तर मराठी साहित्यात पावसाची सुरूवात आणि लिज्जत पापड यांची मैत्री जगज्ञात आहे.
आता इथे 'नुकतीच पावसाला सुरूवात होत आहे' असे पापडीय मटेरियल आल्यावर आमच्यासारख्या लाटणंवालीने पापड न लाटणं ,ही काही होण्यासारखी गोष्टंच नाही.
तर हा पहिला पापड!
हा पापड म्हणजे बेफिकीर यांच्या तरहीचे विडंबन आहे.
त्यांनी मोठ्या मनाने परवानगी दिली म्हणून इथे छापण्याचे धाडस करत्येय.
धन्यवाद बेफिकीरजी!
पुन्हैकवार धागा वाह्यात होत आहे
नुकतीच कीर्तनाला सुरुवात होत आहे
मुरतो जसा जसा तो गुंडाळण्यात गझला
त्यांना विडंबण्या मी निष्णात होत आहे
नजरानजर, उसासे, ताटातुटी, दिलासे
प्रत्यक्ष जे नसे ते शब्दांत होत आहे
कणभर स्वतः बदल रे पाहून थक्क होशी
हा केवढा बदल ह्या विश्वात होत आहे
अपुली लहान बुद्धी, नुसते बघत बसावे
बोलायच्या कढीची खैरात होत आहे
( मूळ गझल- ५९६११)
तर , हा पापड लाटायला पाचच मिनिटे वेळ लागला. कारण बेफिजींच्या शब्दातच मोठी कळा होती, मी फक्त चार दोन शब्द बदलले.
*******************************************
दुसरा पापड!
नुकतीच पावसाला सुरूवात होत आहे
कांदाभजी न वाईन बघ फस्त होत आहे
जाऊन का मरावे गर्दीत धबधब्यांशी
गच्चीवरी सुखाची बरसात होत आहे
कृत्रिम लिपस्टिकांची मातब्बरी कशाला
ओठांवरील लाली, पानात कात आहे
डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांत वाढ झाली
ती डॉक्टरीण आता पैशांत न्हात आहे
ये पावसा असा तू वेळेवरी हमेशा
दुष्काळ कोरडा रे धंद्यास घात आहे
पावसाला सुरूवात झाल्यावर अनिलचेंबूरना भजी नी वाई फस्तं करायची स्वप्ने पडली.
मग फक्तं आणि फक्तं त्यांच्यासाठी रचलेली ही थोडीशी डॉक्टरी गझल.
इथं वाईन पिल्याने अलामतीवर बिलामत आलीय. पण पहिल्या द्विपदीत 'फस्त' शब्द यायलाच हवा होता म्हणे.
तर हा पापड सहा मिनिटात.
**************************
तर चेंबूर दादा म्हणाले की आता हॅटट्रिकच करून टाका.
ते ओरिजिनल लिज्जत पापडवाले पण एका वेळेस तीन तीन पापड लाटतच असत.
त्यामुळे ही एक
स्वप्नातल्या सुगीची रुजुवात होत आहे
नुकतीच पावसाला सुरूवात होत आहे
चाहूल ही सखीची की भास या मनाचा
का नाद पैंजणांचा कानात होत आहे
हृदयात काहिली जी बाहुंमध्ये निमाली
मन थंडगार ओले रानात होत आहे
हे भेटणे घडीचे मग साथ आठवांची
जाऊ नको प्रिये तू का रात होत आहे
पुसतील साजणाला रे या खुणा कशाच्या
'साती जराजराशी वाह्यात होत आहे'
हा पापड भर ओपिडीत लाटला. मध्येच एक पेशंटपण पाहिला.
त्यामुळे मग याला १९ मिनिटे लागली.
असो.
तर नुकतीच पावसाला सुरूवात होत आहे.
मायक्रोवेवात एकेक पापड वीस ते तीस सेकंद गरम करा आणि आपापल्या आवडत्या उष्णपेयांबरोबर रिचवा.
******************
तर, इथे लाटायची प्रेरणा घेऊन बाकीचे लाटणीबहाद्दर आले होते.
या त्यांच्या लाट्या.
अमेय२८०८०७
दुपटी धुवायला 'बा' तैनात होत आहे
नुकतीच पावसाला सुरुवात होत आहे
चोरून वळचणीला जे व्हायचे अता ते
सर्वांसमोर बागा-खडकात होत आहे
******
जाग्याव पलटी
वाढेल फार आता बघ रक्तदाब माझा
जर सोय पापडांची फुकटात होत आहे
वाड्या, गढ्या नि गावे नेली धुवून सारी
म्हणतात लोक ह्याला 'सुरुवात' होत आहे
'पलटी' नको उगाचच सेंटी करू स्वतःला
आनंद 'लाट'ण्याची जर बात होत आहे
तोडीस तोड पापड खाऊन घेतले पण
झाले अजीर्ण... डॉक्टर तेलंगणात आहे
****
भास्कराचार्य |
फ्रेंडशिप मागितली, बॉयफ्रेंड आहे म्हणाली
मनातल्या आकांक्षांचा आज घात होत आहे
याची सुधारित आवृत्ती
मी फ्रेंडशीप पुसता 'आहे दुजा' म्हणाली
आकांक्षिल्या सुखावर हा घात होत आहे
****
anilchembur
घाला मलाच गोळ्या सेवक-प्रधान बोले
गोरक्ष टोळक्यांची जळवात होत आहे.
****
मुक्तेश्वर कुळकर्णी - यांचे पापड गोल नाहीत, पण चालतंय.
कोणास ठाऊक कुणाला काय होत आहे
मलाही नाही उमजत मला काय होत आहे
****
मानव पृथ्वीकर - यांचे पापड उडदाचे नाहीत, नागलीचे आहेत.
ओझोनच्या थराची तडकून काच गेली
पृथ्वीत मावलेली छाया उडुन गेली
अतीनील किरणांनी केला त्वचाक्षोभ
उबदारशा उन्हाची व्याख्या विरुन गेली
वैश्विक तपमानाची चिंता इथे कुणाला
भाकरी लष्कराची करपून पार गेली
******
आणि भरत. याने की आमच्या भमंनी इतके छान शेर रचले की शेवटी त्यांची एक वेगळी तरही झाली.
तर ही भरतनी रचलेली तरही.
और आने दो!
कोणास ठाऊक कुणाला काय होत
कोणास ठाऊक कुणाला काय होत आहे
मलाही नाही उमजत मला काय होत आहे
साती
साती, भम नी जाप, भाचा, अचे नी
साती, भम नी जाप, भाचा, अचे नी मानव
तळणी कितीकिती ही कढईत होत आहे
साती, यू टू? पण मस्तच. आता जर
साती, यू टू?
पण मस्तच.
आता जर पुरेसे पापड लाटून झाले असतील तर म्हणा पाहू सगळे :
गच्च ओपीडी हुच्च पापड
गच्च ओपीडी हुच्च पापड...
लय भारी. पापड एकदम कुरकुरीत.
लय भारी. पापड एकदम कुरकुरीत.
साती मस्त पापड.
साती
मस्त पापड.
पापड भारी आहेत! आवडले सर्वच !
पापड भारी आहेत! आवडले सर्वच !
सगळ्यांना धन्यवाद!
सगळ्यांना धन्यवाद!

व्वा व्वा! एकदम कुरकुरीत आहेत
व्वा व्वा! एकदम कुरकुरीत आहेत पापड..
झकास साती. जाप,भम यांच्या
झकास साती.
जाप,भम यांच्या लाटयाही मस्त.
संकलनाला मदत केल्याबदल
संकलनाला मदत केल्याबदल धन्यवाद सोनू.
ओपिडीत गझल नॉटी, टांगा पलटी
ओपिडीत गझल नॉटी, टांगा पलटी पेशंट फरार.....
अशक्य आहे हे.
सण पंचमी गं आली , नागास दूध
सण पंचमी गं आली , नागास दूध आणा
पण नागराज अस्सल सैराट होत आहे !
एम आर मंडळींचा, दरबार होत
एम आर मंडळींचा, दरबार होत आहे
फुकटात सँपलांचा वर्षाव होत आहे.
टाटा सुमो कशाला, अन फोर्ड ही नकोशी,
दारात मर्सिडिझ चा, ताफा झुलत आहे.
खाता तुम्ही तुपाशी, मग का आम्ही उपाशी
साध्याच मिश्रकांचा यल्गार येत आहे.
( मिश्रक : कंपाउंडर. पावसाळी पगारवाढी साठी आंदोलन करत आहेत)
जन्म मरणा मध्ये मी सावरु
जन्म मरणा मध्ये मी सावरु पहातो
पाय टेकतो जेथे तेथेच शेवाळ आहे.
साती .
साती
.
हा काहीतरी भन्नाट प्रकार
हा काहीतरी भन्नाट प्रकार दिसतोय :). पण काही समजले नाही. लिन्का वाचून येतो.
साती,,,,,,, क्या बात है!!!!
साती,,,,,,, क्या बात है!!!! आवडले ब्वा हे चुरचुरीत पापड
आजुबाजूला पडलेल्या पिठाची मी
आजुबाजूला पडलेल्या पिठाची मी पण लाटी फोडून पाहिली..
मावशी मेसवाली तडकून आत गेली
'पीस' मागता म्हणे ती संपून 'करी' गेली
दारी खाणावळीच्या पाहूणे दोन येता
खळी गाली अशी खुलते; वरणात पाणी घालता...
धन्यवाद मंडळी. विकु,
धन्यवाद मंडळी.
विकु, भारीच.
नंतर हेडरमध्ये टाकेन.
चंबू, तुम्ही तुमचे शब्द वृत्तात आणि अलामतीत सलामत बसवा.

नको बाबा.. लाटून लाटून मधेच
नको बाबा.. लाटून लाटून मधेच फाटतोय आता..!
चंबू
चंबू
"वाळायचे कसे हे भर पावसात
"वाळायचे कसे हे भर पावसात पापड"
संवाद कावळ्यांचा पोटात होत आहे
जाप, लय भारी
जाप,
लय भारी
धन्यवाद सोनू.
धन्यवाद सोनू.
आला पाऊस सरसरा, वारा ही
आला पाऊस सरसरा, वारा ही त्यात सुटला भरारा
पापड नुसतेच खायचे कशाला, वर कांदा नी शेवेची पखरण करा.
साती
नुसते उडदाचे पापड नको, त्यात मिरी, हि. मिर्ची पण हवी.
पाऊस हा सरारा थंडीत चिंब
पाऊस हा सरारा थंडीत चिंब ओल्या
मस्तानि काशि पिंगा वाड्यात होत आहे.
अचे -
अचे -
पापड आवडले.
पापड आवडले.
-----------------------------
---------------------------------------
Pages