मलेशिया - काय पाहावे - माहिती हवीय

Submitted by साधना on 29 July, 2016 - 09:01

नणंदेच्या आग्रहाला बळी पडून तिच्याबरोबर १९ ते २५ नोवेंबर मलेशियाला जायला होकार दिला, तिकिटेही काढली गेली आणि आता ती मला सांगतेय की कुठे राहायचे, काय बघायचे हे तु ठरव, आपण बुक करू. हे " तु ठरव, आपण बुक करू" प्रकरण आहे हे मला माहित नव्हते, मला वाटलेले की तिने सगळा प्लान बनवलाय आणि मला नुसतेच भटकायचेय.

तर आता माझ्या गळ्यात प्लान करायची जबाबदारी आल्यावर मला मायबोलीची आठवण झाली. इथे मलेशिया गुगलुन पाहिले, पुर्ण माहिती नाहीय आणि जी आहे ती जुनी आहे. म्हणुन म्हटले धागाच काढुया आता. तसेही बरेच महिने मी धागे विणले नाहीयेतच.

तर मंडळी, मला या कामात जरा मदत करा.

प्लान असा आहे -

१९ ला क्वालालंपुरसाठी निघणार, २० ला सकाळी क्वालालपुरला पोहोचू. तिथुन २२ ला सकाळचे पेनांगला जायचे विमान तिकिट आहे. २५ चे परतीचे तिकिट लंकावीवरुन आहे. (langwaki) लंकावी ते क्वालालंपुर आणि क्वालालंपुर त मुंबई.

हॉटेल बुकिंङसाठी मी airbnb पाह्तेय. KL मध्ये genting highland पाहायचे याबद्दल नणंद ठाम आहे.. त्यात बहुतेक एक दिवस जाईल.

पेनांग ते लंकावी बोटीने जास्त जवळ आणि स्वस्त आहे असे नेटवर वाचलेय. नोवेंबर शेवट हा तिथे पावसाळ्याचाही शेवट असतो, त्यामुळे बोट प्रवास कितपत सुरक्षित? नेटवर तरी बरापैकी सेफ आहे असे वाचले.

पेनांगमध्ये १ दिवस पुरेसा होईल की २ दिवस राहावे? नेटवरचे वाचुन १ दिवस पुरेसा होईल असे वाटतेय. लाण्गवाकी मला जास्त बरे वाटतेय. तिथे काय काय पाहता येईल ते मी नेटवर शोधतेय, कोणाला काही माहिती असेल तर सांगा.

तिथे फिरण्यासाठी टॅक्सी केलेली बरी असेही वाचलेय. याबाबत काही अनुभव असेल तर सांगा. आम्ही ४ जण आहोत, एक टॅक्सी पुरण्यासारखी आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फॉर्म १४A मध्ये short term multiple entry असे नमूद करायला जागा सापडत नाहीये.

(साधना या धाग्यावरील या अस्थानी पोस्ट्स बद्दल सॉरी, पण इतक्या साध्या गोष्टीसाठी अजून एक धागा काढायची इच्छा नव्हती) Happy

सिंगापूर मधून ट्रेन/बस मलेशियाला जाणे सोयीचे आहे का ?

माधव तुम्ही तिथे जाऊन रिग्गीट बदलून घ्या लिहिलेत पण तिथे आपले भारतीय चलन न्यावे कि डॉलर्स?
ट्रिप अडवाईसार म्हणतोय कि रुपये नेलेत तरी चालतील. सध्याच्या परिस्थितीत आपले रुपये आपल्या हातात कमीत कमी कष्टात कसे आणावेत हा प्रश्न आहे।

कार्ड आहे पण नंतर पेमेंट करताना रेट जरा जास्त पडतो असे काहीजणांचे म्हणणे पडले म्हणुन तिथुन बदलुन घ्यावेतका हा प्रश्न..

बाकी आपण कुठेही निघालो की ज्यांना जायचे नसते त्यांना छातीठोकपणे सगळे माहित असते आणि आपण बावळटासारखे त्यांचे ऐकत असतो हा अनुभव सध्या घेतेय.. एकाने सांगितले की कार्डवर पेमेंट करा आरामात, तर ते ऐकुन भाऊ म्हणाला, अज्जाबात नको, नंतर अव्वाच्या सव्वा दराने कार्डकंपनी वसुल करणार.... त्यामुळे जरा गोंधळलेय.

शेवटी सोबत १००० रिंगिट ठेवायचे आणि बाकीचे भारतीय रुपयेच न्यायचे असे ठरवेन असे वाटतेय. हॉटेल बिल कार्डावर होईल पण ते कार्ड माझे नाहीय. Happy

भारतीय रुपये नेऊ नका , बर्‍याच जणांनी घेणं बंद केलयं , उगाच अडकुन पडाल. कार्डावर थोडासा चार्ज लागेल पण ते जास्त सेफ असेल. आणि सोबत किमान ५००- १००० डॉलर्स तरी नक्की ठेवा.
नवीन नोटांविषयी फारशी माहिती नाही.

माधव तुम्ही तिथे जाऊन रिग्गीट बदलून घ्या लिहिलेत पण तिथे आपले भारतीय चलन न्यावे कि डॉलर्स? >>> रुपये. डॉलर्स घेताना पण लॉस होतोच आणि विकताना पण.

पण आता या ५००/१००० च्या गोंधळात काय होईल याची कल्पना नाही.

hdfc सारख्या बँका नेहमीच्या डेबीट कार्डावर परदेशी खरेदीची सुविधा उपलब्ध करून देतात. ती सुविधा पण मलेशीअन करंसी खरेदी करण्यापेक्षा स्वस्तच पडते. सध्याच्या परीस्थितीत तो पर्याय जास्त सुरक्षीत वाटतोय मला.

एच डी एफ सी रिगालिआ कार्ड बेस्ट. आहे सर्व देशांत चालते. लिमिट भरपूर आहे.

आय सी आय सी आय पण एक कार्ड बनवून देते युरो भरून. त्याची चौकशी करा. माझ्याकडे ठाण्यातला
ट्रावल एजन्सीचा पत्ता फोन आहे देउ का त्यांच्याक डे बरोबर सल्ला मिळेल. व ते करून देणारी माणसे पण आहेत. फोन चे पण नवे कार्ड लागेल. जी पी एस अतिशय उपयुक्त आहे.

भारतीय रुपये नेऊ नका , बर्‍याच जणांनी घेणं बंद केलयं , उगाच अडकुन पडाल. कार्डावर थोडासा चार्ज लागेल पण ते जास्त सेफ असेल. आणि सोबत किमान ५००- १००० डॉलर्स तरी नक्की ठेवा.
नवीन नोटांविषयी फारशी माहिती नाही.>>>

सिंगापुर मधले मेजर करन्सी चेंजरनी आजुनही रुपये बदलायचे बंद केले आहे. रुपये - अमेरिकी डॉलर - रिंगिट पेक्षा केर्डीट कार्ड बरे पडते. फक्त क्रेडीट/ डेबिट कार्ड बाहेरच्या देशात चालते की नाही ते चौकशी करा.

धन्यवाद मित्रांनो, माझ्याकडे एसबीआय, hdfc चे int डेबिट कार्ड्स आहेत आणि स्टॅन चार्टचे क्रेडिट. त्यामुळे चालून जाईल अशी आशा वाटतेय. थोडे रुपये ठेवते जवळ, चालले तर चालले.

हॉटेल बुकिंग केलय तिथे वायफाय आहे, त्यावरून व्हॉ ऍ वगैरे वापरून घरच्यांशी संवाद साधता येईल. तसेही दिवसभर काही बोलत बसणार नाहीय त्यामुळे कॉलिंग कार्डच्या भानगडीत पडणार नाही. मागे मुलगी महिनाभर युकेला गेलेली तेव्हा तिला मॅट्रिक्स कार्ड दिलेले त्यावरचा डेटा तिने शेवटी जबरदस्ती संपवला. सगळीकडे हाय स्पीड वायफाय होते त्यामुळे गरज पडली नाही.

मलेशियात वाय फाय सर्वत्र नाहीये असे वाचलेय पण दिवसभर घरी संपर्कात राहण्याची आवश्यकताहि नाही त्यामुळे चालून जाईल.

हॉटेल बुकिंग केलय तिथे वायफाय आहे, त्यावरून व्हॉ ऍ वगैरे वापरून घरच्यांशी संवाद साधता येईल. तसेही दिवसभर काही बोलत बसणार नाहीय त्यामुळे कॉलिंग कार्डच्या भानगडीत पडणार नाही. >>> तुम्हाला लोकल कॉल करायचे नसतील तर हा बेस्ट उपाय आहे . आम्हीही मागे एका ट्रीप मध्ये घेतलेले कार्ड जबरदस्तीने संपवलेलं . यावेळी ट्रीप ला जाताना आई आणि नणंदेला सांगूनच ठेवलं होतं , त्यामुळे फक्त रात्रीच खुशालीचा वॉ. आ. कॉल व्ह्यायचा.

मित्रानो, तुम्हा सगळ्यांच्या टिप्स लक्षात ठेवून मलेशिया पार पाडले. मस्त वाटले. लंकावी सगळ्यात बेस्ट.

जाई, धागा काढून लिहिते सविस्तर वृत्तांत.

मी पण ऑगस्ट मध्ये मलेशियाला जाऊन आले. आम्ही कुआला लम्पूर ला उतरल्यावर लगेच बाय रोड पेनांग ला गेलो होतो. तो रस्ता ही ४-५ तासाचा आहे पण प्रवास नाही जाणवला रस्ते आणि बसेस उत्तम. आदल्या रात्री नीट झोप न झाल्याने मी बस मध्ये झोपून गेले होते.
पेनांग शांत आणि निवांत आहे. कुआला लम्पूर थोडे गर्दीचे ठिकाण आहे. तिथे आम्ही चायना टाउन मध्ये राहिलो, तिथे ५५ रिन्गिट मध्ये के एल ट्रिप साठी हॉप इन हॉप ऑफ अशा बसेस आहेत. म्हणजे त्यांचा त्या बसेस सतत फिरत असतात. आपण एकदा काढलेले तिकिट २४ तास व्हॅलिड असते. त्यांची ती बस बोर्ड केली की त्यांनी आयडेंटिफाय केलेली बघण्यासारखी असलेली ठिकाणं येतात त्या अगोदर त्याबद्द्ल ची माहिती अनाउन्स होते आपल्याला इंट्रेस्टिंग वाटलं तर उतरून ती जागा पहायची, आणि नेक्स्ट हॉपिन्हॉपॉफ मध्ये बसायचं..
आम्ही आदल्या संध्याकाळी तिकिट काढलं मग फिरून काय काय पाहण्याजोगं आहे ते नोंदवून घेतलं, ट्विन टॉवर मात्र त्या रात्रीच पाहिले. आत गेलो नाही, बाहेरून पाहिले.. कारण त्याची तिकिटे अर्ध्यातासात संपतात आणि ते देतिल त्या स्लॉट मध्येच तिथे जावे लागते ते पण १५ मिनिटं, त्यातून त्या दोन टॉवरला जोडणारा जो ब्रिज आहे तिथवरच प्रवेश आहे. सो आम्ही तो बेत रद्द केला. घर पोच तिकिटं होती $६० (यु एस) मग आम्ही बेत रद्द केला. दुसर्‍या दिवशी नोंदवून घेतलेली ठिकाणं पाहिली, एक म्युझियम, बर्ड आयव्हरी वगैरे. मग के एल टॉवर ला गेलो. पण आम्हाला ऑबझर्वेशन डेक पर्यंत जाऊ दिलं.. तो ही टॉवर चिक्कार उन्च आहे. आणि तिथे अनलिमिटेड वेळ थांबता येते.
जेन्टिन्ग हायलँड मला अजिबात आवडले नाही. तिथे वर जाताना रोप कार चाच काय तो थरार आहे, बाकी सर्व एका बंदिस्त इमारतीत आहे. बाहेरच्या थीम पार्क चे काम सुरू असल्याने ते ही काही पाहता आले नाही.
बत्तु केव्हज पाहिल्या पण ढिगभर जिने चढून गेलो आणि आता फक्त मुरूगन (बहुतेक) त्यांचं मंदिर आहे वर.. मला बोर झालं. खाण्याचे हाल झाले माझे ( कारण मी होतकरू मासे खाऊ आहे, मटण चिकन नाही खात) Sad

स्मिता श्रीपाद, तुम्ही विचारलेली माहिती मेल केली पण मेल जात नाहीय म्हणून इथे देते.

हे कार्ड आहे अरमानचे. आता तो तिथे आहे का माहीत नाही, पण हॉटेल असणार. Happy एकदम हाई फाई हॉटेल नाहीय, साधे आहे. पण एकदम स्वच्छ, स्टाफ चांगला व सगळ्यात महत्वाचे म्हणजे मार्केटात आहे. हॉटेलच्या मागे बीच आहे. बाहेर पडलात की खाण्याचे भरपूर ऑप्शन्स आहेत. चालत लांबवर भटकू शकता. रेट पण रिझनेबल आहेत।

IMG-20161128-WA0048.jpg

Pages