अल्पावधीत बॉडी कशी बनवावी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 July, 2016 - 11:51

त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा कॉलेजग्रूप सुलतान बघायला जातोय. बहुतांश जणांचा चित्रपट एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू दंगा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी दुनियादारीच्या वेळी आणि नुकतेच सैराटबाबत केले होते. यण्दा हा मान चक्क सुलतानने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी झिंगाट किंवा झिंदगी सारखी गाणी सुलतानमध्ये नाहीत. म्हणून मग सलमान एखादी फाईट जिंकला रे जिंकला, की टीशर्ट काढून दादा गांगूलीच्या आवेशात फिरवायचा प्लान बनला आहे. मात्र शर्ट काढला तर आतले बनियान दिसणार, त्यामुळे नवी ब्रांडेड बनियान घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या बेबी नंदाला विचारले. म्हणजे गर्लफ्रेंड हो. तर तिने यापेक्षा भारी आयडीया दिली. म्हणाली बनियान हवीच कशाला? सीधी बात नो बकवास! शर्ट काढायचे आणि सरळ उघडे व्हायचे. पिक्चर तसाही सलमानचा आहे. त्याला लोकांसमोर उघडे व्हायला लाज वाटत नाही तर तुम्ही का लाजत आहात? कमॉन, मन साफ तन साफ तर उघडे होण्यात कसले आलेय पाप!

बस्स संध्याकाळ होताच हाच डायलॉग 'रात्रीस खेळ चाले' या आमच्या व्हॉटसप ग्रूपवर चिपकवला. एकेक भूत पिशाच्च उगवू लागले आणि प्रत्येकाला ही दरिद्री आयडीया आवड्यायला लागली. हो हो करता सारेच जण त्या दिवशी घरून आंघोळ करून यायला आणि बनियानसह शर्ट काढायला तयार झाले. ठराव पास झाला. तिकिटे लागलीच बूक झाली. आणि ईथे माझ्या डोक्यात उदबत्ती पेटली..

तर अंतर आत्मा म्हणाला, भावा तो सलमान आहे. मस्सलचे गोडाऊन आहे. आपले एक छोटेसे हड्डीचे दुकान आहे. न लाजता शर्ट काढले तरी लाज ही जाणारच. पोरींना समोर डेरी मिल्क सिल्क दिसत असताना त्या आजूबाजुच्या Gem's च्या गोळ्या काही टिपणार नाहीतच. पण उगाच ती हाडाची काडं बघून एखाद्या कुत्र्याला मोह अनावर झाला तर ईंज्जतीचा पंचनामा होईल तो वेगळाच. कल्पना आहे की मल्टीप्लेक्समध्ये कुत्रे कुठून येणार.. पण मन शैतानाचे घर, भिती कुठूनही प्रवेश करते..

तर, आता ऐनवेळी फजिती होऊ नये म्हणून,

१) दहा दिवसांत लज्जानिवारण करण्याईतपत मांसाचे गोळे अंगावर कसे चढवावेत?

२) यापुढे अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरुपी योजनेच्या अंतर्गत येत्या चार-सहा महिन्यात त्या मांसाच्या गोळ्यांवर आकार ऊकार नटस कटस बोल्ट कसे ऊगवावेत?

माहिती दोघांची तितकीच गरजेची असली तरी कृपया आधी नंबर १ बाबत सुचवा. वजन वाढवायला मी केळ खाऊ शकतो पण आता आणखी वेळ खाऊ शकत नाही..

एवढे दिवस शाहरूखचा फ्यान होऊन जगलो, आता काही दिवस सलमानचा फ्यान होऊन जिममध्ये मरायचा विचार करतोय.. खरंच, व्यायामाला वय नसते..

थॅन्क्स ईन् एडवान्स,
धन्यवाद आगाऊ ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे ऋन्मेष, तूच ना तो म्हणणारा? आमच्या ग्रुप मध्ये 100 जोर मारू शकणारा मी एकटाच म्हणून?
मी तर तुला हट्टाकट्टा गबरु जवान समजत होतो

मध्यमवर्गीय सल्ला देऊन टाकाच, एक बाफ वाचेल त्याचा >>

अरे नाही ! बिफोर फोटो काअ असावा ह्यावर एक बाफ काढ म्हणतोय मी. ह्या "विषयावर" तर अनेक बाफ निघू शकतात.

ह्या काही आयडीया

गर्लफ्रेन्ड मिळाली, आता पुढे काय?
पुढे म्हणजे नक्की काय? अमेरिकन संस्कृतीनुसार कितवा बेस?
कपडे काढतानाचे अनुभव ! ( कोणते कपडे घालावेत? हा एक ऑफशुट बाफ )

अशी मजा मुकायची का? नविन विषय, नविन बाफ. असंच मला बरं वाटतं. नाहीतर आपण दिलेले "विषयी" सल्ले सर्च मध्ये दिसणार नाहीत.

श्री | पाहीजे तर आपण फ्लेक्स बनवु ' बघतोस काय रागानं , २०० बर्पी मारलाय वाघानं'

>>>

Lol
पडलो कि राव इथ खुर्चितन हासुन हासुन ..!!!

पिक्चर तसाही सलमानचा आहे. त्याला लोकांसमोर उघडे व्हायला लाज वाटत नाही तर तुम्ही का लाजत आहात? कमॉन, मन साफ तन साफ तर उघडे होण्यात कसले आलेय पाप!

<<

इतर गदारोळात कुणाचं लक्षं कसं गेलं नाही?

@ऋन्मेष ची गफ्रे (माईंड यू, गर्ल फ्रेंड) या भौला चक्क 'अहो' म्हणते आहे... #SanskariGF #MCP-Runmesh

@ऋन्मेष ची गफ्रे (माईंड यू, गर्ल फ्रेंड) या भौला चक्क 'अहो' म्हणते आहे... #SanskariGF #MCP-Runmesh >>> गैरसमज आहेत , त्याची गफ्रे सगळ्या टोळक्याला उद्देशुन म्हणतेय. Proud
मोरपंखिस Proud

अहो बोलणारी गर्लफ्रेंड असते?
दहावीला शंभर मार्कांचे संस्कृत घेणारी मुलगी तरी असे धाडस करत असेल का..

बाकी ते पुढचे काय ते कोणी हिंट तरी द्याल का? कारण तुमचे जोक त्यावर चालू असतील आणि माझ्याशी संवंधित असतील पण मला समजलेच नाहीत तर व्यर्थ नाही का जाणार?

अहो सांगणारा उपयोगही सांगेलच की.. मला नुसते शोभेची बॉडी नाही कमवायचीय. वेळप्रसंगी दोनाचे चार हात करताना वापरताही आली पाहिजे.

बाकी ते पुढचे काय ते कोणी हिंट तरी द्याल का? >>> का तुला दिसत नाही का ? अरेरे मग कसं होणार रे तुझं ? Lol

गेल्या तासाभरात एवढी विडंबने वाचून मलाच एखादे लिहावेसे वाटू लागलेय. पण असे स्वताच्याच लिखाणाचे करणे अलाऊड असते की नाही माहीत नाही.

तरी लोकहो, या नादात मूळ धाग्यावर सल्ले द्यायला विसरू नका. उद्या उठल्यावर न मोजता काही सुर्यनमस्कार आणि बैठका मारून बॉडी गरम करतो. मग ती वाढवायची कशी याचे सल्ले ऐकायला माबोवर येतो. तुर्तास शुभरात्री !

आमचा मित्र ( जुनी गोष्ट आहे )बॅाडी बनवायचा किडा चावल्यावर जवळच्या जिममध्ये गेला."मला बॅाडी बनवायची आहे."
ट्रेनरने खांद्यावर हात ठेवला आणि समजावणीच्या सुरात म्हणाला " या वयात (३०) बॅाडी होत नाही भाऊ पण दोनचार युक्त्या/व्यायाम सांगतो ते दहा मिनीटे कर."त्याकाळी स्वस्तात फुकटचे सल्ले देणारे ट्रेनर असायचे.चार महिन्यांनी मलाही सांगितला तो व्यायाम मित्राने.मी घरातला लोखंडी बत्ता घेऊन सुरू केलं.पंधरा दिवसांत प्रचंड फरक दिसू लागला.ते सिटप,दंड वगैरे फालतू आहे.आणखी एक सोपा प्रकार सर्वांसाठी ( मुले,मुली) आहे कोणतंही वजन वगैरे वापरायचं नाही.

आज पहिल्यांदाच कु ऋ चा बाफ अथ पासून इती पर्यंत पूर्ण वाचला. हहपूवा एकदम.....

केदारचा साडी बाफ वाचून काही कळेना याला कसला किडा चावला ते, खाली हा बॉडी बाफ बघितल्यावर एकदम सूर्यच उगवल्यासारखा प्रकाश पडला टाळक्यात....

>>>> २०० बर्पी, १५० सुर्यनमस्कार, २०० स्वॅक्टस, १०० सिटप, १० मिनिटे प्लँक असा एक सेट ! <<<<
यातिल शब्दांचे अर्थ हवेत, बर्पी, स्वॅक्ट्स, प्लँक म्हणजे काय?

गेले सव्वा महिना मी रोज ५० जोर(पुश अप्स), १०० बैठका (सिटप?), १५ पुल अप्स काढतो अन नंतर कोच सांगेल ती वजने सांगेल त्या पद्धतीने उचलतो-ठेवतो. Happy पण सव्वा महिन्यात तितका काय फरक दिसला नै बोवा......

त्यापेक्षा ऋन्मेषा, वविला ये, चिखला उघडाबंब होऊन लोळ, मनही साफ होईल, तनही साफ होईल मृत्तिकास्नानाने..... अन अंगावर चिखलाचे थर चढले की बॉडीही दिसु लागेल.... Proud

हा बाफ्/धागा खरतर विनोदी लेखनात असायला हवा, ऑफिसमध्ये आल्यावर ईतके प्रतिसाद पाहुन वाचायला घेतला, वाट लागली हसुन.

खुप ऑड वाटत असे एकटे हसताना कारण बाकिचे संशयित नजरेने पाहतात

.चार महिन्यांनी मलाही सांगितला तो व्यायाम मित्राने.मी घरातला लोखंडी बत्ता घेऊन सुरू केलं.>>>>नक्की काय सुरु केलं? सर्व कोरड्या चटण्या व मसाले मिक्सर ऐवजी खलातच कुटले का?

पोरींना समोर डेरी मिल्क सिल्क दिसत असताना त्या आजूबाजुच्या Gem's च्या गोळ्या काही टिपणार नाहीतच. >>>>>

पहिल्या दिवशीचा व्यायाम शाल लपेटून केला तर चालेल का?>>>>>

Rofl Rofl

रुन्म्या, लय भारी

ऑस्सम. केदारतात्या लै भारी पोस्ट.

रुणमेश माझे धाकटे दीर सांगलीत जिम चालवतात आणि कसकसल्या प्रोटीन पावडरी वगैरे चे विक्रेते पण आहेत. बॉडि बिल्डिंग मध्ये अनुभव आहे त्यांसी. परश्याच्या वयाचे होते तेव्हा तसेच स्पर्धेत वगैरे भाग घेत असत. जा सांगलीस आणि बनवून आण बॉडी.

ते बारा का चोवीस अंड्यांचे आमलेट, दोन शेर दूध मलाई मारके, जिलब्या, अन भरपूर नाश्टा पानी.
ते राहिलेच की. म्यागी वगैरे खाउन बाडी नाही बनायची.

Pages