सध्या इथे मस्त थंडी पडलीये आणि मला काहीतरी छान गरमागरम आणि तिखट खायला हवं होतं. मग मला आजीच्या हाताचे शेंगोळे आठवले. पण ती हुलग्याच्या पीठाचे करते आणि इथे हुलग्याचं पीठ मिळण्याची शक्यता जवळपास नाहीच, म्हणून मग ज्वारीच्या पीठावर प्रयोग करायचा ठरवलं.
साहित्य:
१ वाटी ज्वारीचं पीठ
५ चमचे बेसन
ओवा
जिरे, मोहरी, हिंग
५-७ पाकळ्या लसूण ठेचून
२ चमचे लाल तिखट
फोडणीसाठी तेल आणि ४ कप पाणी
कृती:
शेंगोळ्यांसाठी:
आधी ज्वारीचं पीठ, ४ चमचे बेसन, ओवा, तिखट, मीठ , ठेचलेला लसूण एकत्र करून साधारण भाकरीच्या पिठासारखे भिजवावे
यातील एक चमचा मिश्रण बाजूला काढून ठेवावे आणि बाकी मिश्रणाचे गोल आकारात शेंगोळे बनवून घ्यावेत (कडबोळी असतात त्या आकारात).
फोडणीसाठी:
आधी एक कप पाण्यात आपण काढून ठेवलेला एक चमचा पिठाचा गोळा व्यवस्थित मिसळून घ्या
कढईत फोडणीसाठी तेल घालून त्यात जिरे, मोहरी , हिंग , ठेचलेला लसूण घालून घ्यावे. लसूण छान परतला की मग एक चमचा कोरडे बेसन घालून खमंग वास येईपर्यंत परतावे (साधारण एक मिनिट). मग मिश्रणाचा गोळा मिसळलेले एक कप पाणी आणि ३ कप साधे पाणी घालून उकळी आणावी.
एक दणदणीत उकळी आली की मग हळूहळू यात शेंगोळे सोडावे आणि १० ते १५ मिनिटे माध्यम आचेवर शिजू द्यावे. गरज लागली तर मीठ घालावे.
शेंगोळे शिजलेत याची खात्री झाली की प्लेट किंवा वाटीत घेऊन ताव मारावा
वरून कोथिंबीर, खोबरे पेरले तर मग अहाहा !!!
थंडी किंवा पावसाच्या दिवसात खाण्यासाठी अगदी आरोग्यदायी आणि चविष्ठ असा पदार्थ आहे.
आणि हा फोटो ... दिसायला फार तोंपासु नसला तरी चव अप्रतिम होते 

मस्त.
मस्त.
तोंपासु. माझा आवडता पदार्थ.
तोंपासु. माझा आवडता पदार्थ. आजीची आठवण आली !!
हे बुळबुळीत नाही लागत?
हे बुळबुळीत नाही लागत?
नाही हो...ज्वारीच पीठ आहे ना
नाही हो...ज्वारीच पीठ आहे ना मुख्य घटक, त्यामुळे बुळबुळीत नाही लागत
ज्वारीचे पीठ त्या पाण्यात
ज्वारीचे पीठ त्या पाण्यात विरघळवण्यापेक्षा जर शेंगोळेच जास्त शिजवले तर त्याचे कण पाण्यात मिसळून आपोआपच दाट पाणी तयार होते. पण फार वेळ शिजवावे लागते.
मस्त! असा पदार्थ आयता,
मस्त! असा पदार्थ आयता, गरमागरम खायला मिळावा... आहा!
शेंगुळ्यां म्हनुन लोक का
शेंगुळ्यां म्हनुन लोक का चिडवतात, ते आज कलल.
ह.घ्या.
मस्त, वन डी श मील म्हणून
मस्त, वन डी श मील म्हणून अतिशय मस्त डिश आहे ही. यामध्ये आपल्याला हव्या त्या भाज्या घालून इम्प्रोव्हाईज करता येत. सोलापूर-मराठवाडा भागात उकड कडबोळे म्हणतात तर नाशिक जुन्नर भागात शेंगोळे म्हणतात. याचे अजून दोन प्रकार म्हणजे थालीपीठ भाजणीचे आणि कुळीथाच्या (हुलगे) पिठाचे पण असेच शेंगोळे केले जातात. कुळीथ चवीला थोडस उग्र असल्यामुळे त्यात आंबट काहीतरी घालायला लागत.
बाकी गरमा गरम शेंगोळे वर तुपाची धार आहा ..
काही दिवसांपुर्वीच केले
काही दिवसांपुर्वीच केले होते.. मस्त दिसत आहे..
आईशप्पथ, एकदम तोम्पासु! या
आईशप्पथ, एकदम तोम्पासु! या रविवारी करायलाच हवे.
आम्ही बाजरीच्या पीठात पालामेथी घालुन पण करतो. http://www.maayboli.com/node/22503
मस्त मी एकदा केल्या होत्या
मस्त मी एकदा केल्या होत्या कुळीथाच्या पिठाच्या.
रेसिपी छानच.
मस्त. सध्याच्या हवेत करुन
मस्त. सध्याच्या हवेत करुन खायला अगदीच परफेक्ट आहेत.
सिंडरेलाने पण दिली होती मला वाटतं कृती. तेव्हापासून करुन बघायचे आहेत खरं तर
मस्त. ज्वारीचं पीठ घरात आहेच
मस्त. ज्वारीचं पीठ घरात आहेच (कुळीथ मिळत नाही म्हणून याचा विचारही कधी केला नव्हता). आता जरा सणसणीत पावसाळा सुरू झाला की करून बघेन
मस्त.
मस्त.
कुळीथ/हुलग्याच्या पिठाचे
कुळीथ/हुलग्याच्या पिठाचे शिंगोळे इथे आहेत
मस्त आहे. आमच्याकडे पण फार
मस्त आहे. आमच्याकडे पण फार आवडतात. फक्त शेंगोळे करत बसायला वेळ जातो थोडा.
ह्याच्यात कच्चे शेंगदाणे आणि लसूण अर्धवट भरडून मिसळले तर खाताना शेंगदाण्याचे बारीक तुकडे दाताखाली येतात ते छान लागतात.
मनस्वीनी, धन्यवाद
मनस्वीनी,
धन्यवाद साम्गितल्यबद्दल.
पण ह्या पदार्थाचा आकार आणि रंग नावडीचा दिसतो म्हणून बाद आहे आमच्या यादीत. मी आपले कुतुहल म्हणून विचारले.
कुळीथाचं पिठलं सुद्धा कमीच खाते. खाल्ले तर ते सरसरीत करतो कोकमं आणि भरपूर कोंथिंबीर टाकून, ते जोवर गरम तोवरच खातो.
असो.
कुळथाचे पिठले गरमच चांगले
कुळथाचे पिठले गरमच चांगले लागते. ज्वारीचे शेंगोळे छान लागतात. उद्या करणार आहे
हा प्रकार कधीच खाल्ला नाही.
हा प्रकार कधीच खाल्ला नाही. मस्त आहे.
शेन्गोळे झणझणित आणि गरम
शेन्गोळे झणझणित आणि गरम असतानाच खावे त्याची मजा गरम खाण्यातच आहे, रन्ग-रुप मात्र फारस अपिलिन्ग नसत याच
शेंगोळे/शिंगोळे आवडता प्रकार
शेंगोळे/शिंगोळे आवडता प्रकार आहे पण कुळीथ आणि बेसनाचेच खाल्ले आहेत. असे करून बघेन कधी तरी.
आम्ही पन ज्वारीच्या पिठाचे
आम्ही पन ज्वारीच्या पिठाचे करतो.. मळलेल्या पिठात बारीक चिरलेली मेथी तसेच फोडणीत सुद्धा थोडी मेथी घालतो..
घरी ताक भरपुर शिल्लक आहे .ताक
घरी ताक भरपुर शिल्लक आहे .ताक घालुन करु का?
ज्वारी +उडीद= कळणा पीठ आहे
ज्वारी +उडीद= कळणा पीठ आहे त्याचे करु का ?