लाखात एखादा !

Submitted by सुप्रिया जाधव. on 28 May, 2016 - 02:54

भिकारी ऐन वैशाखात जातो गात एखादा
जणू ज्वालामुखी निद्रिस्त धुमसे आत एखादा

अचानक भेटलो आपण अचानक दूरही गेलो
कुठे ठरवून होतो का कधी अपघात एखादा ?

विखारी वास्तवावरती स्मृतींचा लेप चोपडतो
जुना कडुलिंब सळसळता उभा परसात एखादा

विचारांचा तुझ्या पगडा मनावरती असा माझ्या
बुडावा बेवड़ा व्यसनामधे दिनरात एखादा !

जुन्या चपला जुनी छत्री दयेपोटी तिला देते
जिने रस्ता बनवलेला उन्हातान्हात एखादा

कुणी बदल्यात प्रेमाच्या मिळवले प्रेमही आहे
असू शकतो असा श्रीमंत पण.....लाखात एखादा !

किनार्यावर उभी आहे प्रतिक्षा संपली नाही
मला उद्ध्वस्त करण्या धाड़ झंझावात एखादा

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अचानक भेटलो आपण अचानक दूरही गेलो
कुठे ठरवून होतो का कधी अपघात एखादा ?

जुन्या चपला जुनी छत्री दयेपोटी तिला देते
जिने रस्ता बनवलेला उन्हातान्हात एखादा

कुणी बदल्यात प्रेमाच्या मिळवले प्रेमही आहे
असू शकतो असा श्रीमंत पण.....लाखात एखादा !

हे तीन अधिक आवड्ले बाकीचेही छानच . काफिये उस्फूर्त आणि आपसूक असे आणलेत हे जास्त भावले

धन्यवाद

अचानक भेटलो आपण अचानक दूरही गेलो
कुठे ठरवून होतो का कधी अपघात एखादा ?

कुणी बदल्यात प्रेमाच्या मिळवले प्रेमही आहे
असू शकतो असा श्रीमंत पण.....लाखात एखादा !

व्वाह…

क्या बात है, सर्वच शेर आवडले. पण

किना-या वर उभी आहे प्रतिक्षा संपली नाही
मला उद्ध्वस्त करण्या धाड़ झंझावात एखादा

(या शेरसाठी पैकीचे पैकी गुण दिले आहेत.)

-दिलीप बिरुटे

>>>कुणी बदल्यात प्रेमाच्या मिळवले प्रेमही आहे
असू शकतो असा श्रीमंत पण.....लाखात एखादा !

किनार्यावर उभी आहे प्रतिक्षा संपली नाही
मला उद्ध्वस्त करण्या धाड़ झंझावात एखादा<<< व्वा