पीड

Submitted by वैवकु रीटर्न्स on 6 July, 2016 - 04:59

ही कुठल्याश्या स्मरणांवरची वीण उसवलेली आहे
ठसठसत्या जखमांनी माझी झोप उडवलेली आहे

मी माझ्या रात्रीच्यारात्री गझलेसोबत घालवणे
माझ्या पत्नीने माझी ती खोड जिरवलेली आहे

जीवन म्हणजे अस्तित्त्वाच्या भीषण आभासांचे वन
श्वासांना पकडत मी माझी वाट वळवलेली आहे

शब्दांच्या आधारे माझा विठ्ठल बांधत आहे मी
ज्याच्या पायी ह्या जन्माची वीट बसवलेली आहे

आलम-दुनियेसाठी माझे हे लेखन नाहीच मुळी
ज्या हृदयांना कळते त्यांना पीड कळवलेली आहे

(अपूर्ण..... )

~वैवकु

बेफीजींच्या एका गझलेच्या जमीनीवरून

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठसठसत्या जखमांनी माझी झोप उडवलेली आहे

जीवन म्हणजे अस्तित्त्वाच्या भीषण आभासांचे वन

छान!

जीवन म्हणजे अस्तित्त्वाच्या भीषण आभासांचे वन
श्वासांना पकडत मी माझी वाट वळवलेली आहे

आलम-दुनियेसाठी माझे हे लेखन नाहीच मुळी
ज्या हृदयांना कळते त्यांना पीड कळवलेली आहे<<< व्वा

>>>बेफीजींच्या एका गझलेच्या जमीनीवरून<<<

माझी गझल कोणती? अनुभुतींच्या शिंतोड्यांनी, ही का? - धन्यवाद!

कै मजा नै आली राव. कै तरी रापचिक लिहा बरं. वाह उस्ताद वाह, अशी दाद द्यावी वाटली पाहिजे.
लिहित राहा.

>>>>> बेफीजींच्या एका गझलेच्या जमीनीवरून

अहो, किती दिवस दुसर्‍याच्या 'जमीनी' वापरणार ? स्वतःच्या जमीनीवरुन सोडा की काही क्षेपणास्त्र. Wink

-दिलीप बिरुटे