Submitted by सुप्रिया जाधव. on 28 May, 2016 - 02:54
भिकारी ऐन वैशाखात जातो गात एखादा
जणू ज्वालामुखी निद्रिस्त धुमसे आत एखादा
अचानक भेटलो आपण अचानक दूरही गेलो
कुठे ठरवून होतो का कधी अपघात एखादा ?
विखारी वास्तवावरती स्मृतींचा लेप चोपडतो
जुना कडुलिंब सळसळता उभा परसात एखादा
विचारांचा तुझ्या पगडा मनावरती असा माझ्या
बुडावा बेवड़ा व्यसनामधे दिनरात एखादा !
जुन्या चपला जुनी छत्री दयेपोटी तिला देते
जिने रस्ता बनवलेला उन्हातान्हात एखादा
कुणी बदल्यात प्रेमाच्या मिळवले प्रेमही आहे
असू शकतो असा श्रीमंत पण.....लाखात एखादा !
किनार्यावर उभी आहे प्रतिक्षा संपली नाही
मला उद्ध्वस्त करण्या धाड़ झंझावात एखादा
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवटचे चार फारच भारी जमलेत
शेवटचे चार फारच भारी जमलेत ....
धन्यवाद शशांक !
धन्यवाद शशांक !
अचानक भेटलो आपण अचानक दूरही
अचानक भेटलो आपण अचानक दूरही गेलो
कुठे ठरवून होतो का कधी अपघात एखादा ?
जुन्या चपला जुनी छत्री दयेपोटी तिला देते
जिने रस्ता बनवलेला उन्हातान्हात एखादा
कुणी बदल्यात प्रेमाच्या मिळवले प्रेमही आहे
असू शकतो असा श्रीमंत पण.....लाखात एखादा !
हे तीन अधिक आवड्ले बाकीचेही छानच . काफिये उस्फूर्त आणि आपसूक असे आणलेत हे जास्त भावले
धन्यवाद
धन्यवाद वैवकु
धन्यवाद वैवकु
अपघात आणि लाखात सर्वात जास्त
अपघात आणि लाखात सर्वात जास्त आवडले
अपघात ... स्वच्छ शेर आवडला
अपघात ... स्वच्छ शेर
आवडला
अचानक भेटलो आपण अचानक दूरही
अचानक भेटलो आपण अचानक दूरही गेलो
कुठे ठरवून होतो का कधी अपघात एखादा ?
कुणी बदल्यात प्रेमाच्या मिळवले प्रेमही आहे
असू शकतो असा श्रीमंत पण.....लाखात एखादा !
व्वाह…
क्या बात है, सर्वच शेर आवडले.
क्या बात है, सर्वच शेर आवडले. पण
किना-या वर उभी आहे प्रतिक्षा संपली नाही
मला उद्ध्वस्त करण्या धाड़ झंझावात एखादा
(या शेरसाठी पैकीचे पैकी गुण दिले आहेत.)
-दिलीप बिरुटे
खुपच छान
खुपच छान
अत्यंत सुंदर
अत्यंत सुंदर
ही मात्र खूप चांगली जमलेली
ही मात्र खूप चांगली जमलेली आहे.
विचारांचा तुझ्या पगडा मनावरती
विचारांचा तुझ्या पगडा मनावरती असा माझ्या
बुडावा बेवड़ा व्यसनामधे दिनरात एखादा !.................... उपमा मस्तय !
>>>कुणी बदल्यात प्रेमाच्या
>>>कुणी बदल्यात प्रेमाच्या मिळवले प्रेमही आहे
असू शकतो असा श्रीमंत पण.....लाखात एखादा !
किनार्यावर उभी आहे प्रतिक्षा संपली नाही
मला उद्ध्वस्त करण्या धाड़ झंझावात एखादा<<< व्वा