देवा तुझ्या दारी आलो

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
<1’

ये देवा तुझ्या दारी आलो
गुणगान गाया
तुझ्याइना माणसाचा
जन्म जाई वाया

ये देवा दिली हाक
उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी
समिंदराची माया
मोरया मोरया मोरया मोरया
मोरया मोरया मोरया मोरया

वीररसातील संगीत आणि आर्त आवाज. क्या कहने. अनुभूती अनुभूती म्हणतात ती हिच का?

http://www.youtube.com/watch?v=IOmh7kUnirw

आणि हे ही बघा.

http://www.youtube.com/watch?v=mEkF1jVy2bY

अजय-अतूलच्या अनेक आवडत्या गाण्यांपैकी एक.

विषय: 
प्रकार: 

अफलातून गाणं आहे हे! सारेगम मधे ऐकल्यापासून रोज तरी ऐकत असेन आता..
अजय अतुल यांचे श्री गणेशाय धीमही.. तेही मस्तय!!

(मीही केला बदल.. ) Happy

अजय्-अतुलचा 'विश्वविनायक' हा अख्खा आल्बमच महान आहे.

नाशिक बँड त्यांनी अजरामर केलाय. त्या तालाचा गाण्यात कधी वापर होऊ शकेल असं कधी कोणालाही वाटलंही नसेल.

मलाहि हे गाणं खुप आवडत.. असं म्हणण्यापेक्षा रोज झोपताना हे गाणं ऐकुनच आंम्ही सारे झोपतो.. शेवटी ते जोरात वाजणारं संगीत.. खरंच अक्षरशः गुंगुन जातो आपण.
अजयचा तो वेगळाच गावरान आवाज ह्या गाण्याचं विशेष आहे.

नाशिक ढोल म्हण मंजू! बँड म्हटलं, की लग्नाची वरात आठवते. Happy
----------------------
एवढंच ना!

त्या तालाचा गाण्यात कधी वापर होऊ शकेल असं कधी कोणालाही वाटलंही नसेल. >> खरयं. मी पहिलेंदा ऐकले तेंव्हा चकित झालो होतो.

माझ्या आवडत्या संगितकरांपैकी एक "अजय-अतुल". तशी त्यांची सगळीच गाणी छान असतात. पण "उलाढाल" मधलं हे बाप्पांचं गाणं खासच. डोळे मिटून, बाप्पांचं रूप डोळ्यांसमोर आणून अगदी एकरूपतेने हे गाणं ऐका... गाण्याच्या शेवटी "मोरया मोरया" च्या जयघोषाच्या वेळी अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय रहात नाहित.

मस्तच आहे हे गाणं. रोमांच उभे रहातात खरेच.
यूट्यूबवर गेलं की रोहीत राऊतच्याही क्लिप्स दिसतात. त्याने हिंदी लिटल चॅम्प्स आणि आता मराठी लिटल चॅम्प्समध्येही अप्रतिमच गायलंय हे गाणं.
जबरदस्त काँपोझिशन!
-----------------------------------
शेवटी साथ नशीबाचीच!

च्या जयघोषाच्या वेळी अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय रहात नाहित. >> खरच.

सारेगमप मधे पहिल्यांदा ऐकले, तेंव्हाच खुप आवडले.

आशू, 'बँड' च गं. त्यात झांज, ढोल, ताशे इत्यादी वाद्यांचं एकत्रित सादरीकरण असतं. नुसता ढोल वाजवत नाहीत.

सुंदर गाण्.धन्यवाद शेअर केल्याबद्दल्.अजुन अशी काही गाणी असतील तर तीही शेअर करावीत.
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

माझंही आवडतं गाणं.. Happy
संगीतही वीररसपूर्ण, अन थोडंसं 'नाशिक ढोल' च्या जवळपास जाणारं आहे.

--
संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?

केदार, दुव्यांबद्दल धन्यवाद. काल ऐकले. मस्तच आहे रे!

>>अजय अतुल यांचे श्री गणेशाय धीमही.. तेही मस्तय!!
झी मराठीवरती अजय - अतुल लाईव्ह असा कार्यक्रम होता. त्यामध्ये शंकर महादेवन यांनी हे गाणे म्हटले होते.
त्यांची प्रतिक्रीया होती. आयुष्यात काही अ‍ॅचिव्हमेंट म्हणता येईल अशा मोजक्या गाण्यांपैकी हे गाणे आहे.

दरवेळेस - हे गाणे ऐकताना मंत्रघोष काय असतो आणि आर्जवे काय असतात याची कल्पना येते आणि अक्षरशः डोळ्यात पाणी येते.