सैराट

Submitted by मंदार खरे on 30 May, 2016 - 07:56

मलाबी वाटतय सैराट व्हावं
प्रेमात पडूम सुसाट पळावं
झिंग झिंग झिंग झिंग
झिंग झिंग झिंगाट करावं

चिठ्ठी द्यायच डेअरींग करावं
विहरीमंदी उंच उडी मारावं
तिने खुशाल नाही म्हणावं
पावशेर ढकलुन तर्राट व्हावं

तिला नजरबंदीत असं खिळवाव
डोळ्याच्या पातीला हळूच लवाव
तिने हवं तर नाही हसावं
डोळ्यातलं बारीक कसपट काढावं

तिच्या बापाल एकदा भेटावं
भावाशीही तीच्या सलगी करावं
थोडासा अंदाज घेवुन ठरवाव
धूम ठोकुनी बुंगाट पळावं

पिक्चरमंदी काय पण दाखवावं
अभ्यास सोडून लफडी करावं
सुरळीत झालं जरी सगळं
ट्रॅजडी दाखवून अचाट करावं

आंथरुण पांहून पाय पसरावं
गुमान शिकून मोठ्ठ व्हावं
असं सैराट कशाला व्हावं
त्या परिस विराट बनावं

© मंदार खरे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users