AIB ची किड - पुन्हा एकदा - आवरा आता यांना

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2016 - 13:47

AIB ची किड फोफावणार होतीच. काही आश्चर्य नाही वाटले त्यात. पण खेद मात्र झाला.

हा माझा २०१५ चा धागा - AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी - http://www.maayboli.com/node/52596
आता तो धागा लॉक आहे, पण मी तेव्हाच याचा निषेध केला होता. तेव्हाच सावध केले होते. वॅलेंटाईन डे ला गरीब बिचार्‍या प्रेमिकांना फटकवणार्‍या संस्कृतीरक्षकांनाही तेव्हाच आवाहन केले होते. तेव्हा हे जे काही थेरं चालू होती ती एका खाजगी जागेत आणि आपापसात चालली होती असा युक्तीवाद होत होता. चला आतापुरता तो मान्यही करूया. पण आज मात्र तो युक्तीवादही केविलवाणा ठरावा असा प्रकार घडलाय. आता महाराष्ट्रभूषण सचिन आणि लतादिदींचा अपमान घडलाय. अपमान हा शब्दही कमी भासावा अश्या गलिच्छ आणि अर्वाच्य भाषेत त्यांच्यावर विनोद केले गेलेत. आता हे नक्कीच त्यांची परवानगी घेऊन केले गेले नसावेत. तर मग हे असे कोणालाही काहीही करण्याचा काय हक्क बनतो. हक्कही एका बाजूला राहीला, मुळात ज्या विनोदाच्या नावाखाली हे केले गेलेय तो हा अस्सा असतो. एखादा मानसिक आजारीच अश्यातून आनंद उचलो शकतो. कमाल वाटते या लोकांची की सेलेब्रेटी निवडताना देखील यांना हि आदर्श व्यक्तीमत्वेच मिळावीत. लतादिदिंना मी व्यक्तीशा ओळखत नाही, कधी स्टेजवर गाताना पाहिले असेल तेवढेच. पण सचिन मात्र सचिन आहे. त्याला गॉड ऑफ क्रिकेट खेळापेक्षाही जास्त त्याच्या वर्तनामुळे बोलतात. अश्या आयडॉलनाच नेमके या प्रकारासाठी निवडणे यातून चीप मेंटेलिटी आणि सवंग प्रसिद्धीचा हव्यास हेच दिसून येते.

असो, खाली बातमीची लिंक शेअर करतो,
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/film-indu...
विडिओ शेअर करायला मन धजावत नाहीये.

पण शोधून नक्की बघा.
कारण मागे धाग्याबरोबरच एक पोलही काढलेला - AIB पोल - http://www.maayboli.com/node/52621

त्याचा निकाल असा होता -
१) हो - असे चांगले कार्यक्रम व्हावेत. - २७ मत (१५ टक्के)
२) नाही - असे वाईट कार्यक्रम होऊ नयेत - ९२ मते (४९ टक्के)
३) तटस्थ - बघायचे ते बघतील - ६८ मते (३६ टक्के)

तर मला वाटते अपवाद वगळता उर्वरीत ५१ टक्के लोकांची मतेही आता नक्कीच बदलतील..

निषेध !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीपांजली,
खरंच. तो प्रवक्ता मला अत्यंत अपोलोजेटिक स्वरात म्हणाला की माझा मुलगा एआयबीचा फॅन आहे, त्यालाच मी क्लिपबद्दल विचारलं, मला काही हिंदुत्ववाद वगैरे समजत नाही, पण आमच्या पक्षाची ती लाईन आहे.

ते मोर इक्वल आहेत. ((तेंडूल/ मंगेश) कर) आणि/ किंवा ते पक्ष.
चिन्मय, असं असेल तर मग त्याला फुल्टू सपोर्ट. Proud काम करणारी कंपनी भुक्कड प्रोडक्ट बनवते तरी आठवड्याला पेचेक पडतोय तर मी गपपणे कित्येकदा काम करतो की!!!

हा एआयबीचा व्हिडिओ नाही. तन्मय भटचा आहे. >>> That explains a lot. एआयबीचे मी पाहिलेले बरेचसे ब्रिलियण्ट होते. विमान प्रवास, लग्न, पिक्चर पाहणारे फॅन्स वगैरे. हा अगदीच भंकस आहे.

चिनूक्स +१.

हा व्हिडिओ टुकार आहे आणी त्याकडे दुर्लक्ष करावे हा साधा उपाय आहे.

राजकिय पक्ष व टीव्ही चॅनेल वाले यांना चघळायला विषय.

वरचे काही प्रतिसाद वाचले तरी मी तो जोक का टाकला हे कळेल. असा काही व्हिडियो आहे हे सचिन पगारेंच्या गावीही नव्हते. पण हा धागा वाचून यू टयूब वर जाऊन सर्च वगैरे मारून तो पहाणे हे सारे या धाग्यामुळेच. लोकांनी दुर्लक्श केले असते तर ते स्नॅपचॅट इतर लाखो स्नॅअपचॅट प्रमाणे विसमरणातही गेले असते. आता पोलिसांना तपासाचे काम !

विकू काल तुमच्या जोकला हसलो पण इथे हसायचं राहिलं. Lol
नशीब, भारतात सर्विस देताय तर सेक्युरिटी की द्या नाही सांगितलं.

विनोदाचं वावडं आपल्याला नाहीच. लता मंगेशकर, सचिन यांच्यावर आधीसुद्धा कितीतरी कॉमेडी शोज मध्ये जोक्स केलेले आहेत. त्यांच्याविरुद्ध कधी कोणी बोलल्याचे आठवत नाही. असल्यास जरा संदर्भ द्या.

बऱ्याच स्टँड अप कॉमेडी शोज मध्ये आजकाल बऱ्याचदा अश्लीलच विनोद आढळतात. अश्लीलता आणि चिपनेस टाळून विनोद करता येत नाहीत का ?

The great Indian comedy circus मध्ये पण कित्येक सेलिब्रेटीज वर विनोद होते.

हिडीस विनोद करणे किंवा हीन पातळीवर विनोद करणे हे आक्षेपार्ह आहे. पण नेहमीप्रमाणे हा मुद्दा येतो कि अश्लीलता आणि हिडिसपणाची व्याख्या कोण आणि कशी ठरविणार ?

Orkut? I thought Orkut doesn't exist anymore Happy
Snapchat story can stay online only for 24 hrs after publishing , vanishes after that !
Well, of course one can record , take screen shots and user can download own stories during 24 hrs .
Tanmay has posted his Snapchat download on his Facebook that's why it's going viral .

पण "नेमकी एक बाजू" प्रत्येक वादात असायला ह्वी असे कशाला? >>> वादाला दोनच बाजू असतात असे कशाला गृहीत धरतोस Happy तू एखाद्या तिसर्‍या चौथ्या बाजूलाही असशील. मला तुझ्या पोस्टवरून तुझा नेमका स्टॅन्ड समजला नव्हता ईतकेच.

पण जो बनवतो त्याचेही स्वातंत्र्य आहे >>> या वाक्यावरून तो समजला. माझा ईथेच आक्षेप आहे. हे कसले नक्की स्वातंत्र्य? एखाद्यावर संबंध नसताना अश्या भाषेत टिका करायचे?

खाली चिनूक्स यांनी म्हटले आहे << केस करणं इत्यादी मूर्खपणा आहे कारण कोणत्याही दृष्टीनं ही अब्रूनुकसानी नाही.>>> हे सेलिब्रेटींनाच लागू होते का मी इथल्या एखाद्या सभासदाला घेऊन अगदी याच लेव्हलचा विडिओ बनवू शकतो?

जगभरात स्टॅण्ड-अप कॉमेडीच्या विश्वात काय सुरू आहे >>>> त्याने काय फरक पडतो? आता हे जगभर म्हणजे नक्की कोणत्या देशातील कोणते भाग आणि जगाची किती टक्के लोकसंख्या हे जाणून घेणे रोचक राहील. पण जे काही जगाच्या या भागांमध्ये चालते ते जसेच्या तसे आपण प्रत्येकाने का स्विकारायला हवे? आता पुन्हा तोच युक्तीवाद होईल की तुम्हाला नाही आवडत तर नका बघू. पण किती गंडलेला आहे हा युक्तीवाद. कारण ज्यावर हा विडिओ बनवला आहे त्यालाही यात गृहीत धरल्यासारखेच झाले.

हे म्हणजे बसस्टॉपवर एक बेवडा येतो. तिथे उभ्या असलेल्या महिलांसमोर काही अश्लील हावभाव करतो. आणि आपण त्यावर आक्षेप न घेता आपली मान वळवून बस कुठल्या नंबरची येतेय ते बघायचे. कमाल आहे.

हा एआयबीचा व्हिडिओ नाही. तन्मय भटचा आहे. >>> शीर्षक बदलतो आणि तन्मय भट्टचे नाव टाकतो. त्याच्या कर्तुत्वाचे श्रेय एआयबीला कशाला ना उगाच.

काही लोकांना इतकं वर, आदर्श ठिकाणी नेऊन ठेवणं की जेणेकरुन त्यांचं नाव काढलं की लगेच यादवी माजते वगैरे बालिशपणा केव्हा बंद होणार आहे काय माहित.
>>>>>>
असं काही नाही. सचिनच्या जागी मायबोलीचा एखादा सभासद असता तरी माझा आक्षेप असताच. कारण आक्षेप या मेंटेलिटीला आहे. अर्थात पण तुमच्यामाझ्यावर असले काही बनवून त्या तन्मय भटला काही प्रसिद्धी मिळणार नाही ना तो विडिओ हिट होणार म्हणून आपण सेफ आहोत.

अंध, अपंग, तृतीयपंथी, सनी लियोनी यांच्याबद्दल काहीही बोललेलं चालतं. पण लता, सचिन यांच्याबद्दल विनोद करायचे नाहीत, असं का?
>>>>
मुळीच नाही चालत. कश्याचा संदर्भाने हे म्हटलेय समजले नाही.
पण मग अंध अपंग यांनाच सहानुभुती द्यायची आणि सेलेब्रेटी या भक्कम असतात, त्यांचा पाणऊतारा केल्यास त्यांनी चालवून घ्यावे ही अपेक्षा ठेवणे चूक वाटत नाही का?
तुमचा "गे" सबंधाबद्दलचा धागा होता. तिथल्या विचारांचे मी कौतुकच केले होते. पण आता उदाहरण म्हणून घेतो. जर माझ्या ओळखीचा कोणी गे असेल आणि त्याच्या गे असण्यावर जोक्स बनवून मी सोशलसाईटवर पसरवले तर तुम्ही याला माझे स्वातंत्र्य बोलणार की अश्यांना जगू द्या सन्मानाने म्हणत त्याला सहानुभुती दर्शवणार.?

मागे एकदा एआयबी रोस्ट वरुन वान्दग माजले होतेच पण तेव्हा रोस्ट करुन घेणारे पण त्याला तयार होते त्यामुळे सगळा समन्तिचा आपखुशीचा मामला होता पण जे तन्मयने स्नॅपचॅट वापरुन केलय त्याला ना शेन्डा ना बुडुख,

वादाला दोनच बाजू असतात असे कशाला गृहीत धरतोस स्मित तू एखाद्या तिसर्‍या चौथ्या बाजूलाही असशील. >>> मी कोठे गृहीत धरले? उलट मीही असेच म्हणतोय की (इथे जरी तसे नसले तरी) विषयाच्या व्याप्तीप्रमाणे अनेक बाजू असतील.

माझा ईथेच आक्षेप आहे. हे कसले नक्की स्वातंत्र्य? एखाद्यावर संबंध नसताना अश्या भाषेत टिका करायचे? >> हो. कारण ते कंट्रोल करायला जाणे हा स्लिपरी स्लोप आहे. हे स्वातंत्र्य कोठपर्यंत अलाउड आहे आणि त्याच्या पुढे नाही हे कसे ठरवणार? साधा विनोद सुद्ध न खपणारे अतिसंवेदनशील लोकही अनेक असतात.

ॠन्मेष,
आवडत नाही तर बघु नका हा गंडलेला युक्तिवाद नाही, खरच उपाय आहे.
आवडत नसताना बघून / पब्लिसिटी देउन तुम्ही इनडायरेक्ट्ली जे आवडत नाहीत त्यांचा फायदा करून नक्कीच देताय, साधी गोष्ट लक्षात ठेवा : social media celebrities get paid based on number views/followers /hits .
झालच तर काँट्रोव्हर्सीमुळे बिग बॉस मधे स्थान मिळायची संधी , थोडक्यात भरभक्कम रक्कम मिळावून द्यायला तुम्हीच इनडायरेक्ट्ली मदत करताय.
़केवळ हा बीबी आल्यामुळे शोधून पाहिला मी तन्मयचा व्हिडीओ, त्यावर त्याची भूमिका काय पहाण्यासाठी स्नॅपचॅट वर फॉलो पण केलं मी तन्मय भट्ला :).
इतरही बर्याच लोकांनी या बीबी मुळे पाहिला असणार हा व्हिडीओ .
देशातल्या न्युज वाचून समज्तय कि अनेकांना स्नॅपचॅट म्हणजे काय हे पण माहित नाही, आता उत्सुकतेमुळे बर्याच लोकांनी स्नॅपचॅटही डाउनलोड केलं असणार !
सांगा , फायदा कोणाचा झाला Happy ?

नुकताच न्यायालयाने निर्णय दिला आहे कि प्रधानमंत्र्यांना मूर्ख वा मंदबुद्धी म्हणणे हा देशद्रोहाचा गुन्हा असू शकत नाही. यावरून काय ते समजून घ्या.

>>कारण ते कंट्रोल करायला जाणे हा स्लिपरी स्लोप आहे. हे स्वातंत्र्य कोठपर्यंत अलाउड आहे आणि त्याच्या पुढे >>नाही हे कसे ठरवणार?

अगदी बरोबर. सरकार लोकांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर अंकुश ठेवू पाहिल तर तो उपाय रोगापेक्षा भयंकर ठरेल. उदा. उद्या शिवसेना सत्तेवर आली आणि कुणी बा़ळासाहेब ठाकर्‍यांविरुद्ध ब्र जरी काढला तरी असला कायदा वापरून त्याला आत घालतील.

मी हा व्हिडियो पाहिलेला नाही, बघणार नाही. जे काही वर्णन ऐकले ते शिसारी आणणारे होते. लता मंगेशकर हे माझ्या लेखी एक श्रद्धास्थान आहे. एक वेळ लताबाईंचा आवाज तितकासा सुरेल नाही असे म्हणणे ऐकून घेईन. पण जवळपास ९० ला पोचलेल्या बाईच्या रुपाची टिंगल ही अत्यंत असंस्कृतपणाची आहे. मी जर ह्या इसमाचा बॉस असतो तर येन केन प्रकारेण काही तरी कायदेशीर खुसपट काढून त्याला नोकरीवरून अर्धचंद्र दिला असता. जर घरमालक असतो तर त्याला काही तरी कारण काढून जागा खाली करायची नोटिस दिली असती. रेस्टॉरंट मालक असतो तर त्याला सेवा नाकारली असती.

पण तरी खास असल्या नालायक लोकांकरता वेगळा कायदा बनवून त्यांना अडकवावे असे मला वाटत नाही.

शेंडेनक्षत्र +१.

>>हे म्हणजे बसस्टॉपवर एक बेवडा येतो. तिथे उभ्या असलेल्या महिलांसमोर काही अश्लील हावभाव करतो. आणि आपण त्यावर आक्षेप न घेता आपली मान वळवून बस कुठल्या नंबरची येतेय ते बघायचे. कमाल आहे.

ऋन्मेष, हे उदाहरणच मुळात गंडलेले आहे. एखाद्या बेवड्यने असे अश्लील हावभाव करून आपल्या फेसबूक वर टाकले आणी लोकांनी तो व्हिडोयो अगदी सर्च करून पाहिला व मग आमच्या भावना दुखावल्या हो ! असे म्हणून डोळ्याला पदर लावला हे जास्त योग्य उदाहरण आहे.

मी तो पाहिला नाही, पहाणरही नाही.

हे भावना दुखवणे जरा कमी करून घेतले तर बरे. मद्यंतरी कुणा रिकामटेकड्या माणसाने शिवाजी महाराजांचा फोटो मॉर्फ करून टाकला. ते पाहून "भावना दुखवल्या गेलेल्या" काही तरुणांनी मुसलमानांच्या झोपड्या जाळल्या. आपण असला मूर्खपणा करत असू तर पाकिस्तान ला आपल्यावर हल्ला करायचीही जरूरी नाही. अधून मधून असले फोटो टाकयचे, आपणच आपलादेश जाळून टकू.

ऋन्मेऽऽष | 1 June, 2016 - 02:41 च्या पोस्टला + हजारो.

मुर्खांचा असंस्कृतपणा बाजार आहे सगळा.

ऋन्मेष, मी तुझ्या मतांशी सहमत आहे.
>>>> मला व्हिडीओ आवडला नाही. काही शेरे आक्षेप घेण्यासारखे आहेत. पण जो बनवतो त्याचेही स्वातंत्र्य आहे - सचिन व लताला राग आला तर त्यांनी केस करावी. ती ग्राह्य वाटली तर न्यायालय काय ते करेल. <<<
फारेन्डा, तुझे हे वाक्य वाचल्यावर मला नुकताच आलेला एक फॉर्वर्डेड मेसेज आठवला. त्यानुसार, आशय असा की, जगात दुष्ट दुर्जन प्रवृत्तींकडुन होणारी हिंसा हा चिंतेचा विषय नसुन त्याबाबत सज्जनांनी मुक्याने शांत बसणे हे जास्त धोकादायक चिंताकारक आहे.
काये ना, की पुर्वी चौकाचौकात नुक्काड/अड्ड्यावर चार टवाळ मवाली पोरे बसलेली असायचीच, आजही असतात, मग येता जाता कुणालाही छेडछाड कर, घाणेरड्या बिभत्स अश्लिल कॉमेंट कर असे उद्योग चालायचे, आजही चालतात. फक्त फरक इतकाच पडलाय, की तथाकथित व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली या भिकार** धन्द्यांना हल्ली "व्यासपीठ व प्रतिष्ठा" मिळवुन देण्याचा ठेकाही समाजातीलच काही हुच्चभ्रू विचारवंतांनी घेतलाय.
आदर्श, योग्य, नैतिक अशा शब्दांचा तिटकारा असलेले हे लोक चांगल्या वाइटाबद्दलची कसलीही चिकित्सा खपवुन घेऊ शकत नाहीत अन लगेच आले "संस्कृती रक्षक" म्हणून बोम्बा मारु लागतात. अन तेव्हा मात्र त्यांना लगेच "कायद्याचे राज्य" आठवते....
शेवटी समाजात येनकेनप्रकारेण अराजक माजावे अशाच हेतुने कोणत्याही कसल्याही वृत्ती/प्रवृत्तींना उत्तेजन देणारे हे समाजघटक, प्रत्यक्षात मात्र त्यांचे वेगळ्याच अजेंड्याकरता काम करीत असतात, व अशाप्रकारे श्रद्धास्थानांवर हल्ले करणे, हल्ला करणार्‍यांना संरक्षण देणे, त्यांच्या पाठीशी व्यक्तिस्वातंत्र्याच्या नैतिकतची(?) झुल पांघरुन उभे रहाणे, वेळेस असलेल्या कायद्यांचा सोईस्कर आधार घेणे इत्यादी गोष्टी करणे हे त्यांच्या इतिकर्तव्यतेतच असते. असो.

वर कोणतरी म्हणलय की कायद्यामार्फत काही होणार नाही - खटले टिकणार नाहीत. काय आधाराने म्हणलय काय की, पण हा सरळ सरळ "अ‍ॅब्युस" की कायसे से आहेच, व कोर्टात टीकू शकेल.
फक्त कॉन्ग्रेस गवताप्रमाणे माजत चाललेल्या अशा दु:ष्प्रवृत्तींविरुद्ध कोर्टात जाणे वगैरे वेळखाऊ बाबी करायच्या व त्यांना कोर्टामार्फत कायद्याने ठेचून काढायचे वा नाही , व ते कुणी करायचे हा प्रश्न आहे.

http://www.saamana.com/mainpage/shirish-kanekar-vinodch-naslela-vinod
हा शिरीष कणेकरांचा लेख वाचा. कणेकरांच्या लताभक्तीबाबत कुणाला शंका असायचे कारण नाही. त्यांनीही अशा तथाकथित विनोदाबद्दल घृणा व्यक्त केली आहे. पण ह्यावर चर्चा करून, त्याविरुद्ध कोर्टात केस करुन आपण असल्या नालायक लोकांना संजीवनी देत आहोत. ह्या क्षुद्रपणाकडे दुर्लक्ष हाच एक उपाय असेच म्हटले आहे.

रस्त्यात उभे राहून टिंगल, कॉमेंट करणे आणि हे प्रकरण ह्यात मोठा फरक आहे. रस्त्याने येणे जाणे आपण टाळू शकत नाही. रोजचे व्यवहार करायला ते करावेच लागते. पण ह्या हीन लोकांनी तोडलेले तारे हे कुठल्याशा वेब साईटवर आहेत. अगदी यूट्युबवर असली तरी अन्य लाखो, करोडो व्हिडियोपैकी एक अशी ती क्लिप आहे. ती साईट जोरजबरदस्तीने आपल्या समोर आणली जात नाही. आपल्या रोजच्या कामात ब्राउजर उघडला की ती क्लिप बघावीच लागेल असा काही व्हायरस ह्या हलकट लोकांनी बनवलेला नाही. त्यामुळे ह्या क्लिपकडे पूर्ण दुर्लक्ष करणे सहज शक्य आहे.

शेंडेनक्षत्र - सहमत.

लिंबू - तुझी पोस्ट म्हणजे दिशाभुलीचे उत्तम उदाहरण आहे. मी लिहीले आहे काय आणि तू आरोप कसले करतोयस. असंबद्ध व चुकीची उपमा वापरून मूळ मत कसे चुकीचे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न - यालाच स्ट्रॉमॅन आर्ग्युमेण्ट म्हणतात.

पहिले म्हणजे सर्वात सिरीयस - "विचारस्वातंत्र्याच्या कायद्याचा सोयीस्कर आधार"- मी विचारस्वातंत्र्याच्याच बाजूने कायम मत दिलेले आहे. वाहते बाफ सोडले तर बाकी सगळ्या पोस्ट्स माबोवर सहज सापडण्यासारख्या आहेत. कोठे दिसले तुला उलटे मत?

दुसरे म्हणजे चौकातली मवाली पोरे. त्याचा इथे काय संबंध. हा तन्मय भट काही हातात फोन धरून तुमच्या समोर येताजाता आलेला नाही की माझी ही क्लिप बघा. इंटरनेट च्या कोणत्यातरी कोपर्‍यात ती फिल्म आहे. आवर्जून ती बघितली नाहीत तर तुम्हाला कसलाही उपद्रव नाही. त्यामुळे मवाल्यांचे उदाहरण पूर्ण चुकीचे आहे.

दुष्ट प्रवृत्तींकडून होणारी हिंसा व सज्जनांनी शांत बसणे - पुन्हा एकदा पूर्ण असंबद्ध.

हे लोक चांगल्या वाईटाची चिकित्सा खपवून घेउ शकत नाहीत? कोणी रोखले आहे. उलट मीच म्हणतोय की तो व्हिडीओ भंकस आहे. तुम्ही निघालात त्यांना "अद्दल" वगैरे घडवायला, तो ही सरकारी/कायदेशीर मार्गाने नाही. त्याला विरोध केलाय.

शेवटी समाजात येनकेनप्रकारेण अराजक माजावे अशाच हेतुने कोणत्याही कसल्याही वृत्ती/प्रवृत्तींना उत्तेजन देणारे हे समाजघटक, प्रत्यक्षात मात्र त्यांचे वेगळ्याच अजेंड्याकरता काम करीत असतात, व अशाप्रकारे श्रद्धास्थानांवर हल्ले करणे, हल्ला करणार्‍यांना संरक्षण देणे, त्यांच्या पाठीशी व्यक्तिस्वातंत्र्याच्या नैतिकतची(?) झुल पांघरुन उभे रहाणे, वेळेस असलेल्या कायद्यांचा सोईस्कर आधार घेणे इत्यादी गोष्टी करणे हे त्यांच्या इतिकर्तव्यतेतच असते. असो. >>> महान आहे हे. विचारस्वातंत्र्य हे अराजक, तर जनरल पब्लिक ने इतर लोकांना "अद्दल घडवणे" हे नैतिक व समाजहितकारक! नागरिकशात्रातील एक दोन धडे मी गाळलेले दिसतात.

ह्या क्षुद्रपणाकडे दुर्लक्ष हाच एक उपाय असेच म्हटले आहे.>> नाही पुर्ण वाचा!
पण काहीच अ‍ॅक्शन घेतली नाही तर तन्मय भट्टच्या वृत्तीचे आणखीही विनोदवीर (?) पुढे येतील व मन चाहेल ते बकतील. तन्मयला मोकळं सोडल्यावर या मंडळींना कुठल्या तोंडानं तुम्ही वेसण घालणार? हे असंच चालू राहणं देशाच्या संस्कृतीला घातक नाही का? वेळीच ही विषवल्ली चेचून टाकली की ती फोफावणार नाही. तन्मय भट्ट महत्त्वाचा नाही पण त्यानं दाखवलेली वृत्ती हाणून पाडलीच पाहिजे. आपापल्या क्षेत्रात शिखरावर पोहोचलेल्या व त्यासाठी उभं आयुष्य वाहून घेतलेल्या महामानवांच्या अंगावर विनोदाच्या आवरणाखाली कोणाही भडभुंजानं चिखलफेक केलेली खपवून घेता कामा नये. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो. तन्मय भट्ट सुटल्याचं दु:ख नाही पण ही वृत्ती सोकावते.

सोशल मिडियाचं प्रोलिफरेशन एव्हढं झालंय कि कोणतीहि वादग्रस्त बातमी (टेक्स्ट, क्लिप, ट्विट) तुमच्यापर्यंत पोचतेच, ती उघडु नका, बघु नका म्हणणे हा भाबडेपणा आहे. पण एक सुजाण नागरीक म्हणुन तुम्ही अशा बातम्यांना काडीचीहि किंमत न देता दुर्लक्श जरुर करु शकता...

....

Pages