कबड्डी....खेळ बदलणार

Submitted by मी चिन्मयी on 11 July, 2016 - 15:04

क्रिकेट....फुटबाॅल....ऑलिंपिक....या मोठ्या मोठ्या नावांमधे एक नाव पुसट होत गेले ते म्हणजे कबड्डी. आज अगदी पहिल्या इयत्तेत शिकणार्या मुलाला विचारले 'बाळा तुझा आवडता खेळ कोणता?' तर 'बाळ' पापणी लवायच्या आत उत्तर देतो..'क्रिकेट'!!! अगदी एका जागी बसणारा बाळ असेल तर काही विडिओ गेम्सची पण नावं सांगेल. पण त्याला कबड्डी या खेळाचे नावही माहिती नसेल.

कबड्डी हा खर्या अर्थाने मातीशी जोडलेला खेळ आहे. पूर्वी मातीतच खेळला जायचा. काळानुसार आता मातीच्या जागी 'मॅट' आली. पण खेळाची मजा आणि चुरस काही बदलली नाही. फारशी(माझ्यामते थोडीही) प्रसिद्धीची झलक न लाभलेला हा खेळ आणि तो खेळणारे नव्हे जिवंत करणारे खेळाडू यांच्याबद्दल थोडेसे बोलावे म्हणून हा प्रयत्न.मी काही खेळातली उत्तम जाणकार वगैरे नाही किंवा खेळाडूही नाही. तरीही मागील 2 वर्षांत कबड्डीने चाहते खेचून आणलेत त्यापैकी मी एक.

इथे नक्की कबूल करावेसे वाटते की 2 वर्षांपूर्वी पर्यंत कबड्डी ही national च नाही तर international level ला खेळली जाते हे मला माहिती नव्हते. आणि कबड्डीचा world cup असतो हे तर त्याहून माहिती नव्हते. अशी परिस्थिती असताना भारताने आजपर्यंत जवळजवळ 7 वेळा हा world cup जिंकलाय हे कुठुन माहिती असणार? Asian cup, South asian cup यात सुद्धा भारताची कामगिरी सर्वोत्कृष्ट आहे, हे आता इंटरनेट चाळल्यावर कळते आहे. आणि अशी स्थिती फक्त माझी नाही तर अनेक लोकांची आहे. कारण हा खेळ फक्त तो खेळणार्या खेळाडूंनाच माहिती असल्यासारखा होता. आणि खेळच ओळखीचा नाही तर खेळाडू कुठून ओळखीचे असणार. क्रिकेटीअर्सची नावे घडाघडा बोलून दाखवता येतात पण कबड्डीपटू कोण आहेत याचा पत्ताच नाही.

पण आज हे चित्र थोड्या प्रमाणात का होइना बदलताना दिसते आहे. आणि त्याचे पूर्ण श्रेय जाते '' प्रो कबड्डी लीग" ला. या लीग ने खेळाला एक नवीन प्लॅटफाॅर्म उपलब्ध करून दिला आहे. आणि हा खेळ लोकांच्या आणखीन जवळ आणून ठेवला आहे. प्रेक्षक गर्दी करत आहेत. आणि खेळाडू आता हिरो बनत आहेत. या लीगच्या मागे अनेक लोकांची मेहनत आणि चिकाटी आहे. कारण लीग उभी करणेच पुरेसे नव्हते. तर प्रेक्षकांची पसंती आणि उपस्थिती सुद्धा गरजेची होती. आता हे उद्दिष्ट साध्य होताना दिसते आहे. 8 टीम्स सोबत कबड्डी लीग चे 3 सीजन पूर्ण झाले. चौथा सीजन आता थाटात सुरू आहे. परिस्थिती चांगल्याकरिता पालटली आहे...खेळाची आणि खेळाडूंचीही.

एका माहितीपटात मी प्रो कबड्डीच्या एका सदस्याची मुलाखत पाहिली. त्यांचे एक वाक्य अगदी छान लक्षात राहिले.."जेव्हा प्रेक्षक फक्त खेळ न पाहता अंपायर होतात,तिथे आमची सगळी मेहनत सफल होते. कारण त्यांनी खेळ फक्त पाहिलेला नसतो तर समजून घेतलेला असतो." याच माहितीपटात अनुप कुमार या एका उत्तम खेळाडूने आपले मनोगत मांडले. तो म्हणाला, " आधी आम्हाला फार कोणी ओळखतच नव्हते. World cup जिंकल्यावरही त्याची दखल घेतली गेली नव्हती. पेपरच्या एका कोपर्यात एक छोटीशी बातमी एवढेच त्याचे महत्त्व होते. पण आता वेळ बदलली आहे. आता प्रसिद्धी मिळते आणि पैसाही. आता आम्हालाही कळू लागले आहे मोठ्या लोकांमधे कसे उठा-बसायचे."

टीव्हीवर ही लीग अगदी सर्रास पाहिली जाते. 4 भाषांमधे अनेक देशांमधे याचे प्रसारण केले जातेय.आमच्या घरात तर जेवणाच्या वेळासुद्धा पुढे-मागे सरकल्यात. 40 मिनीटे डोळ्यांच्या पापण्यासुद्धा लवताना विचार करतात. 'सुपर रेड', 'सुपर टॅकल', डू ऑर डाय रेड' असे शब्द ओठी खेळू लागलेत. लीग संपल्यावर टीव्हीवर काय बघायचे असे प्रश्न पडू लागलेत. सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आपली एक जागा निर्माण करण्यास हा खेळ पुढे सरसावला आहे. आणि त्यात तो यशस्वी होईल यात शंका नाही...कारण खिळवून ठेवेल तोच खरा खेळ!!!

ता.क.- मनजीत छिल्लर आणि अजय ठाकूर माझे पर्सनल फेवरेट आहेत. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीपक हुडा ची सुपर रेड हा मेन टर्निंग पॉईंट होता
बाकी हाफ टाइम च्या आधी अनुप च्या दोन लागोपाठ सुपर टॅकल झाल्या
मुंबई बेटर लक नेक्स्ट टाइम

हो
आज यू मुंबा खरच छान खेळले
पहिल्या हाफ मधेच मोठी लीड घेतली
ऑल आऊट झाला असता तर कदाचित पॉईंट्स मधला फरक बराच कमी झाला असता

मुंबई बेटर लक नेक्स्ट टाईम असं का लिहिलंय? हरले का यु मुंबा? माझा थोडा बॅकलॉग आहे. गेल्या दोन दिवसांतले सामने पाहायचे आहेत.

मुंबावाल्यांना सामना शेवटपर्यंत अटीतटीचा ठेवण्याचं (आधी जिंकत असले तरी) कौशल्य चांगलं जमलंय.

राहुल चौधरीचं जास्तच कौतुक होतंय असं वाटतं. पहिल्या सीझनमधला नेत्रदीपक खेळ पुन्हा कधी दिसला नाही. शिवाय आता वय आणि शरीर वाढलंय, तसा स्पीड कमी झालाय असं वाटतं. आणखी एक म्हणजे बचावाच्या वेळी तो आपला अजिबात काही संबंध नसल्यासारखा उभा असतो. फक्त काल पाहिलेल्या सामन्यांत दोनदा पकडींना हातभार लावला. पहिल्या सीझनमध्ये तर तो फक्त चढाई करायला मैदानात यायचा. बचावाच्या वेळी त्याला सब्स्टिट्यूट करून बाकावर बसवायचे. ५०० रेड पॉइंट्स केलेत. पण त्याच्या संघाकडून सगळ्यांत जास्त रेड्स तोच करतो.

बंगलोर बुल्सची टीम मोस्ट इम्प्रेसिव्ह आहे. सरासरी वय २१ आहे म्हणे. रोहित कुमार चढायांप्रमाणेच पकडीही करतोय. त्या संघात अजय कुमार हा एक शहरी तोंडवळ्याचा खेळाडू आहे. त्याला एस्केप आर्टिस्ट म्हणायला हवं.

कोणी पाहत नाहीए का? बहुतांश सामने अटीतटीचे होताहेत. काल प्रबळ वाटलेला संघ आज फिका पडतोय. अजूनतरी गुजरातला कोणाचं आव्हान मिळालेलं नाही.

एका सामन्यात अनुपकुमार एकटाच झुंजतोय, आणि त्याला कोणाचीच साथ नाही, असं चित्र होतं. ते आता बदलू लागलंय Happy काशिलिंग अडके आणि श्रीकांत जाधव फॉर्मात आलेत. मागचे दोन की तीन सामने जिंकले. पटणा पायरट्सना हरवलं.
पण सरासरी गुण पाहिले तर यु मुंबा पाचव्या क्रमांकावर आहे, चढ सोपा नाही.
डिफेंडिंगमध्ये अनेक गुण फुकट देताहेत. सुरिंदर सिंग दिसला रेडर की धावत सुटतो.

बेंगॉल वॉरियर्सच्या मणिंदरचा मी फॅन झालोय. कसलाही शो शा न करता क्लास खेळ.

बेंगॉल वॉरियर्सच्या मणिंदरचा मी फॅन झालोय. कसलाही शो शा न करता क्लास खेळ. >> या वेळेस बरेच नवीन खेळाडु पुढे आलेत आणी जुने फारसे चालत नाहियेत.

मणिंदर नवा नाही. जुनाच आहे. पहिल्या सीझनमध्ये जयपूरला जिंकून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. इंज्युअरी गॅप नंतर आता परत आलाय.
यु मुंबाने निराशा केली. काल हरयाणासोबत महत्त्वाचा सामना होता. गुण/सामने या गुणोत्तरात हरयाणा ग्रुपमध्ये तिसरे आणि मुंबा चौथे. काल मोठ्या फरकाने सामना जिंकला असता, तर दोघांचं गुणोत्तर सारखं झालं असतं. सामना तर गमावलाच. पण फरक कमी करून एक गुण मिळवायचा, तर दीड मिनिट असतानाची चढाई करायला आलेला श्रीकांत जाधव मध्य रेषेजवळ घुटमळत टाइम किल करत होता. अरे बाबांनो, जास्तीत जास्त चढाया होऊन गुण कमवायची गरज तुम्हाला आणि वेळ मारायची गरज पुढे असलेल्या हरयाणाला आहे.

आजपासून Pro Kabaddi season 6 सुरू होतोय. चाहत्यांनी इथे बोलायला हरकत नाही. Happy

बरेच स्टार खेळाडूंचे संघ बदलल्याने घडी विस्कटल्यासारखी वाटतेय. रेडर्सच्या जोड्या फुटल्यात.
गेल्या वेळःचा सीझन खूपच लांबल्यासारखा वाटलेला. आताही तेच होणार आहे.
मला दोन गोष्टी आणखी आवडत नाहीएत - चाळीस मिनिटांचा सामना संपवायला जवळजवळ सव्वा तास घेताहेत. दुसरं कॉमेंट्री भयानक शब्दबंबाळ.
रिव्ह्यु घेतला की काय झालंय ते त्यांना दिसेल तसं सांगतात आणि त्यांचा अंदाज सांगतात. आणि निकाल त्या विरोधात गेला की श्वास घ्यायची फुरसतही न घेता त्या नव्या निकालाचं तोंड फाटेतो कौतुक करतात, नाहीतर तोच एक्स्प्लेन करतात.

खरंच आहे. बारा संघ आणि तीन महिने लांबलेली टुर्नामेंट नाहीच बघवत. सुरूवातीच्या 2-3 मॅचेस् बघूनच कंटाळा येतो कारण मुळात कुठल्या टीमला सपोर्ट करायचा तेच कळत नाहीये. लाडक्या टीम मधले सगळे खेळाडू भलत्याच टीम्समधे गेलेत. त्यामुळे आता फक्त लाडक्या खेळाडूला चिअर करतो आम्ही ( घरबसल्याच हो).
आता थोड्या दिवसांनी फक्त स्कोअर बोर्ड बघायचा आणि तिसर्या महिन्याच्या शेवटी क्वार्टरफायनल्स पासून पुन्हा बघायला सुरूवात करायची.

या धाग्यावर आशियाई गेम्स मधल्या धक्कादायक निकालांचा उल्लेख झालेला नाही?

या वेळेस आपल्याला एकही गोल्ड मिळाले नाही! पुरूष कबड्डीमधे इराण सुवर्ण तर कोरीआ रौप्य पदक घेऊन गेले, भारत चक्क कांस्यपदकावर राहीला. महिला कबड्डीमधे देखील इराणने सुवर्ण पदक कमावले आणि भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

इतर देशांची प्रगती अशीच राहीली तर पुढचे विश्वकरंडक अधिक चुरशीचे होतील आणि कबड्डीला आंतराष्ट्रीय स्तरावर चालना मिळू शकेल.

थाॅर माणूस, अहो अशी सिरियस चर्चा करण्याइतपत कुणी पाहत नाही कबड्डी. त्यामुळे स्पर्धांमागचं राजकारण माहिती असणं जरा कठीणच आहे. आशियाई गेम्स भारतासाठी 'वेक अप काॅल' होता असं म्हणायला काही हरकत नाही. इतर देशांमधले खेळाडू आपल्याकडे पैसे देऊन खेळायला आणायचे, त्यांना सगळे बारकावे शिकवायचे आणि नंतर त्याच्याकडूनच चारी मुंड्या चित् व्हायचं. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय संघाचा आणि निवड समितीचा गाफिलपणा. आपल्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाहीच असं मानून चालणारे. अंतर्गत वाद देशाच्या प्रतिभेपेक्षा महत्वाचे आहेत यांना.
यावरून रंगलेला ब्लेम गेम फेसबुकवर बघितला.

इराण संघ केपीएलच्या आधीपासूनच तयारीचा वाटत होता. मागच्या एशियाई गेम्स की विश्वचषकातही त्यांनी टफ फाइट दिलेली. त्यामुळे केपीएलमध्ये आपण त्यांना बारकावे शिकवले, हे पूर्ण खरं नाही. ते खेळाडू चांगले होते, म्हणून त्यांना के पीएलमध्ये घेतलं.
कोरियानेही या एशियन गेम्सच्या आधी आपल्याला एकदा धूळ चारलीय. तेव्हा भारत हरला तरी खेळ जिंकतोय म्हणून आनंद मानायचा.
त्यात संघनिवडीतलं राजकारण, कोर्ट केस, आणखी काय काय. अजय ठाकूर कप्तान म्हणून पटत नाही.
त्यावर इराणच्या कोचिंग टीममध्ये भारताने संधी नाकारलेल्या या महिला कोच https://indianexpress.com/article/sports/asian-games/asian-games-2018-ho...
https://indianexpress.com/article/sports/asian-games/asian-games-2018-wa...

-----

कोणाला सपोर्ट करायचं हा मोठाच प्रश्न. काल लाडका अनुपकुमार (कापं गेली भोक राहिले असले तरी) यु मुंबाविरोधात.
दिल्लीला केपी एल आणि आय पी एल दोहोंतून बॅन केलं पाहिजे.
सुरुवातीला स्पेक्टॅक्युलर चढाया आणि पकडी , एस्क्पेस दिसायचे ते आता रूटिन झालेत. त्यामुळे रस कमी होतोय. रोजचा अडीज तास देणं ही परवडणार नाही. सगळे संघ एकेकदा पाहिले की मग कोणाच्या मॅचेस नीट पाहायच्या ते ठरवेन.

इतकी वर्षे भारत पहिला होता आणि बाकी कोणी प्रतिस्पर्धी नव्हता म्हणून चालत होतं. आता बाकीचे देश पण जोरात तयारी करून उतरत आहेत स्पर्धेत त्यामुळे आपल्याकडे असलेल्या अंतर्गत बाबी समोर येत आहेत. गेहलोत पर्व संपून आता नवीन कोणी तरी येईल आणि आहे तेच चालू ठेवेल, खेळांची एकूणच जी दशा क्रिकेट सोडता आहे त्यात काही बदल होणे नाही.

भारतीय संघात कोचच्या आवडीचे कॅप्टन आणि मग कॅप्टनच्या आवडीचे इतर खेळाडू असं समीकरण फार पूर्वापार चालत आलेलं आहे. खेळाडू त्यांच्या कुवतीनुसार किंवा स्कील्सनुसार नाही तर ' फेवरिट कोण' या न्यायाने निवडले जातात.
अतिशय उत्तम खेळणारे कित्येक खेळाडू Pkl मधे दिसतात.पण भारतीय संघात त्याचे नाव विचारातही घेतले जात नाही.
Pkl मधे सुपर 10 वर सुपर 10 लावणारे 'लाडके' इंटरनॅशनल मॅचेस् मधे शून्य होऊन जातात.

फजल अत्राचलीला जनगणमन म्हणताना बघून या धाग्याची आठवण आली.
होम पिचवर यु मुंबा शेवटच्या क्षणी सामने हरताहेत.
सिद्धार्थ देसाई इज द न्यु फाइंड. उंचीचा भरपूर फायदा घेतोय.
प्रो कबड्डीत फीमेल ऑफिशियल्स ठेवलेत याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं.
जयपूरच्या सामन्यांत अभिषेक वात आणतो.

धमाल. तमिळ थलैवाज वि. हरयाणा शेवटचे ३० सेकंद.
४०-३८ जयपूर पुढे.
अजय ठाकुर चढाईत वेळ घालवायला चक्क टायमर बघत कर कटिवरी ठेवोनी उभा ठाकला , तर हरयाणाच्या पोरांनी त्याचा गणपतीबाप्पा मोरया केला.
शेवटी ४०-४० बरोबरी

उठा उठा प्ले ऑफ्सची वेळ झाली. (रविवारपासून)
सर्प्राइज सर्प्राइज - दबंंग देल्ही बाद फेरीसाठी पात्र गुजरात आणि मुंबा १-२.

झोन बी मधून तिसरा क्वालिफायर ठरायचाय आणि पहिल्या दोघांची क्रमवारीही ठरायचीय.
बंगलूर ७३ बंगाल ६९.
जयपूर वि बंगलोर आणि युपी वि. बंगाल हे सामने बाकी आहेत.
जयपूर आणि बंगाल जिंकले तर १ बंगाल २ बंगलोर ३. पटना हे क्वालिफाय होतील.
बंगाल हरले तर १. बंगलोर २. बंगाल ३. युपी

दोन.
एलिमिनेटर आणि क्वालिफायर. झोनमध्ये पहिले आले असते, तर क्वालिफायर आणि दोन संधी.

Pages