इस्ट ऑफ इडन

Submitted by केदार on 10 June, 2016 - 10:47

इस्ट ऑफ इडन - जॉन स्टाईनबॅक

सायरस हा एक सैनिक. तो ही नावालाच. त्याची ज्या जागेवर पोस्टींग होती तीथे कधी युद्ध झाले नव्हते. सायरसला खोटे बोलण्याची सवय आहे. त्याने कसे अनेक युद्धात वरिष्ठांना स्टॅटजीची मदत देउन युद्ध जिंकले असे लोकांना खोटे सांगतो. ते खोटे इतके पसरते की त्याला अमेरिक व्हाईस प्रेसिडेंट त्यांच्या युद्ध विषयक सल्लागार म्हणून नेमतात. त्यात तो भ्रष्टाचार करून खूप पैसे कमवतो.

सायरस चे मुलं अ‍ॅडम आणि चार्ल्स. त्याच्या बायकोने आत्महत्या केली आहे. त्याला मृदू स्वभाचा अ‍ॅडम जास्त आवडतो. तर चार्ल्सचा बेरकी स्वभाव असल्यामुळे तो त्याच्याशी नेहमीच थोडे कडक वागत असतो. सायरसला आपली मुलं, खासकरून अ‍ॅडमने सैन्यात जावे व जे स्वतः केले नाही ( खरे युद्ध) ते करावे असे वाटत असते आणि तो बळजबरी अ‍ॅडमला सैन्यात भरती करतो. अ‍ॅडम वडिलांपासून दुखावला जातो चार्ल्स, अ‍ॅडमचा भाऊ हा शेती करतो. खरे तर तो धट्टाकट्टा आणि अ‍ॅडमला नेहमी त्रास देणारा असतो, सायरसचे जास्त प्रेम अ‍ॅडमवर असते असे त्याला नेहमी वाटते. तो वडिलांचे प्रेम प्राप्त करण्यासाठी अनेक प्रयत्न करतो.

सायरस मरतो तेंव्हा भ्रष्टाचाराने कमाविलेले $१००,००० डॉलर ह्या दोघांच्या नावे करून मरतो. अ‍ॅडम आणि चार्ल्स हे अनेक वर्षे भेटलेले नसतात. ( तो सैनिक असतो), ते भेटतात. एके दिवशी त्यांच्या दरवाज्यापाशी एक मरणासन्न अवस्थेत असणारी मुलगी येउन कोसळते. ते दोघे तिला मदत करतात. तिचे नाव कॅथी. अ‍ॅडम हा नेहमीच उद्विग्न अवस्थेत जगणारा माणूस. ( त्याला जे करायचे असते, ते करता येत नाही) त्याला कॅथी आवडते. तो तिची सुश्रुशा करतो आणि तिला लग्न करायला भाग पाडतो. ते दोघे भाऊ १००,००० वाटून घेतात आणि अ‍ॅडम, बायकोसहित कॅलिफोर्नियाला निघून जातो. तिथे येऊन तो शेत विकत घेतो. त्याच्या रॅंचचा शेजारी सॅम हॅमिल्टनचे शेत आहे. सॅम हा एक हरहुन्नरी माणूस. वेगवेगळी संशोधने करणारा आणि अतिशय मनमिळावू. त्याच्यामध्ये एक फिलॉसॉफर दडला आहे. विहीर खोदायला मदत म्हणून अ‍ॅडम सॅम कडे जातो आणि तिथे ते दोघे कायमचे मित्र होतात.

कॅथी ! हे एक अफलातून कॅरेक्टर आहे. ती अतिशय रुपवान, छोट्या चनिची मुलगी. कुणालाही तिची भुरळ पडावी अशी. पण तिचे मन मात्र राक्षसीवृत्तीचे आहे. ती, तिच्या आईवडिलांना त्यांच्या राहत्या घरात जाळून टाकते आणि पळून जाते. तिची भेट एका कुंटनखाना चालविणार्‍या माणसाशी होते. काही दिवस ती स्वतःहुन त्याच्या सोबत राहते, पण ते पण तिला नको वाटते. पैसे घेउन पळून जाताना, तो माणूस पकडतो आणि तिला खूप मारतो. मरणासन्न अवस्थेत असतानाही ती त्या माणसाला जिवानिशी मारते. अन धडपडत अ‍ॅडम अन चार्ल्सच्या घराशेजारी येऊन पडते. अ‍ॅडमशी लग्न केल्यावरही तिला चार्ल्स आवडत असतो. अ‍ॅडम न कॅथीमध्ये फारतर दोनदा संबंध येतात. पण चार्ल्स अन कॅथी मध्ये अनेकदा होतात. पण अ‍ॅडमला हे माहिती नसते. तो कॅथीला घेऊन कॅलिफोर्नियात येतो.

कॅथीला दिवस जातात. पण तिची ओढातान होत असते. तिला अ‍ॅडम सोबतचे बंदिस्त आयुष्य नको आहे. ती मुलांना गर्भातच मारण्याच्या प्रयत्न करते, पण डॉक्टर तो हाणून पाडतात. अश्यातच कॅथीला मदत म्हणून अ‍ॅडम, ली ला कामावर ठेवतो. तो स्वंपाकी असतो. ली हा चिनी माणूस आहे. त्या काळात, म्हणजे १९१० च्या आसपास अनेक चिनी लोकं कॅलिफोर्नियामध्ये दाखल झाली. ती रेल्वे मजदुर म्हणून आली होती. ली देखील फिलॉसॉफिकल माणूस आहे. सॅम, अ‍ॅड्म आणि ली ह्यांची मैत्री होते. पुस्तकातील त्यांच्या फिलॉसॉफिक्ल चर्चा सुंदर आहेत. लीच्या तोंडी असणारी अनेक वाक्ये फारच गहन आहेत. उदाहरणार्थ - When a man says he does not want to speak of something he usually means he can think of nothing else.”

कॅथी बाळंत होते. ती दोघांना जन्म देते. जुळी मुले. आणि अ‍ॅडमला खांद्यावर गोळी झाडुन निघून जाते. कॅथी ही सालिना गावात जाऊन कुंटनखान्यात आश्रय घेते. पुढे ती त्या मालकिनीला मारून स्वतःच "मॅडम" बनते.

कॅथी निघून गेल्याच्या दु:खात अ‍ॅडम असतो. तो उध्वस्त झालेला असतो. एक वर्षे तो मुलांची नावही ठेवत नाही. सॅम अन ली खूप प्रयत्न करतात. पण अ‍ॅडम शॉ़ मधून बाहेर येत नाही. अचानक एके दिवशी सॅम, लिसामुळे ( त्याची बायको) येतो अन अ‍ॅडमला एकदम धमकी देतो आणि थोबाडीत मारतो आणि सांगतो की मुलांना नावे ठेवायला हवीत, मुलं तुझी आहे. कॅथी गेली वगैरे वगैरे. अ‍ॅडमला ते पटते.

ली आणि सॅम बायबल उघडतात आणि पहिलीच गोष्ट येते केन आणि एबलची. केन आणि एबल हे बिबिलिकल कॅरेक्टर्स आहेत. अ‍ॅडम आणि इव्हची मुलं.

कथा वाचता वाचता ते Timshel ह्या शब्दापाशी येऊन थांबतात आणि तिघांमधील फिलॉसॉफर जागा होतो. पुढची तीन पाने म्हणजे पर्वनीच ! उदाहरणार्थ,

I believe that there is one story in the world, and only one. . . . Humans are caught—in their lives, in their thoughts, in their hungers and ambitions, in their avarice and cruelty, and in their kindness and generosity too—in a net of good and evil. . . . There is no other story. A man, after he has brushed off the dust and chips of his life, will have left only the hard, clean questions: Was it good or was it evil? Have I done well—or ill?”

किंवा

We have only one story. All novels, all poetry, are built on the neverending contest in ourselves of good and evil. And it occurs to me that evil must constantly respawn, while good, while virtue, is immortal. Vice has always a new fresh young face, while virtue is venerable as nothing else in the world is.”

चर्चेवरून त्यांची नावे कॅलेब आणि अरोन अशी ठेवली जाती. ( Celeb & Aron) कालांतराने त्यांच्यांसोबत अ‍ॅब्रा नावाच्या मुलीची जी, अरोनच्या प्रेमात पडते, तिची कथाही आहे. ते दोघे लहानपणापासूनच, ६ ते ७ वर्षाचे असल्यापासून प्रेमात आहेत.

चार्ल्स मरतो आणि मरताना १००.००० डॉलर्स अ‍ॅडम अन कॅथीच्या नावाने करतो. अ‍ॅडमला ती कुठे आहे हे कळते व तो अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच भेटतो व ते पैसे देऊ करतो.

ह्या दोन भावात कॅलेब हा थोडा विचित्र वागतो, त्याला वाटत असते की कोणीही त्याच्यावर प्रेम करत नाही. ( चार्ल्स सारखेच) आणि अरोन सर्वांचा लाडका आहे. अरोन अत्यंत देखना असतो. कॅलेबला त्यांची आई जिंवत आहे व वेश्याव्यसाय करते हे कळते. ते तो काही दिवस लपवून ठेवतो. कॅलेब व्यवसाय करतो, त्यातून त्याला १५००० मिळतात, ते तो वडिलांना देऊ करतो. वडिल म्हणतात युद्धात ( पहिले महायुद्ध) काळाबाजार करून आलेला पैसा मी घेणार नाही, त्याचा राग येउन तो ते पैसे जाळून टाकतो. ह्याच रागात तो अ‍ॅडमला त्यांच्या आईविषयी सांगतो आणि त्याला भेटायला घेऊन जातो. आईला भेटल्यावर आरोन व्यथित होऊन मिल्ट्रीत भरती होतो आणि पहिल्या महायुध्दात मारला जातो.

अब्रा नंतर कॅलेबवर प्रेम करते. आरोनला भेटल्यावर कॅथी आत्महत्या करते आणि तिच्याकडे असलेले १००,००० डॉलर्स हे अरोनच्या नावावर करते.

अ‍ॅडमला, अरोनच्या मृत्यूची बातमी समज्ल्यावर हार्ट अ‍ॅटॅक येतो आणि त्यातच तो जातो. पण तो मरण्याआधी कॅलेबला पश्चाताप होतो की माझ्यामुळेच आरोन मिल्ट्रीत गेला आणि मेला. मी त्याचा खून केला आणि मी वडिलांच्याही मृत्यूला कारणीभूत आहे. तो घरातून निघून जाऊन आत्महत्या करायच्या विचारात असतो. ली त्याची घालमेल ओळखतो आणि त्याला म्हणतो, की अब्राकडे जा. अब्रा त्याला समजावून घेते. आणि परत घरी आणते.

------------

वर मी लिहिले की केन आणि एबली कथा वाचली जाते व त्यातून नावे मिळतात. हा भाग साधारण अर्धे पुस्तक झाल्यावर आहे. २४ चाप्टर होउन जातात. तो पर्यंत मला पुस्तकाचे नाव "इस्ट ऑफ इडन" का दिले आहे हे चमकले नव्हते. सॅम, अ‍ॅडम अन ली हे जेंव्हा चर्चा करतात तेंव्हा चमकले.

चर्चा करताना कथेत असणार्‍या Thou Mayest आणि Timshel चा उल्लेख येतो. आणि त्यावर ली त्याचे भाष्य मांडतो.

This was the gold from our mining: 'Thou mayest.' The American Standard translation orders men to triumph over sin (and you can call sin ignorance). The King James translation makes a promise in 'Thou shalt,' meaning that men will surely triumph over sin. But the Hebrew word timshel—'Thou mayest'—that gives a choice. For if 'Thou mayest'—it is also true that 'Thou mayest not.' That makes a man great and that gives him stature with the gods, for in his weakness and his filth and his murder of his brother he has still the great choice. He can choose his course and fight it through and win."

आणि त्या अनुषंगानेच सॅमचे ली ला उद्देशून असणारे हे वाक्य "But the choice, Lee, the choice of winning! I had never understood it or accepted it before. Do you see now why I told Adam tonight? I exercised the choice. Maybe I was wrong, but by telling him I also forced him to live or get off the pot."

इथून पुढे मला जायला वेळ लागला. कारण मी विचार करत होतो की ह्याचा एकत्र संबंध काय? तर ह्या सर्वाचा संबंध बायबलशी आहे. जो पुस्तकात कधीही ठळकपणे दाखवलेला नाही. खरेतर फक्त दोनदाच (एकदा केन आणि एबल च्या कथेत आणि एकदा अ‍ॅडम आणि कॅलच्या संवादात तो आहे. पूर्वी कधीतरी मी बायबल वाचले होते पण त्यातील गाभा लक्षात राहिला तरी संवाद नव्हते लक्षात आणि त्यामुळे परत एकदा मी ती कथा ह्या पुस्तकामुळे वाचून काढली.

केन आणि एबल हे अ‍ॅड्म अन इव्हचे मुलं असतात. केन हा चमत्कारीक / सनकी / बेरकी. तर एबल हा चांगला. एके दिवशी दोघेही देवाला भेट देतात. त्या पैकी एबलची भेट देवाला आवडते आणि ती तो ठेवतो. त्याचा राग येऊन केन हा एबलचा खून करतो.

बायबल मधील वाक्य.
Cain said to his brother Abel, “Let’s go out to the field.”[d] While they were in the field, Cain attacked his brother Abel and killed him.

Then the Lord said to Cain, “Where is your brother Abel?”

“I don’t know,” he replied. “Am I my brother’s keeper?”

पण बोलून चालून तो देवच. त्याला माहिती असते. तो सांगतो. आणि केनला शिक्षा करतो आणि केन, त्याचा आईवडिलांना सोडून इस्ट ऑफ इडन ( इडन गावाच्या पूर्वेकडे) राहायला निघून जातो. इथे, ह्या कथेत इस्ट ऑफ इडनचा उल्लेख आहे. जो मुळ पुस्तकात नाही. पण त्या वागन्यामुळे जॉन ने त्यामुळे पुस्तकाचे नाव इस्ट ऑफ इडन ठेवले आहे. इतकेच नाही, तर कथेत ही वाक्य आहेत.

Adam asked, “Do you know where your brother is?”
“No, I don’t,” said Cal.
“He hasn’t been home for two nights. Where is he?”
"How do I know?” said Cal. “Am I supposed to look after him?”

तसेच कथेत दोन वेळा वडिलांना भेट देण्याचा प्रसंगही येतो. पहिल्यांदा चार्ल्स, सायरसला भेट देतो, जी त्याला आवडत नाही आणि ती आवडली नाही म्हणून चार्ल्स अ‍ॅडमला, त्याच्या भावाला मारतो. तर दुसरी भेट कॅलेब, अ‍ॅडमला देतो. १५००० डॉलर्सची. पण अ‍ॅडमने ती नाकारल्यावर कॅलेब, अरोनला आईकडे घेऊन जातो, आणि त्यामुळे अरोन व्यथित होऊन घर सोडून निघून जातो.

मला पुस्तकाचा शेवट खूप आवडला. ली आणि अब्रा, अ‍ॅडमकडे, कॅलेबला घेऊन जातात. मृत्यूशय्येवर अ‍ॅडमला कळतं ही कॅलेबनेच त्याला जायला भाग पाडले पण अ‍ॅडम शेवटचे वाक्य उच्चारतो ते म्हणजे " Tinsel"

जॉन स्टाईनबेक ( लेखक) हा ऑलिव्ह हॅमिल्टनचा मुलगा आहे. तो स्वतः नॅरेटर बनून बरेचदा पुस्तकात आहे. ऑलिव्ह ही सॅमची मुलगी. ऑलिव्ह आणि सॅम हे खरे होते, जॉनही खरा आहे. पण कथा काल्पनिक.

पुस्तकातील, पहिले तीन चार, २४वे प्रकरण आणि शेवटचे काही प्रकरणं म्हणजे पूर्ण पुस्तक. पण तरीही खूप पाने ह्या तीन पिढ्या उभ्याकरण्यात खर्ची पडले. विचार केला तर जॉनने मुख्य पात्रांची नावे ही नाव पण मुद्दामहून ए आणि सि वरून तशीच घेतली आहे. जी लक्षात यायला मला खूप वेळ लागला.

Cain & Abel
Caleb & Aron
Charles & Adam
Cyrus
Cathy आणि Abra

ही पूर्ण कथाही बायबलमधील मुख्य दोन पात्रांभोवती म्हणजे Cain & Abel भोवती फिरत राहते. आणि ती अरोनच्या म्हणजे एबलच्या मृत्यूनंतर ऑलमोस्ट संपते.

खरेतर पूर्ण कथा लिहायला नको होती. पण हा काही पिक्चर नव्हे शिवाय पुस्तक १९५२ मध्ये प्रकाशित झाले आणि १९५५ मध्ये त्यावर पिक्चरही आला होता. त्यामुळे मला आणि त्यावर केन अ‍ॅन्ड एबलच्या कथेवरच हे पुस्तक कसे उभे आहे हे दाखवायला थोडक्यात कथा लिहावी लागली.

जॉन नेहमीसारखाच फिलॉसॉफिकल आणि सोशल मोड मध्ये आहे. आपल्या आजूबाजुला असणारी खरी माणसे ( आई, आजोबा इत्यादी), बायबल आणि फिक्शन ह्यांचा जबरदस्त मेळ साधणारी कथा म्हणजे "इस्ट ऑफ इडन" केवळ नावच नाही तर त्याने बायबल मधील ओरिजनल सिन बद्दलही छुपे वक्तव्य केले आहे, उदाहरनार्थ - कथेत तीनवेळा धनलाभ आहे. सायरस १००,००० अ‍ॅड्म अन चार्ल्सला देतो, चार्ल्स अ‍ॅडम अन कॅथीला, अन कॅथी परत आरोनला. विचार केला तर हे सर्व पैसे देखील काळाबाजार, खोटेबोलने आणि वेश्याव्यसायातून आलेले आहेत. थोडक्यात बायबल मधील "ओरिजनल सिन" जे पास ऑन होते. केन आणि एबल च्या छोट्या संभाषनावरून आणि त्यांच्या कथेचा गाभा घेऊन जॉनने ही कथा अफलातून फुलवली आहे. प्रत्येक कॅरेक्टर इतकं सुरेख रंगवल आहे की ज्याचे नाव ते.

जनरली मला कोणाचे कोट्स द्यायला आवडत नाही. पण आमचे महामहोपाध्याय, रा रा, श्री श्री श्री जॉर्ज आर आर मार्टिनजी साहेब म्हणाले आहेत की "A reader lives a thousand lives before he dies, the man who never reads lives only one." — GRRM

त्यामुळे मुख्य कथा इथे दिली तरी, ती मुळातून वाचने महत्वाचे आहे. कारण तेच, अ रिडर लिव्हज.

तीच अनुभूती पुस्तकातून येते. आपल्यातला केन आणि एबल आपल्याही नकळत दिसत राहतो. शेवटी म्हणावेसे वाटते की, आपण सर्वच Timshel मध्येच जगतो. आणि केवळ Thou Mayest मुळेच मी पण इथे ह्या पुस्तकाबद्दल लिहिले.

इस्ट ऑफ इडन - जॉन स्टाईनबेक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम रसग्रहण !
'केन अँड एबल' या बायबलमधील कथेने जेफ्री आर्चर या लेखकालाही मोहीत केलं असावं. त्याच्या 'केन अँड एबल' [Kane And Abel ] या जबरदस्त कादंबरीचं प्रेरणास्थानही बायबलमधील ही कथाच आहे.

रसग्रहण मस्तच.. वाचु कि नको अस वाटलं सुरुवातीला कारण इंग्रजी पेक्षा मराठी साहित्यात जास्त रस आहे..
पण हे वाचुन बायबल आणि इस्ट ऑफ इडन दोन्ही वाचायची खुमखुमी आलीए Happy