळसळ ऐकू येते. ती पूजेची थाळी घेऊन हळुहळू दाराशी जाऊन उभी राहते आणि तेवढ्यात ह्रितिक येतो. मग कुठूनतरी एक मुलींचा ताफा येतो आणि नाच सुरू करतो इ. इ.

यश चोप्रा व्हर्जन (rmd, धनि)
------------------
ह्रितिक आणि त्याचा काका सरसोंची शेती करत असतो. ते सरसों विकायला तो मोहेंजोदारो मधे जातो. ह्रितिक पूजा ला बघतो. पूजा ह्रितिक ला बघते. एकदम दोघे स्वप्नात स्वित्झर्लंडला जातात. तिथे पूजा शिफॉनच्या साड्या नेसून गाणं म्हणते.

सूरज बडजात्या व्हर्जन (rmd, धनि)
-------------------------
ह्रितिकच्या काकाची तीन मजली झोपडी असते. त्यात सगळे एकत्र जेवत वगैरे असतात. लल्लू त्यांना जेवण वाढतो. ह्रितिक आणि त्याचा चुलतभाऊ फॅक्टरी सुरू करायला मोहेंजोदारो मधे जातात. तिथे ह्रितिक पूजाच्या प्रेमात पडतो. त्यांना आधी कबीर बेदी विरोध करतो. पण शेवटी त्याला अचानक उपरती होते आणि तो पूजाचा हात खुशीखुशी ह्रितिकच्या हातात देतो.

रामगोपाल वर्मा व्हर्जन (rmd, धनि)
-------------------------
सिनेमात सुरूवातीला अर्धा तास कॅमेरा नुसता मोहेंजोदारोच्या गल्लीबोळातून फिरत राहतो. मग पुढची पंधरा मिनीटं ह्रितिक आणि पूजाचं स्वप्न. स्वप्नात समुद्र, पाणी, उर्मिला / अंतरा माळी / निशा कोठारी इ.इ.

पुणे ५२ व्हर्जन (rmd)
---------------
ह्रितिक रोशन बैलगाडीतून इकडून तिकडे जातो आणि थोड्यावेळाने तिकडून इकडे येतो.

फराह खान व्हर्जन (सीमंतिनी)
---------------------
हरप्पा मधून ह्रितीकला भेटायला असंख्य लोक येतात आणि "दारो दारो" म्हणत खूप पितात, गाणी म्हणतात... Wink

रामसे व्हर्जन (मंदार)
-------------
किर्र्र रात्री 'कर्र कर्र कर्र' आवाज करत दार उघडून ह्रिथीक मोहेंजोदारोमधे शिरतो. एका भयाण हवेलीत मिणमिणता दिवा हातात धरलेला वॉचमन त्याला मोहेंजोदारोची करुण कहाणी सांगतो. अनेक वर्षांपूर्वी मोहेंजोदारो गडप होण्याची प्रक्रीया सुरु झालेली असते तेव्हा कबीर बेदी गाडला जाउन मेलेला असतो, पण तो परतोनी आलेला असून त्याची कन्या पूजा हेगडेला कैद करुन ठेवत असतो. केवळ अदीदासचे बूट घालून त्या पायाने लाथ मारल्यासच त्याचा विनाश होणार असतो. त्या आधी एकाने तसा निष्फळ प्रयत्न केलेला असतो.
मग ह्रिथीक अपघाताने पूजा हेगडेच्या बाथरुम मधे शिरतो. तिथे तिची अंघोळ सुरु असते. गाणे म्हणता म्हणता ते बाथटबमधे पडतात, आणी बाथटबला क्रॅक जाउन त्याखाली कबीर बेदीला पूर्वी मारण्याचा प्रयत्न केलेल्याचे प्रेत आदीदासच्या बूटांसकट पुरलेले असते. ते बूट घालून ह्रिथीक कबीर बेदीचा नायनाट करतो.
आनंदाने तो पूजाकडे जातो पण तोपर्यंत आदीदासचे बूट काढलेल्या माणसाच्या भूताने तीला पळवून नेलेले असते. यापुढील ष्टुरी भाग २ मधे....

नागराज व्हर्जन (श्री)
-------------------
पुजा हेगडे विहिरीत अंघोळ करत असताना हृतिक रोशन तिथे येतो आणि धोतरासकट विहिरीत उडी मारतो , पुजा हेगडे म्हणते , आता ग बया , हे कुठुन पडलं , नंतर हृतिकला विहिरीबाहेर हुसकुन काढताना म्हणते , ये रत्ताळ्या हु भाईर , बरा डोळं झाकुन पडलास रं !
Lol

पूजाचा डायलॉग - मला बी तुजी संगिनी व्हायचं. पालीत सांगून कळत नाही व्हय? अर्धमागधीत सांगू?? (सीमंतिनी)

अनुराग कश्यप व्हर्जन (पायस)
-------------------------

ह्रितिकचे वडील अनेक वर्षांपूर्वी कबीर बेदीसाठी मुकादमगिरी करत असतात. त्यांच्यावर खुश होऊन कबीर बेदीने त्यांना खास एकशिंगी गेंड्याच्या शिंगाचं मुंडास दिलेलं असतं. पण त्यांना गेंडा आवडत नसल्याने बेदीचे दोन शिंगी बैलाचे मुंडासे हवं असतं. मग बेदी त्यांना गंगाकाठच्या मगरीचं कातडं आणायाला पाठवतो आणि मगरींचा व्यापार करणार्‍या आपल्या मित्राकडून मारतो. ह्रितिक तेव्हा खूप छोटा असतो तो तेवढं मुंडासं घेऊन पळतो.
अनेक वर्षांनंतर आता त्याने कबीर बेदीच्या सिंधू माँ काठच्या शेतजमिनीवर अवैध कब्जा केला आहे. या झगड्याचा फैसला करायला ते दोघे चावडीवर जमतात. मग ह्रितिक तेच एकशिंगी गेंड्यावालं मुंडासे घालून बैलावरुन उतरतो आणि मागून नॅरेशन सुरु होते
" कबीर बेदी ह्रितिक को तो नही पहचानता था पर अपने मुंडासे को पहचानता था. ये वो जमाना था जब बडे लोग आदमीयों के नाम भुल जाते थे पर अपनी सिंधू माँ के तीर वाली जमीन और अपने सींग नही भुलते थे"
अर्थातच फैसला ह्रितिकच्या बाजूने होतो पण बैलाच्या शिंगाच्या गावात गेंड्याचे शिंग घातल्याबद्दल तसेच अरुणोदय सिंगला सिंग मारल्याबद्दल त्याला कैद होते. मग जाता जाता ह्रितिक कबीर बेदीला म्हणतो
"ये मुंडासा हम छीनेंगे नही, कह के लेंगे"

महेश भट्ट व्हर्जन (rmd)
------------------
ह्रितिकचं ऑलरेडी त्याच्याच गावात लग्न झालेलं असतं. मग तो मोहेंजोदारो मधे येतो आणि त्याला पूजा भेटते. पूजा सोबत त्याचं अफेअर सुरू होतं आणि ते एकत्र राहू लागतात. पण पूजा ओव्हर पझेसिव्ह असते. तिला ह्रितिकचं आधीचं लग्न सहन होत नाही आणि ती आत्महत्या करते.

विक्रम भट्ट व्हर्जन (rmd)
-------------------
ह्रितिक मोहेंजोदारोच्या गल्लीबोळातून फिरत असतो. रात्रीची वेळ असते. तेव्हा त्याला पूजाचा आत्मा दिसतो. तो आत्म्याची स्टोरी जाणुन घ्यायला सिंधू माँ के मंदिर जातो. आणि त्याला कळतं की हा त्याचा पुनर्जन्म आहे आणि पूजाला कबीर बेदीने गेल्या जन्मातच मारलेलं आहे. फिर उलगडता है पूजा के कत्ल का राज! हा पिक्चर बराचसा अंधारातच असतो त्यामुळे मोहेंजोदारो मधे पण ६ महिने वगैरे रात्र असणार असं आपल्याला वाटायला लागतं.

मोहेंजोदरो-५२ (फारएण्ड)
---------------
सन १७८९ मधे फ्रेन्च राज्यक्रांती झाली. नुकत्याच संपलेल्या रेनेसान्स पीरियड मधून नव्या आकांक्षाचे धुमारे घेउन निघालेल्या अ‍ॅन्ग्लो-फ्रेंच-सॅक्सन समुदायाच्या पुढच्या पिढ्या आता पौगंडावस्थेत आल्या होत्या. मध्ययुगीन कालखंडातील अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर नव्हते. अशा एका काळातील व्यक्तिसापेक्ष कथा हॉलीवूड पासून ते फिलीपिनो चित्रपटसृष्टीत अनेक आल्या आहेत. त्यामानाने बॉलीवूड मधे याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेलेले आहे. हा एक महत्त्वाचा कालखंड होता.

दुसरे म्हणजे समोर घडणार्‍या घटनांना कॅमेर्‍याने सतत "फॉलो" करण्याची गरज आहे असे आपल्याकडचे प्रेक्षक समजतात. प्रत्यक्ष जीवनात असे होत नाही. पण त्यामुळे असे नसलेले चित्रपट त्यांना फालतू वाटतात. अशा प्रेक्षकांनी चेन्नई एक्सप्रेस पाहावा.

वर म्हंटल्याप्रमाणे फ्रेन्च राज्यक्रांती व फिलिपाइन्स मधले त्यावरचे परिणाम यावर हा चित्रपट आहे. हृतिक जेव्हा पहिल्यांदा नदी ओलांडून जायला निघतो तेव्हा चतुर्दशी असते (चंद्राची कोर पाहा, डावीकडे झुकलेली) मागे कबिल्यामधे लुई शमाशा उई लागलेले असते. त्यातील (चतुर्दशी = चौदावा) लुई हा तत्कालीन फ्रेन्च राज्यकर्त्यांचे प्रतीक आहे. तर हृतिका नेपोलियन चे. पूजा हेगडे म्हणजे अशा वेळी स्वतःच्या आनंदात मश्गुल असणारी जनता....तिने आंघोळ करणे हे त्याचेच प्रतीक आहे.

ब्लाह ब्लाह ब्लाह

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंधू माँ की मूर्ती का राज - १ (सीआयडी व्हर्जन)

ह्रितिक मोहेंजोदारोत प्रवेश करतो. गेले काही दिवस तो झोपू शकलेला नाही, त्याला स्वप्नात एक शहर दिसतंय, त्यात एक मंदिर आणि त्यात एक मूर्ती. इतर काही कामधंदा नसल्याने तो या शहरातून त्या शहरात फिरत फिरत इथे पोचला आहे. त्याला जाणवते - अरे ये शहर तो वही सपनों वाला शहर हय. मग तो मंदिरात पोचतो. सिंधू माँच्या मूर्ती जवळ जातो. पण तेवढ्यात देवदर्शनाच्या नावाखाली पूजा हेगडेवर लाईन मारायला आलेला अरुणोदय त्याला बघतो आणि धक्के मारून बाहेर काढतो. मग नदीकाठी बसलेला ह्रितिक विचार करू लागतो, जरूर उस मूर्ती के पीछे कोई ना कोई राज तो है. या विचारात असतानाच नदीकाठची मगर त्याचे धोतर ओढून त्याला एका विशिष्ट दिशेला इशारा करते - ओह माय गॉड ये तो लाश है. इसका मतलब, इसका मतलब ये आदमी मर चुका है. ये मामला तो सीआयडी के पास देना होगा.

***

विवेक एकदा लंगडी घालत, एकदा छप्पापाणी खेळत, एकदा मगरीच्या पाठीवर उभा राहून शीर्षासन करत असे वेगवेगळ्या अँगलमधून लाशचे फोटो काढतोय. या फोटोंचा कोणीही वापर करणार नाहीये हे पक्के ठाऊक असूनही कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन वृत्तीचा तो तडफदार तरुण आपले काम करत आहे. अभिजीत आणि दया लाशचं निरीक्षण करत आहेत. तेवढ्यात एसीपी येतो.
"हां अभिजीत कुछ पता चला?"
"सर हातापाई के तो कोई निशान दिख नही रहे. पर उससे भी बडा सवाल ये है कि ये है कौन. इसके पास तो आयडी कार्ड भी नही है. लगता है खूनी ने सारे आयडेंटिफिकेशन पानी मे बहा दिये."
"नही नही अभिजीत मुझे तो ये कुछ और ही चक्कर लगता है. दया इसका मतलब जानते हो?"
उकडत असल्याने एसीपीच्या पंख्यासमोर येत दया क्या सर करतो. - "इसका मतलब मोहेंजोदारो की करप्ट कॉर्पोरेशन आयडी कार्ड इशू नही करती. अभिजीत मुझे तो ये बहुत बडी साजिश लगती है. साळुंखे को बुलाओ. अब वही करेगा मोहेंजो का कबीर और बेदी का दारो."

स्थळः साळुंकेची तात्पुरती लॅब, मोहेंजोदारोतल्या एका घरात बनवलेली
"बॉस मैने इस लाश को फिंगरप्रिंट के लिए चेक किया. इतना तो मैं यकीन के साथ कह सकता हूं कि लाश के फिंगरप्रिंट लाशके ही हैं."
"साळुंके साब ये फिंगरप्रिंट तो कोई बच्चा भी बता सकता है. कोई ठोस जानकारी हो तो बताईये. जैसे तारिका जी को देखो, तारिकाजी आप ही बताईये कुछ ठोस." साळुंके होल वावर इज युवर चेहर्‍याने कॅरी ऑनचा इशारा करतो.
"अभिजीत लाश की मौत पानी मे डुबने से हुई है. पर गजब कि बात ये है कि लाश के पेट मे मिला पानी और सिंधू नदी का पानी इन दोनों के डीनए अलग अलग है." सगळे अविश्वासाने तिच्याकडे बघतात. एसीपी आता बोलतो
"साळुंके क्या तुम ये कहना चाहते हो कि लाश को पहले कही और डुबा के मारा गया और फिर नदी मे डाला गया."
"बिलकुल सही कहा तुमने. और एक बात, हमने लाश का भी डीनए टेस्ट किया. लाश का डीनए हमारे रेकॉर्ड के अनुसार किसी पूजा हेगडेसे मॅच करता है." एसीपी वटारलेल्या डोळ्यांनी पूजाला बोलावून घेतो. सोबत एक पे एक फ्रीच्या ऑफर अंतर्गत ह्रितिकपण येतो. आता शक्य तितक्या मृदू स्वरात एसीपी - "बेटा क्या ये तुम्हारे पापा थे?"
पूजा शक्य तितका अभिनय करत - "हां" (मागून गोवारीकर आणि बीपी सिंग निश्वास टाकतात. एकच क्लोज अप होता हिचा, निभावला)
"सर हो ना हो ये उस अरुणोदय सिंग और उसके बाप कबीर बेदी का किया धरा है." - ह्रितिकचा आरोप
"आप की तारीफ" - दया
मग ह्रितिक त्याची करुण कहाणी निवेदन करतो. फ्रेडी घाबरून ये पुनर जनम का चक्कर है छाप डायलॉग मारतो.
"बकवास मत करो फ्रेडी. ये सब ढकोसला है. पर वो मूर्ती ..... वो मूर्ती दया .... वो मूर्ती."
"सिंधू माँ की मूर्ती सर?" "हा दया सिंधू माँ की मूर्ती. उस मूर्ती के पीछे कोई ना कोई राज तो जरूर छुपा है. दया कुछ ना कुछ गडबड जरूर है"
सर, विवेक प्रवेश करतो. सर मैने पता किया है कि जिस डीनए का पानी लाश के पेट में था उस ग्रुप का पानी पूरे मोहेंजोदारो में सिर्फ कबीर बेदी के महम में, मेरा मतलब हमम सॉरी हमाम याने के स्विमिंग पूल मे पाया जाता है.
ओह माय गॉड. सारा चक्कर इस कबीर बेदी से शुरु हो के कबीर बेदी पर खतम हो रहा है. लगता है इस कबीर बेदी को जा के मिलना ही पडेगा.

(भाग २ मध्ये चालू)

इतना तो मैं यकीन के साथ कह सकता हूं कि लाश के फिंगरप्रिंट लाशके ही हैं.<<<<<
Lol पायस, तुम्ही ग्रेट आहात. _/\_

सिंधू माँ की मूर्ती का राज - २

स्थळ : कबीर बेदीचा महल
दार उघडल्याबरोबर नोकराला ढकलून देत एसीपी, विवेक, फ्रेडी व पूर्वी आत घुसतात. ये क्या तमाशा है करत कबीर बेदी आणि अरुणोदय सिंग येतात.
"ओह तो तुम कबीर बेदी हो. कबीर बेदी हं."
"हां तो. आपसे मतलब?" "हमे ऐसा शक है कि पूजा हेगडे के बाप, लाश का खून आपने किया है."
"ये क्या बकवास है? भला मैं ऐसा क्यूं करूंगा? मेरे इस निकम्मे बेटे कि शादी तय हुई है लाश के बेटी से."
एसीपी चौंकतो. चेन रिअ‍ॅक्शनने फ्रेडी आणि पूर्वीही चौंकतात. तर विवेक कोलांटी उडी मारतो.
"फिर भी एक काम किए बगैर हम यहाँसे नही जा सकते. फ्रेडी, विवेक, पूर्वी! यहाँ का चप्पा चप्पा छान मारो"
"अरे पर ढूंढोगे क्या?" "वो सीआयडी को मत सीखाओ, सीआयडी अपना काम करना जानती हैं."

***

दया, अभिजीत, श्रेया आणि ह्रितिक मंदिरात पोचलेत. तो ये है वो मूर्ती जो तुम्हारे सपनों में आती है. ह्रितिक मान डोलावतो. तेवढ्यात मागून ठकठकचा आवाज येतो. ते मूर्ती जागेवरून हलवतात तर श्रेया चित्कारते - सर ट्रॅपडोर.
लग तो ट्रॅपडोरही रहा है. अभिजीत क्या करे? सोचना क्या है दया तोड दो दरवाजा. दरवाजाच्या मागे विवेक उभा.
"विवेक तुम यहाँ क्या कर रहे हो?" "सर इस तहखाने का दूसरा छोर उस सिंगवाले घारे के घर में खुलता है."
"ओह माय गॉड!" इतना ही नही सर ये देखिए ये किसी का कंकाल यहा पडा है."

***

"बॉस मैने कंकाल के भी फिंगरप्रिंट लेने कि कोशिश की पर अफसोस सालों वहां पडे रहने से फिंगरप्रिंट मिलना बहुत मुश्किल है. पर फेस रिकनस्ट्र्क्शनसे हमें ये पता चलता है कि ये कंकाल ह्रितिक के बाबा का है."
"डीनए टेस्ट भी यहीं कहता है." तारिका हातात जांभळं लिक्विड असलेली परीक्षानळी नाचवत अनुमोदन देते.
"अब सारा चक्कर समझ में आ रहा है. जरुर उस कबीर बेदीने ह्रितिक के माँ बाप को मारा होगा और इसी लिए उसे ये सपनें आता है. दया अभिजीत चलो जरा बेदीजी को दर्शन दे आते है."

***

"हां मैने ये सब किया है पर तुम मेरा कुछ नही बिगाड सकते. मैंने नदी के बांध पर टाईमबॉम्ब फिट किया हैं. सब को लेकर डुबूंगा मैं."
कट टू बांध. विवेक रोप मल्लखांब करत बांधावर चढतो. "सर ब्लास्ट होने मे सिर्फ तीस सेकंड बचे है" इथे सर अर्थात दया. एसीपी, अभिजीत प्रभुती नारळ पाणी पीत ह्रितिकला "तुला काईट्स नावाचा प्रकार का करावासा वाटला रे?" ही पूछताछ करत आहेत.
"विवेक एक काम करो तुम बॉम्ब मुझे दो." विवेक बॉम्ब दयाला देतो. दया तो बॉम्ब पाण्याच्या तळाशी घेऊन जातो. ब्लास्ट!! बांध सुरक्षित पण दया आणि विवेकचं काय झालं? एसीपी अभिजीतचे रडक्या चेहर्‍याचे क्लोजअप्स! एवढ्यात धूर सरतो आणि तोंड काळे केलेले विवेक आणि दया नदीतून पोहत पोहत बाहेर येतात. सगळीकडे आनंदी आनंद!

***

" ये सब मैंने सिंधू माँ के मूर्ती के पीछे के तहखाने में छिपे खजाने को पाने के लिये किया. ह्रितिक के डॅड मेरे साथी थे तो लालच में मैने उन्हे मार दिया. जब मेरा राज पूजा हेगडे के बाप को पता चला तो मैंने उसे भी मार दिया. मुझे लगा था कि ये केस सीआयडी स्पेशल ब्युरो में जायेगा और अजातशत्रु को क्राईम पेट्रोलसे फुरसत नही मिलेगी तो मैं बच जाऊंगा."
"हाहाहाहाहा. देखा अभिजीत कह रहा है सोचा था कि बच जाऊंगा. याद रखो दो सिंगवाले, खूनी कितना भी चालाक सही कोई ना कोई गलती जरूर करता है. दो दो खून किये तुमने. तुम्हे तो फांसी ही होगी!"
(द एन्ड)

Rofl
अशक्य बाफ. विकेंडला तो महाटुकारभिकार मोहेंजोदारो बघितल्याचं दु:ख हा बाफ पाहून कमी झालं जरा.
रमड-धनी जोडीनं लिहिलेले सगळेच व्हर्जन्स लै भारी. नागराज व्हर्जनही टू मच!! Lol

उदय - एक सुचवतो, तुम्ही लिंक शेअर करा ना धाग्याची. इतर व्हर्जन्सही तेवढीच जबराट आहेत. एका लिंकमध्ये सगळी व्हर्जन्स वाचता येतील. धागा सार्वजनिक असल्याने सगळ्यांना दिसू शकतो, सदस्यत्वाची गरज नाही.

@ सर्वच
'हेरा फेरी' मैं करता नही, पर खाता हूं देवी का प्रसाद
इस कदर हौसला अफजाई के लिए देता हूं धन्यवाद

(आता टण्या पुरस्कृत कैफे बुदेलिएअरमधील वडापाव खाल्ल्यानंतर ससुराल सिमर का व्हर्जन लिहावं का याचा मंडळ गांभीर्याने विचार करत आहे. तसा ठराव अध्यक्ष पुढील अधिवेशनात मांडतील)

हसून हसून गडबडा लोळण
अशक्य बाफ. विकेंडला तो महाटुकारभिकार मोहेंजोदारो बघितल्याचं दु:ख हा बाफ पाहून कमी झालं जरा.
>>>>>> मो + १००
हा अशक्य बाफ आहे.
पायसचे सीआयडी वर्जन Rofl
नागराज वर्जनही :हहपुवा:
या बाफचे घरात सार्वजनिक वाचन झाले. सर्वांचेच वर्जन्स भारी!

अशक्य बाफ. कालच तो महाटुकारभिकार मोहेंजोदारो बघितल्याचं दु:ख हा बाफ पाहून कमी झालं जरा.
>>>>>> मो + १०००००००००० Rofl

कालपर्यन्त हा बाफ वाचायला येत नव्हते.. उगाच ष्टोरी बीरी कळ्ळी त.... Proud
पण वाचला असता तर मी वाचले असते ना.. Uhoh

मूळ इष्टोरीपेक्षा वरची सगळी वर्जन्स मस्तं मस्तं आहेत...

Pages