रिओ ऑलिंपिक्समध्ये भारतीय खेळाडू

Submitted by भरत. on 10 August, 2016 - 00:14

अ‍ॅथलेटिक्स :
थाळा फेक : विकास गौडा ५८.९९ मी. गोळा फेकून ३५ स्पर्धकांत २८वा.
गोळा फेक : महिला मनप्रीत कौर १७.०६ मीटरच्या फेकीने ३६ स्पर्धकांत २३वी.
८०० मीटर्स : पुरुष : जिन्सन जॉन्सन १मि ४७.२७ ची वेळ नोंदवत २५वा.
२० किमी चालणे : मनीष सिंग १ तास २१.२१ ची वेळ नोंदवत १३वा. अन्य दोन स्पर्धक फाउल केल्याने बाद.
४०० मीटर्स : पुरुष : मोहम्मद याहिया ४५.९५ सेकंदांची वेळ नोंदवत ३१वा
पुरुषांच्या लांब उडीत अंकित शर्मा ७.६७ मीटर २४वा
महिलांच्या १०० मीटर्स स्प्रिंटमध्ये द्युती चांद ११.६९ सेकंद ५०वी
महिला ३००० स्टीपलचेस : ललिता बाबर ९.१९.७६ मिनिटांची वेळ नोंदवत आपल्या हीटमध्ये चौथी. फायनलसाठी पात्र. अंतिम फेरीत ९:२२:७४ची वेळ नोंदवत दहावी.
याच प्रकारात सुधा सिंग ९.४३.२९ ची वेळ नोंदवत ३०वी आली..
४०० मीटर्समध्ये निर्मला ५३.०३ सेकंद वेळ नोंदवत ४४वी आली.
महिलांच्या मॅरॅथॉनमध्ये ओ पी जैशा २तास ४७ मिनिटे १९ सेकंदांची वेळ नोंदवत ८९वी तर कविता राऊत २:५९:२९ ची वेळ नोंदवत १२०वी आली.
थाळी फेक : महिला : सीमा अंतिल ५७.५८ मी थाळी फेकत २०वी.
महिला ८०० मीटर्स धाव : टिंटू लुका २:००:५८ मिनिटांची वेळ नोंदवत २९वी.
५० किमी चालणे : पुरुष : संदीप कुमार ४ तास ०७ मि.५५ सेकंदांची वेळ नोंदवत ८० स्पर्धकांत ३५वा.
महिला : २० किमी चालणे : खुशबीर कौर १तास ४० मि ३३ सेकंदांची वेळ नोंदवत ७४ स्पर्धकांत ५४वी.सपना स्पर्धा पूर्ण करू शकली नाही.
महिला ४ X ४०० मीटर्स रिले : भारतीय महिला ३ मि २९.५३ ची वेळ नोंदवत आपल्या हीटमध्ये ७व्या तर एकंदर १३व्या.
पुरुषांचा संघ ४ बाय ४०० मीटर्स रिले मध्ये डिस्क्वालिफाय झाला.

कुस्ती ग्रीको रोमन ८५ किलो वजनी गटात रविंदर खत्री हंगेरियन पैलवानाकडून ०-४ असा पराभूत.
ग्रीको रोमन ९८ किलो वजनी गटात हरदीप सिंग तुर्की पैलवानाकडून १-२ असा पराभूत

महिला ५८ किलो वजनी गटात साक्षी मलिकने कांस्य पदक मिळवले.

महिला ४८ किलो वजनी गटात विनेश उपान्त्यपूर्व फेरीत चीनी पैलवानाकडून पराभूत आणि जखमी.
महिला ५३ किलो वजनी गटात बबिता कुमारी १/८ फेरीत ग्रीसच्या पहिलवानाकडून १-५ अशी पराभूत
पुरुष : ५७ किलो वजनी गटात संदीप तोमर १/८ फेरीत रशियन पहिलवानाकडून ३-७ असा पराभूत

गोल्फ : अनिर्बान लाहिरी पार+१ च्या स्कोरसह ४५वा तर शिव चौरसिया पार+७ सह ५८वा. एकूण ६० खेळाडू.
महिलांच्या गोल्फमध्ये अदिती अशोक par+7 चा स्कोर करत ४१वी.

जलतरण : महिला : २०० मी फ्रीस्टाइल १८ वर्षांची शिवानी कटारियाने : २ मि.०९:३० सेकंदांच्या वेळेसह २९ स्पर्धकांत २८वी.
पुरुष : २०० मी बटरफ्लाय : सजन प्रकाश १:५९:३७ मि.च्या वेळेसह २९ स्पर्धकांत २८वा.

जिम्नॅस्टिक्स (मराठी प्रतिशब्द?) दीपा कर्माकरची प्राथमिक फेरीतली कामगिरी :
तिचे स्कोर्स आणि रँक्स
ओव्हरऑल ५१.६६५ (५१) ५७.२६५
अन इव्हन बार्स ११.६६६ (७७)
फ्लोर एक्स. १२.०३३ (७५)
बीम १२.८६६ (६५)
व्हॉल्ट १४.८५० (८)
ती व्हॉल्टच्या अंतिम फेरीत पोचली आहे.
अंतिम फेरीत १५.०६६ च्या स्कोरसह चौथा क्रमांक
पुरुष तिहेरी उडी : रणजीत महेश्वरी १६.१३ लांब उडी मारून ३०वा
महिला २०० मीटर्स धाव : श्रावणी नंदा २३.५८ची वेळ नोंदवत ५५वी.


ज्युडो
: ९० किलो वजनी गटात अवतार सिंग रेफ्युजी ऑलिंपिक टीमच्या खेळाडूकडून राउंड ऑफ ३२ मध्ये ०-५ असा पराभूत

टेनिस पुरुष दुहेरी : पेस-बोपन्ना पहिल्याच फेरीत पोलिश टेनिसपटूंकडून ४-६, ६-७ असे पराभूत.

महिला दुहेरी : सानिया मिर्झा-प्रार्थना ठोंबरे चीनी टेनिसपटूंकडून ६-७,७-५,५-७ अशा पराभूत

मिश्र दुहेरी : सानिया मिर्झा-रोहन बोपन्ना अ‍ॅस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसर- पीअर्स जोडीला ७-५,६-४ असे नमवीत उपान्त्यपूर्व फेरीत दाखल. अँडी मरे-हीदर वॉटसन जोडीला ६-४,६-४ असे नमवीत उपान्त्य फेरीत दाखल. उपान्त्य फेरीत व्हीनस विल्यम्स राजीव रामकडून २-६,६-२,(१०-३ टायब्रेकर) पराभूत. कांस्यपदकासाठीच्या सामन्यात झेक जोडीकडून १-६,५-७ असा पराभव
टेबल टेनिस :

महिला : मौमा दास पहिल्याच फेरीत चीनी खेळाडूकडून ०-४ अशी पराभूत
मनिका बात्रा पोलिश खेळाडूकडून २-४ अशी पराभूत

पुरुष : सौम्यजीत घोष : थायलंडच्या खेळाडूकडून १-४ असा पराभूत
अचंतअ शरथ कमल : रोमानियन खेळाडूकडून १-४ असा पराभूत
तीरंदाजी : पुरुष : अतनू दास
५ ऑगस्ट रोजी झालेल्या व्यक्तिगत पात्रता फ़ेरीत ७२० पैकी ६८३ चा स्कोर करत अतनुने पाचवा रँक पटकावला.
९ ऑगस्ट रोजी राउंड ऑफ़ ३२ मध्ये त्याने नेपाळच्या मुक्तन जितबहादुरचा ६-० असा आणि राउंड ऑफ़ १६ मध्ये क्युबन तीरंदाजाचा ६-४ असा पराभव केला. आता १२ तारखेला राउंड ऑफ़ ८ मध्ये त्याचा सामना कोरियाच्या Lee Seung-yun शी होईल. १/८ बाद फेरीत कोरियन धनुर्धार्‍याकडून ४-६ असा पराभूत.

भारत यंदा पुरुषांच्या सांघिक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकलेला नाही.

५ ऑगस्ट रोजी झालेल्या व्यक्तिगत पात्रता फ़ेरीत दीपिका कुमारीने ६४० गुणांसह २०वा, लैशराम बोंबायला देवीने ६३८ गुणांसह २४ वा तर ल़मीराने माझीने ६१४ गुणांसह ४३वा रॅंक पटकावला. पैकी लक्ष्मीचा राउंड ऑफ़ ३२ मध्ये १-७ असा पराभव झाला.
लैशराम बोंबायला देवीने राउंड ऑफ ३२ मध्ये ऑस्ट्रियन खेळाडूचा ६- गुणांनी पराभव केला.राउंड ऑफ १६ मध्ये चायनीज तायपेईच्या खेळाडूला ६-२ गुणफरकाने हरवले.पुढच्या फेरीत मेक्सिकन खेळाडूकडून ४ सेट्समध्ये पराभूत

दीपिकाकुमारीने राउंड ऑफ ३२ मध्ये जॉर्जियन खेळाडूला ६-४ असे तर राउंड ऑफ १६ मध्ये इटालियन खेळाडूला ६-२ असे हरवले.राउंड ऑफ ८ मध्ये ती तैपेईच्या खेळाडूकडून तीन सेट्समध्ये पराभूत झाली.

महिलांनी सांघिक पात्रता फ़ेरीत १८९२ गुणांसह ७वा क्रमांक मिळवला. पण त्या उपान्त्यपूर्व फ़ेरीत रशियाकडून २-३ अशा पराभूत झाल्या.

नेमबाजी :
महिला : १० मी. एअर रायफ़ल : अपुर्वी चंडेला ४११.६ गुणांसह ३४वी , अयोनिका पॉल ४०३ गुणांसह ४७वी. पात्रता फ़ेरीत बाद.
पुरुष : १० मी पिस्तुल : जीतु राय ५८०च्या स्कोरने ६व्या रॅंकसह अंतिम फ़ेरी गाठली. ७८.७ स्कोरसह आठवा आला.
महिला : १० मी.पिस्तुल : हीना संधु ३८०च्या स्कोरसह १४वी. अंतिम फ़ेरी गाठू शकली नाही.
पुरुष : ट्रॅप : मानवजीत सिंग संधू ११५ गुणांसह १६वा. किनन चिनॉय ११४ गुणांसह १९वा दोघेही पात्रता फ़ेरीत बाद.
पुरुष : १० मी एअर रायफ़ल : अभिनव बिंद्रा : पात्रता फ़ेरीत ६२५.७ सह ७वा . अंतिम फ़ेरीत तिसर्‍या क्रमांकासाठी टाय झाल्यावर शूट आउटमध्ये बाद. ४था रँक.
महिला : २५ मि. पिस्तुल : हीना संधु ५७६/६००. ४० स्पर्धकांत २०वी.
पुरुष : ५० मि पिस्तुल : जितु राय ५५४/६०० १२वा प्रकाश नंजप्पा ५४७/६०० २५वा.
५० मि. रायफल प्रोन पोझिशन : गगन नारंग ६२३.१(१३वा) चैन सिंग ६१९.६(३६वा)
स्कीट : पुरुष : मिराज अहमद खान (७२/७५ चा स्कोर १०वा) उरलेल्या दोन फेर्‍यांत ४९/५०. एकंदर १२१च्या स्कोरसह नववा.
२५ मि. रॅपिड फायर पिस्तुल : गुरप्रीत सिंग २८९/३०० - २६ स्पर्धकांत १०वा. आज आणखी एक फेरी होईल.
दुसर्‍या राउंडमध्ये २९२ आणि एकूण ५८१. पात्रता फेरीत गुरप्रीत सातवा आलाय. पहिले सहा शूटर्स फायनलला पोचले.
५० मि रायफल ३ पोझिशन्स : चैन सिंग २३वा आणि गगन नारंग ३३वा

नौकानयन : rowing : men's singles sculls : दत्तू बबन भोकनाळ : हीटमध्ये ७ मिन.२१.६७ सेकंदांच्या वेळेसह उपान्त्यपूर्व फेरीसाठी पात्र.
तिथे कामगिरी सुधारत ६ मिन ५९.८९ सेकंदांची वेळ नोंदवत आपल्या हीटमध्ये चौथा आला. पदकांसाठीच्या स्पर्धेतून बाहेर. एकंदर १३वा रँक.

बॅडमिंटन
महिला दुहेरी : ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा अव्वल मानांकित जपानी जोडीकडून १५-२१,१०-२१ अशा पराभूत. नेदरलंडस्च्या जोडीकडून १६-२१,२१-१६,१७-२१ अशा पराभूत .थाय जोडीकडून १७-२१,१५-२१ असा पराभव
पुरुष दुहेरी : मनु अत्री, बी सुमीथ रेड्डी इंडोनेशियन जोडीकडून १८-२१,१३-२१ असे पराभूत. चीनी जोडीकडून
१३-२१,१५-२१ असा पराभव.जपानी जोडीला २३-२१,२१-११ असे हरवले.
महिला एकेरी : पी व्ही सिंधूने हंगेरियन खेळाडूला २१-८,२१-९ अशी मात दिली. कॅनडाच्या खेळाडूला तीन गेम्समध्ये १९-२१,२१-१५,२१-१७ असे हरवले.
राउंड ऑफ १६ मध्ये तैवानच्या ताइ त्झु यिंगचा २१-१३,२१-१५ असा पराभव.
चीनच्या वँग यिहानला २२-२०,२१-१९ अशी मात देत उपान्त्य फेरीत धडक.
उपान्त्य फेरीत जपानच्या ओकुहारा नोझुमीला २१-१९,२१-१० असे नमवीत अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश.
पी व्ही सिंधू अंतिम फेरीत स्पेनच्या कोरोलिना मारिनला २१-१९,१२-२१,१५-२१ अशी झुंज देत पराभूत. रौप्यपदकाची मानकरी
सायना नेहवालने ब्राझिलियन खेळाडूला २१-१७,२१-१७ असे नमवले. युक्रेनच्या खेळाडूकडून १८-२१,१९-२१ असा पराभव. आव्हान ग्रुप स्टेजला संपुष्टात.

पुरुष एकेरी : किदंबी श्रीकांतने मेक्सिकन खेळाडूचा २१-११,२१-१७ असा पराभव केला. स्वीडिश खेळाडूला २१-६,२१-१८ असे नमविले. राउंड ऑफ १६ मध्ये डेन्मार्कच्या जान जॉर्गन्सेनला २१-१९,२१-१९ असे हरवून उपान्त्यपूर्व फेरीत धडक. उपान्त्यपूर्व फेरीत लिन डानकडून ६-२१,२१-११,१८-२१ असा पराभूत.
मुष्टियुद्ध : ७५ किलो (मिडल वेट) वजनी गटात विकास क्रिशन पहिली फेरी जिंकून शेवटच्या १६ खेळाडूंत पोचला.तुर्कस्थानच्या मुष्टियोद्ध्याला नमवून उपान्त्यपूर्व फेरीत दाखल. तिथे उझ्बेकिस्तानच्या बॉक्सरकडून ०-३ असा पराभूत
६४ किलो - वेल्टरवेट गटात मनोज कुमार पहिल्या फेरीत २-१ असा विजय मिळवून शेवटच्या १६ मुष्टियोद्ध्यांत दाखल. उज्बेकिस्तानच्या मुष्टियोद्ध्याकडून ०-३ असा गुणांवर पराभव

भार-तोलन अर्थात वेटलिफ्टिंग :
महिला ४८ किलो वजनी गटात मीराबाई चानू क्लीन & जर्क प्रकारात एकदाही वजन उचलू न शकल्याने स्कोर न नोंदवताच स्पर्धेबाहेर.स्नॅच प्रकारात ८२ किलो वजन उचलले.
७३ किलो वजनी गटात सतीश शिवलिंगम ३२९ किलो वजन अचलून १४ भारतोलकांत ११वा आला.

हॉकी : पुरुष :आयर्लंडला ३-२ असे हरवले. जर्मनीकडून १-२ पराभूत , अर्जेंटिनाला २-१ असे हरवले. नेदरलंड्सकडून १-२ पराभव कॅनडा २-२ बरोबरी. उपान्त्यपूर्व फेरीत बेल्जियमकडून १-३ असा पराभव

महिला : जपानशी २-२ बरोबरी; ग्रेट ब्रिटन ०-३ पराभव ऑस्ट्र्लिया १-६ पराभव अमेरिकेकडून ०-३ पराभव अर्जेंटिना ०-५
.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या स्पर्धा/सामने
कुस्तीचे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:३० ला सुरू होतील. ७४ किलो वजनी गटात नरसिंग यादव आणि ५७ किलो वजनी गटात संदीप तोमर हौद्यात उतरतील. संदीपला पात्रता फेरीची कुस्ती खेळावी लागणार नाही.

बॅडमिंटन : महिला : अंतिम फेरी : भारतात १८:५५

अ‍ॅथलेटिक्स :

पुरुषांची ५० किमी चालण्याची स्पर्धा : संदीप कुमार भारतात १६:३०
महिला २० किमी चालणे : खुशबीर कौर आणि सपना : भारतात २३:००

महिला ४ X ४०० मीटर्स रिले दुसरी हीट : उद्या भारतातल्या सकाळी ५:२१
पुरुष ४ X ४०० मीटर्स रिले दुसरी हीट : उद्या भारतातल्या सकाळी ५:५०

आकाशवाणीवरच्या बातम्यांत आत्ताच नरसिंग यादव भाग घेऊ शकत नसल्याचे सांगितले आहे.

गोल्फ मधे एकूण चार फेर्‍या असतात आणि चारही फेर्‍या संपल्यावर जो सगळ्यात कमी शॉट्स मारतो तो जिंकतो.. अजून दोन फेर्‍या बाकी आहेत.. पण दोन फेर्‍यांनंतरची आदिती अशोकची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. तिने असाच परफॉर्मन्स ठेवला तर तिच्या कडून पदकाची अपेक्षा ठेवायला हरकत नाही. अर्थात गोल्फमधे प्रत्येक दिवशी वेगळी कामगिरी होते कारण रोजचे हवामान वेगळेच असते..

गोल्फ चार दिवस चालणार. काल एकदा ती दुसर्‍या रँकवर होती.
गोल्फ समजायला फार कठीण नाही. बघायला मजाही येते. गोल्फ कोर्सवर विशिष्ट संख्येने holes असतात. क्लब (गोल्फ स्टिक) वापरून त्या होल्समध्ये गोल्फ बॉल टाकणे हे उद्दिष्ट. प्रत्येक होलला किती स्ट्रोक्स लागावेत हे ठरलेले असते. आधी टी (जोराचा फटका) मारून बॉल होलच्या जवळ आणायचा आणि मग एक किंवा दोन putt (हलका शॉट) मारून बॉल होलमध्ये ढकलायचा. तुम्हाला ठरलेल्या संख्येने फटके लागले तर पार स्कोर. त्यापेक्षा जास्त लागले बोगी आणि कमी लागले तर बर्डी ईगल. हा स्कोर अर्थात क्युम्युलेटिव्ह. शेवटी कमीतकमी फटक्यांत सगळा गोल्फ कोर्स पूर्ण करणारा विजेता.

मला आता अदिती अशोक संयुक्तरीत्या आठवी दिसतेय.लीडरचा स्कोर १० अंडर पार आहे तर अदितीचा ६ अंडर पार.

हिम्या, भरत, धन्यवाद Happy

बोगी, बर्डी ईगल हे शब्द बघितले/ऐकले काल. स्कोअरमध्ये ते मायनस काय असतं? सगळी होल्स कव्हर करायची असतात का? ठराविक ऑर्डरने करायची की पाहिजे त्या ऑर्डरने केलेली चालतात? कारण एके ठिकाणी बॉल घालवणं चालू असताना तिथे जास्त प्लेअर्स दिसत नव्हत्या. म्हणजे वेगवेगळ्या होल्सना विखुरल्या असाव्यात असं मला वाटलं.

मायनस स्कोर म्हणजे अंडर पार. अर्थातच चांगला.
सगळी होल्स कव्हर करायचीच असतात. ऑर्डरबद्दल नक्की माहीत नाही.

केश्वे, साईटवर चेक केलेस तर तीन तीन खेळाडूंची स्टार्ट टायमिंग्स दिसतील. एका वेळेस तीन खेळाडू एक नंबर च्या होल पासून सुरु करतात. ते पुढच्या होलला गेले की मग पुढचे तीन खेळाडू एक नंबर होल पासून सुरु करतात. होल्स ला १ ते १८ असे नंबर असतात आणि त्यानुसारच जावे लागते.
एक होल पूर्ण करायला जर ४ शॉट्स लागत असतील आणि ते ३ शॉट्स मध्येच पूर्ण झाले तर स्कोर -१ असा येतो, म्हणजेच १ अंडर पार.
यंदाच्या स्पर्धेत ७१ पारचा कोर्स आहे आणि त्यात आदिती अशोकने दोन दिवसाच ६ अंडर पारचा स्कोर केला आहे. दोन दिवसांमध्ये १४२ शॉट्स मारल्या नंतरचा हा स्कोर आहे. आदितीला १४२ शॉट्सच्या ऐवजी १३६ शॉट्स कोर्स पूर्ण करायला लागले आहेत.

सिंधूने सिल्व्हर मेडल जिंकलंच. आपल्या मल्लांची काय खबरबात?

अदिती फायनलला पोहोचली असा wa msg फिरतोय. खरं आहे का? लिंकवर मला तिसरा राऊंड चालू दिसतोय आणि अदिती T12, T11 वगैरे होताना दिसतेय.

बायकांच्या २० कि.मी. चालण्याच्या स्पर्धेत खुशबीर कौर १ तास ४० मिनीटं ३३ सेकंद वेळ देत ५४ वी आली. दुसरी सपना स्पर्धा पूर्ण नाही करू शकली. मध्ये एकदा बघितलं तेव्हा ती पडलेली दिसली.

तिसर्‍या दिवस अखेर अदिती अशोक par+2 च्या स्कोरसह संयुक्तपणे ३१वी.दुसर्‍या दिवस अखेर तिचा स्कोर ६ अंडर पार होता. म्हणजे काल तिने पार+८ असा स्कोर केला. बर्‍याच बोगीज केल्यात. आज शेवटचा दिवस. लीडरचा तिसर्‍या दिवस अखेर ११ अंडर पार.

५० किमी चालणे : पुरुष : संदीप कुमार ४ तास ०७ मि.५५ सेकंदांची वेळ नोंदवत ३५वा. एकूण ८० स्पर्धकांपैकी ४९ नी स्पर्धा पूर्ण केली.
महिला : २० किमी चालणे : खुशबीर कौर १तास ४० मि ३३ सेकंदांची वेळ नोंदवत ५४वी.सपना स्पर्धा पूर्ण करू शकली नाही.
महिला ४ X ४०० मीटर्स रिले : भारतीय महिला ३ मि २९.५३ ची वेळ नोंदवत आपल्या हीटमध्ये ७व्या तर एकंदर १३व्या
पुरुषांचा संघ ४ बाय ४०० मीटर्स रिले मध्ये डिस्क्वालिफाय झाला.
पुरुष : ५७ किलो वजनी गटात संदीप तोमर १/८ फेरीत रशियन पहिलवानाकडून ३-७ असा पराभूत

पी व्ही सिंधू अंतिम फेरीत स्पेनच्या कोरोलिना मारिनला २१-१९,१२-२१,१५-२१ अशी झुंज देत पराभूत. रौप्यपदकाची मानकरी
.

>>तिसर्‍या दिवस अखेर अदिती अशोक par+2 च्या स्कोरसह संयुक्तपणे ३१वी.दुसर्‍या दिवस अखेर तिचा स्कोर २ अंडर पार होता. म्हणजे काल तिने पार+२ असा स्कोर केला. <<

मयेकर, थोडं करेक्शन. दुसर्या दिवस अखेर आदिती ६ अंडर पार (-६) होती. तिसर्या दिवशी शी शाॅट ८ ओवर पार (+८), ब्रिंगिंग हर टोटल स्कोर टु २ ओवर पार (+२). लिडर बोर्ड इथे आहे...

पाकीस्तान नसतेच काय या लफड्यात कधी? कुठेच नाव नाही. त्यांच्या 'ह्याच्यात ' ऑलिम्पिक शब्द नसेल त्यामुळे ते हराम आहे.असे तर नाही ? मग बाकी मुस्लीम कंट्रीतले खेळाडू विशेषतः मुली कशा येतात? बहुदा त्यांचे 'ते हे 'वेगळे असेल....

सापडले सापडले , शेजार्‍याम्ची माहिती मिळाली. त्यांच्या साईजच्या मानाने आपल्यात त्यांच्यात फार गुणात्मक फरक नाही. Happy

The slide in Pakistan sports will be visible in the Rio Olympic Games this summer as the Pakistan contingent will include more officials than athletes.
With the failure of the national hockey side to qualify for the Rio Olympics, the 18-member Pakistan contingent will include seven athletes and 11 officials.
The athletes include swimmers Lianna Swan and Haris Bandey who are based abroad, judoka Shah Hussain, who also lives in Tokyo, shooters Ghulam Mustafa and Minhal Sohail and two sprinters.

All the Pakistani athletes have got chances to compete in the Rio Olympics only through wild card entries as none of the country's athletes in different disciplines couldn't come through the qualification process.
Not even a single boxer could qualify for the Olympics although one of Pakistan's two non-hockey medals came through boxing in 1988 when Hussain Shah won a bronze.
Judoka Shah Hussain is the son of the medal-winning pugilist.
The president of Pakistan Olympic Association, Arif Hasan has blamed the Pakistan Sports Board for the sad state of affairs.
Hasan, in particular, was upset over the failure of the hockey team to qualify for the Olympics, a first for the country.
"Hockey is our national sport and through it we always had hope of winning a medal in the Olympics. But even that has now gone," he lamented.

हा हा हा हा....

महिलांच्या गोल्फमध्ये अदिती अशोक par+7 चा स्कोर करत ४१वी. अदितीचं वय फक्त १८ वर्षे आहे.

आज ६५ किलो वजनी गटात योगेश्वर दत्तच्या कुस्त्या होतील.स्थानिक वेळ ८:३० भारतीय वेळ सायंकाळी ५:००
अन्य काही पैलवानांप्रमाणे योगेश्वरला पात्रता फेरीत बाय मिळालेला नाही.

पुरुषांच्या मॅरॅथॉनमध्ये राम खेता, नितेंद्र सिंग, GOPI Thanackal भाग घेतील. तिथल्या संध्याकाळी ६ ला म्हणजे भारतात पहाटे २:३०

Pages