पाहिला बॉ एकदाचा! अंमळ उशिरच झाला म्हणायचा बघायला. खरं तर बघायचा प्लन पण नव्हता आजिबात, असच टिपिकल स्टोरी असेल जरा चांगली गाणी असलेली म्हणून फार लक्ष नाही दिलं. पुढे थेट्रात पुढे जाऊन पबलिक नाचतय वगैरेचे व्हॉट्स अॅप विडियो यायला लागले आणि मसालाच आयटम दिसतोय असं मनोमन अधोरेखित झालं आणि नाद सोडून दिला.
मग आत्ता काही दिवसांपुर्वी माझे बेकरी फ्रेंड फारएण्ड ह्यांनी टिपापा ह्या ठिकानी येऊन नव्यानं एकदा सैराटच्या कौतूकाचं खातं उघडलं तेव्हा माझे कान परत वर गेले. मग पुढे बाकी इतर फ्रेंडांनी पण तीच री ओढली आणि ते टाकत असलेल्या पोस्टींमुळे माझ्या डोक्यात वातावरण तयार होऊ लागलं. निव्वळ ह्या पोस्टींमुळे मी सैराटची गाणी एकायला आणि पिकचर बघायला घेतला!
२-३ दिवसांपुर्वी सुरवातीची फक्त २० मिनिटं हा सिनेमा बघितला आणि मला त्या सिनेमानी खिशात घातलं! कित्येक दिवसांनी किंवा वर्षांनी एखाद्या पिकचरची झिंगं चढली असं झालं!!!
कुठल्या शॉट बद्दल अन कुठल्या गाण्याबद्दल किंवा कुठल्या एक्स्प्रेशननांबद्दल बोलावं अन किती बोलावं हेच समजेनासं झालय. लोकं आपापल्या अँगलनी सिनेमे बघतात, त्यांना त्यातून बरच वेगळं काही काही सापडतं आणि वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा सिनेमा त्यांना आवडतो.
एक सिनेमा म्हणून स्वतंत्रपणे तो पिकचर छान असला तरी माझ्याकरता तरी ह्या पिकचरनी काही केलं असेल तर कॉलेजच्या दिवसांपासूनचा पुढचा काही काळ मला अक्षरशः परत जगवून आणलय!
सुरवातीच्या मंजुळेंच्या कॉमेंट्री पासून जी काही एकेक प्रसंगांना सुरवात होते, माणूस त्यात हरवूनच जातो!
काय त्यांची ती कॉमेंट्री अन ते रखरखलेल्या उन्हातलं मैदान अन ते पॅविलियन, ते ढोल तडम ताशे वाले अन सरवात महत्वाचं म्हणजे मॅच सुरु असलेल्या दरम्यान त्या प्लेयरांचं एकेक बोलणं!
लंगड्याच्या "हे हलगथ कोन पाठवलं रे ." " मंग्या मंग्या आरं नीट खेळ मंग्या नीट खेळ!अरं बॉल बघाय आधी बॅट नगं न फिरवू" पासून पुढे परत मंगेश मोहिते पाटलांनी बॉल हुकवल्यवर त्याच्या संतापाचा अक्षरशः अंत होतो तेव्हा " मला खेळायचच नै जा..." म्हणून बॅट सोडून ऑल्मोस्ट तो चालायलाच लागतो हा प्रसंग त्यातली लंगड्याची तळमळ किती लोकांनी अनुभवलेली आहे?
कधी आपण लंगड्याच्या बोटीत शिव्या घालत असतो तर कधी कधी मंग्याच्या सुद्धा बोटीत कारण "अर किती फाष्टाक्तोय बघ्तोन तू?" असाही प्रसंग येऊन गेला असेलच (तुम्ही अगदी स्टार बॅट्समन नसाल तर नक्कीच येउन गेला असेल).
मधल्यामध्ये बिली बाऊडींग अन शकुना आत्याचा सीन पण खल्लास आहे! किती वेळा पोरं आया, आज्या बोंबल्त आल्याकी बॉल बॅट हातात जे असेल ते टाकून पळायचे. फोर सिक्सच्या अॅक्शन पण कहर आहेत! एकदम किडमिडीत अंगकाठी अन त्यावर बनियन, डोक्याला आधी फडकं अन मग त्यावर कॅप! पुर्वी अंपायर लोकं खुप वेळा तसं करायचे! निरिक्षण सॉलिड आहे मंजुळेंचं किंवा ज्यानी कोणी डिटेलिंग केल्य त्याचं.
पर्श्यानी आधी फोर सिक्स मारल्यावर लंगड्याच्या एकेक शिवीसुचक हातवारे (काही न बोलता नेमकी काय शिवी दिली हे लगेच कळतं
) अन पुढे म्याच जिंकून दिल्यावर आडम तिडम मुद्दाम हारलेल्या टीम समोर केलेला नाच!
इतकं बारिक आणि चोख निरिक्षण म्हणजे काय चेष्टाय का राव? अन त्यापेक्षाही ते बरोबर शॉट मध्ये उतरवणं म्हणजे फार भारी! नागराज मंजुळेकी जय!
पुढे तात्यासाहेबांचं भाषण ज्यात खरं एक पुढे होऊ घातलेल्या काही गोष्टींना किती महत्व आहे हे अधोरेखित करणारं वाक्य आहे. "अहो तालुक्याचं राहुद्या आधी आपल्या बायका संभाळा म्हना ह्यांना..." असं ते म्हणतात.
थोडक्यात घरातल्या बाया/मुली ह्यांच्याशी स्वतःची अन घराण्याची इज्जत बांधलेली आहे ह्या टाईपची विचारसरणी असलेलं घर आहे. आणि हे बोलताना त्या सोनलताई का कोण असतात त्या शेजारीच बसलेल्या असतात. 
(ह्याच संदर्भात अजून एक गंमत म्हणजे तात्यासाहेबांच्या बंगल्याचे नाव अर्चना असतं))
नंतर विहिरीचा सीन. तिथे आर्चीची हापिशियल एंट्री होते अन क्या बॉस एंट्री बोले तो एंट्री आहे पोरीची! अर काय एक्स्प्रेशन अन काय तो कान्फिडन्स अन काय तो हेल बोलण्याचा! झन्नाट! ती ज्या पद्ध्तीनी येऊन विहिरीवर एक पाय ठेवून वाकून खाली बघते त्यातच सगळं येतं! पाटलाची पोरगी असल्याचा शुद्ध माज!
अय रत्ताळ्या निग्ग्कीरं भैर... आत्तागंबया भैरा बिराएकाकाय.... अय अय खुळखुळ्या उभाssssर!!!!
खलाssssस... अरे लेडी गब्बर वाटते ती इथे!!! (थांबा अजून! पुढे मी अजून तिचे अन तिच्या अॅक्टिंगच्या तारिफांचा पूल बांधणारच आहे. ही नुसती सुरवात आहे!
)
त्यानंतरची होते ती लंगड्याची होलपट तर निव्वळ कमाल आहे! त्याचे ते तसं चालणं असल्यामुळे ते आण्खिनच विनोदी झालय सगळं. ह्याउपर काय दिसतं ते म्हणजे मैत्री. येवढा पायानी अधू असून सुद्धा लगबगीनी (साबण अंगावर असताना) जाऊन आधी परश्याला सांगतो. (ते कसं सांगतो ते वाचण्यापेक्षा बघण्यातच मजा आहे). पण मी पवायला गेल्तो तिकडं आर्चिनं मला हाकल्ला हे सांगताना मला हाकल्ला ह्याचं तुसभर सुद्धा दु:ख किंवा लाज नाहीचे कुठे! नसतेच. सगळ्यात महत्वाचं काम त्यावेळी असतं ते मित्राला त्याचं सामान (आवडणारी मुलगी) कुठेतरी येऊन उभी आहे हा मेसेज जाणं! त्यात आपली इज्जत गेली तरी बेहत्तर पण मित्राचं झ्यंगाट हे जमवून दिलच पाहिजे, ते परम कर्तव्य असतय लगा!!
परश्याला स्वप्न पडतं तो प्रसंग आणि त्या भोवतीचे डायलॉग तर हसून हसून पुरेवाट आहेत. "कुठं दिवस भर कुत्री मारत हिंडत असतं कै म्हाईत" इति पशाचा बाप. ते नगं घरचे उठतीन आर्चे म्हणताना परश्याचा आवाज अशक्य दबलेला, चिरका अन लाडिक होतो! (स्वप्नात किस सुरु असतो ना?)
स्वप्न पडतात त्यात सुद्धा घरच्यांची भिती असतेच हे टीनेजर असताना काही आजिबात नवीन नसावं!
आता परशाची एंट्री!! म्हणजे सैराट एंट्री ह्या अर्थानं. फायन्ली लंगड्याची तगमग एकदाची "तिथं आर्चि आली आर्चि....." म्हणत कानावर पडल्यावर मग खरी जादू सुरु होते. याड लागलं! भन्नाट म्युजिक, बॅकड्रॉप अन सिनेमॅटोग्राफी! खरं डोळे मिटले आणि फक्त म्युजिक एकलं तर असं वाटेल की एखादा हॉलिवूडमधल्या जबरी म्युजिकलच सुरु असावं. मागची सीनरी जब्बरदस्त जमलीये. डिस्नी म्युजिकल सारखं ग्रँड वाटावं असं म्युजिक पण त्यात आपली माती, गवत, पक्षी अन आपला गावरान परश्या पण अगदी लिलया फिट्टं बसतात! कशाला बॉलिवूडवाले उगच झकमारी करत स्विझरलंडला जाऊन त्या हिरोंना गरम कपड्यात अन हिरवणींना स्लीव्लेस ब्लाऊजांमध्ये बरफात नाचायला लावतात देव जाणे!
पुढे आवरुन सावरुन भांगपट्टी करुन आलेला परशा कपडे अन सँडलांसकट जी उडी मारतो आगा ना पिच्छा बघत व्हिरीत त्यावर मी तर थेट्रात पैशे फेकले असते! ह्याला मंतेत जिगर! आधी उडी मारली, बघून घेतलं आर्चिला आता पुढचं पुढं बघू!
आत्तगंबया हे कुठून पड्लं व्हिरीत यून!
अssय निघ भायेर..
सॉरी सॉरी,
हss सॉरी सॉरीच्या लाडक्या.. आधी निघ भायेर..
मला मैतीच नवतं, बघितलच न्हाईमी..
बरं डोळं झाकून पडला रं हिरीत... आता बघितलं ना? हो भाएर..
आता खरं सीन बाय सीन कौतूक करत बसलो तर तो पर्यंत मंजुळेंचा दुसरा पिच्चर यायचा एखादा! त्यापेक्षा जरा फॉरमॅट बदलून, ज्या गोष्टी मला जास्त आवडल्या त्या बद्दलच लिहितो.
सैराट झालं जी:
ह्या गाण्यानी नुसतं वेड लावलय. खरं खुप सारे फॅक्टर्स आहेत ते गाणे आवडण्यामागे. एक तर आर्ची, परशा आणि त्यांचं एकेक प्रसंगातून फुलणारं प्रेम ह्या गाण्यात एकदम tempo धरतं (मालवहातुक वाला टेंपो नाही, गाण्यातला टेंपो असतो तो!).
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि त्याला साजेसं तेवढच अत्यंत ग्रँड ग्रँड पण थोडा गावाकडला टच असलेलं म्युजिक! (ढोलांचा वापर आणि ग्रामिण बाज असलेली भाषा)
खरंही वाटत नाही की हे करमाळ्याचं वगैरे शुटिंग आहे! काय एकसे एक अॅंगल घेतले आहेत!
गाण्यातले काही मोमेंट्स पण मस्त टिपले आहेत.
अगं झन्नानलं काळंजामंदी
अन हत्तामंदी हात आलं जी....
सैराट झालं जीssss
सैराट झालं जीssss
ह्या शॉट मध्ये आधी परशा आर्चिला गोल फिरवतो आणि नंतर आर्चि खाली वाकून खळाळून हसताना दाखवलीये.
ही हसतानाची आर्चि माझ्या करता कायमची स्मरणात गेलीये. 
नंतर गाण्यातच आर्चि परशाच्या बहिणीला स्कुटरवरुन घेऊन जाताना दाखवलीये आणि पुढे आर्चि मंदिरातून बाहेर गाभार्यात येते आणि तिथे तिच्या रंगीत चपलांमध्ये गुलाबाची फुलं ठेवलेली असतात. ती इकडे तिकडे बघते शोधत कोणी ठेवले असतील आणि तिला दोन खांबांमधून बसलेला परशा दिसतो, तो पाया पडल्या सारखं करुन मग हाथ जोडतो, मी ठेवले आहेत हे सांगत. मग आर्चि ती फुलं उचलून त्याचा वास घेते आणि मग छातीशी कवटाळते. पुढे आर्चि आणि सपनी, परशा, सल्या अन लंगड्या बसलेले असतात त्यांच्या शेजारून जातात तेव्हा लंगड्या सपनीवर फुल फेकल्याची अॅक्शन करतो! आणि त्या पुढे गेल्या की मग आल्या अन लंगड्या दोघंही बाबा प्रेमीपरशांच्या पाया पडतात की काय बॉ आय्ड्या काढली लगा बाबांनी!!! पोरगी फिदाssss...
(हा शॉट सुरु असताना मला वाटतं मागे आधी वायोलिन आणि नंतर बासरी आणि सॅक्सोफोन आहे. अप्रतिम जमून आलाय शॉट, म्युजिक, चित्रिकरण, सगळ्यांचे एक्स्प्रेशन्स सगळ्याच दृष्टिनी!! टोटल गुंडाळून खिशात जाणार हे असले शॉट दाखवले की आशिक दिलाचा प्रेक्षक!) 
नंतर घोडेस्वारीच्या शॉट मध्ये लंगड्या, सल्या आणि आनी असतातच. बघताना गंमत वाटते पण आपल्याकडे तरुण मुलं मुलींना घोडेस्वारीच काय एकांतात कुलफ्या पण खाऊ देतील कोणी तर शपत. आपल्याला नेमून दिलेली कामं सोडून तरुण मुलं मुलींच्या एकांतात व्यत्यय आणण्यात पोलिस, गावातली इतर लोकं वगैरे अशी सगळी बिन प्रेम करताच कुटुंबवत्सल झालेली मंडळी अगदी तरबेज असतात. सतत बिचार्या प्रेमींना आपलं लक्ष ठेवावं लागतं, कोणी पाहतय का, किंवा मग असं मित्रांना तरी राखणाला ठेवावं लागतं.
(असं कसं? असं आडनिड्या वयातल्या मुलं मुलींना एकांतात कसं काय सोडायचं, नाही? उद्या काही वेडंवाकडं झालं तर? आपल्या इज्जतीचं काय होईल? अहो आम्ही पण बरीच वेडीवाकडी कामं करतोओ पण ते बंद दरवाज्या आड, तिथे कोणाला कळतय?) 
कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं च्या वेळेस जेव्हा परशा हवेत किस सोडतो तेव्हा लंगड्याचा "आयो.." वासताना स्लो मोशन मध्ये स्पष्ट दिसतो!!
पुढच्या कडव्यात रंगा खेळतात तो प्रसंग आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे खरं? आपल्या इथे ग्रामिण परिसरात असतात तशी दगड मातीच्या भिंती असलेली घरं, आजूबाजूला उगवलेलं कोरडं गवत, त्या दगडमातीच्या घरांमधून असलेल्या धुळीच्या वाटा! ह्या असल्या बॅकग्राऊंड असताना सुद्धा आधी बिल्ड केलेल्या वातावरणामुळे आणि म्युजिक, सिनेमॅटोग्राफी मुळे काय जब्बरदस्त भाव खाल्लाय ह्या प्रसंगानी?!
गाणं संपत असतानाचे शॉट्स (त्या कळसाच्या छोट्या गच्चीवर वगैरे) मला वाटतं ड्रोन वापरुन शॉट्स घेतले आहेत. सिंपली (अॅज इन सिंपल) इन्क्रेडिबल!
आर्चि:
आर्चि मला वाटतं एका पिकचर मधलं एक पात्र नसून एक फिनोमेनॉन होऊन गेली आहे. ह्यात खरं तिच्या अॅक्टिंगला दाद द्यावी की मंजुळेंच्या परफेक्ट कास्टिंगला हे समजत नाही कारण ती अॅक्टिंग करते असं मला वाटतच नाही इतकी ती फिट बसली आहे त्या रोल करता. ह्याच अर्थ इथे मी झुकतं माप मंजुळेंच्या कास्टिंग ला देइन, पण ते देत असताना तिनी ज्या प्रकारे रोल पेलला आहे त्याला जवाब नाही. हे मान्य की रिंकु राजगुरु रियल लाईफ मध्ये बरीचशी तशीच चालते बोलते पण पिकचर मध्ये फक्त तिचं चालणं आणि बोलणं नाहीये ना ? खुप ठिकाणी तिला स्ट्राँग इमोशन्स दाखवावे लागले आहेत, एका अल्लड पाटल्याच्या पोरी पासून पुढे हलाखीत दिवस काढून नंतर एकदम मचुअर, आत्मविश्वासानी संसार करणारी तरीही आई वडीलांच्या आठवणीनी झुरणारी आर्चि हे ट्रान्सफॉर्मेशन तिला पेलावं लागलेलं आहे and oh my god has she done it well!!!
आता खरं खुप काही लिहिता येइल पण एक शेवटचा माझ्या कायमचा लक्षात राहिल असा प्रसंग आहे त्या बद्दल लिहून आवरतं घेतो. हा प्रसंग खरं मंजुळेंचं डायरेक्शन, परशा आणि आर्चिच्या अॅक्टिंगमुळे अत्यंत रियलिस्टिक होऊन आपल्या अंगावर येतो अगदी.
त्या फोनच्या पासवर्ड वरुन आधीच परशा जरा उखडलेला असतो, दुसर्या दिवशी कामावर जायच्या आधी पण त्यावरुन खटका उडतो आणि आर्चि निघत असे पर्यंत सुरुच असतं भांडण.
"तिथं कामावर कोणी फोन बघू नये म्हनून बदल्लाय" इथे खरं परशा थोडा शरमल्या सारखा होतो, कारण त्याला स्वतःची चूक लक्षात येते बहुतेक पण तो पर्यंत डॅमेज झालेलं असतं.आर्चिचा संयम संपलेला असतो.
"कुडं चालली?"
"चालली मसनात! कुटं जाती रोज मी?" "तुझ्या ह्या असल्या सबावाचा लै वैताग आला मला"
"काय यवडा वैटे का मी?"
"मंग मी वाईटे का?"
"मी आसकुडं म्हनलं?"
"म्हनायची काय गरजे?"
"कामावर जावच लागल का?"
"लोडय कामाचा, सर वोरड्त्याल"
काम संपवून आर्ची परशाच्या डोसा टपरीवर येते.
परश्या अजून घुसाट्यातच असतो.
"परश्या..... ओ साह्येब... पिकचरला जायचं का?"
"कामय मला.."
"मी इचारतीकी सुमनताईला"
"दुसरं कामेमला"
"चल ना..."
"तुला एकदा सांगितलेलं कळतय का?"
"हळू बोल की मग येवडं वरडतो कशाला?"'
"लै गाजलेला पिच्चरय, तुझ्या आवडत्या हिरोचा"
"...."
"मी एकटी जाईना?"
"जां..."
"खरच एकटी जाईन"
"निग्की मग कशाला थामली!"
"लै इगोए तुला, बस तसाच..."
असं म्हणून आर्चि एकटी पिकचर ला जाते....
त्या प्रेमानी म्हणलेल्या ओ सायेबाला पुढे जी अत्यंत तुसडी वागणूक मिळते ती बघून आणि एस्पशली विहिरीवरची ७-८ पोरांना दमात घेऊन हाकलणारी आर्चि आठवून ह्रदयाला खिंडारं पडतात!
पाटलाची पोरगी म्हणून येवढा माज केलेली, तेवढच ह्या परशावर प्रेम करणारी अन त्याला वाचवताना स्वतःच्या वडिलांकडून मार खाणारी, आबावर गोळी झाडणारी पण नंतर परिस्थितीशी दोन हात करत पण प्रेमानी राहू बघणार्या आर्चिची वाताहत बघवत नाही. पुढे प्रकरण आण्खिन थोडं विकोपाला जाऊन नंतर शेवटी परत ती दोघं आपल्याला एक मेकांशिवाय कोणी नाही हे समजून परत एकत्र येतात.
परशा तसा चांगला दाखवलाय आणि पिकचर मध्ये आर्चिच्या घरचे खुप जास्त कडक दाखवले आहेत पण एकंदरितच हे सगळं आपल्याकडच्या बर्याच मुलीं/स्त्रियांबद्दलचं खुप बोलकं असं उदाहरण आहे.
पळून जाऊन लग्न केलेलं नसलं आणि घरच्यांनी करुन दिलेलं असलं तरी एकदा लग्न करुन दिलं की आपली जबाबदारी संपली आणि माहेरपणाला आनंदानी ये असं म्हणाले तरी टेकनिकली घरी परत जायचे दरवाजे बंद असतात. सो उद्या काही अनबन झाली तरी एक तर तुम्ही ते निभावून न्यायचं किंवा मग आपला आपण मार्ग बघायचा येवढच उरतं.
असो..... 
अकरित घडलया
सपान हे पडलया
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजलं
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरलं
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…….
_/\_
धिस इज टू मच अॅक्च्युअली!
धिस इज टू मच अॅक्च्युअली! असोच!
हो मला पण वाटल सेमच,
हो मला पण वाटल सेमच,
कुठेतरी कॅमेन्ट वाचलेली कि
कुठेतरी कॅमेन्ट वाचलेली कि लोक 5 मिनिटांचा शेवट, 5 मिनिटात विसरून गेले आणि आता केवळ झिंगटणे शिल्लक राहिले. मला हे अपेक्षित होतेच पण तरीही कुठेतरी वाईट वाटले. आता फक्त आर्चि परश्या राहिले, चित्रपट संपला.
आता फक्त आर्चि परश्या राहिले,
आता फक्त आर्चि परश्या राहिले, चित्रपट संपला.>>>> साधना, आपणांस अनुमोदन आहे.
या सिनेमा ने १०० करोड चा आकडा
या सिनेमा ने १०० करोड चा आकडा पार केला आहे का ? काही माहिती ?
With all due respect zingat
With all due respect zingat gaanyacha atirek jhaala aahe. One country band is banging the same tune for the last two hours.
धिस इज टू मच अॅक्च्युअली!
धिस इज टू मच अॅक्च्युअली! असोच! मम रिया.
रविवारी झी वर "सैराट यशोगाथा"
रविवारी झी वर "सैराट यशोगाथा" ( Looks like making of Sairt) चा एपीसोड दाखवलय..
त्याच्या व्हीडीओची लिन्क आहे का कोणा कडे ?
कपिल शर्माच्या प्रत्येक शो
कपिल शर्माच्या प्रत्येक शो मध्ये , ' झिंगाट' गाण्यावर डान्स होतो.
बघितला सैराट आज टीव्हीवर. इथे
बघितला सैराट आज टीव्हीवर. इथे वाचून सीन आणि सीन पाठ होते पण स्वतःच्या डोळ्याने बघायची इच्छा होती ती पूर्ण झाली. चांगला होता. शेवट माहिती असून सुन्न करून गेला.
त्या दोघांची रक्ताळलेले मृतदेह न दाखवता, ते बाळ रडत बाहेर येतं आणि त्याची रक्ताळलेली पाऊले एवढं दाखवलं असतं तरी तोच सुन्न इफेक्ट आला असता असं वाटतं.
>>शेवट माहिती असून सुन्न करून
>>शेवट माहिती असून सुन्न करून गेल>>>> मलाही मेंदू बधीर झाल्याची भावना आली होती. पुन्हा तो शेवट पाहणे शक्य नाही
काल टीव्ही वर पाहिला. आवडला
काल टीव्ही वर पाहिला. आवडला !
बस , एवढा एकच शब्द पुरेसा आहे.
"सैराट" हा तद्दन बाजारू
"सैराट" हा तद्दन बाजारू चित्रपट आहे. विषयात सुद्धा नाविन्य नाही. हिंदी मध्ये "एक दुजे के लिये" तब्बल पस्तीस वर्षांपूर्वी येऊन गेला होता. त्याच शिळ्या कढीला "सैराट" च्या दिग्दर्शकाने शेवटची फोडणी थोडी वेगळी टाकून आणि अजय-अतुलच्या संगीताचा तडका मारून ऊत आणला आहे.
विषयातला सामाजिक आशय आणि त्याचा सामाजिक आणि राजकीय फायदा मिळावा म्हणून ठराविक लॉबीने त्याचा केलेला गवगवा (मार्केटिंग). सैराटचा गल्ला जमण्यामागे कलात्मकते पेक्षा कलेशी संबंध नसलेल्या या दोन गोष्टी जास्त कारणीभूत आहेत. आपल्याकडे जिथे पैसा ओतून, बाजारू व उठवळ भाषणे करून आणि मालाची करावी तशी पक्षाची जाहिरातबाजी करून आख्खे सरकार निवडून आणता येते तिथे एक चित्रपट प्रसिद्ध करण्याची काय ती कथा? म्हणूनच, चित्रपटाची लोकप्रियता आणि त्याची कलात्मक उंची यांचा काहीएक संबंध असू शकत नाही.
कलात्मकतेच्या दृष्टीने विचार केला तर सामना, सिंहासन, जैत रे जैत, उंबरठा यासारख्या चित्रपटांच्या नखाचीही सर "सैराट"ला नाही. मराठीत एक म्हण आहे "कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे...". ती इथे लागू पडते.
काळे पांढरे रंग असलेला आणि डिजिटल फिजिटल काहीही नव्हते अशा काळात तयार झालेला "सामना" अजूनही सरस आहे. नवनवीन तंत्रज्ञान येईल जाईल. वेगवेगळे प्रयोग झाले आणि होतील. पाण्याखाली. हवेत. दुबईमध्ये. अमेरिकेत. हेलिकॉप्टरमधून. फक्त कॅमकॉर्डर वापरून. स्वित्झर्लण्ड मध्ये. बिग बजेट. नो बजेट. असे सगळे प्रयोग करून झाले. कौतुक जरूर आहे. पण निळू फुले, श्रीराम लागू, ग. दि. माडगूळकर, भास्कर चंदावरकर, जगदीश खेबुडकर, बाबूजी सुधीर फडके, लतादीदी आणि जब्बार पटेल ह्या टीमची सर अजून एकाही चित्रपटाला का आलेली नाही हि खंत सुद्धा मनात आहे. जमल्यास विचार व्हावा यावर सुद्धा. जुने चित्रपट आठवून मराठी चित्रपटसृष्टी अजूनही रसिकांना साद घालते आहे "सख्या रे घायाळ मी हरिणी..."
इनामदार, हे वरील मत चित्रपट
इनामदार, हे वरील मत चित्रपट पाहून झाल्यानंतरचे असेल तर ठीक आहे.
नसेल तर बघून घ्या एकदा, घाई नाही .
इनामदार
इनामदार
@Filmy, माझ्या प्रतिक्रियेत
@Filmy, माझ्या प्रतिक्रियेत उल्लेख केलेले सर्व चित्रपट मी पाहिलेले आहेत (अर्थात त्यात सैराट पण आलाच). आजवर सैराट पाहिला नव्हता म्हणून प्रतिक्रिया लिहिली नव्हती. पण चित्रपट पाहताना लक्षात आले कि एकंदर चर्चेवरून चित्रपटातील कलात्मकतेचा जो काही अंदाज मी बांधला होता तो तंतोतंत खरा निघाला.
मीच तुम्हाला असे सांगेन कि हे जुने चित्रपट एकदा जरूर पाहून घ्या. तुमचे सैराट विषयी मत नक्की बदलेल.
त्याचे काय आहे ना कि प्लायवूडच्या फळ्यांचे फर्निचरच फक्त ज्यांना माहित आहे त्यांना दर्जेदार फर्निचर कशाला म्हणतात कळणे अवघड आहे. मला जे काही म्हणायचे आहे ते या एका वाक्यात आहे. बहुतांश तरुण पोरंपोरी सैराट ला उत्कृष्ट वगैरे म्हणत आहेत त्यांनी उत्कृष्ट सिनेमा पाहिलेलाच नाही. जाहिरातबाजीला बळी पडून मतदान करणारी पिढी आहे. असो. यावर वेगळी चर्चेचा धागा निर्माण करतो.
तुमच्या मताचा आदर आहे. अर्थात
तुमच्या मताचा आदर आहे. अर्थात त्याने माझे मत, आवड बदलणार नाही. पण इतक्या संयत प्रतिक्रियेबद्दल खरंच धन्यवाद.
हल्ली तरी पब्लिक फोरमवर हे थोडेसे दुर्मिळच.
इनामदार सर, सैराट हा
इनामदार सर, सैराट हा व्यावसायिक चित्रपट नाही असे तुम्हाला का वाटते? सैराट एक उत्तम आणि उत्कृष्ट व्यावसायिक (तुमच्या शब्दात तद्दन बाजारूच) चित्रपट आहे. मात्र ह्या तद्दन बाजारू संज्ञेला जी तुच्छपणाची झाक आहे ती सैराटच्या बाबतीत सर्वथा अस्थानी आहे.
सामना, सिंहासन, जैत रे जैत, उंबरठा ह्या चित्रपटांची जातकुळी (genre) आणि सैराटची जातकुळी फार वेगळी आहे. त्यामुळे अशी तुलना मी तरी करणार नाही.
एक दुजे के लिये आणि सैराटची केवळ कथा सारखी आहे म्हणून लगेच शिळ्या कढीला ऊत म्हणणे कितपत योग्य आहे? वेळ असता तर मीच तुम्हाला ह्या दोन्ही चित्रपटांतले फरक सांगितले असते. पण जर तुम्ही सामना सारख्या चित्रपटांचे चाहते असाल तर ते तुमचं तुम्हाला ही उमगणं अवघड नाही!
जर तुम्हाला "तद्दन बाजारू" चित्रपट आवडतच नसतील तर तुम्हाला सैराट आवडणं अवघड आहे. तुम्ही फँड्री बघा. तोच आशय तुमच्या भाषेत कलात्मक की काय तशा पद्धतीने मांडला आहे!
Fandry was pure dose of medicine and Sairat is a sugar coated capsule. It's your choice!
एक बारके डीटेलः आताच बया
एक बारके डीटेलः आताच बया का? गाण्यात आर्ची आरश्या समोर नटत बसलेली असते तर आरश्यावरच काढलेले चुडीदार सलवारी उलटे टाकले आहेत. आपण बाहेरून आल्यावर काढोन फेकतो व
घरातले कपडे घालतो तसे. व मग त्याला केसाला लावायच्या पिना स्टिक केल्या आहेत. केस मोकळे सोडताना पिना कुठेतरी चिकटवतो तसे. एकदम सही.
सामना, सिंहासन, जैत रे जैत,
सामना, सिंहासन, जैत रे जैत, उंबरठा यासारख्या चित्रपटांच्या नखाचीही सर "सैराट"ला नाही.>>> इनामदार पण तुम्ही तुलना करतायचं कशाला , वर उल्लेखलेले सगळे सिनेमे सर्वोत्तम आहेत यात दुमत नाही, वर उल्लेखलेले सगळे सिनेमा पाहिलेले आहेत आणि प्रचंड आवडलेले आहेत ,पण त्याचा अर्थ हा नाही की आम्हाला सैराट आवडुच नये किंवा आम्ही सैराटला डोक्यावर घेऊच नये , कशासाठी हा अट्टाहास ?
ह्या दोन वेगवेगळ्या आवडी आहेत हे लक्षात घ्या.
बहुतांश तरुण पोरंपोरी सैराट ला उत्कृष्ट वगैरे म्हणत आहेत त्यांनी उत्कृष्ट सिनेमा पाहिलेलाच नाही. >>> कशावरुन तुम्ही निष्कर्ष काढला ? त्यांनी फक्त मराठीच नाही इतर प्रादेशिक भाषेतले, परदेशातले अनेक उत्कृष्ट सिनेमे बघितलेले असु शकतात .
पुर्वीही इथे बर्याचजणांनी सैराटवरुन आगपाखड केलेली आहे , त्यांच्यासाठी , आम्ही कुठल्याही सिनेमाला कमी लेखत नाही , ( अगदी गिकुच्याही नाही
) , जुने मराठी सिनेमा तर सदैव ' सर आखोंपर ' .
त्यामुळे आगपाखड करनं बंद करा.
आणि परत एकदा ' सैराट' आमचा प्रचंड आवडता सिनेमा आहे
काल युट्यूब वर...एका
काल युट्यूब वर...एका दक्षिनात्य बॅन्ड (बहुतेक रॉक बॅन्ड) ने तयार केलेल सैराट च "आत्ताच बया का बावरल" हे गाण पाहिल... खुपच सुरेख जमलय.. तिचे काही उच्चार थोडे मजेशीर वाटले :).. पण प्रयत्न आवडला...
"यामीनी जी." असच काहीतरी नाव आहे गायीकेच...
हे पाहुन खुप छान वाटत की दुसर्या भाषेतील बॅन्ड..मराठी गाण्यावर एवढी मेहनत घेउन ते सादर करतायत..
हा लेख आत्ता वाचनात आला..एक
हा लेख आत्ता वाचनात आला..एक वेगळाच दृष्टीकोन मांडला आहे!
http://www.uniquefeatures.in/anubhav/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A...
लेख आवडला !
लेख आवडला !
अत्यंत सुमार चित्रपट.
अत्यंत सुमार चित्रपट.
सैराट ची DVD कधी रिलीज होणार
सैराट ची DVD कधी रिलीज होणार आहे? काही कल्पना?
खरचं मायबोलीने ह्या क्षेत्रात
खरचं मायबोलीने ह्या क्षेत्रात उतरायला हरकत नाही. बर्याच लोकांची सोय होईल आणि मराठी सिनेमाला थोडीशी मदत पण होईल.
काल परत एकदा पाहिला.
काल परत एकदा पाहिला.
काल थोडा भाग परत पाहिला.
काल थोडा भाग परत पाहिला. सल्ल्या तिला फोन नं देतो तो नं लक्षात ऑल्मोस्ट राहिल म्हणून लिहायला आलो तर लेट कन्व्हर्ट बाईंनी इथे लिटरली शाळाच घेतली होती ते दिसले :). कंसराज यांनी तो नं ऑलरेडी लिहीला आहे.
करण जोहरचा सैराट ! हे राम !!
करण जोहरचा सैराट ! हे राम !!
शाहरूख आहे का? किमान झिंगाटवर
शाहरूख आहे का?
किमान झिंगाटवर आयटम नंबर करताना ...
Pages