तडका - कर्ज वसुलीत

Submitted by vishal maske on 12 August, 2016 - 21:13

कर्ज वसुलीत

घेताना घेतात
कर्ज भरमसाठ
मात्र फेडताना
फिरवतात पाठ

कर्ज वसुलीसाठी मग
प्रॉपर्टीही जप्त होते
कमावलेली अब्रुही
बदनामीत मुफ्त जाते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचे बरेच तडके आवडतात. हा आणी कालचा मात्र आवडला नाही. माझ्या ओळखीचे एक स्नेही होते ते पण असेच छोटेखानी तडके लिहायचे. विद्रोही कवी म्हणुन ओळखले जायचे. रमेश भवर त्यांच नाव. त्यांचे तडकेही जबराट असायचे अगदी सोप्या भाषेत. उदाहरणार्थ...

भारत आमचा देश आहे
आम्हि गर्वाने गातो
आणि आमच्याच देशात
भाड्याच्या घरात रहातो.