पाहिला बॉ एकदाचा! अंमळ उशिरच झाला म्हणायचा बघायला. खरं तर बघायचा प्लन पण नव्हता आजिबात, असच टिपिकल स्टोरी असेल जरा चांगली गाणी असलेली म्हणून फार लक्ष नाही दिलं. पुढे थेट्रात पुढे जाऊन पबलिक नाचतय वगैरेचे व्हॉट्स अॅप विडियो यायला लागले आणि मसालाच आयटम दिसतोय असं मनोमन अधोरेखित झालं आणि नाद सोडून दिला.
मग आत्ता काही दिवसांपुर्वी माझे बेकरी फ्रेंड फारएण्ड ह्यांनी टिपापा ह्या ठिकानी येऊन नव्यानं एकदा सैराटच्या कौतूकाचं खातं उघडलं तेव्हा माझे कान परत वर गेले. मग पुढे बाकी इतर फ्रेंडांनी पण तीच री ओढली आणि ते टाकत असलेल्या पोस्टींमुळे माझ्या डोक्यात वातावरण तयार होऊ लागलं. निव्वळ ह्या पोस्टींमुळे मी सैराटची गाणी एकायला आणि पिकचर बघायला घेतला!
२-३ दिवसांपुर्वी सुरवातीची फक्त २० मिनिटं हा सिनेमा बघितला आणि मला त्या सिनेमानी खिशात घातलं! कित्येक दिवसांनी किंवा वर्षांनी एखाद्या पिकचरची झिंगं चढली असं झालं!!!
कुठल्या शॉट बद्दल अन कुठल्या गाण्याबद्दल किंवा कुठल्या एक्स्प्रेशननांबद्दल बोलावं अन किती बोलावं हेच समजेनासं झालय. लोकं आपापल्या अँगलनी सिनेमे बघतात, त्यांना त्यातून बरच वेगळं काही काही सापडतं आणि वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा सिनेमा त्यांना आवडतो.
एक सिनेमा म्हणून स्वतंत्रपणे तो पिकचर छान असला तरी माझ्याकरता तरी ह्या पिकचरनी काही केलं असेल तर कॉलेजच्या दिवसांपासूनचा पुढचा काही काळ मला अक्षरशः परत जगवून आणलय!
सुरवातीच्या मंजुळेंच्या कॉमेंट्री पासून जी काही एकेक प्रसंगांना सुरवात होते, माणूस त्यात हरवूनच जातो!
काय त्यांची ती कॉमेंट्री अन ते रखरखलेल्या उन्हातलं मैदान अन ते पॅविलियन, ते ढोल तडम ताशे वाले अन सरवात महत्वाचं म्हणजे मॅच सुरु असलेल्या दरम्यान त्या प्लेयरांचं एकेक बोलणं!
लंगड्याच्या "हे हलगथ कोन पाठवलं रे ." " मंग्या मंग्या आरं नीट खेळ मंग्या नीट खेळ!अरं बॉल बघाय आधी बॅट नगं न फिरवू" पासून पुढे परत मंगेश मोहिते पाटलांनी बॉल हुकवल्यवर त्याच्या संतापाचा अक्षरशः अंत होतो तेव्हा " मला खेळायचच नै जा..." म्हणून बॅट सोडून ऑल्मोस्ट तो चालायलाच लागतो हा प्रसंग त्यातली लंगड्याची तळमळ किती लोकांनी अनुभवलेली आहे?
कधी आपण लंगड्याच्या बोटीत शिव्या घालत असतो तर कधी कधी मंग्याच्या सुद्धा बोटीत कारण "अर किती फाष्टाक्तोय बघ्तोन तू?" असाही प्रसंग येऊन गेला असेलच (तुम्ही अगदी स्टार बॅट्समन नसाल तर नक्कीच येउन गेला असेल).
मधल्यामध्ये बिली बाऊडींग अन शकुना आत्याचा सीन पण खल्लास आहे! किती वेळा पोरं आया, आज्या बोंबल्त आल्याकी बॉल बॅट हातात जे असेल ते टाकून पळायचे. फोर सिक्सच्या अॅक्शन पण कहर आहेत! एकदम किडमिडीत अंगकाठी अन त्यावर बनियन, डोक्याला आधी फडकं अन मग त्यावर कॅप! पुर्वी अंपायर लोकं खुप वेळा तसं करायचे! निरिक्षण सॉलिड आहे मंजुळेंचं किंवा ज्यानी कोणी डिटेलिंग केल्य त्याचं.
पर्श्यानी आधी फोर सिक्स मारल्यावर लंगड्याच्या एकेक शिवीसुचक हातवारे (काही न बोलता नेमकी काय शिवी दिली हे लगेच कळतं
) अन पुढे म्याच जिंकून दिल्यावर आडम तिडम मुद्दाम हारलेल्या टीम समोर केलेला नाच!
इतकं बारिक आणि चोख निरिक्षण म्हणजे काय चेष्टाय का राव? अन त्यापेक्षाही ते बरोबर शॉट मध्ये उतरवणं म्हणजे फार भारी! नागराज मंजुळेकी जय!
पुढे तात्यासाहेबांचं भाषण ज्यात खरं एक पुढे होऊ घातलेल्या काही गोष्टींना किती महत्व आहे हे अधोरेखित करणारं वाक्य आहे. "अहो तालुक्याचं राहुद्या आधी आपल्या बायका संभाळा म्हना ह्यांना..." असं ते म्हणतात.
थोडक्यात घरातल्या बाया/मुली ह्यांच्याशी स्वतःची अन घराण्याची इज्जत बांधलेली आहे ह्या टाईपची विचारसरणी असलेलं घर आहे. आणि हे बोलताना त्या सोनलताई का कोण असतात त्या शेजारीच बसलेल्या असतात. 
(ह्याच संदर्भात अजून एक गंमत म्हणजे तात्यासाहेबांच्या बंगल्याचे नाव अर्चना असतं))
नंतर विहिरीचा सीन. तिथे आर्चीची हापिशियल एंट्री होते अन क्या बॉस एंट्री बोले तो एंट्री आहे पोरीची! अर काय एक्स्प्रेशन अन काय तो कान्फिडन्स अन काय तो हेल बोलण्याचा! झन्नाट! ती ज्या पद्ध्तीनी येऊन विहिरीवर एक पाय ठेवून वाकून खाली बघते त्यातच सगळं येतं! पाटलाची पोरगी असल्याचा शुद्ध माज!
अय रत्ताळ्या निग्ग्कीरं भैर... आत्तागंबया भैरा बिराएकाकाय.... अय अय खुळखुळ्या उभाssssर!!!!
खलाssssस... अरे लेडी गब्बर वाटते ती इथे!!! (थांबा अजून! पुढे मी अजून तिचे अन तिच्या अॅक्टिंगच्या तारिफांचा पूल बांधणारच आहे. ही नुसती सुरवात आहे!
)
त्यानंतरची होते ती लंगड्याची होलपट तर निव्वळ कमाल आहे! त्याचे ते तसं चालणं असल्यामुळे ते आण्खिनच विनोदी झालय सगळं. ह्याउपर काय दिसतं ते म्हणजे मैत्री. येवढा पायानी अधू असून सुद्धा लगबगीनी (साबण अंगावर असताना) जाऊन आधी परश्याला सांगतो. (ते कसं सांगतो ते वाचण्यापेक्षा बघण्यातच मजा आहे). पण मी पवायला गेल्तो तिकडं आर्चिनं मला हाकल्ला हे सांगताना मला हाकल्ला ह्याचं तुसभर सुद्धा दु:ख किंवा लाज नाहीचे कुठे! नसतेच. सगळ्यात महत्वाचं काम त्यावेळी असतं ते मित्राला त्याचं सामान (आवडणारी मुलगी) कुठेतरी येऊन उभी आहे हा मेसेज जाणं! त्यात आपली इज्जत गेली तरी बेहत्तर पण मित्राचं झ्यंगाट हे जमवून दिलच पाहिजे, ते परम कर्तव्य असतय लगा!!
परश्याला स्वप्न पडतं तो प्रसंग आणि त्या भोवतीचे डायलॉग तर हसून हसून पुरेवाट आहेत. "कुठं दिवस भर कुत्री मारत हिंडत असतं कै म्हाईत" इति पशाचा बाप. ते नगं घरचे उठतीन आर्चे म्हणताना परश्याचा आवाज अशक्य दबलेला, चिरका अन लाडिक होतो! (स्वप्नात किस सुरु असतो ना?)
स्वप्न पडतात त्यात सुद्धा घरच्यांची भिती असतेच हे टीनेजर असताना काही आजिबात नवीन नसावं!
आता परशाची एंट्री!! म्हणजे सैराट एंट्री ह्या अर्थानं. फायन्ली लंगड्याची तगमग एकदाची "तिथं आर्चि आली आर्चि....." म्हणत कानावर पडल्यावर मग खरी जादू सुरु होते. याड लागलं! भन्नाट म्युजिक, बॅकड्रॉप अन सिनेमॅटोग्राफी! खरं डोळे मिटले आणि फक्त म्युजिक एकलं तर असं वाटेल की एखादा हॉलिवूडमधल्या जबरी म्युजिकलच सुरु असावं. मागची सीनरी जब्बरदस्त जमलीये. डिस्नी म्युजिकल सारखं ग्रँड वाटावं असं म्युजिक पण त्यात आपली माती, गवत, पक्षी अन आपला गावरान परश्या पण अगदी लिलया फिट्टं बसतात! कशाला बॉलिवूडवाले उगच झकमारी करत स्विझरलंडला जाऊन त्या हिरोंना गरम कपड्यात अन हिरवणींना स्लीव्लेस ब्लाऊजांमध्ये बरफात नाचायला लावतात देव जाणे!
पुढे आवरुन सावरुन भांगपट्टी करुन आलेला परशा कपडे अन सँडलांसकट जी उडी मारतो आगा ना पिच्छा बघत व्हिरीत त्यावर मी तर थेट्रात पैशे फेकले असते! ह्याला मंतेत जिगर! आधी उडी मारली, बघून घेतलं आर्चिला आता पुढचं पुढं बघू!
आत्तगंबया हे कुठून पड्लं व्हिरीत यून!
अssय निघ भायेर..
सॉरी सॉरी,
हss सॉरी सॉरीच्या लाडक्या.. आधी निघ भायेर..
मला मैतीच नवतं, बघितलच न्हाईमी..
बरं डोळं झाकून पडला रं हिरीत... आता बघितलं ना? हो भाएर..
आता खरं सीन बाय सीन कौतूक करत बसलो तर तो पर्यंत मंजुळेंचा दुसरा पिच्चर यायचा एखादा! त्यापेक्षा जरा फॉरमॅट बदलून, ज्या गोष्टी मला जास्त आवडल्या त्या बद्दलच लिहितो.
सैराट झालं जी:
ह्या गाण्यानी नुसतं वेड लावलय. खरं खुप सारे फॅक्टर्स आहेत ते गाणे आवडण्यामागे. एक तर आर्ची, परशा आणि त्यांचं एकेक प्रसंगातून फुलणारं प्रेम ह्या गाण्यात एकदम tempo धरतं (मालवहातुक वाला टेंपो नाही, गाण्यातला टेंपो असतो तो!).
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि त्याला साजेसं तेवढच अत्यंत ग्रँड ग्रँड पण थोडा गावाकडला टच असलेलं म्युजिक! (ढोलांचा वापर आणि ग्रामिण बाज असलेली भाषा)
खरंही वाटत नाही की हे करमाळ्याचं वगैरे शुटिंग आहे! काय एकसे एक अॅंगल घेतले आहेत!
गाण्यातले काही मोमेंट्स पण मस्त टिपले आहेत.
अगं झन्नानलं काळंजामंदी
अन हत्तामंदी हात आलं जी....
सैराट झालं जीssss
सैराट झालं जीssss
ह्या शॉट मध्ये आधी परशा आर्चिला गोल फिरवतो आणि नंतर आर्चि खाली वाकून खळाळून हसताना दाखवलीये.
ही हसतानाची आर्चि माझ्या करता कायमची स्मरणात गेलीये. 
नंतर गाण्यातच आर्चि परशाच्या बहिणीला स्कुटरवरुन घेऊन जाताना दाखवलीये आणि पुढे आर्चि मंदिरातून बाहेर गाभार्यात येते आणि तिथे तिच्या रंगीत चपलांमध्ये गुलाबाची फुलं ठेवलेली असतात. ती इकडे तिकडे बघते शोधत कोणी ठेवले असतील आणि तिला दोन खांबांमधून बसलेला परशा दिसतो, तो पाया पडल्या सारखं करुन मग हाथ जोडतो, मी ठेवले आहेत हे सांगत. मग आर्चि ती फुलं उचलून त्याचा वास घेते आणि मग छातीशी कवटाळते. पुढे आर्चि आणि सपनी, परशा, सल्या अन लंगड्या बसलेले असतात त्यांच्या शेजारून जातात तेव्हा लंगड्या सपनीवर फुल फेकल्याची अॅक्शन करतो! आणि त्या पुढे गेल्या की मग आल्या अन लंगड्या दोघंही बाबा प्रेमीपरशांच्या पाया पडतात की काय बॉ आय्ड्या काढली लगा बाबांनी!!! पोरगी फिदाssss...
(हा शॉट सुरु असताना मला वाटतं मागे आधी वायोलिन आणि नंतर बासरी आणि सॅक्सोफोन आहे. अप्रतिम जमून आलाय शॉट, म्युजिक, चित्रिकरण, सगळ्यांचे एक्स्प्रेशन्स सगळ्याच दृष्टिनी!! टोटल गुंडाळून खिशात जाणार हे असले शॉट दाखवले की आशिक दिलाचा प्रेक्षक!) 
नंतर घोडेस्वारीच्या शॉट मध्ये लंगड्या, सल्या आणि आनी असतातच. बघताना गंमत वाटते पण आपल्याकडे तरुण मुलं मुलींना घोडेस्वारीच काय एकांतात कुलफ्या पण खाऊ देतील कोणी तर शपत. आपल्याला नेमून दिलेली कामं सोडून तरुण मुलं मुलींच्या एकांतात व्यत्यय आणण्यात पोलिस, गावातली इतर लोकं वगैरे अशी सगळी बिन प्रेम करताच कुटुंबवत्सल झालेली मंडळी अगदी तरबेज असतात. सतत बिचार्या प्रेमींना आपलं लक्ष ठेवावं लागतं, कोणी पाहतय का, किंवा मग असं मित्रांना तरी राखणाला ठेवावं लागतं.
(असं कसं? असं आडनिड्या वयातल्या मुलं मुलींना एकांतात कसं काय सोडायचं, नाही? उद्या काही वेडंवाकडं झालं तर? आपल्या इज्जतीचं काय होईल? अहो आम्ही पण बरीच वेडीवाकडी कामं करतोओ पण ते बंद दरवाज्या आड, तिथे कोणाला कळतय?) 
कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं च्या वेळेस जेव्हा परशा हवेत किस सोडतो तेव्हा लंगड्याचा "आयो.." वासताना स्लो मोशन मध्ये स्पष्ट दिसतो!!
पुढच्या कडव्यात रंगा खेळतात तो प्रसंग आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे खरं? आपल्या इथे ग्रामिण परिसरात असतात तशी दगड मातीच्या भिंती असलेली घरं, आजूबाजूला उगवलेलं कोरडं गवत, त्या दगडमातीच्या घरांमधून असलेल्या धुळीच्या वाटा! ह्या असल्या बॅकग्राऊंड असताना सुद्धा आधी बिल्ड केलेल्या वातावरणामुळे आणि म्युजिक, सिनेमॅटोग्राफी मुळे काय जब्बरदस्त भाव खाल्लाय ह्या प्रसंगानी?!
गाणं संपत असतानाचे शॉट्स (त्या कळसाच्या छोट्या गच्चीवर वगैरे) मला वाटतं ड्रोन वापरुन शॉट्स घेतले आहेत. सिंपली (अॅज इन सिंपल) इन्क्रेडिबल!
आर्चि:
आर्चि मला वाटतं एका पिकचर मधलं एक पात्र नसून एक फिनोमेनॉन होऊन गेली आहे. ह्यात खरं तिच्या अॅक्टिंगला दाद द्यावी की मंजुळेंच्या परफेक्ट कास्टिंगला हे समजत नाही कारण ती अॅक्टिंग करते असं मला वाटतच नाही इतकी ती फिट बसली आहे त्या रोल करता. ह्याच अर्थ इथे मी झुकतं माप मंजुळेंच्या कास्टिंग ला देइन, पण ते देत असताना तिनी ज्या प्रकारे रोल पेलला आहे त्याला जवाब नाही. हे मान्य की रिंकु राजगुरु रियल लाईफ मध्ये बरीचशी तशीच चालते बोलते पण पिकचर मध्ये फक्त तिचं चालणं आणि बोलणं नाहीये ना ? खुप ठिकाणी तिला स्ट्राँग इमोशन्स दाखवावे लागले आहेत, एका अल्लड पाटल्याच्या पोरी पासून पुढे हलाखीत दिवस काढून नंतर एकदम मचुअर, आत्मविश्वासानी संसार करणारी तरीही आई वडीलांच्या आठवणीनी झुरणारी आर्चि हे ट्रान्सफॉर्मेशन तिला पेलावं लागलेलं आहे and oh my god has she done it well!!!
आता खरं खुप काही लिहिता येइल पण एक शेवटचा माझ्या कायमचा लक्षात राहिल असा प्रसंग आहे त्या बद्दल लिहून आवरतं घेतो. हा प्रसंग खरं मंजुळेंचं डायरेक्शन, परशा आणि आर्चिच्या अॅक्टिंगमुळे अत्यंत रियलिस्टिक होऊन आपल्या अंगावर येतो अगदी.
त्या फोनच्या पासवर्ड वरुन आधीच परशा जरा उखडलेला असतो, दुसर्या दिवशी कामावर जायच्या आधी पण त्यावरुन खटका उडतो आणि आर्चि निघत असे पर्यंत सुरुच असतं भांडण.
"तिथं कामावर कोणी फोन बघू नये म्हनून बदल्लाय" इथे खरं परशा थोडा शरमल्या सारखा होतो, कारण त्याला स्वतःची चूक लक्षात येते बहुतेक पण तो पर्यंत डॅमेज झालेलं असतं.आर्चिचा संयम संपलेला असतो.
"कुडं चालली?"
"चालली मसनात! कुटं जाती रोज मी?" "तुझ्या ह्या असल्या सबावाचा लै वैताग आला मला"
"काय यवडा वैटे का मी?"
"मंग मी वाईटे का?"
"मी आसकुडं म्हनलं?"
"म्हनायची काय गरजे?"
"कामावर जावच लागल का?"
"लोडय कामाचा, सर वोरड्त्याल"
काम संपवून आर्ची परशाच्या डोसा टपरीवर येते.
परश्या अजून घुसाट्यातच असतो.
"परश्या..... ओ साह्येब... पिकचरला जायचं का?"
"कामय मला.."
"मी इचारतीकी सुमनताईला"
"दुसरं कामेमला"
"चल ना..."
"तुला एकदा सांगितलेलं कळतय का?"
"हळू बोल की मग येवडं वरडतो कशाला?"'
"लै गाजलेला पिच्चरय, तुझ्या आवडत्या हिरोचा"
"...."
"मी एकटी जाईना?"
"जां..."
"खरच एकटी जाईन"
"निग्की मग कशाला थामली!"
"लै इगोए तुला, बस तसाच..."
असं म्हणून आर्चि एकटी पिकचर ला जाते....
त्या प्रेमानी म्हणलेल्या ओ सायेबाला पुढे जी अत्यंत तुसडी वागणूक मिळते ती बघून आणि एस्पशली विहिरीवरची ७-८ पोरांना दमात घेऊन हाकलणारी आर्चि आठवून ह्रदयाला खिंडारं पडतात!
पाटलाची पोरगी म्हणून येवढा माज केलेली, तेवढच ह्या परशावर प्रेम करणारी अन त्याला वाचवताना स्वतःच्या वडिलांकडून मार खाणारी, आबावर गोळी झाडणारी पण नंतर परिस्थितीशी दोन हात करत पण प्रेमानी राहू बघणार्या आर्चिची वाताहत बघवत नाही. पुढे प्रकरण आण्खिन थोडं विकोपाला जाऊन नंतर शेवटी परत ती दोघं आपल्याला एक मेकांशिवाय कोणी नाही हे समजून परत एकत्र येतात.
परशा तसा चांगला दाखवलाय आणि पिकचर मध्ये आर्चिच्या घरचे खुप जास्त कडक दाखवले आहेत पण एकंदरितच हे सगळं आपल्याकडच्या बर्याच मुलीं/स्त्रियांबद्दलचं खुप बोलकं असं उदाहरण आहे.
पळून जाऊन लग्न केलेलं नसलं आणि घरच्यांनी करुन दिलेलं असलं तरी एकदा लग्न करुन दिलं की आपली जबाबदारी संपली आणि माहेरपणाला आनंदानी ये असं म्हणाले तरी टेकनिकली घरी परत जायचे दरवाजे बंद असतात. सो उद्या काही अनबन झाली तरी एक तर तुम्ही ते निभावून न्यायचं किंवा मग आपला आपण मार्ग बघायचा येवढच उरतं.
असो..... 
अकरित घडलया
सपान हे पडलया
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजलं
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरलं
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…….
_/\_
मोसा, लेडी गब्बर चालू राहुदे.
मोसा, लेडी गब्बर चालू राहुदे. मजा येतेय वाचायला.
कुणाला खरेच कुठलाच सिन वगैरे उगीच नाही वाटला? किंवा एखादी उणीव, चुक?
मी विचार करुन भंजाळलो पण मलाही काही नाही सापडत नाव ठेवायला.
तरी हे तीन पाँईट, अगदीच पाणचट तरीही
१. आधीच लिहिल्याप्रमाणे स्लोमोचा अतिवापर (हेही चांगल्या अर्थाने, म्हण्जे एवढी गरज नव्हती अतिगोड आइसक्रिमची)
२. चित्रपटाच्या कालखंडाबाबत जरा शंका वाटतात. म्हण्जे कुठेतरी स्क्रीनवर २०१५ साल पाहिल्यासार्खे वाटते. मेबी त्या बस स्टॉपवर दोघे बसलेले असतात विमनस्क अवस्थेत. मग सुरुवात ते शेवट अंदाजे ४-६ वर्षांचा काळ दाखवलाय. म्हण्जे शेवट २०१८-१९? मग तेव्हाचे ४० हजार? इथे बहुदा माझाच काही घोळ होत असेल.
३. मला शेवटचा तासभर तरी असह्य होतो. काही विनोद पेरुन खुलवता आला असता तोही भाग.
)
('नवरा-बायकोच्या अतिगंभीर भांडणातही काही विनोदी किस्से घडतात, तेव्हा ते तितकेसे भावत नसले तरी त्रयस्तांस किन्वा काही काळाने आपणास आठवून हसू फुटते' या अनुभवमिश्र रिअॅलिटीस स्मरुन.
अजय हा मराठीतला उदित नारायण
अजय हा मराठीतला उदित नारायण आहे.पल्लेदार आणि दमदार आवाज.
त्या आर्ची/प्रिन्सच्या
त्या आर्ची/प्रिन्सच्या बुलेटच्या पुढच्या मडगार्डवरची तलवार बघीतली का कुणी. साधारण दैत्य/राक्षस लोक वापरतात ती तलवार आहे. Scimitar Sword.
आज लंगड्या/ प्रदीप/ बाळ्या चा
आज लंगड्या/ प्रदीप/ बाळ्या चा वाढदिवस आहे असे फेबु वर वाचले..
लिहिल होत सैराट्चा खरा हिरो लंगड्या ला वाढदिवसाच्या शुभेच्छा ..
खरच असेल तर शुभेच्छा ..
शेवटच्या सीन मध्ये आर्चीचे
शेवटच्या सीन मध्ये आर्चीचे एकदम निर्जीव दिसणारे वर बघणारे डोळे पाहिले का? >>> हा एकच सीन नाही। पाहू शकत. पहिल्यांदा पाहिला, दोन रात्र झोप उडाली, नंतर पिक्चर बघताना टाळलाच
पहिल्चांदा असं झालंय की मूव्हीतली कॅरॅक्टर्स ही मूव्हीतली न वाटता आपलीच कोणीतरी जवळची आहेत असं फिलिंग येतंय.
"पहिल्चांदा असं झालंय की
"पहिल्चांदा असं झालंय की मूव्हीतली कॅरॅक्टर्स ही मूव्हीतली न वाटता आपलीच कोणीतरी जवळची आहेत असं फिलिंग येतंय." .... खर आहे
प्रत्येक सिनेमाचा एक टर्निंग पॉइण्ट असतो, पर्फेक्ट डिफाइंड असतो, सिनिमाच्या दिग्दर्शकाने तो छान पेरलेला असतो.
कोणीतरी प्रेम करणारी असावी असे मनोमन वाटायचे. पण तिला विचारण्याची हिंम्मतच कधी झाली नाही. मी इथे, ती तिथे उंचावर. ती हो म्हणणे कधीच शक्य नाही. असे मनात म्हणून कधीच प्रेम व्यक्त झाले नाही.
का कदाचित त्या आर्ची ने एका अलगद क्षणी मला विचारले असते "मी कूड म्हनल मला नाही आवडत"? आज कदाचित जिंदगी वेगळी असती. हा परशा तुम्ही असाल तर सैराटचा टर्निंग पॉइण्ट इथे.
पत्रे चिठ्ह्या पाठवल्या, दोन्ही बाजूनी नजरा नजर झाली. कॉलेज चे दिवस, चिंब भीजलेला पहिला पाउस तिच्याबरोबरचा, नारळ पाणी किंवा गरम भजी, कॉलेजमधले स्नेह संमेलन, तिचे सॉलिड दिसणे आणि इतकेच. थोडे प्रकरण पुढे गेलाय पण प्रपोज करायला घाम.
का कदाचित त्या आर्ची ने एका अलगद क्षणी मला विचारले असते तर. "मला पण तू आवडतो... मराठीत सांगितलेल कळत नाही, इंग्लीश मधे सांगू? ई लव यू". आज कदाचित जिंदगी वेगळी असती. हा परशा तुम्ही असाल तर सैराटचा टर्निंग पॉइण्ट इथे.
बॅंडस्टॅंड चा कट्टा, केफे मधे प्यायलेली कॉफी. घरच्यांची करडी नजर चुकवून भेटायला येणारी ती, तिची वाट पाहत बस स्टॉप वर उभा असलेला मी आणि उशीरा का होईना पण दिलासादायक असे तिचे ते येणे. प्रेमाने मोहरून एकमेकांकडे निशब्दपणे पहाणे, हृदयांत, मनांत प्रेमाचे कारंजे फुलले आहे आणि यामध्येच बरांच काळ निघून जातो. लग्न करायचे का? मी विचारतो आणि अचानक तिला घरच्यांच्या सूचनांची आठवण येते. कोकणस्थ ब्राम्हाणच पाहिजे, देशस्थ पण नको, आधी बोर्डात आलाय का विचार नाहीतर किती मार्कानी बोर्ड हुकले ते विचार.
प्रेमात पडताना जात पात दिसते का कधी, ते अलगद हळूवार होते आणि आयुष्यातले सर्वात सुंदर सोनेरी क्षण देऊन जाते. माझ्यातल्या आर्ची चा हा टर्निंग पॉइण्ट. प्रेमावर विश्वास होता, दोघांच्या कर्तबगारीवर होता पण पळून जायचे धाडस नव्हते. का माझ्यातल्या आर्ची ने ठसकावून घरच्याना सांगण्याची बंदुक उचलली नाही? आज कदाचित जिंदगी वेगळी असती.
मी सैराट बघितला आणि मनाचा हलकल्लोळ झाला. हृदयाच्या कोपर्यात दडवून, मुद्दाम विसरायला ठेवलेल्या आठवणी, ज्याला गरजेचे कुलुप लावले होते ते सहज गळून पडले. २० वर्षापूर्वीचे वडीलधार्यांच्या मर्जी राखायला तोडलेले प्रेम लख्ख तसेच्या तसे आठवले.
आज त्याच्या कर्तबगारी वरच्या न्यूज़ mentions Linkedin फीड मधे आल्या की अजूनही धडाडत. असो.
ज्याच्या हृदयात प्रेम आहे, त्याला त्याला सैराट आवडला कारण प्रत्येकाच्या अनुभवलेल्या प्रेमाचा अंत किंवा सफल जिथे झाला आहे, तो त्याच्या दृष्टीने सैराट चा टर्निंग पॉइण्ट आहे.
असो! जे काही मनात आलं ते भरभरून लिहावसं वाटलं.
काही ठिकाणी टायमिंग गंडलय.
काही ठिकाणी टायमिंग गंडलय. उदा क्रिकेट मॅचनंतरच्या बक्षिस समारंभात सल्या 'मुलगीच द्या' म्हणतो त्यानंतर एक पॉज आहे आणि मग मंग्या म्हणतो 'काय म्हन्ला रे'. सहसा अशी प्रतिक्रिया लगेच येते, पॉज नंतर नाही
टण्या अगदी. मी ती सेन्सॉर
टण्या अगदी. मी ती सेन्सॉर कॉपी नाही पाहीली (फक्त थेटरलाच पाहीला म्हणा) पण त्यात काही जास्तीचे काही वेगळे सीन आहेत म्हणे.
एडिटिंग मध्ये काही घोळ झाला असेल बहुतेक.
अवांतर.. सैराटव्यतिरिक्त
अवांतर.. सैराटव्यतिरिक्त कोणता असा दुसरा मुवी आहे का,मराठीत इतके अभूतपूर्व यश मिळालेला..?
>>
यशाचं माहीत नाही पण अशीही बनवा बनवीवर पण अशीच चर्चा रंगते माबोवर
अवांतर.. सैराटव्यतिरिक्त
अवांतर.. सैराटव्यतिरिक्त कोणता असा दुसरा मुवी आहे का,मराठीत इतके अभूतपूर्व यश मिळालेला..?>>
बॉक्स ऑफीस कमाईत महागाई दर लावला तर माहेरची साडी पुढेच असेल मेबी
हा हलकट्पणा आहे रीया, ह्या
हा हलकट्पणा आहे रीया,
ह्या धाग्यावर तरी सैराटव्यतिरिक्त कोणता असा दुसरा मुवी नाहीये असे म्हणायचे ना!
न झोपणारा धागा आहे
न झोपणारा धागा आहे हा!
अल्ट्रा मॅरॅथॉन धावताना स्पीड उसैन बोल्ट्चा बघीतला आहे का कुणी !
मोसा, ह्या सिनेमात असं खूप
मोसा,
ह्या सिनेमात असं खूप काही आहे जे प्रत्येकाला भावतं, भूतकाळात नेतं, त्यामुळे प्रत्येकाला हा अापलाच सिनेमा अाहे हे वाटतं.
हेच सैराटच्या यशाचे गुपित अाहे.
हा हलकट्पणा आहे रीया, दिवा
हा हलकट्पणा आहे रीया, दिवा घ्या
ह्या धाग्यावर तरी सैराटव्यतिरिक्त कोणता असा दुसरा मुवी नाहीये असे म्हणायचे ना! <<< हर्पेन
सैराट इफेक्ट : आमचे चिरंजीव,
सैराट इफेक्ट :
आमचे चिरंजीव, वय वर्षे साडेतीन.
आमच्यात नेहमी एक खेळ चालतो. तो डॉक्टर असतो मी पेशंट , मी टीचर तो स्टुडंट , किंवा व्हाइस-व्हर्सा आणि अजुन काही अशीच कॉम्बीनेशन्स
काल रात्री २-३ कॉम्बीनेशन्स झाल्यावर चिरंजीव म्हणाले, " डॅडू तु पनश्या न मी आन्ची"
(र आणि ल चा उच्चार "न" आहे अजुनतरी.) मी आणि सौ गारच!
मग म्हणतो " बोल कि"
मी : "काय बोलू?"
चिरंजीव : " म्हण, आन्चे मना तु नै आवदते"
मी आणि सौ अवाकच!
चिरंजीव : "बोल ना!"
मी : " आर्चे मला तु लै आवडते"
चिरंजीव : " पन्शा मनापण तु नै आवदतो"
आमच्याबरोबर दोन्ही वेळा होता तो थेटरमध्ये सैराट पाहायला, पन झिंगाटवर नाचन्यापलिकडे त्याने कधी काही केले नव्हते आनि आता हा डायलॉग
एक अशी पद्धत आहे मला वाटते कि
एक अशी पद्धत आहे मला वाटते कि मामाची मुलगी करून घेतात त्यामुळे मंग्याला आर्चीवर हक्क वाट्त असेल. वेळ आली की आपल होईलच तिच्याशी लग्न टाइप काँफिडन्स असेल. पण ही तर स्वतंत्र मताची निघाली त्यामुळे त्याचे फ्युचरही गंडले. त्यामुळे मंग्या द्विधा मनःस्थितीत असेल.
हळद पिवळी चारोळींच्या शेवटी लाज आली गाली ला कोरस चा आवाज एकदम आतला हळूवार होतो. ते फार सुरेख वाट्ते ऐकायला. पूर्वीच्या कथांमध्ये मनानं वरलं असे ती ही घडी. बाकीचे सर्व लग्न जुळवणे व होणे. हळद मधला गिटार चा रिफ पण मस्त दणकट आहे तिच्या सारखाच.
परश्या पळून गेल्याने बहिणीचे लग्न अडकते. बाबा जात पंचायतीत थोबाड फोडून ( स्वतंचे) माफी मागतात कारण मुलीचे आयुष्य मार्गी लागावे. अशी अगतिकता भोगायला लागू नये लाइफ मध्ये. त्यांनीही स्वप्ने बघितली असतील मुलगा सावलीत ल्या नोकरीत लागला की आपण घरी बसू जरा आराम करू. तर हे नशिबी आले.
आबासाहेब चिरंजीव धमालच आहेत.
आबासाहेब
चिरंजीव धमालच आहेत.
मोसा, अगदी अगदी . ---- मी
मोसा, अगदी अगदी .
----
मी तीनदा थेटरात पाहून सुद्धा , फक्त एकदाच शेवट पाहिला.
इतकं क्युट चालू असताना... नकोच तो उल्लेख.
-----
इथे लोकांना प्रश्ण आहेत ना की, घरी कोणीच सांगत नाहीत कसे आर्ची परश्याबद्दल तर,
असे बघितलेय,
गावात जर मोठ्या घरची मुलगी( मुलगी घराची इज्जत हा मागसलेला विचार असतो ना) प्रेमात असेल दुसर्या जातीच्या मुलाच्य किंवा मुलाशी बोलताना दिसली तरी इतरांना मजा असते/वाटते.
कारण श्रीमंता विरुद्धा जेलसी, चीड. असे विचार असतात मनात,
लय माज करत व्हतं आनि आता पोरगी गेल्ली फुकट. आता होइल त्वांड काळं. अशी चर्चा करतात आपसा-आपसातच.
तर अर्धे अधिक लोकं, त्यांच्या कोन नादाला लागल, आपल्याला काय करायचं, आपली थोडी पोरगी हाय. असे म्हणणारे असतात.
गावात अगदी बाया हिरिवर , नदीवर, दुपारचे वाळवणी/ साठवणी करताना कुजबुजणार तर बापडे त्यांच्या अड्ड्यावर.
अगदी अगदी... माझी लेक ( वय ५)
अगदी अगदी...
माझी लेक ( वय ५) आणि तीचा बाबा पण हा खेळ खेळतात....ती अर्ची असते आणि बाबा परशा....
"काय बग्तु रं ....कुटं काय...खोखो बगतु..." वाला सीन दोघं खेळत असतात बरेच्दा....
आणि दोघं बाथरुम मद्धे बराच वेळ शॉवरखाली खेळत बसतात तेव्हा मी डायलॉग मारते...

" अय मन्ग्या व्हु बाहीर....काय भैरा बिरा हाय का काय....व्हय बाहीर...मराटीत सांगितलेलं कळत नाय? ईंग्लीश्मद्धे सांगु ...."
हे घ्या. एकनॉमिक्स च्या
हे घ्या. एकनॉमिक्स च्या अभ्यासाचा चांगला वापर.
माहेरच्या साडीने १९९१ मधे १२ करोड कमावले. भारताचा तेव्हाचा consumer price index आजच्या वर्षात रेशियो घेऊन, त्याकाळची टिकेट किंमत २० रुपये पकडून गणित केले. माहेरची साडी तुलनात्मक कमाई१५७ करोड होते.
तिकीट किंमतीचा अंदाज नाही मला १९९१ मध्यल्या. ते बरोबर की नाही सांगा मग परत गणित करेन....
दोन खूपच खटकलेल्या गोष्टी, १)
दोन खूपच खटकलेल्या गोष्टी,
१) अक्काचे येणं अगदी नेमकं त्याच वेळेला, त्याच बाजून
२) एक तरी सीन परश्या आपल्या आई वडेल आणि बहिणीशी सम्पर्क करताना किंवा आठवणीने भरून आलेला....
मित्रांशी बोलतोय मग आपल्या लोकांशी क नाही?
मंग्याला आधी वाटत असते की
मंग्याला आधी वाटत असते की परश्या आर्चीवर एकतर्फी लाईन मारतोय आणि परश्याची गँग तिला वरडतंय मागेमागे फिरतेय.
त्यामुळे तो चिडतो आणि परश्याशी मारामारी करतो.
पण जेव्हा आर्ची त्यालाच दम देते तेव्हा त्याला कळत की आग दोनो तरफ बराबर लगी है.
मग तो त्या दोघांना काहीच विरोध करत नाही. सैराट झालं जी गाण्यात कवायतीच्या सीन मध्ये तो देखील हसत असतो या दोघांचे इशारे बाघून
हा सिनेमा ऑनर किलींग वर आहे.
हा सिनेमा ऑनर किलींग वर आहे. पण खरेच महाराष्ट्रात इतपत जहाल निर्णय घेतले जातात का?
गजानन - माझ्यामते ढवळी
गजानन - माझ्यामते ढवळी म्हणजे वेंधळी टाईप
नाही नाही , ढवळी म्हणजे गोरी
नियमितपणे वापरला जाणारा शब्द आहे.
आसा.... चिरन्जीव! भारीच!
आसा.... चिरन्जीव! भारीच!
मित्रांशी बोलतोय मग आपल्या
मित्रांशी बोलतोय मग आपल्या लोकांशी क नाही? >>>
त्याच्या आई वडीलांनी गाव सोड ेलं असतं नं. तसंही त्याला जाणीव असणार की आपण संपर्कात राहिलो तर तेयानाही त्रास देणार. सुमनताईस म्हणतो ना तो की आम्ही माघारी गेलो तर जित्तं ठेवनार न्हाय म्हणून.
बी, महाराष्ट्रात अजून तरी अशा
बी, महाराष्ट्रात अजून तरी अशा घटना तुरळक आहेत, पण आहेत. लग्नाआधीच दलित मुलाला मारल्याची घटना हल्लीच वाचलेली.
आरचीचे डोळे उघडे आहेत, मृत्यूनंतर.
२) एक तरी सीन परश्या आपल्या
२) एक तरी सीन परश्या आपल्या आई वडेल आणि बहिणीशी सम्पर्क करताना किंवा आठवणीने भरून आलेला....अगदी.,मला हे खुपच खटकलं.
माहेरची साडी तुलनात्मक कमाई१५७ करोड होते...बापरे..!
पण काहिही म्ह्णा..सैराट सैराट आहे..! त्याची बरोबरी कुणी करेल असं वाटत नाही.
मागे कोणीतरी एकमेकांचा शर्ट
मागे कोणीतरी एकमेकांचा शर्ट घालण्याचा फोटो दिलंय.
सैराट आवडला नसता तर तो फोटो डिरेक्टरच्या चुका मध्ये आला असता.
एक तरी सीन पाहिजे होता की
एक तरी सीन पाहिजे होता की भाऊबीज आहे आणि परश्या आर्ची दोघे ही घरच्या आठवणीने हळवे झालेत.
किंवा अार्ची भाऊबीजेच्या दिवशीच रांगोळी काढतेय नि तेवढ्यात प्रिन्स मंडळी येते.
Pages