अल्पावधीत बॉडी कशी बनवावी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 July, 2016 - 11:51

त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा कॉलेजग्रूप सुलतान बघायला जातोय. बहुतांश जणांचा चित्रपट एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू दंगा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी दुनियादारीच्या वेळी आणि नुकतेच सैराटबाबत केले होते. यण्दा हा मान चक्क सुलतानने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी झिंगाट किंवा झिंदगी सारखी गाणी सुलतानमध्ये नाहीत. म्हणून मग सलमान एखादी फाईट जिंकला रे जिंकला, की टीशर्ट काढून दादा गांगूलीच्या आवेशात फिरवायचा प्लान बनला आहे. मात्र शर्ट काढला तर आतले बनियान दिसणार, त्यामुळे नवी ब्रांडेड बनियान घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या बेबी नंदाला विचारले. म्हणजे गर्लफ्रेंड हो. तर तिने यापेक्षा भारी आयडीया दिली. म्हणाली बनियान हवीच कशाला? सीधी बात नो बकवास! शर्ट काढायचे आणि सरळ उघडे व्हायचे. पिक्चर तसाही सलमानचा आहे. त्याला लोकांसमोर उघडे व्हायला लाज वाटत नाही तर तुम्ही का लाजत आहात? कमॉन, मन साफ तन साफ तर उघडे होण्यात कसले आलेय पाप!

बस्स संध्याकाळ होताच हाच डायलॉग 'रात्रीस खेळ चाले' या आमच्या व्हॉटसप ग्रूपवर चिपकवला. एकेक भूत पिशाच्च उगवू लागले आणि प्रत्येकाला ही दरिद्री आयडीया आवड्यायला लागली. हो हो करता सारेच जण त्या दिवशी घरून आंघोळ करून यायला आणि बनियानसह शर्ट काढायला तयार झाले. ठराव पास झाला. तिकिटे लागलीच बूक झाली. आणि ईथे माझ्या डोक्यात उदबत्ती पेटली..

तर अंतर आत्मा म्हणाला, भावा तो सलमान आहे. मस्सलचे गोडाऊन आहे. आपले एक छोटेसे हड्डीचे दुकान आहे. न लाजता शर्ट काढले तरी लाज ही जाणारच. पोरींना समोर डेरी मिल्क सिल्क दिसत असताना त्या आजूबाजुच्या Gem's च्या गोळ्या काही टिपणार नाहीतच. पण उगाच ती हाडाची काडं बघून एखाद्या कुत्र्याला मोह अनावर झाला तर ईंज्जतीचा पंचनामा होईल तो वेगळाच. कल्पना आहे की मल्टीप्लेक्समध्ये कुत्रे कुठून येणार.. पण मन शैतानाचे घर, भिती कुठूनही प्रवेश करते..

तर, आता ऐनवेळी फजिती होऊ नये म्हणून,

१) दहा दिवसांत लज्जानिवारण करण्याईतपत मांसाचे गोळे अंगावर कसे चढवावेत?

२) यापुढे अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरुपी योजनेच्या अंतर्गत येत्या चार-सहा महिन्यात त्या मांसाच्या गोळ्यांवर आकार ऊकार नटस कटस बोल्ट कसे ऊगवावेत?

माहिती दोघांची तितकीच गरजेची असली तरी कृपया आधी नंबर १ बाबत सुचवा. वजन वाढवायला मी केळ खाऊ शकतो पण आता आणखी वेळ खाऊ शकत नाही..

एवढे दिवस शाहरूखचा फ्यान होऊन जगलो, आता काही दिवस सलमानचा फ्यान होऊन जिममध्ये मरायचा विचार करतोय.. खरंच, व्यायामाला वय नसते..

थॅन्क्स ईन् एडवान्स,
धन्यवाद आगाऊ ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सातीतै लै भारीं.
ऋ तुझ्याचमुळे रे असे मस्त वाचायला मिळते. तू धागा काढला नसतास तर ही मजा मिळाली असती का?

माझा मायबोलीचा आजवरचा अनुभव बोलतो की जे सगळ्यांना समजते पण मला समजत नाही ते काहीतरी चावटच असते.>>> जर तुला कळतच नाही तर चावटच आहे हे कस सांगतोयस? Uhoh
नाडी आणि रांग कळत नाही म्हणजे कमाल आहे.

{{{ नाडी आणि रांग कळत नाही म्हणजे कमाल आहे. }}}

त्याच्या पिढीतल्या लोकांना -
टमरेल घेऊन सार्वजनिक शौचालयाच्या रांगेत उभे राहावे लागले नसणार.
चट्टेपट्टे असणार्‍या नाडीच्या अर्ध्या चड्ड्या नेसाव्या लागल्या नसणार.

तेव्हा स्वतंत्र ब्लॉकमध्ये, स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था असणार्‍या आणि इलॅस्टीकचे (जॉकी व तत्सम ब्रँडेड) अंडरवेअर्स वापरणार्‍यांना हा संबंध कसा कळणार?

माझा मायबोलीचा आजवरचा अनुभव बोलतो की जे सगळ्यांना समजते पण मला समजत नाही ते काहीतरी चावटच असते..>>>>भारीच बुवा चावट तू.:फिदी:

बिपीनचंद्र, कुछ नही बदला है..

कॉमन शौचालये चाळीतून जाऊन एमेनसी ऑफिसात स्थापन झालीयत..
फक्त आता नाडीच्या जागी पट्टा सोडावा लागतो..

पण रांगा ईथेही लागतात.. दारं ईथही ठोठावली जातात..
आणि दार ठोठावणारा आपला बॉसच तर नाहीये ना या भितीने .......

म पुढचे वाक्य तुम्हीच पुर्ण करा Happy

काय करत काय असतोस रे तु , दार ठोठावण्याइतपत वेळ यायला >>>> ऋन्मेष चा बॉस पण त्याला हेच विचारत असणार ............... Happy

अहो श्री, थिअरी ऑफ रिलेटीव्हिटी ऑफ द टाईम..
आत बसलेला माणूस निवांत असतो कारण त्याचा पगार त्याही स्थितीत चालू असतो. तर बाहेर उभ्या माणसाच्या हातातले घड्याळ पळत असते कारण पोटातल्या टाईमबॉम्बमधील टिकटिक त्याला धडकी भरवत असते. ओरडावे अश्या परिस्थितीत तो नसल्याने मग दार ठोठावणे हाच पर्याय शिल्लक राहतो.
शेवटी कोणीही कितीही मोठा बॉस असला तरी निसर्गाच्या हाकेला सर्वांनाच विनम्रपणे ओ द्यावाच लागतो Happy

Hya dhagyvar 101 ka kaay tya post baghun 'kavva moti khayega' he athaval..
Kali matalay. Dusar kaay!

त्याच्या पिढीतल्या लोकांना -
टमरेल घेऊन सार्वजनिक शौचालयाच्या रांगेत उभे राहावे लागले नसणार.
चट्टेपट्टे असणार्‍या नाडीच्या अर्ध्या चड्ड्या नेसाव्या लागल्या नसणार.>>>>>>>>> हे केलं म्हणजेच माहित असतं का?

ऋन्मेष,

{{{ आणि दार ठोठावणारा आपला बॉसच तर नाहीये ना या भितीने .......

म पुढचे वाक्य तुम्हीच पुर्ण करा }}}

याच्याऐवजी उलट झालं तर.... म्हणजे दार तुम्ही ठोठावताय आणि आत तुमचा बॉस आहे. आता तुम्हीच कल्पना करून पाहा.

>>>>> याच्याऐवजी उलट झालं तर.... म्हणजे दार तुम्ही ठोठावताय आणि आत तुमचा बॉस आहे. आता तुम्हीच कल्पना करून पाहा. <<<<<<<< Lol Rofl
कल्पना कशाला? त्याच्या ते नेहेमीच्याच सरावाचे असणार आहे..... Wink

तुम्ही बहुतेक माझ्या दुसर्या धाग्यात वाचले नाही, बॉसचा मी लाडका आहे. आमच्या कामाच्या पद्धतीत कमालीची तफावत असूनही ते शक्य झालेय ते याच कारणामुळे, आमच्या कॉमन सवयीमुळे.. ना ते माझा हिशोब ठेवतात ना मी त्यांचे कोणाला सांगत.. कोणीही आत असेना, कोणीही बाहेर, आम्ही बस्स एकमेकांकडे हसून आतबाहेर करतो Happy

, बॉसचा मी लाडका आहे>>>>>झालं मग! आता असे पण धागे निघतील.

बॉसचा बड्डे आहे, गिफ्ट कोणते देऊ? आपल्या आवडत्या लोकांना कोणती गिफ्ट द्यावी?:दिवा:

भाऊ शीर्षकच चुकलं ...अल्पावधीत कधी बॉडी होत नाही. करायचीच झाली तर प्रोटीन पाउडर घ्यायला लागेल आणि तुम्हाला ती नवीन म्हण तर माहिती असेलच ....
पाउडर खाऊन केलेली बॉडी आणि जमीन विकून आलेला पैसा कधी टिकत नाही.
बाकी डायेट किंवा वर्काउट प्लान पाहिजे असेल तर सांगा....

एक शंका: बॅासची नाडी ओळखणारे ( पट्टे नव्हे,नाडी असाच शब्द आहे वाक्प्रचारात) इतरांना ते शिकरेट कशाला सांगतील?सगळेच लाडके होतील ना बॅासचे.आणि प्रमोशनला बुच बसेल.

Pages