AIB ची किड - पुन्हा एकदा - आवरा आता यांना

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2016 - 13:47

AIB ची किड फोफावणार होतीच. काही आश्चर्य नाही वाटले त्यात. पण खेद मात्र झाला.

हा माझा २०१५ चा धागा - AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी - http://www.maayboli.com/node/52596
आता तो धागा लॉक आहे, पण मी तेव्हाच याचा निषेध केला होता. तेव्हाच सावध केले होते. वॅलेंटाईन डे ला गरीब बिचार्‍या प्रेमिकांना फटकवणार्‍या संस्कृतीरक्षकांनाही तेव्हाच आवाहन केले होते. तेव्हा हे जे काही थेरं चालू होती ती एका खाजगी जागेत आणि आपापसात चालली होती असा युक्तीवाद होत होता. चला आतापुरता तो मान्यही करूया. पण आज मात्र तो युक्तीवादही केविलवाणा ठरावा असा प्रकार घडलाय. आता महाराष्ट्रभूषण सचिन आणि लतादिदींचा अपमान घडलाय. अपमान हा शब्दही कमी भासावा अश्या गलिच्छ आणि अर्वाच्य भाषेत त्यांच्यावर विनोद केले गेलेत. आता हे नक्कीच त्यांची परवानगी घेऊन केले गेले नसावेत. तर मग हे असे कोणालाही काहीही करण्याचा काय हक्क बनतो. हक्कही एका बाजूला राहीला, मुळात ज्या विनोदाच्या नावाखाली हे केले गेलेय तो हा अस्सा असतो. एखादा मानसिक आजारीच अश्यातून आनंद उचलो शकतो. कमाल वाटते या लोकांची की सेलेब्रेटी निवडताना देखील यांना हि आदर्श व्यक्तीमत्वेच मिळावीत. लतादिदिंना मी व्यक्तीशा ओळखत नाही, कधी स्टेजवर गाताना पाहिले असेल तेवढेच. पण सचिन मात्र सचिन आहे. त्याला गॉड ऑफ क्रिकेट खेळापेक्षाही जास्त त्याच्या वर्तनामुळे बोलतात. अश्या आयडॉलनाच नेमके या प्रकारासाठी निवडणे यातून चीप मेंटेलिटी आणि सवंग प्रसिद्धीचा हव्यास हेच दिसून येते.

असो, खाली बातमीची लिंक शेअर करतो,
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/film-indu...
विडिओ शेअर करायला मन धजावत नाहीये.

पण शोधून नक्की बघा.
कारण मागे धाग्याबरोबरच एक पोलही काढलेला - AIB पोल - http://www.maayboli.com/node/52621

त्याचा निकाल असा होता -
१) हो - असे चांगले कार्यक्रम व्हावेत. - २७ मत (१५ टक्के)
२) नाही - असे वाईट कार्यक्रम होऊ नयेत - ९२ मते (४९ टक्के)
३) तटस्थ - बघायचे ते बघतील - ६८ मते (३६ टक्के)

तर मला वाटते अपवाद वगळता उर्वरीत ५१ टक्के लोकांची मतेही आता नक्कीच बदलतील..

निषेध !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह्ह..सॉरी सॉरी.

प्राजक्ता,
सॉरी, कृपया अनुल्लेख करणे. Happy

चिनूक्स सॉरी नका बोलू हो एवढ्या छोट्या गोष्टीसाठी.. तो तन्मय भट्ट एवढे काही बोलून गेला तो बोल्ला का कोणाला काही सॉरी बिरी Happy

बाकी म्हणजे कणेकरांच्या लेखातील सोयीचे वाक्य आधी वर देण्यात आलेले.
प्राजक्ता नेमका पॅरा टाकल्याबद्दल धन्यवाद.
सावकाशीने वाचतो आणि ईतरही मुद्द्यांवर थोड्यावेळाने येतो ..

मवाली मुलाच्या उदाहरणाबद्दल गल्लत होतेय पुन्हा.
लोकांच्या भावना दुखावण्याचे तुर्तास बाजूलाच ठेवा.
ज्याच्यावर हा विडिओ बनला आहे त्यांच्या भावनांचा का विचार होत नाहीये ईथे?
सचिन आणि लतादीदी यांना गृहीत का धरले जात आहे की त्यांचेही विचार आपल्यासारखेच असतील आणि ते देखील मनस्ताप होऊ न देता याकडे दुर्लक्ष करू शकतील.
तो मवाली मुलगा ज्या मुलीसमोर अश्लील हावभाव करतोय तिने काय फकत एवढाच विचार करून गप्प राहायचे का की बसस्टॉपवर फार गर्दी नव्हती तर चार लोकांनीच माझी ही विटंबना पाहिली तर कश्याला उगाच त्या मवाल्याच्या नादाला लागा. उद्या जेव्हा भर बाजारात माझा पदर खेचायची तो हिंमत करेन तेव्हा बघूया त्याचे काय करायचे ते..

सोशल मिडियाचं प्रोलिफरेशन एव्हढं झालंय कि कोणतीहि वादग्रस्त बातमी (टेक्स्ट, क्लिप, ट्विट) तुमच्यापर्यंत पोचतेच, ती उघडु नका, बघु नका म्हणणे हा भाबडेपणा आहे.

>>>>

जुन्या एआयबी धाग्यात हा एक युक्तीवाद होता की त्या विडिओमध्ये आधीच वॉर्निंग दिलेली.
या विडिओत द्यायची राहिले वाटते Happy

सांगायचा मुद्दा हा की तेव्हाचे काही युक्तीवाद आता गंडले आहेत,
आताचे काही युक्तीवाद येत्या काळात गंडतील.
जेवढा उशीर करू तेवढे हे एवढा वेग पकडेल की मग थोपवायला जड जाईल

एखादा मवाली माणूस एखाद्या मुलीची छेड काढतो आहे आणि ही क्लिप ह्यात फरक आहेच आहे. जेव्हा कुणी चेहर्यासमोर उभा राहून उपद्रव करतो तेव्हा तो सहन करावा लागतो. पण ही क्लिप जबरदस्तीने सचिन वा लताबाईंना पहायला भाग पाडले गेले का? नाही. इंटरनेटच्या कुठल्यातरी कोपर्यात ती क्लिप होती. यथावकाश तिच्यावर जळमटे जमून ती विस्मृतीत गेली असती. ह्याच्याकडे दुर्लक्ष करणे हेच बरे.

लता आणि सचिन त्यांच्या अपमानाचं बघून घेतील. इतरांनी त्रास का करून घ्यावा?
>>>

ओके!
म्हणजे त्यांना त्रास होऊ शकतो हे मान्य केलेत आपण असे समजू

पण ही क्लिप जबरदस्तीने सचिन वा लताबाईंना पहायला भाग पाडले गेले का? नाही.

>>>>

आता फार मोठा घोळ होतोय!

एखाद्याबद्दल क्लिप बनवणे हा गुन्हा नाही.
ती जगाला दाखवणे हा गुन्हा नाही.
पण जेव्हा ती ज्यांच्यावर बनवली आहे त्यांनाच पकडून जबरदस्ती बघायला लावतील तेव्हा तो गुन्हा ठरेल.

असे म्हणायचे आहे का?

राहून राहून मवाल्याचे गैरलागू उदाहरण का दिले जात आहे ?

१ एक मुलगी रोजच्या रस्त्याने जात असताना काही मवाली तिची छेड काढतात. हे चुकीचेच आहे. इथे त्या मुलीला पोलिसात तक्रार करायचा जरूर हक्क आहे. पोलिसांनीही जरूर कारवाई करावी.

२ त्याच रस्त्यावर एक बोळ आहे आणी तिथे "इथे मवाली आहेत" अशी पाटी लिहून बाण दाखवला आहे. मुलिचा तो रस्ता नव्हे तरीपण कुतुहल म्हणून ती त्या बोळात जाते. पुढे एका दुकानावर "आत मवाली आहेत" अशी पाटी आहे, दुकानावर पडदा आहे. तरीही कुतुहलाने ती पडदा सारते. मग मवाली तिची छेड काढतात.

१ व २ मध्ये फरक आहे ना?

तन्मय भट पेक्षा कर्कश आवाजात डॉल्बी लावणार्‍या मंडळाविरुद्ध कारवाई करणे जरूरीचे आहे. कारण तिथे लोकांना "न ऐकणे" हा चॉइसच नसतो.

Bhat chya video kade durlaksha Kara mhannaryani pahilyane Hya aslya faltu MaBo Kardashian types lekhankade durlaksha karayala shikla pahije. Sudharit aani bursatlelya lokana controversial fadtus batmyacha Chara takun jhunji baghne, Ani pratisad milvane ha ekmev goal asato he ajun lakshyat ka yet nahi.

>>राहून राहून मवाल्याचे गैरलागू उदाहरण का दिले जात आहे ?<<
पहिल्या पानावरचं तुम्हि दिलेलं उदाहरण सुद्धा गैरलागु आहे. सचिन आणि लताबाईंच्या पर्स्पेक्टिव्ज ने तर सोडाच, इतरांनाहि ते लागु नाहि...

चिनुक्स! तु मला उद्देशुन काही लिहल असशिल तर मी वाचलच नाहीये त्यामुळे that's ok! तसही मी तो पॅरा कॉपी पेस्ट केल्याच सायोने क्लियर केलेय.

असा अर्थ कसा निघतो?
>>>
हो नाही निघत तसा अर्थ. मुळात कोणाला कश्याचा त्रास होईल हे आपण नाही सांगू शकत. पण जे घडलेय त्याचा ‘एखाद्याला’ त्रास होऊ शकतो किमान हे तर मान्य कराल.

१ व २ मध्ये फरक आहे ना?
>>>
आहे. फरक आहे.
पण जे घडलेय ते क्रमांक २ मध्ये येत नाहीये.

सचिन वा लतादीदींना असे म्हटले गेले का की तुम्ही अमुक तमुक लक्ष्मणरेषा ओलांडली की मग आम्ही तुमच्यावर अश्लील विडिओ बनवणार?

मुळात अश्लील विडिओ बनवणे हाच गुन्हा आहे हे तुम्हाला समजत नाहीये. तो विडिओ त्यांना जबरदस्ती दाखवणे याला तुम्ही गुन्हा ठरवायला जात आहात, आणि मग त्यावर युक्तीवाद करत आहात Happy

खाली येऊन बायकोची वाट बघत असताना सर्वात वरच्या मजल्यावरची चोविशीतली पटेलीण तुमच्याशी गप्पा मारायला येते , त्या रंगात आल्या असताना बायको येते...
तर मी येईपर्यंत माझ्या नव-याकडे लक्ष दिल्याबद्दल थँक्स असे ती म्हणेल का ?

>>एखाद्याबद्दल क्लिप बनवणे हा गुन्हा नाही.
ती जगाला दाखवणे हा गुन्हा नाही.
<<
जगाला दाखवणे म्हणजे काय? तमाम जग आपले उद्योग धंदे सोडून ती क्लिप पहाते आहे का?
आजकाल व्हिडियो क्लिप बनवणे इतके सोपे झाले आहे की अक्षरशः कुणीही तशी बनवू शकतो. अशा कोट्यावधी क्लिपा रोज बनत असतील. प्रत्येकाची एखाद्या सेन्सॉर बोर्डातर्फे तपासणी करून ती पास वा नापास करणे शक्य तरी आहे का? आणि तसे करण्याची गरज आहे का? माझ्या मते नाही.
ह्या गलिच्छ क्लिपला इतकी प्रसिद्धी नसती तर व्यक्तिशः मला तर ती बनली आहे हे कळलेच नसते. अजूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करणे शक्य आहे आणि तेच व्यवहार्य आहे.
फक्त लता मंगेशकर आणि सचिन तेंडूलकरविरुद्ध बोलायला प्रतिबंध करणारे कायदे करणे शक्य नाही. जे काही कायदे होतील ते वापरून मोदींवरच्या विनोदाला बंदी, राहुल गांधीवरील विनोदाला बंदी, त्याला पप्पू म्हटले तर बंदी, मोदींना फेकु म्हटले तर तुरुंगवास वा दंड. मग हळूहळू राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, मग महापौर, नगरसेवक, तमाम राजकीय पक्ष असे सगळे ह्या कायद्याच्या कक्षेत येऊ लागतील आणि जे काही आहे ते अभिव्यक्तीस्वातंत्र्यही नष्ट होताना पहावे लागेल. वृत्तपत्राचे संपादक, व्यंगचित्रकार, पत्रकार ह्यांना कायम ह्या भीतीखाली वावरावे लागेल. एका क्षुद्र मनोवृत्तीच्या व्यक्तीला थांबवण्याकरता इतकी मोठी किंमत द्यायची माझी तरी तयारी नाही.

ऋन्मेष, अश्लिलची व्याख्या वाचायला सर्वप्रथम ह्यातला पहिला पॅरा वाच आणि मग एआयबीचा व्हिडिओ बनवणं गुन्हा आहे का ते ठरव. http://www.aisiakshare.com/node/5213

बाकी अंक वाचू नकोस नाहीतर विकु त्यावरही जोक करतील Proud

‘एखाद्याला’ त्रास होऊ शकतो किमान हे तर मान्य कराल.>>>>>> इथेच तर प्राबलेम आहे! त्या कोणत्याही एखाद्याला ह्या बिनकामाच्या उठबशीची गरजच नाहीये मुळात. एखाद्या कृत्याला कायद्याच्या नियमांनुसार ठराविक वजन असतं.
हे ही मान्य की कायदा हा बदललत्या समाजरचने बरोबर बदलत राहतो किंवा बदलत राहावा पण ह्या विडियोच्या विशिष्ट मुद्द्यावर जे काही तपशिल मांडले जात आहेत ते काही बदलत्या समाजरचनेच्या खुणा वगैरे नाहीयेत.
दोन प्रसिद्ध व्यक्तींच्या चेहर्‍यांना एकत्र करुन त्यांच्या तोंडी काही अचरट संवाद घालण्यात काय नवीन आहे? त्यात अश्लिल काहीच नाहीये त्यामुळे आपण कशाला अश्लिल म्हणतो हे ही पडताळून पाहावे.

>> त्यात बेकायदेशीर असं काहीही नाही.<<

या विधानावरुन, तुम्हि कायदेतद्न्य आहात हे ग्रहित धरतो. हायपोथेटिकली, उद्या सचिन/लताबाईंनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला (कॅरॅक्टर ॲसॅसिनेशन) तर ते कायद्याला धरुन होइल का? कायद्याला धरुन नसेल तर मुंबई पोलिसांनी क्लिपवर बंदि का घातली?

मुंबई पोलिसांनी क्लिप काढून टाकायला लावणं हे चूकच आहे. मुळात त्यासाठी त्यांना कोर्टाचा आदेश लागतो आणि कोर्टानं तसा आदेश दिल्याची बातमी मी वाचली नाही. अर्थात कोर्टात न जाताही पोलिस अनेकदा क्लिप काढायला लावतात, त्यातलाच हा प्रकार आहे.

उद्या सचिन आणि लता यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला तर तन्मय भट आरामात सुटेल.

तन्मय भटचा व्हिडिओ अश्लील नाही.
>>>
ओके. शक्य आहे. माझे मराठी कच्चे आहे थोडेफार. अश्लील नाही तर मग असभ्य म्हणत असतील त्याला.

त्यात बेकायदेशीर असं काहीही नाही.
>>>>
कायद्याचा माझा अभ्यास नाही त्यामुळे हे कायद्याने गुन्हा ठरतो का बघावे लागेल.
तसेही कायदा गाढव असतो असा माझा मागे एक धागा होता.
जर हे खरेच बेकायदेशीर कृत्यात मोडत नसेल तर त्या धाग्यात हे उदाहरण अ‍ॅड करता येईल.

पण कायदा काहीही निकाल देण्याआधी हे करण्यामागचा हेतू नक्कीच बघेल. मला तो कुठल्याही एंगलने उदात्त वा निरुपद्रवी वाटत नाहीये.

बाकी आधीही मी एक प्रश्न विचारलेला की हे बेकायदेशीर नसेल तर या प्रकारचे विडिओ सेलिब्रेटींवरच बनवायची मुभा असते की आपण ओळखीच्या लोकांवरही बनवू शकतो?

ऋन्मेष, वर लिंक दिलीये ती वाच.
तू काढून बघू शकतोस असे व्हिडीओ तुझ्या ओळखीच्या लोकांवर. इथे व्हिडीओ काढण्यापूर्वी टिप्स मागायला आणखी काही धागे निघू शकतील.

शेन्डेनक्षत्र - सहमत.

एरवी लक्षही गेले नसते.... पण या बाफ मुळे मी व्हिडीओ शिधला आणि बघितला, काही विशेष असे नाही आहे. विनोदी असे काही आढळले नाही. विडीओ अजिबात आवडला नाही. अभिव्यक्ती स्वातन्त्र्य मोठे म्हणायचे आणि विसरायचे.

जुन्या एआयबी धाग्यात हा एक युक्तीवाद होता की त्या विडिओमध्ये आधीच वॉर्निंग दिलेली.
या विडिओत द्यायची राहिले वाटते
<<
हा एयाबीचा रोस्ट व्हिडीओ नाहीये हा सांगितलय वर बर्याच जणांनी , तन्मय च्या पर्सनल स्नॅपचॅटचा आहे.
नंतर त्यानी डाउनलोड करू फेसबुक वर टाकताना कॅपशन लिहिलीये "I make such non sense on snapchat , also I obviously love Lata and Sachin, just having some fun )
त्यामुळे इग्नोअर करा नाहीतर त्याला अजुन फेमस करा , up to you :).

Pages