शोध(लेखक मुरलीधर खैरनार) : फॅन क्लब

Submitted by अमा on 18 May, 2016 - 05:46

शोध पुस्तक वाचले का? मला तर खूप छान वाटले. इतिहास आणि तंत्रज्ञानाची जोड चांगली घातली आहे. केतकी व शौनक जोडी, तसेच तो गोंदाजी आणि ते गावातले वातावरण, तो भायाचा सण सर्व अगदी मनोरंजक आहे. ह्या पुस्तकावर चर्चे साठी धागा.

ह्याची खरे तर फिल्म बनवली पाहिजे. खूप मस्त होईल. असे पाने उलटताना वाटत होते. पोस्टी लिहीताना फार रहस्य भेद होनार नाही ह्याची कृपया काळजी घ्यावी. ह्या पुस्तकावर आधारित काही मर्चं डाइज उपलब्ध असते तरी मी ते घेतले असते. उदा. पहिला तो श्लोक मोडीत लिहीलेले सुलेखन असलेला मग, भूदेवीची मूर्ती, मॅप चे चित्र असलेला टीशर्ट वगैरे.

तसेच पुस्तकावर आधारित काही टूर उपलब्ध असेल तर ती ही करता येइल. सातमाळा डोंगराची?!

मायबोली करांनी लेखकांना मदत केली आहे असे वाचले खूप छान वाटले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आहे या फॅनक्लबमध्ये.

खैरनार गेल्याची बातमी खरंच खूप धक्कादायक होती (जवळच्या व्यक्तींना आजाराची कल्पना होती पण आमच्यासारख्या वाचकंना त्याबद्दल काहीच माहित नव्हते) या लेखकाला अजून काही वर्षांचं आयुष्य मिळायला अह्वं होतं..

मी पण या क्लब मधे....फारच खिळवुन ठेवणारं पुस्तक...आणल्यापासुन जे वाचायला सुरु केलेलं...दिवस रात्र एक करुन अक्षरश्: दीड दिवसात झपाटल्यासारखं वाचुन काढलं...
सगळे धागे शेवटी मस्त जुळवले आहेत....
खैरनार गेल्याची बातमी वाचुन खुप वाईट वाटलं होतं..त्यांच्या मनात या पुस्तकाचा दुसरा भाग काढायचा होतं असं पण कुठेतरी वाचलं....भाग २ वाचायला मिळणार नाही आता Sad ....

मी ठाण्यातून पुस्तक जत्रेतून घेतलेलं पुस्तक आणि सुट्टीत वाचायचं म्हणून अगदी कव्हर न काढता जपून ठेवलं होतं. सुटटीची मजा द्विगुणित झाली पुस्तका मुळे. मराठीत डॅन ब्राउनच्या पुस्तका सारख काहीतरी पण काहीतरी फार सुपिरीअर वाचतो आहोत असा फील आला. मला नाशीक, वणी परिसराची फारशी माहिती नाही त्यामुळे ते ही फारच नवीन वाटले. एकदा जाउन यायला हवे.

लेखकाचं नाव पण लिहा वरती, नंदिनींनी दिलय म्हणुन कळाले..
जेंव्हा 'शोध' नावाने सर्च दिला तर ढिगभर पुस्तके आली..
Capture123_0.JPG

किंमत फार आहे. (अलीकडेच काही पुस्तकांची खरेदी केली होती त्यामुळेही ही किंमत फार वाटत असेल.) पण घ्यावेसे वाटू लागले.

पुस्तक खिळवून ठेवणारे आहे अगदी! प्रत्येक बारकाव्याचा अतिशय अभ्यास केला आहे हे वाचताना जाणवत.

खैरनार गेल्याची बातमी खरंच खूप धक्कादायक होती. या लेखकाला अजून काही वर्षांचं आयुष्य मिळायला हव होतं>+१

झी कथा आकार घेत असतानाचा प्रवास फेसबुकवर त्यांच्या मित्रांनी अनुभवलेला आहे. त्या वेळी कादंबरी निश्चित कशी असेल याची कल्पना नव्हती, पण उत्कंठा लागून राहिलेली होती. या कादंबरीच्या प्रवासात त्यांनी बरेचदा प्रश्न विचारले, त्याची आवडलेली उत्तरे, मदत करणा-यांची नावे पुढच्या पोस्टमधे गुंफत गेले. कथा पूर्ण करतानाची चिकाटी, एव्हढी भली मोठी कादंबरी पुन्हा पुन्हा वाचून पाहून पुन्हा बदल करणे हे सर्व किचकट काम करत असताना अपडेट्स देणे हा प्रवास सुद्धा सर्वांना सोबत घेत खेळीमेळीने झाला.

इतक्या उमद्या स्वभावाच्या या लेखकाचे अचानक जाणे चटका लावून जाणारे आहे. कादंबरीबद्दल अनेकांनी लिहीलेलेच आहे अन्यत्र..

पुस्तक वाचताना अथपासून इतिपर्यंत एकदम खिळवून ठेवते. प्रत्येक बाबतीमधले नमूद केलेले डिटेल्स भयंकर कौतुकास्पद आहेत. खैरनारांची मेहनत नि चिकाटी पानोपानी जाणवते. कथानकाचा फ्लो अशा प्रकारच्या लिखाणाला हवा तसा फ्लुइड आहे.

(माझ्यासाठी डीटेल्स थोडे कमी असते नि त्या ऐवजी कॅरॅक्टर्स अधिक खुलवली असती तर आवडले असते). पुढच्या भागाची तयारी दिसते होती, दुर्दैवाने तसे होणार नाही.

कादंबरी चांगली आहे. जरी एकूण रचना डॅन बाऊन वर आधारीत असली तर कथानक अस्सल मराठी मातीतले असावे यासाठी भरपूर श्रम घेतले आहेत असे जाणवते.

मला मुख्यतः दोन गोष्टी खटकल्या.

१)प्रयत्नपूर्वक मिळालेली सर्व माहिती कादंबरीत लिहिलीच पाहिजे असा थोडा अट्टाहास वाटला. मग ते मुंबई विमानतळ असो नाहीतर नाशिकाच्या गल्ल्यांचा विस्तृत इतिहास असो वा तांत्रिक माहिती. अशी पानेच्या पाने भरली गेली आहेत आणि त्यातून ना कथानक पुढे सरकते ना पूरक माहिती मिळते. पन्नास साठ तरी पाने कमी होऊ शकली असती असे वाटते.

२) कथानकात हळू हळू निर्माण होणारी गुंतागुंत बघता एकंदर रह्स्य व शेवटही तेवढ्याच गुंतागुंतीचा असायला हवा होता असे वाटते.

पुढचे भाग वाचता येणार नाहीत याचे वाईट वाटते.

जीएस, पहिल्या मुद्द्यासाठी +१ , विशेषतः मुंबई विमानतळासाठी!
शेवटाबद्दल मलाही काही शंका होत्या, पण लेखकाचा दुसरा भाग लिहायचा विचार असेल तर मग त्या दुसर्या भागांत कदाचित स्पष्टीकरण मिळालं असतं. आता ती संधी नाही.

मला वाट्ते स्टीग लार्सन च्या पुस्तकाचा चौथा भाग तो वारल्यावर आला. तसे कोणी टीम ने किंवा लेखकाने केले तर शक्य आहे दुसरा भाग. अ ट्रिब्युट म्हणून.

शुक्रवारी स्टाइनबेकचे इस्ट ऑफ इडन संपल्यावर, असाम्याने दिलेले शोध हातात घेतले. आणि काही तासांमध्ये संपविले देखील. सलग वाचायला मजा आली. खूप दिवसांनी असे सलग एकटाकी पुस्तक न ठेवता वाचून काढले.

पुस्तकावर डॅन ब्राउनचा खूप प्रभाव दिसतो लिहायला खूप मेहनत घेतल्याचे जाणवते. मराठीमध्ये अशी पुस्तके नाहीतच.

फक्त काही ढोबळ चुका आहेत त्या टाळता आल्या असत्या. सॅन जोसे वगैरे वगैरे. काही पाने निश्चित कमी करता आली असती. उदा मुंबई विमानतळाचे वर्णन. मला नाशिक मधील वर्णन आवडले कारण तिथे कथा घडतेय तर ती यायला पाहिजे. तसेच ३/४ पुस्तकानंतर इंटेसिटी कमी होत जाते. आणि आता ओके, लेखक संपविन्याच्या दृष्टिने लिहितोय असे वाटायला लागते. ते टाळता आले असते.

पिक्चर काढला जावा असे मलाही वाटत आहे. Happy

मागे अशीच एका मराठी हेराची कथा वाचली होती. ( सत्यधटनांवर आधारित पण फिक्शन) ते नाव आत्ता आठवत नाही. पण असे प्रयोग होत आहेत हे स्तुत्य आहे. एखादे पुस्तक केवळ ६० जणांनी पन्हाळा घेतला, त्यावरही यायला हवे असेही वाटते.

नुकतच हे पुसक वाचून संपवल. वेगवान कथानक आणि जबरी डिटेलिंग आहे. मला आवडलं. बर्‍याच दिवसांनी सलग
वर म्हटलंय तसं डॅन ब्राऊनच्या पुस्तकांची आठवण झाली आणि असा प्रयत्न मराठी पुस्तकात झालेला पाहून छान वाटलं.

जीएसने म्हटलयाप्रमाणे बर्‍याच ठिकाणांची सविस्तर वर्णनं आहेत आणि मला तरी आवडली आणि वगळली असती तरी चाललं असतं असं अजिबात वाटलं नाही. जुन्या नाशकाचं वर्णन सुरेख आहे.

प्रस्तावनेत बर्‍याच मायबोलीकरांची नावं दिसली !!

खूप दिवसांनी असे सलग एकटाकी पुस्तक न ठेवता वाचून काढले. >>>> टाकाने पुस्तक वाचायचं कसं? एकटाकी लिहितात ना ? Happy

नुकतेच वाचले.

जबरदस्त डिटेलींग केलय आणि उत्सुकता शेवटपर्यंत टिकवून ठेवलीये. त्यामुळे आवडलेच. कशाचा शोध चालू आहे आणि कोण सत् आणि कोण खल हे समजल्यावर खरे तर रहस्य फारसे उरत नाही. पण तरीही उत्सुकता जराही कमी होत नाही.

मुंबईतली वर्णने मस्त एंजॉय केली. पुस्तकातल्या डोंगराळ भागात कधीच न जाताही तो भाग अगदी डोळ्यापुढे उभा केला पुस्तकाने त्याबद्दल लेखकाचे कौतुक केलेच पाहिजे. नाशकात कधीच गेलो नाहीये त्यामुळे तेथील डिटेलींग मात्र कंटाळवाणे झाले. आणि आधीच्या डिटेलींगवरून त्याचा कथानकात काहीच उपयोग नसणार हे कळल्यामुळे ते सोडून दिले.

शेवट खूपच तोकडा वाटला. म्हणजे जेवढ्या बारीकसारीक गोष्टी आधी आहेत त्या मानाने शेवट अगदीच उरकल्यासारखा वाटला. (आधी डिटेलींग नसते तर तसे वाटले नसते कदाचीत). शेवट नीटसा पटला पण नाही. तो पटण्याकरता आभोणकरांचे पात्र खुलवायला हवे होते. ते पात्र सरळसरळ आणि बिनडोकपणे खलनायकाला मदतच करत राहते. आणि त्यामुळे शेवट पटत नाही.

काही सहज जाणवलेल्या ढोबळ चुका:

१. महत्वाचे दुवे ज्या कापडावर असतात त्याचा उल्लेख आधी रेशमी असा केलाय आणि शेवटी मलमल.
२. केतकीला जे हवे असते ते देवघरात असताना पितळ्याच्या डबीत असते आणि शेवटी सापडते तेंव्हा सोन्याच्या डबीत.

खरंच नागराज मंजुळेनी हा सिनेमा बनवला तर काय मजा येइल नै. उसके पास वो क्रिएटिविटी और इमॅजिनेशन है सचमे. आता जॉनर बदलायची पण वेळ झाली आहे त्यांच्यासाठी.

नुकतंच शोध वाचून संपवलं . जबरी डिटेलिंग केलेय . आवडलं .वर म्हणलं आहे तस डॅन ब्राऊनच पुस्तकं वाचण्याचा फील आला .
शेवट थोडा सरधोपट झाला आहे खरा पण दुसऱ्या भागात अधिक स्पष्टीकरणं मिळालं असतं . लेखकाची मेहनत पानोपानी जाणवते . नाशिकच्या इंटिरियर मधले उल्लेखही रोचक आहेत .

मी पण जबरदस्त फॅन झाले पुस्तक वाचुन. खान्देश आणि बागलाण परगण्याचे सन्दर्भ आल्याने फारच जवळची वाटते कथा. खरोखर पुस्तकात दिलेल्या जागा, किल्ले गडकोट, फिरायला आवडेल. Happy

शोध कादंबरीवर इथे लेखन झालेले आहे हे वाचून आनंद झाला...
सुरतेच्या हस्तगत मालाची वाहतूक आणि नंतर गायब झालेल्या मौल्यवान संपत्तीचा शोध यातून इतिहासाच्या न बोलल्या गेलेल्या घटनांवर प्रकाश टाकणारा एक धागा सध्या सादर असताना कै मुरलीधर खैरनारांंची आठवण चटका लावून जाते.

जयंत जोपाले यांच्यासोबत नाशिक भागात ते फिरले. कादंबरीत आलेल्या किल्ल्यांच्या परीसरात ते अनेक महीने फिरले. त्या घळई, भेगा इत्यादींचे फोटो घेतले. अंतर आणि लागणारा वेळ याच्या नोंदी घेतल्या.
ते असतानाच त्यांच्या कादंबरीवरचा अभिप्राय त्यांना कळवण्यासाठी लिहायला घेतला होता. थोडासा कंटाळा केला आणि त्यांच्या जाण्याचीच बातमी आली. मग वर्षभर तो तसाच पडून होता. नंतर त्यांच्या पश्चात छोटेसे समीक्षण म्हणून फेसबुकवर पोस्ट केले. पण त्यात मजा नव्हती.

जी मेहनत घेतली ती पानापानातून झळकतेच आहे. मात्र काहीही झाले तरी डॅन ब्राऊन पासून घेतलेली स्फूर्ती याऐवजी त्याच्या कादंबरीचे देशीकरण असे वाटत राहीले. शैली डॅन ब्राऊनची, फक्त भाषा मराठी आणि संदर्भ महाराष्ट्रातले हा फील येत राहिला. अस्सल वाटले नाही. मात्र शिवाजी महाराजांच्या सूरत लुटीची वर्णने थक्क करणारी आणि प्रचंड अभ्यास असणारी आहेत.

हुशार, हरहुन्नरी आणि मनमोकळ्या स्वभावाचा लेखक.. काही दिवस त्यांचा थोडा सहवास लाभला
त्यावेळेस शोध प्रकाशनाच्या टप्यात होती, झपाटून काम केले होते शोध वर, सुंदर बोलायचे
मुळात कलाकाराला शोभणारी बेफिकीर वृत्ती होती आणि सिगारेट जास्त जवळची.
त्यामुळे अकाली जाण्यात हातभार.. Sad पण कमाल माणूस होता