वांगमय-ए-मोहेंजोदारो

Submitted by rmd on 15 August, 2016 - 14:02

काल मोहेंजोदारो पाहिला. सिनेमा पाहून झाल्यावर त्याची वेगवेगळी व्हर्जन्स इमॅजिन करण्याचा मोह आवरला नाही. 'बे एरिया' च्या वाहत्या पानावर अशी काही व्हर्जन्स पोस्ट करताच तिथल्या बाकी मेंबर्सनी त्यात अजून भर घातली. ही सगळी गंमत इतर मायबोलीकरांसोबत शेअर करण्यासाठी आणि अशी अजून व्हर्जन्स यावीत म्हणून हा धागा.
(हेडर सौजन्य - मॅक्स)

** स्पॉयलर अलर्ट : खालील व्हर्जन्स वाचून कोणाला जर मोहेंजोदारो सिनेमाची खरी स्टोरी समजली तर आम्ही जबाबदार नाही Proud **

भन्साळी व्हर्जन (rmd)
------------------
संपूर्ण मोहेंजोदारो एकदम रंगीबेरंगी. कबीर बेदीचा महाल रंगीत काचांचा, झुळझुळ पडदे असलेला वगैरे. ह्रितिकची त्याच्या मूळ गावात एक मैत्रीण - उससे दिल लगाके बैठेली. मोहेंजोदारो मधे पूजा हेगडे. मग त्या दोघींची 'तू च कशी ग्रेट आणि ह्रितिकसाठी बेस्ट' टायपाची जुगलबंदी. ते पाहून ह्रितिक सिंधू नदीत उडी मारून आत्महत्या करतो.

जुगलबंदी गाणं -

संग संग संगिनी तू संग संग संगिनी
सरमनकी तू है रानी
नहीं वो तो तू है, चानी
आज हम नाचे मिलके
बरसे घटा से पानी

रोहित शेट्टी व्हर्जन (धनि)
-------------------
मोहेंजोदारो मधे बैलगाड्यांचा पाठलाग सिक्वेन्स. त्यात २-४ बैलगाड्या आपटून हवेत उंच उडतात आणि खाली पडतात. मग एक रथांची शर्यत. त्यात ह्रितिकचा आणि पैलवानांचा रथ एकमेकांवर आपटतात आणि सगळे खाली पडतात. मग हाताने मारामारी. ह्रितिकच्या उजव्या हाताच्या एका ठोश्यात पैलवान हवेत लांब उडून पडतो. ह्रितिक डाव्या हाताने दुसर्‍या पैलवानाला पंच मारतो तर तो थेट कबीर बेदीच्या पायाशी जाउन पडतो वगैरे.

केजो व्हर्जन (rmd, धनि)
-------------
ह्रितिकचा काका त्याला लहानपणीच लंडनला घेऊन गेलेला असतो आणि स्थायिक झालेला असतो. ह्रितिकला मोहेंजोदारो बद्दल कळल्यावर तो तिकडे जायला निघतो. इकडे मोहेंजोदारो मधे त्याची आई सिंधू माँ की पूजा करत असते आणि अचानक तिला पानांची सळसळ ऐकू येते. ती पूजेची थाळी घेऊन हळुहळू दाराशी जाऊन उभी राहते आणि तेवढ्यात ह्रितिक येतो. मग कुठूनतरी एक मुलींचा ताफा येतो आणि नाच सुरू करतो इ. इ.

यश चोप्रा व्हर्जन (rmd, धनि)
------------------
ह्रितिक आणि त्याचा काका सरसोंची शेती करत असतो. ते सरसों विकायला तो मोहेंजोदारो मधे जातो. ह्रितिक पूजा ला बघतो. पूजा ह्रितिक ला बघते. एकदम दोघे स्वप्नात स्वित्झर्लंडला जातात. तिथे पूजा शिफॉनच्या साड्या नेसून गाणं म्हणते.

सूरज बडजात्या व्हर्जन (rmd, धनि)
-------------------------
ह्रितिकच्या काकाची तीन मजली झोपडी असते. त्यात सगळे एकत्र जेवत वगैरे असतात. लल्लू त्यांना जेवण वाढतो. ह्रितिक आणि त्याचा चुलतभाऊ फॅक्टरी सुरू करायला मोहेंजोदारो मधे जातात. तिथे ह्रितिक पूजाच्या प्रेमात पडतो. त्यांना आधी कबीर बेदी विरोध करतो. पण शेवटी त्याला अचानक उपरती होते आणि तो पूजाचा हात खुशीखुशी ह्रितिकच्या हातात देतो.

रामगोपाल वर्मा व्हर्जन (rmd, धनि)
-------------------------
सिनेमात सुरूवातीला अर्धा तास कॅमेरा नुसता मोहेंजोदारोच्या गल्लीबोळातून फिरत राहतो. मग पुढची पंधरा मिनीटं ह्रितिक आणि पूजाचं स्वप्न. स्वप्नात समुद्र, पाणी, उर्मिला / अंतरा माळी / निशा कोठारी इ.इ.

पुणे ५२ व्हर्जन (rmd)
---------------
ह्रितिक रोशन बैलगाडीतून इकडून तिकडे जातो आणि थोड्यावेळाने तिकडून इकडे येतो.

फराह खान व्हर्जन (सीमंतिनी)
---------------------
हरप्पा मधून ह्रितीकला भेटायला असंख्य लोक येतात आणि "दारो दारो" म्हणत खूप पितात, गाणी म्हणतात... Wink

रामसे व्हर्जन (मंदार)
-------------
किर्र्र रात्री 'कर्र कर्र कर्र' आवाज करत दार उघडून ह्रिथीक मोहेंजोदारोमधे शिरतो. एका भयाण हवेलीत मिणमिणता दिवा हातात धरलेला वॉचमन त्याला मोहेंजोदारोची करुण कहाणी सांगतो. अनेक वर्षांपूर्वी मोहेंजोदारो गडप होण्याची प्रक्रीया सुरु झालेली असते तेव्हा कबीर बेदी गाडला जाउन मेलेला असतो, पण तो परतोनी आलेला असून त्याची कन्या पूजा हेगडेला कैद करुन ठेवत असतो. केवळ अदीदासचे बूट घालून त्या पायाने लाथ मारल्यासच त्याचा विनाश होणार असतो. त्या आधी एकाने तसा निष्फळ प्रयत्न केलेला असतो.
मग ह्रिथीक अपघाताने पूजा हेगडेच्या बाथरुम मधे शिरतो. तिथे तिची अंघोळ सुरु असते. गाणे म्हणता म्हणता ते बाथटबमधे पडतात, आणी बाथटबला क्रॅक जाउन त्याखाली कबीर बेदीला पूर्वी मारण्याचा प्रयत्न केलेल्याचे प्रेत आदीदासच्या बूटांसकट पुरलेले असते. ते बूट घालून ह्रिथीक कबीर बेदीचा नायनाट करतो.
आनंदाने तो पूजाकडे जातो पण तोपर्यंत आदीदासचे बूट काढलेल्या माणसाच्या भूताने तीला पळवून नेलेले असते. यापुढील ष्टुरी भाग २ मधे....

नागराज व्हर्जन (श्री)
-------------------
पुजा हेगडे विहिरीत अंघोळ करत असताना हृतिक रोशन तिथे येतो आणि धोतरासकट विहिरीत उडी मारतो , पुजा हेगडे म्हणते , आता ग बया , हे कुठुन पडलं , नंतर हृतिकला विहिरीबाहेर हुसकुन काढताना म्हणते , ये रत्ताळ्या हु भाईर , बरा डोळं झाकुन पडलास रं !
Lol

पूजाचा डायलॉग - मला बी तुजी संगिनी व्हायचं. पालीत सांगून कळत नाही व्हय? अर्धमागधीत सांगू?? (सीमंतिनी)

अनुराग कश्यप व्हर्जन (पायस)
-------------------------

ह्रितिकचे वडील अनेक वर्षांपूर्वी कबीर बेदीसाठी मुकादमगिरी करत असतात. त्यांच्यावर खुश होऊन कबीर बेदीने त्यांना खास एकशिंगी गेंड्याच्या शिंगाचं मुंडास दिलेलं असतं. पण त्यांना गेंडा आवडत नसल्याने बेदीचे दोन शिंगी बैलाचे मुंडासे हवं असतं. मग बेदी त्यांना गंगाकाठच्या मगरीचं कातडं आणायाला पाठवतो आणि मगरींचा व्यापार करणार्‍या आपल्या मित्राकडून मारतो. ह्रितिक तेव्हा खूप छोटा असतो तो तेवढं मुंडासं घेऊन पळतो.
अनेक वर्षांनंतर आता त्याने कबीर बेदीच्या सिंधू माँ काठच्या शेतजमिनीवर अवैध कब्जा केला आहे. या झगड्याचा फैसला करायला ते दोघे चावडीवर जमतात. मग ह्रितिक तेच एकशिंगी गेंड्यावालं मुंडासे घालून बैलावरुन उतरतो आणि मागून नॅरेशन सुरु होते
" कबीर बेदी ह्रितिक को तो नही पहचानता था पर अपने मुंडासे को पहचानता था. ये वो जमाना था जब बडे लोग आदमीयों के नाम भुल जाते थे पर अपनी सिंधू माँ के तीर वाली जमीन और अपने सींग नही भुलते थे"
अर्थातच फैसला ह्रितिकच्या बाजूने होतो पण बैलाच्या शिंगाच्या गावात गेंड्याचे शिंग घातल्याबद्दल तसेच अरुणोदय सिंगला सिंग मारल्याबद्दल त्याला कैद होते. मग जाता जाता ह्रितिक कबीर बेदीला म्हणतो
"ये मुंडासा हम छीनेंगे नही, कह के लेंगे"

महेश भट्ट व्हर्जन (rmd)
------------------
ह्रितिकचं ऑलरेडी त्याच्याच गावात लग्न झालेलं असतं. मग तो मोहेंजोदारो मधे येतो आणि त्याला पूजा भेटते. पूजा सोबत त्याचं अफेअर सुरू होतं आणि ते एकत्र राहू लागतात. पण पूजा ओव्हर पझेसिव्ह असते. तिला ह्रितिकचं आधीचं लग्न सहन होत नाही आणि ती आत्महत्या करते.

विक्रम भट्ट व्हर्जन (rmd)
-------------------
ह्रितिक मोहेंजोदारोच्या गल्लीबोळातून फिरत असतो. रात्रीची वेळ असते. तेव्हा त्याला पूजाचा आत्मा दिसतो. तो आत्म्याची स्टोरी जाणुन घ्यायला सिंधू माँ के मंदिर जातो. आणि त्याला कळतं की हा त्याचा पुनर्जन्म आहे आणि पूजाला कबीर बेदीने गेल्या जन्मातच मारलेलं आहे. फिर उलगडता है पूजा के कत्ल का राज! हा पिक्चर बराचसा अंधारातच असतो त्यामुळे मोहेंजोदारो मधे पण ६ महिने वगैरे रात्र असणार असं आपल्याला वाटायला लागतं.

मोहेंजोदरो-५२ (फारएण्ड)
---------------
सन १७८९ मधे फ्रेन्च राज्यक्रांती झाली. नुकत्याच संपलेल्या रेनेसान्स पीरियड मधून नव्या आकांक्षाचे धुमारे घेउन निघालेल्या अ‍ॅन्ग्लो-फ्रेंच-सॅक्सन समुदायाच्या पुढच्या पिढ्या आता पौगंडावस्थेत आल्या होत्या. मध्ययुगीन कालखंडातील अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर नव्हते. अशा एका काळातील व्यक्तिसापेक्ष कथा हॉलीवूड पासून ते फिलीपिनो चित्रपटसृष्टीत अनेक आल्या आहेत. त्यामानाने बॉलीवूड मधे याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेलेले आहे. हा एक महत्त्वाचा कालखंड होता.

दुसरे म्हणजे समोर घडणार्‍या घटनांना कॅमेर्‍याने सतत "फॉलो" करण्याची गरज आहे असे आपल्याकडचे प्रेक्षक समजतात. प्रत्यक्ष जीवनात असे होत नाही. पण त्यामुळे असे नसलेले चित्रपट त्यांना फालतू वाटतात. अशा प्रेक्षकांनी चेन्नई एक्सप्रेस पाहावा.

वर म्हंटल्याप्रमाणे फ्रेन्च राज्यक्रांती व फिलिपाइन्स मधले त्यावरचे परिणाम यावर हा चित्रपट आहे. हृतिक जेव्हा पहिल्यांदा नदी ओलांडून जायला निघतो तेव्हा चतुर्दशी असते (चंद्राची कोर पाहा, डावीकडे झुकलेली) मागे कबिल्यामधे लुई शमाशा उई लागलेले असते. त्यातील (चतुर्दशी = चौदावा) लुई हा तत्कालीन फ्रेन्च राज्यकर्त्यांचे प्रतीक आहे. तर हृतिका नेपोलियन चे. पूजा हेगडे म्हणजे अशा वेळी स्वतःच्या आनंदात मश्गुल असणारी जनता....तिने आंघोळ करणे हे त्याचेच प्रतीक आहे.

ब्लाह ब्लाह ब्लाह

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि "दारो दारो" म्हणत खूप पितात, गाणी म्हणतात...
ये मुंडासा हम छीनेंगे नही, कह के लेंगे"
चंद्राची कोर पाहा, डावीकडे झुकलेली) मागे कबिल्यामधे लुई शमाशा उई लागलेले >>> Rofl Rofl

मला बी तुजी संगिनी व्हायचं. पालीत सांगून कळत नाही व्हय? अर्धमागधीत सांगू?? >>>> Rofl

कोणीतरी झोया अख्तर व्हर्जन लिहा.......

Lol

झोया अख्तर व्हर्जन

कबिर बेदी च्या राज्यारोहण सोहळ्यानिमित्त ह्रितिक, कबिर बेदी, अरुणोदय सिन्ग, पूजा हेगडे वगैरे एका बोटीतून सिंधू नदीमधे फिरत असतात. मग त्यातल्या प्रत्येक पात्राचे इतर पात्राशी कशा ना कशावरून तरी वाजते, मग समेट होतो, मग सगळे 'छन छन बोले सिंधू मांकि चुडिया' म्हणत पंजाबी भांगडा करत नाचतात.

मोहेंजोदारो हा विषय, त्यातील लोकांचे डायनॅमीक्स, त्यांच्यातल्या नात्यांच्या कॉम्प्लेक्सीटी बद्दल शेक्सपीयरने काही लिहिलं नसल्याने विशाल भारद्वाजचे व्हर्जन पल्बीश करण्यात येत नसल्याचे अत्यंत दु:खद अंतःकरणाने आम्ही जाहीर करत आहोत.
इस कमिनेपन के लिये, दिल गीर आहोत, माफी असावी.
Proud

महेश कोठारे व्हर्जन:
हृतिक गावातून शहरात जातो तिथे घाऱ्या खवीस उर्फ कबीर बेदीची माणसं त्याचा पाठलाग करतात. बॅकग्राऊंडला ढणणण टणणण असलं म्युझीक सुरु. धावता धावता तो एका घरात घुसतो तिथे त्याला पूजा हेगडे धडकते. तिला बघून हृतिक लगेच स्वप्नात म्युन्सीपाल्टीच्या बागेत तिच्याबरोबर 'हेल मोगॅम्बो' 'जिना चढा' 'उदबत्ती ओवाळा' इ. स्टेप्सचा डॅन्स सुरु करतो. गाण्याचे बोल,
अगं चानी sss
माझी राणी sss
ये जरा इकडं, जाऊ जरा तिकडं वगैरे वगैरे..
तेवढ्यात त्याला कबीर बेदी जागं करतो, हृतिक स्वतःच्याच हातावर बुक्का मारत म्हणतो, डॅमीट!!

महागुरू व्हर्जन

ह्रितीक आणि भाऊ मोहेंजोदारो मध्ये भाड्याच्या घरात राहत असतात. त्यात त्यांचे मित्र पण रहायला येतात त्यामुळे मालक त्यांना हाकलून देतो. मग फक्त जोडप्यांना रहायला मिळेल अश्या जागेत ते रहायला जातात. ह्रितीक चे केस लांब असल्याने त्याला बायकोचा रोल करायला मिळतो. त्याच्याकडे बघून कबिर बेदी ला तो आवडतो आणि तो त्याच्या मागे लागतो. इकडे ह्रितीकला मात्र पूजा आवडते त्यामुळे तो एक डान्सर बनून तिच्या मागे लागतो. शेवटी सगळ्यांचा गोंधळ होऊन ह्रितीक ची साडी सुटते आणि तो ह्रितीक हे समजल्यावर कबिर बेदी निघून जातो आणि तो आणि पूजा " मोहेंजोदारोत सिंधू वाहताना प्रेमात रंग यावे " असं बागेत नाचतात Proud

सचिन पिळगावकर (बनवाबनवी) वर्जनः

ह्रिथीक मोहेंजोदारो पासून लांब एका गावात भाड्याच्या घरात रहात असतो. "मोहेंजोदारोमधे डायबेटीसवर जामील औषध मिळतं, माझा मित्र तिकडे जाणार आहे" असं सांगून त्याने घरमालकाकडून सत्तर मोहरा घेतलेल्या असतात. कालांतराने घरमालक भडकतो आणी डायबेटीसचं औषध आणा अथवा घर खाली करा अशी धमकी देतो.
त्यामुळे ह्रिथीकला मोहेंजोदारोला जावंच लागतं. पण मोहेंजोदारोचा राजा कबीर बेदी हा फक्त बायको असलेल्या नवर्‍यांनाच नगरात प्रवेश देत असतो. ही ह्रिथीकची अडचण नितीश भारद्वाज सोडवतो आणी ते नगरात दाखल होतात.
एकदा ह्रिथीक काही कामानिमीत्त पूजा हेगडेशी बोलत असतानाच तिथे एक झुरळ* येते, आणी त्याचे पर्यावसान ह्रिथीक-पूजा आधी मिठीत आणी नंतर प्रेमात पडण्यात होते.

*मोहेंजोदारो च्या काळात झुरळे अस्तीत्वात असण्याचे कोणतेही दाखले इतिहासात नसल्याचं तज्ञांचं म्हणणं असून यावरुन मोठे वादविवाद सुरु आहेत.

राकेश रोशन व्हर्जन
ह्रिथिक सिग्नल देतोय डेड टाउन ला :
ओ ओ ओ ओ ओम..
( अकाशवाणी ओ ओ ओ ओम )
मनाने वय ८ असणार्या ह्रिथिक समोर मोहेंजिदाडोतून पूजा अवतरते.
तिला पाहून ह्रिथिक घाबरतो पण लवकरच ती आपली मैत्रीण असल्याचं त्याला जाणवतं !
तो तिला घरात लपवतो, वर भलीमोठी टोपली झाकतो.
आणि एक दिवस ................

खिडकीतून बाहेर डोकवत पूजा काहीतरी रेकु लागते.
इतक्यात प्रीती झिंटा येते.
ह्रिथिकःअछा हुआ तुम आगयी
प्रीती: लगता है इसे बाहर कुछ खेलना है .
(पूजाकडे बघत) तुम क्या खेलती हो, किससे खेल्ते हो ?
क्रिकेट ? झुला ?
(इतक्यत एक बैलगाडी जाते.)
बैल ?
पूजा : बै ल
ह्रितिह्क : हायला ये बोलती भी है ?
प्रीती :इसका मतलब पॉवर्स होनेके अलावा ये बहुत नाठाळ भी है !
ह्रितिकः मगर ये बैल से कैसे खेलती है, बैल खेलनेवाली चीज थोडीही है ?
प्रीती: हम जो खेलते है उस्से हमे एनर्जी मिलती है, हो सकता है इसे बैलके साथ एनर्जी मिलती हो ?
(इतक्यात ह्रिथिकची आई येते आणि ह्रिथिक पूजाला टोपली खाली लपवतो.
बाहेरच्या बैलाला पूजाची चाहुल लागते आणि तो खिडकीवर शिंगानी धडका मारतो.
पूजा पॉवर्स सकट टोपलीतून बाहेर येते, ह्रिथिक्च्या डिसॉरडर्स क्षणात दूर होतात आणि तो सुप्परहिरो बनतो, आधी बॉडीसुट मग त्यावर अंडरवेअर , लाल अंडवेअरवर बैलाच्या शिंगांचं चित्रं अशा आवतारात तो पूजाला घेउन उडत उडत बैलगाडीत जाऊन बसतो आणि गाडी थेट मोहेंजोदाडो काळात जाउन पोचते !)

ओरिज्नल सीन :
http://youtu.be/Rw5OfYYvTIs

लाल अंडवेअरवर बैलाच्या शिंगांचं चित्रं >>> अरारा , लई भलत सलतं चित्र समोर आलं Lol
लोकं पेटलीत नुसती , आता समजलं मोहेंजोदारो नष्ट का झालं ते Lol
अजुन एक व्हर्जन बाकी आहे ओळखा बघु Wink

कांति शाह का मोहेंजोदारो (कारण नुसता मोहेंजोदारो गोवारीच्या सॉरी गवारीच्या भाजीप्रमाणे कोणीही बनवेल)

ओपनिंग सीन : सपना डाकू रामकलीच्या वेशात. ही इथे का असे फाजील प्रश्न नकोत. कांति शाहच्या प्रत्येक सिनेमात सपना असतेच (सपना = गुंडामधील मिथुनदांची बहीण, मुन्नीबाईमधील मुन्नीबाई, कातिल चुडैलमधील कातिल चुडैल इ. इ.)

रामकली के आने से छाता है अंधेरा चाहे हो अमावस या पूनम
सारा मोहेंजोदारो जानता है कि खाई है उसने सिंधू माँ कि कसम
(मागून बॉम्ब ब्लास्ट आणि रोल क्रेडिट्स)

सीन १ :
एक चिल्लर व्हिलन आणि कबीर बेदी शिपयार्डमध्ये एकमेकांसमोर येतात.
कबीर बेदी : मेरा नाम है महम लगाता मैं हमेशा जखम पर मलम.
चि.व्हि. : नही चलेगा यहाँ कैलास जीवन, करते है हम सिंधू माँ का स्तवन
कबीर बेदी : अबे ज्यादा मत उड. वर्ना मैं तेरा वो हाल करूंगा कि बैल भी तुझे दूध नही देगा.
चि.व्हि. (कबीर बेदीची शिंगे पाहून) : मेरे को मत मार महम, मेरे को मत मार. चाहे तो मुझसे बिल्ली का दूध निकलवा ले पर मुझे मत मार. तुझे चाहिये तो तेरे सिंग से आवाज निकले इसलिए उसका कर्ना बन जाऊंगा पर मुझे मत मार.
(कर्णाच्या जागी कर्ना वापरल्याने ञ-मॅनचा भक्त असलेला कबीर बेदी चि.व्हि.ला शिंगे भोसकून ठार मारतो)
(आता अरुणोदय सिंगवर कॅमेरा येतो)
सिंधू माँ जाग उठी है. अब लोथार के तवे पर सर्मन को पकाना होगा

***

सीन २ :
पूजा हेगडे कॉमन तलावातून अंघोळ करून बाहेर येत आहे. सकाळी सकाळी तिचा मूड बिघडला आहे कारण अरुणोदय सिंगने तिला तलवार चालवायला शिकवायचा प्रयत्न केला आणि वर सुनावले - तुने कांति शाह कि पिक्चर कांति शाह कि जोधा अकबर नही देखी? उसमें भी साईड कॅरेक्टर हिरोईन को तलवार सीखाने कि कोशीश करता है तो तू क्यों नही सीख रही?
ताहेर शाह प्रायव्हेट लिमिटेडचे लेबल असलेला जांभळा टॉवेल गुंडाळून स्वतःच्याच विचारात चालली आहे. काल चोरून ऐकलेल्या संभाषणामुळे कबीर बेदीने नक्की कोणत्या हसीनाचा पसीना वापरला असा प्रश्न तिच्या मनात घोळतोय. याचा फायदा घेऊन चि.व्हि.दो. (चिल्लर व्हिलन दोन) येतो.
"नकली सिंग उछालते हुए कहाँ जा रही हो? असली सिंग तो मेरे पास है"
पूजा त्याला बाणेदारपणे म्हणते
"चानी के नाक मे पहनाने चला हैं छल्ला
तू सिंधू का पूत नही तू है कुत्ते का पिल्ला"
लगेच चि.व्हि.दो. जीभ बाहेर काढून तिचा टॉवेल सोडायला लागतो (मागून जबसे तेरे नैना वाजू लागते)
तेवढ्यात मागून चि.व्हि.दो.च्या पाठीवर मजबूत पंजा पडतो आणि त्याला उचलून फेकून देतो. चि.व्हि.दो. ये किसकी जुर्रत है टाईप डायलॉग मारतो. मागून ड्रॅमॅटिक मुझिक वाजते आणि कॅमेरा ह्रितिकच्या पायापासून चेहर्‍यावरचा प्रवास पूर्ण करतो.
"मैं हूं धूपसे मोहोब्बत करनेवाला, प्रियांका का कृष्णा प्रिती का बावला"
"तुझे बनाकर मूंह का निवाला, घोंप दूंगा मै सिंग का भाला"
"लगता है तू मुझे लोथार का भूला, जानता नही अभी तू मेरे क्रोध का जलजला"
(असे म्हणून तो चि.व्हि.दो. ला उचलून फेकून देतो आणि नंतर गाणं सुरू होते)
मोहेंजोदारो के शोले मध्ये पुढे चालू .....

अरारा! खतर्नाक आहे हे! Rofl

कोठारे, महागुरू दोन्ही व्हर्जन्स, आणि राकेश रोशन पण भारी जमलंय.

तुम्ही सगळ्यांनीं अठ्ठ्याण्णवीय व्हर्जन बघितलं का व्हॉटसॅप वर? >>> नाही. पाठवून दे Happy

Pages