रिटर्न गिफ्ट्स

Submitted by चिंगी on 12 May, 2015 - 10:09

तुम्हाला पटो वा न पटो, वाढदिवसाच्या पार्टया हा सोशल लाइफचा महत्वाचा भाग बनला आहे. आता लहान मुलांच्या पार्टीत रिटर्न गिफ्ट्स चांगलेच रुळले आहेत. इथे त्यातील काही पर्याय तर लिहुयातच सोबत टार्गेट वयोगट आणि काही थीम असल्यास तेही लिहील्यास उत्तम.

मागे एका पार्टीच्या गुडीबॅग मध्ये चॉकलेट ऐवजी ड्रायफ्रूट्स दिले होते.
ही कल्पना आवडली, फक्त नट्सची अॅलर्जी नाहीये ना थे बघायला हवे.

प्रतिसादात लिहीलेले काही पर्याय इथे चिटकवतेय..

स्मायली बॉल
फुलांची रोपटी
सिपी कप
वॉटर बॉटल
ग्रुप फोटोची प्रिंट
पुस्तके
सॅन्ड- बिच सेट
पेन्टिन्ग कॅनव्हास- रन्ग
डिजिटल पिगी बॅन्क
कलर करायचे मग आणी कलर
पुल पार्टिला- वॉटर गन
गिफ्ट कार्ड
वॉटर कलर पॅलेट व रंग
क्रेयॉन्स
प्ले डो
पझल्स

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांना निदान टीन्स मध्ये येइपर्यंत तरी ह्या रिटर्न गिफ्ट्स बद्दल फार उत्सुकता असते. ती बॅग मिळाल्या शिवाय घरीच जात नाहीत.

मला नुकताच स्टीलच्या चमच्यांचा डझनाचा सेट रिटर्न गिफ्ट म्हणून आलाय! घरातले चमचे सदोदित गहाळ होत असतात. खाऊच्या स्टीलच्या डब्यांमध्ये लपून बसतात किंवा किचन ट्रॉलीच्या किंवा शेल्फच्या फटींमधून जोरदार उड्या मारून गायब होतात. काहीजण गॅसवरच्या पातेल्यातील पदार्थ ढवळताना पातेल्यात चुकून तसेच राहिल्यामुळे कलंकित होतात. तेव्हा दर सहा महिन्यांनी जुन्या, विजोड, वाकुड्या झालेल्या, माना मुरगळलेल्या किंवा रंग उडालेल्या चमच्यांना समाधी देऊन त्या जागी ताज्या दमाचे चमचे आणणे क्रमप्राप्त असते. रिटर्न गिफ्ट म्हणून आलेल्या चमच्यांमुळे बाजारातील एक खेप वाचली आहे! Lol

माझ्या नणंदेच्या मुलाचा गेल्या महीन्यात वा.दी झाला.. मुलांना रिटर्न गिफ्ट म्हणुन जिगसॉ पझल्सचे सेट दिले आणि मोठ्यांना रिटर्न गिफ्ट म्हणुन मोगर्‍याची रोप दिली आहेत.. सध्या त्याला फुल येत आहेत मस्त वाटतय Happy

दुपटं चालेल की... आमच्या मातोश्री नातवंडांची सुबक सुंदर स्वच्छ दुपटी वॉशिंगमशीनवर अंथरून ठेवतात Wink

हो तर, दुपटीच कशाला, दुधाच्या (भरलेल्या) पिशव्या जास्त सूट होतील. अकुसारखे मोठे बच्चे घरी जाऊन चहा तरी करतील. Wink

आम्ही अलिकडे गिफ्टस स्विकारणे बंद केले आहे.>>>>>>>>> मी हा निर्णयघेतला तो मुख्यतः माझ्या कामवालीच्या,वॉचमनच्या मुलांसाठी. आपले गिफ्ट दुसर्‍यांनी कमी लेखू नये ,त्यांचा आत्मसन्मान राखावा या
कारणांसाठी.मुलगा प्रथम नाराज झाला होता,पण पटवून घेतले.

या, खा, प्या, सगळ्यांनी मिळून मनापासून गंमत करुया. बास. अ़जून काय हवे ?>>>>>> +१

आम्ही अलिकडे गिफ्टस स्विकारणे बंद केले आहे << हे मी खूप दिवसांपासून करण्याचा प्रयत्न करतो आहे.
पण ना पाहुणे ऐकतात ना कुटूंब.. Proud
आता एक लहानसा बदल केला आहे.. खाण्याच्या/पिण्याचा वस्तू भेट म्हणून नेतो (केक, संतरी/सफरचंदाची पिशवी/ वाईनची बाटली इत्यादी).. निदान खाऊन/पिऊन संपेल तरी.

मुलांच्या वाढदिवसांना गिफ्ट्स न देणे घेणे हे आपले मत आपण मुलांवर लादतो असं आम्हाला वाटतं त्यामुळे आम्ही असं काहीही सांगत नाही. येणार्‍या भेटींमध्ये जास्त करून स्टेशनरी प्रकारच असतात, जे तसेही मुलांना खंडीभर लागतात. अगदी दोन रुपयांचा खोडरबरही गिफ्ट रॅपिंगमध्ये मुलांना मिळाला तरी त्यांच्या चेहर्‍यावर आनंदच असतो. लोकांनी कितीही महागड्या रिटर्न गिफ्ट्स दिल्या तरी आपण आपलं बजेट ठरवलेलंच पाळायचं. स्पर्धा करायचीच नाही. मुलांचा वाढदिवस हा त्यांच्या आनंदासाठी आपण करतो, मग त्यावर बंधनं का घालायची? माझे बाबा तर म्हणतात घरी एकवेळ दसरा पाडवा साजरा करू नका, पण मुलांचा वाढदिवस मात्र ते म्हणतील तसा, त्यांना हवा तसा साजरा करा.
यंदा कसं काय माहिती नाही, पण लेकीने स्वतःहूनच सांगितलं की माझ्या मित्रमैत्रिणींना वाढदिवसाला बोलवायचं नाही. आपले नेहमीचे आजी आजोबा मावशी काका मामा मामी आत्या भावंडं हेच लोकं पाहिजेत. जेवणाचा मेनूही तिनेच सुचवला. आम्ही तिने सांगितल्याप्रमाणेच केलं. ती खूपच खुश होती. पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं भूत डोक्यात असेल.

माझ्या एका मित्राच्या मुलीने एका वाढदिवसाला त्यांच्या बिल्डींगच्या बाजूच्या झोपडपट्टीतली सगळी लहान मुलं घरी बोलवायची असं सांगितलं.
मित्राने आणि त्याच्या बायकोने तत्काळ मानले.
सगळी मुलं आली. त्यांना बिल्डींगीत बड्डे पार्टीला जायचे अप्रूप होते. सगळी मुलं नटून थटून आली होती.
खाऊ, खेळ वगैरे झाले.
पोरं खुश, मित्राची मुलगी खुश आणि आईबाप पण खुश.

माझ्या एका मित्राच्या मुलीने एका वाढदिवसाला त्यांच्या बिल्डींगच्या बाजूच्या झोपडपट्टीतली सगळी लहान मुलं घरी बोलवायची असं सांगितलं.
मित्राने आणि त्याच्या बायकोने तत्काळ मानले.
>>>>
ग्रेट, धाडसाचे काम आहे हे,
निव्वळ अमीर-गरीब भेदभावाबद्दल नाही बोलत आहे तर पुढे आपल्या अपत्याला नको त्या संगती तर लागणार नाही ना ही भिती सुद्धा मनात येऊ शकते.

ग्रेट, धाडसाचे काम आहे हे,
निव्वळ अमीर-गरीब भेदभावाबद्दल नाही बोलत आहे तर पुढे आपल्या अपत्याला नको त्या संगती तर लागणार नाही ना ही भिती सुद्धा मनात येऊ शकते.

>> माझ्याही मनात हेच आले होते. त्या मुलीचे नी पालकांचे कौतुक.

मंजूडी +१. इथल्या पोस्टी वाचून मी कालपासून विचार करत होते, लिहावं की नाही. तू लिहिलंस त्यामुळे आयतंच +१ देते आहे Happy

मंजूडे, अगदी मनातलं लिहिलंस :). आय अ‍ॅम नॉट किडींग, मला भेटवस्तू घेणं आणि देणं प्रचंड आवडतं. दुसर्‍यांना देताना विचार करूनच देत असल्याने सहसा काही वावगं दिलं जात नाही Proud

त्या ताईंनी धागा काढताना रिटर्न गिफ्ट म्हणून काय काय देता येईल याच्या कल्पनांचे संकलन करणे असा उद्देश समोर ठेवला होता असे वाटते.
चर्चा रिटर्न गिफ्ट्स द्यावीत की नकोत यावर सुरू झालिये.

लहान मुलांना रिटर्न गिफ्ट म्हणून तयार खाऊचे असेबल केलेले पाकिट देता येते. त्यात आवडीनुसार व बजेटनुसार काजूकंद, इक्लेअर्स, पर्क किंवा तत्सम चॉकलेट्स् - कॅडबऱ्या, जेली स्वीट्स्, सुकामेवा वगैरे प्रकार देता येतात. पातळ, बारीक नेटच्या व सुंदर कलाकुसरीच्या नाजूक पिशव्या / बटवे विकत मिळतात त्यांमधून देता येईल किंवा कार्टून प्रिंट बॅग्जमधून. किंवा मुलांनीच बनवलेल्या बॅग्जमधून.

* यात अगदी श्रीखंडाच्या किंवा लिमलेटच्या गोळ्या, जेम्सच्या गोळ्या, बडीशेपेच्या रंगीत गोळ्या वगैरेपासून ते बच्चेकंपनीला सध्या आवडणाऱ्या लेटेस्ट खाऊ प्रकारातले काहीही निवडू शकता.

आम्ही दिलेले रिट्र्न गिफ्ट्स

सॅन्ड- बिच सेट
पेन्टिन्ग कॅनव्हास- रन्ग
डिजिटल पिगी बॅन्क
कलर करायचे मग आणी कलर
पुल पार्टिला- वॉटर गन
बार्ण्स नोबेल गिफ्ट कार्ड
ऑरेन्ज लिफ (ice-cream shop)गिफ्ट कार्ड
सगळे गिफ्ट जास्तित जास्त $३-$५ पर्यत होते.

मंजुडी, पोस्ट आवडली.

वाहता धाग्याला बांध घालण्यासाठी ऍडमिन ना साकडे घातलेले आहे. तोवर प्रतिसादात लिहीलेले पर्याय वरती अपडेट केलेत.

आता एक लहानसा बदल केला आहे.. खाण्याच्या/पिण्याचा वस्तू भेट म्हणून नेतो (केक, संतरी/सफरचंदाची पिशवी/ वाईनची बाटली इत्यादी).. निदान खाऊन/पिऊन संपेल तरी. >> गोगा +१.
छान वाटलं वाचून. Happy

नी, तुझ्या मित्राच्या कुटुंबाचे कौतुक वाटले.

चिंगी, स्वस्ति यांनी मस्त लिहीले होते. त्या आयडियाज वाहून गेल्या.

मी माझ्या मुलाच्या वाढदिवसाला निवांत अंध मुक्त विद्यालय, पुणे मध्ये अंध मुलांनी बनवलेले चॉकलेटचे बॉक्स दिले होते.

मस्त चव आणि सुंदर पॅकिंग. सर्वाना आवडले.

http://www.niwantvision.com/Vocation/vocation.aspx

मुलाच्या वाढदिवसाला निवांत अंध मुक्त विद्यालय, पुणे मध्ये अंध मुलांनी बनवलेले चॉकलेटचे बॉक्स दिले होते. > वा ! मस्त! लिंक सेव्ह करून ठेवली आहे.