काळवीट आणि सलमान प्रकरण!

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 July, 2016 - 03:52

अखेर 17 वर्षांनी न्याय झाला आणि काळवीट प्रकरणातील सलमान निर्दोष सुटला. निर्दोष असताना 17 वर्षे मनस्ताप सहन करावा लागला याची भरपाई सलमानला मिळावी याची कायद्यात काही तरतूद नसावी. असली तरी त्याच्या अमूल्य वेळाची आणि मनस्तापाची भरपाई पैश्यात मोजणे कठीणच.

पण या निमित्ताने आणखी एक प्रश्न जो नेहमीच डोक्यात येतो त्याने उसळी मारलीय. काळवीटाला काय एवढे सोने लागले असते जे त्याला जपले जाते. आता गटारीला लाखो कोंबड्या बकर्यांची कत्तल होईल, ईदला त्यापेक्षा जास्त बकरे मारले जातात, रानडुकरे आणि रानसश्यांची सर्रास शिकार होऊन त्यांना खाल्ले जाते. गोहत्येवर निर्बंध लादण्याआधी गायबैलही यातून सुटायचे नाहीत. सागरी जीवांबद्दल तर विचारायलाच नको. म्हणजे एकंदरीत जे प्राणी मुबलक आणि सहज उपलब्ध होतात त्यांना आपण खाण्यासाठी किंवा औषधी वा शोभेच्या, उपयुक्त वस्तू बनवण्यासाठी सर्रास मारतो मग काळवीटालाच का स्पेशल ट्रीटमेंट? नक्कीच यामागे कुठलीही भूतदया नसून कसलासा स्वार्थच असणार. बस तोच या निमित्ताने जाणून घ्यायचाय. जाणकारांनी प्रकाश टाकावा! धन्यवाद..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला एकंदरीतच काही काम धंदे नाहीयेत >>>> +१
मग काळवीटालाच का स्पेशल ट्रीटमेंट? >>>> भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याखाली काळवीटाच्या शिकारीला बंदी आहे.
हे असे धागे विणण्याआधी थोडेसेच गुगल केले असते तरी माहिती मिळाली असती.

endangered species मध्ये काळवीट येते,त्यामुळे त्याच्या शिकारीवर बंदी आहे.तरीही तुमच्या मताशी सहमत, कोणताही प्राणि हा आधी जीव आहे. त्याचा खाण्यासाठी ,शोभेसाठी ,प्रदर्शनासाठी ,प्रयोगासाठी वापर होऊ नये हे मुदलातच मान्य आहे.मी ही कमीतकमी मांसाहाराचा प्रयत्न करतो.आरोग्यासाठी काही प्रमणात मांसाहार गरजेचा असल्याने करतो.तसेच काही औषधे व ट्रीट्मेंट लगेच मानवावर करता येत नाहीत ,त्यामुळे आधी प्राण्यांवर प्रयोग करावे लागतात,पण आता काँम्प्युटर मॉडल्स वापरुन् काही प्रयोग केले जात आहेत .भविष्यात कृत्रीम पद्धतीने बनवलेले मांस उपलब्ध होईल तेव्हा हे मांस खाण्यासाठी प्राणि मारने बंद होईल.

हा धागा सिरीअसली काढलाय की या सगळ्या सारकॅस्टीक कमेंटस आहेत ?
जर तुला खरच तु जे लिहिलय्स तेच म्हणायचं असेल तर तुला एकंदरीतच काही काम धंदे नाहीयेत याला +११११११

खरं तर त्या काळवीटाच्या नातवाईकांकडून सलमानभैयाला नुकसानभरपाई दिली पाहिजे.
पण ये जालीम दुनिया!
असो. काल या घटनेसंबंधी एक मस्तं प्रतिसाद उदय ८२ यांनी दिला होता . तो इथे चिकटवते.

<<जिथे मनुष्य वधामधून निर्दोष सुटका होते तिथे एका जनावराच्या खुनामधून सुटका होने क्षुल्लकच समजायला हवे. उगाच मिडीया सोशल मिडीयावर सलमान नावाच्या आधुनिक कर्णावर चिखलफेक सुरु आहे.त्याचे सामाजिक प्रतिष्ठा बघावी. देशाला खास करून त्याची गरज आहे ते बघावे. अशी माणसे सरकारच्या कितीतरी मदतीला उपयोगी पडतील अशा माणसांवर गुन्हे दाखील करून शिक्षा व्हावी असे प्रयत्न करणार्‍यांना मी तर "देशद्रोही"च बोलेन.
अल्लड , तोरा मिरवणार्‍या अभिनेत्रींना सलमान ने भारतीय संस्कृती शिकवली आहे. त्यांना वठणीवर आणले आहे. आता बघा त्या अभिनेत्री कशा सोज्ज्वळ, आणि निरागस बनल्या आहे. ही सगळी सलमान खान नामक आधुनिक कर्णाची कृपाच आहे. मोठ्या मानसांना उलट आनि उध्दट उत्तरे देणे हे आपले संस्कार नाही हे सलमान खानला चांगले ठावूक आहे म्हणून तर विवेक ओबेरॉय, अर्जित सिंग या लहान्यांना सलमान चांगलीच अद्दल घडवली आहे.
रस्त्यावर फुटपाथ वर झोपणे हे धोकादायक आहे हे सुविचार लोकांना सरकार सांगुन सांगून थकली होती. परंतु मुजोर लोक सरकारला जुमानत नव्हते. मग अशांना धडा सलमानने प्रात्यक्षिक देऊन शिकवला असे लोक म्हणतात. आता मुंबईच्या कुठल्याही फुटपाथावर "येथून "भारताचा आधूनिक कर्ण" सलमान खान याची गाडी प्रवास करते" असे लिहिल्यास तो फुटपाथ रात्री काय दिवसा सुध्दा एकदम मोकळा असतो. इतकी ताकद सलमान खानच्या नावाने निर्माण झाली आहे.
चिंकारा आणि काळाविट च्या शिकारीत सुध्दा सलमान खानचा दोष नाही हे सिध्द झालेच आहे. होणारच होते. कारण शिकारीचा सलमानखानला प्रचंड तिटकारा आहे. तो तर बंदूक सुध्दा हातात पकडायला तयार नसतो. महात्मा गांधींच्या अहिंसेचा तो ब्रँड अँम्बेसेडर आहे. गांधीजी तर काठी वापरत होते सलमान तर ते ही वापरत नाही म्हणे. इतका अहिंसावादी आहे. काही लोक तर म्हणतात चित्रपटात सलमान खान डुप्लिकेट कडून मारामारी करून घेतो. खरे खोटे देव जाणे परंतू कुणावर हात उचलणे त्याला अजिबात मंजूर नाही. फक्त आपल्या महान संस्कृतीला साजेसे वर्तना करिता तो हात उचलतो. अन्यथा तो हात खिशातून सुध्दा बाहेर काढत नाही.
अशा महान आधूनिक कर्णावर चिंकारा आणि का़ळविटच्या शिकारीचा आरोप लागल्यापासून तो प्रचंड अस्वस्थ होता. तो स्वप्नात सुध्दा असे कृत्य करणार नाही त्या कृत्याचा प्रत्यक्षात आरोप म्हणजे बापरे बाप.
गेली कित्येक वर्ष तो झोपला ही नसेल. काय मिळत असेल असे खोटे आरोप करणार्‍या त्या काळविट आणि चिंकाराच्या कुटुंबाला? सलमान तर नुसता बंदूक कुतूहुलाने बघत असेल कारण त्याने या आधी कधी हातात घेतली नव्हती. त्यामुळॅ वापरायची कशी हे कसे कळणार होते ? आणि बंदूकीत गोळी होती हे कोणी त्याला सांगितलेच नाही मुद्दामुन कारण भविष्यात त्याचे चित्रपट १००-२०० कोटी कमवणार होते याचा तिरस्कार काही अभिनेत्यांना निर्मात्यांना अजुन बरेच जणांना आधी पासूनच होता. सलमान खान ने नुसता असाच चाप ओढून बघितला असेल आणि ती गोळी निघाली असेल. बस इतकेच . नंतर कोणीतरी त्या चिंकार्‍याला आणि काळविटाला मारून सलमानचे नाव घेतले असेल. कारण त्याने एक दोन गोळी चालवली होती. आता मला सांगा ज्याने आयुष्यात अहिंसेचे पालन केले आहे कधी बंदूक हातात घेतली नाही तो आधुनिक कर्ण ५०-६० किमी प्रती तास च्या वेगाने पळणार्‍या चिंकारा काळवीटावर नेम धरून गोळी चालवू शकेल का? अहो मी तर म्हणतो ऑलंपिक पदक विजेते सुध्दा करु शकणार नाही मग हा तर बिचारा अहिंसावादी सर्वांना मदत करणारा आधूनिक कर्ण कसा हे करू शकतो ? आंधळा व्यक्ती सुध्दा हे मान्य करणार नाही.
शेवटी इतक्या वर्षांनी भारताच्या आधुनिक कर्णाला न्याय मिळाला. वरून देव बघत आहे.आज तो देव खुश असेल. त्याय्च्या एका महान अनुयायीने त्याचे नाव सार्थ केले. >>

पण या निमित्ताने आणखी एक प्रश्न जो नेहमीच डोक्यात येतो त्याने उसळी मारलीय. काळवीटाला काय एवढे सोने लागले असते जे त्याला जपले जाते.

<<

हे वाक्य वाचले आणि पुढचे काही वाचायची इच्छाच राहिली नाही.

बाकी चालू द्या.

<<< नक्कीच यामागे कुठलीही भूतदया नसून कसलासा स्वार्थच असणार. बस तोच या निमित्ताने जाणून घ्यायचाय. जाणकारांनी प्रकाश टाकावा! धन्यवाद..>>>

तुला धागा काढता यावा म्हणून रे .... दुसरं काय Proud

आता तो (कु. ऋन्मेष) इथुन माहीती गोळा करुन त्याच्या गफ्रे समोर किंवा हापिसात डबे खाताना हिच माहिती सांगुन भाव खाईल. Uhoh

साती, प्लस वन त्या पोस्टला.

ईथे सलमान निर्दोष सुटला हे चांगलेच झाले. जर सदोष मनुष्यवधाच्या दोषातून सुटला असता आणि काळवीटवधाच्या दोषात शिक्षा झाली असती तर माझा माणुसकीवरूनच विश्वास उडाला असता.

@ गिरीकंद, हो. ईथून काही चांगली माहीती मिळाली तर मी ती पसरवतोच. त्याबदल्यात कोणी मला भाव देत असेल तर तोही नाकारत नाही Happy

जर सदोष मनुष्यवधाच्या दोषातून सुटला असता आणि काळवीटवधाच्या दोषात शिक्षा झाली असती तर माझा माणुसकीवरूनच विश्वास उडाला असता.

सध्याचे स्टेटस काय आहे? विश्वास आहे की उडालाय? आहे तर का आहे? उडालाय तर का उडालाय? की आहे का उडालाय ते ठाऊक नाहीये?

पाच वेगवेगळे बीबी काढ रे बाबा.. मी मटेरिअल दिलेय.. अजुन मटेरिअल हवे असेल तर अजुन एक बीबी काढ.

छान पोस्ट साती Happy

ऋन्मेषः
बीबी म्हणजे नक्की काय? धाग्याला बीबी का म्हणातात?
काही लोक बाफ म्हणतात, त्याचा अर्थ काय?

यावर नविन गर्लफ्रेन्ड... ..उप्स! सॉरी, नविन बीबी काढुन समजावून सांगशील का मज पामरास?

बी बी - bulletin board

बा फ - बातमी फलक.

बीबी इंग्रजी व बाफ मराठी एवढा फरक.

सॉरी, नव्या बाफसाठी मटेरिअल प्रश्न विचारलेला हे वाचलेच नाही. आता माझे उत्तर नजरांदाज करा म्हणजे झाले.

>>>> आता तो (कु. ऋन्मेष) इथुन माहीती गोळा करुन त्याच्या गफ्रे समोर किंवा हापिसात डबे खाताना हिच माहिती सांगुन भाव खाईल. <<<< Lol Rofl
अस पटात नै घुसायच गिरीभौ..... Proud

साधना इट्स ओके Happy
त्यामागे काही कहाणी असेल ऋन्मेषची, हे शब्द प्रयोग केल्यावर त्याच्या गर्लफ्रेंडची काय प्रतिक्रिया होती वगैरे.. त्यावर काढेल तो बीबी.

लोक लाडक्या सल्लुबद्दल बोलायला अजिबात तयार नाहीत.
तेच अमीरने नुसतं तोंड उघडलं असतं, तर .......

सलमानला नुकसानभरपाई म्हणून पुढचे सतरा दिवस सगळ्या चित्रपटघरांतून आणि टीव्ही वाहिन्यांवर सलमानपटच दाखवावेत. तसंच एक दिवस मतदानाच्या सुटीसारखा ठेवून त्यादिवशी फक्त ' हम साथ साथ है' दाखवावा व तो पाहण्याची , बिष्णोईंसकट र्सर्व्यांना सक्ती करावी.

सलमानला रियो ऑलिंपिकसाठी शुभेच्छा.

लोक लाडक्या सल्लुबद्दल बोलायला अजिबात तयार नाहीत.
तेच अमीरने नुसतं तोंड उघडलं असतं, तर .......

सलमानला नुकसानभरपाई म्हणून पुढचे सतरा दिवस सगळ्या चित्रपटघरांतून आणि टीव्ही वाहिन्यांवर सलमानपटच दाखवावेत. तसंच एक दिवस मतदानाच्या सुटीसारखा ठेवून त्यादिवशी फक्त ' हम साथ साथ है' दाखवावा व तो पाहण्याची , बिष्णोईंसकट र्सर्व्यांना सक्ती करावी.

सलमानला रियो ऑलिंपिकसाठी शुभेच्छा.

तुला एकंदरीतच काही काम धंदे नाहीयेत>>>>> जो काय धंदा असेल तो पण याच्या या रिकाम्या कामाने बसला असेल किंवा बसेल.:फिदी: मी शीर्षक पहाताच ओळखले की धागाकर्ता ऋन्मेषच असेल.:खोखो:

>जर सदोष मनुष्यवधाच्या दोषातून सुटला असता आणि काळवीटवधाच्या दोषात शिक्षा झाली असती तर माझा माणुसकीवरूनच विश्वास उडाला असता.> मी परत परत ह्या वाक्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतोय.

सदोष मनुष्यवध, भूतदया(?) आणि माणुसकी .. हम्म.... म्हणजे असं व्याकरण थोडं सुधारल्यास "सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून सुटला असता पण काळवीट वधाच्या आरोपात जर शिक्षा झाली असती तर..."

पण "माणुसकी" चा काय संबंध दोन्हीशी? कोणी माणूसकी दाखवणं अपेक्षित आहे नक्कि? न्यायालयानी?

चौकट राजा, दोषाला आरोप करून वाक्य सुधारल्याबद्दल धन्यवाद. या मोबाईलमध्ये मोठी मोठी अवजड वाक्ये लिहिताना ही अशी गडबड उडते.

बाकी वाक्याचा अर्थ लावाल तसा... उलगडला की त्यातली मजा गेली Happy

आशूचॅम्प, एवढा म्हणजे नक्की केवढा हे नेमके मोजमापात सांगितले तरच ऊत्तर देता येईल Happy
तरी अवांतर - यानिमित्ताने बरेच दिवसांपासून पडलेला एक प्रश्न - आचरट आणि पांचट या शब्दांचा नेमका अर्थ काय? दोघांचा अर्थ एकच आहे की वेगवेगळा?
असे शब्दांचे अर्थ विचारायचा धागा असेल तर त्याची लिंक दिली तरी चालेल. ईथे भाईंच्या धाग्यावर अवांतर चर्चा नाही होणार.

ऋबाळा,
आचरट म्हणजे आगाऊ. म्हणजे आपल्या ऐपतीपेक्षा ( वय/मान्/पगार/हुद्दा) जास्त बोलणारा.

पांचट म्हणजे फालतू. वाह्यात. शक्यतो लैंगिक टींज असलेल्या फालतू विनोदाला / लिखाणाला पांचट म्हणतात.

हल्ली काही लोक अतिशय फालतू म्हणजे पाणी घालून वाढवलेला कुणाला हसायलापण येणार नाही अश्या विनोदाला पांचट शब्द वापरतात.
पण ते तितकंसं खरं नाही.

आशूचॅम्प, एवढा म्हणजे नक्की केवढा हे नेमके मोजमापात सांगितले तरच ऊत्तर देता येईल .> हा बाफ उघडून वर मखलाशी करण्याएव्हढा.

>>>आचरट म्हणजे आगाऊ. म्हणजे आपल्या ऐपतीपेक्षा ( वय/मान्/पगार/हुद्दा) जास्त बोलणारा.<<<

हसावे की रडावे Proud

बेफिकीर, हसू नका रडू नका तर माहीत असल्यास योग्य अर्थ सांगा Happy
बाकी तुम्ही नक्कीच मराठी भाषेचे जाणकार आहात यात संदेह नाही.
एखादा शब्द माझ्याबाबत वापरला गेलाय तर त्याचा नेमका आणि योग्य अर्थ जाणून घ्यावा ईतकीच इच्छा आहे.

"भारताचा आधूनिक कर्ण" >> कर्ण कसला ग हा तर श्रीराम! कांचनमृग पण होत ना एन्डेंजर्ड मग हा रामच तर झाला ना!

Pages