आपण वाढदिवस का साजरा करतो?

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 May, 2016 - 02:16

आपण वाढदिवस का साजरा करतो?

सिरीअसली का साजरा करतो आपण
आपल्याच जन्मदिवसाचा सोहळा?

करतो तर करतो .. ईतरांनीही त्यात सामील व्हावे, आपले अभिनंदन कौतुक करावे अशी अपेक्षा का करतो?

लग्नाचा वाढदिवस साजरा करणे समजू शकतो.
आणखी एक वर्ष लग्न टिकवले, आणखी एका वर्षाचा संसार झाला..
पण असा काय तीर मारला आपण, एखाद्या अमुक तमुक दिवशी जन्म घेऊन?
आणि त्या दिवसाला आज अमुकतमुक वर्षे होऊन..

बस्स जगलो एवढेच !

ते तर किडे मुंग्याही जगतातच की..

फरक ईतकाच,
ते किड्यामुंग्यांसारखे जगतात आणि आपण माणसांसारखे जगतो.

बास्स !

पण मुळात कधी कुठे केव्हा कसे जन्मावे हे आपल्या हातात असते का...
करायचेच झाल्यास आपल्याला जन्म देणाऱ्या आईवडीलांचे अभिनंदन करणे जास्त योग्य नाही का..
शेवटी त्यांचेच तर प्रॉडक्ट एक वर्ष आणखी टिकले असते.

आता साजरा करणे आले म्हणजे पार्टी आली. केक आला. दारू आली.
जमलेच तर नाच आणि धिंगाणा आला.
या सर्वाचे फेसबूकवर फोटो टाकून त्यावर आणखी शेकडो लोकांचे कौतुकाचे आणि अभिनंदनाचे पोस्ट मिळवणे आले...

झालेय माझेही हे सारे करून..

मग एके वर्षी मी फेसबूकची सेटींग चेंज केली.
माझा वाढदिवस मी सोडून कोणालाच दिसणार नाही याची खात्री केली.

आणि मग त्या दिवशी मला समजले..

मी सोडून माझ्या बर्थ डे बद्दल कोणालाच पडली नव्हती ..

अगदी कोणालाच पडली नव्हती..

नॉट ए सिंगल विश .. ब्लडी नॉट ए सिंगल विश ..

दुसऱ्या दिवशी मी फेसबूक अकाऊंट डिएक्टीवेट केले ..

हे सगळे मला आजच का आठवले..

कारण पुढच्याच आठवड्यात माझ्या गर्लफ्रेंडचा बर्थडे आहे..

आणि तिची अशी अपेक्षा आहे की मी त्या दिवशी सुट्टी टाकावी.. जे मला वर्कलोडमुळे जमणे अवघड आहे !

काय सांगू आता बॉसला..
ऑफिसच्या मिटींग पेक्षा माझी आजची डेटींग महत्वाची आहे.
जिच्याबरोबर सेटींग झालीय ती महत्वाची आहे.

एवढी हिंमत कदाचित होणार नाही सांगायची ..
पण ऑफिसला दांडी जरूर मारणार ..

उडत गेले ऑफिस आणि तेल लावत गेला बॉस,
तिच्यासाठी मी एवढे जरूर करणार ..

का माहितेय ..

कारण बदललेल्या फेसबूक सेटींगला चकवून, ठिक आदल्या रात्री बारा वाजता, माझा जन्म दिवस उजाडल्या उजाडल्याच.. त्याचे सार्थक करायला..

एक तिचाच तर फोन आला होता Happy

- ऋ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कु ऋ, तुला हा प्रश्न पडावा !!!

ग फ्रे चा वा दि म्हणजे काय असतं हे तुला समझवायला लागल असं खरंच वाटलं नव्हतं.

गिफ्ट के बदले रिटन (return) गिफ्ट (गोड) मिलताय ब्वा.

एन्जॉय ........

सैराट पाहिलं ना

असोच

मस्त लेख!
<मग एके वर्षी मी फेसबूकची सेटींग चेंज केली. माझा वाढदिवस मी सोडून कोणालाच दिसणार नाही याची खात्री केली. आणि मग त्या दिवशी मला समजले.. मी सोडून माझ्या बर्थ डे बद्दल कोणालाच पडली नव्हती ..> हे मात्र खरे आहे!

मनुष्य योनीत जन्माला आल्यानंतर अगदी काहीही करता येत फक्त तय्यारी हवी. अगदी मोक्षप्राप्तीसुद्धा ह्या योनीत करता येते. हे मात्र इतर योनीत जन्माला आलेल्यांना करता येत नाही. म्हणून मनुष्य वाढदिवस साजरा करतो आणि करायला पाहिजे. काहीजण देवळात जाऊन देवाचे आभार मानतात. काही जण आईबांबाचे आशिर्वाद घेतात. काहीजण मित्रांना सामिल करतात तर काही जण प्रेयसीसोबत वादि साजरा करतात Happy

ऋन्मेष
ते जे काही आलेलं आहे ते तुला वेगळं कुणीतरी समजतंय. फक्त एन्जॉय कर.

{प्रतिसाद सौजन्य - तेच ते आलेलं}

अग्निसाक्षीमधे नाना पाटेकरचा डायलॉग आहे वाढदिवस साजरा करण्याबद्दल. तो असाच आहे.

हा सिनेमा नेहमी कुठल्या न कुठल्या वाहिनीवर असतो. नेटवर देखील आहे. शिवाय सीडी, युएसबी द्वारे त्याचा प्रसार होतच असतो.

ओह कापोचे ओके.. आठवले.. पार्टी ओवर.. ढिशक्यांव.. स्पीकर फोडतो.. जमाना झाला ते बघून. पण ते या लिखाणाचा गाभा किंबहुना सार नाहीयेच मुळी.. हे वरील सत्यघटनेतूनच सुचलेय आणि लिहिलेय. फेसबूकचे सेटींग बंद केल्यावर तुमच्या वाढदिवसाचे कोणाला काय किती पडलेय हे एकदा जरा चेक करून बघा. आपणच उगाच आज माझा बड्डे आज माझा बड्डे करत नवीन कपडे घालून मिरवत असतो जसे काही बोर्डात पहिले आलो. पण मग एक गर्लफ्रेंड असते जिच्यासाठी खरेच तो ओकेजन स्पेशल असतो. त्यामुळे आपल्या आईवडील भावंडानंतर त्या पोरीची काळजी करा, तिला खुश ठेवा असे मला यातून सुचित करायचे होते. नानाचे ते सणकी डायलॉग होते. माझी ही प्रेमगाथा आहे Happy

आपण वाढदिवस का साजरा करतो?

आयुष्यातला एक वर्ष सरला म्हणुन.मृत्युच्या आनखी थोडे जवळ पोंहचलो म्हणुन.

वाढदिवस का साजरा करायचा?
- छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवण्यासाठी.

इतरांच जाऊदे मला खूप छान वाटतं माझ्या वाढदिवशी.

लेख आवडला.
फक्त थोडंसं करेक्शन किंवा मतांतर : 'आयुष्याच्या या स्टेजला'(!) स्वतःच स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यात काही गंमत वाटत नाही. खरं तर हे खूप आधीच थांबलंय. तरीही आपल्या वाढदिवसाला कोणी आठवण ठेवून विश करत असेल तर बरं वाटतंच. मित्रमैत्रिणी, नातलगांना त्यांच्या वाढदिवशी फोन करून, मेसेज पाठवून विश करायलाही आवडतं. हल्ली मुद्दाम त्यासाठी भेटणं होत नाही.

यंदाच्या माझ्या वाढदिवसाला मी माझ्या फेसबुक पेजचं सेटिंग बदललेलं. फक्त ते करायला अंमळ उशीर झाला. म्हणजे सकाळचे सात वाजलेले. त्यामुळे शुभेच्छांचं ट्रॅफिक बर्‍यापैकी रोडावलं आणि मग नक्की किती जण आठवण ठेवून शुभेच्छा देतात ते कळलं. ज्यांनी दिल्या नाहीत, त्यांच्याबद्दल रागबिग नाही आला. त्यांना त्यांच्या त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देईनच (फेसबुकने रिमाइंड केलं तर Wink )
पण नंतर काही मी माझं फेसबुक अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट केलं नाही, कारण ते काही फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याघेण्यापुरतं नाही.

लहान मुलांना मात्र गम्मत वाटते आपण एका दिवशी काहीविशेष असतो याचे. बाकी वाढदिवस ज्याचा असतो तोच विसरतो आणि इतर त्याला सर्प्राइज देतात हा एक कहर प्रकार दाखवतात सिनेमा/सिरिअलीत.

मला वाटतं माझ्या वयोगटातल्या लोकांसाठी 'वाढदिवस साजरा करणं' याचं बाळकडूच पाजलं गेलं नव्हतं. त्यामुळें, वादि कधींच साजरा केला नसला तरीही इतरानी साजरा केलेला माझा एक वाढदिवस मात्र अविस्मरणीय आहे -

कांहीं कामानिमित्त ५-६ सहकार्‍यांची आमची टीम पावसाच्या अखेरीस २-३ महिने चंद्रपूरच्या जंगलांत मुक्काम करून होती. सगळं आवरून दुसर्‍या दिवशीं नागपुरहून मुंबई गांठायचं ठरलं. इतक्यांत, 'रात्रीं ताडोबाला मुक्काम करून सकाळीं नागपुरला जावूं' अशी आमच्या नागपुरच्या स्थानिक अधिकार्‍यानी टूम काढली व तशी व्यवस्थाही केल्याचं सांगितलं.

ताडोबाला त्या दिवशीं फक्त आमचाच ८-१० जणांचा ग्रूप होता. तिथल्या तळ्याच्या कांठीं खास आमच्यासाठीं छान टेबल मांडून दिलं होतं. किर्र जंगल, तळ्याच्या पाण्यात डोकावणारं चांदणं व मनासारख्या सहकार्‍यांचं टोळकं ! रात्रीं जेवणाची वाट बघत मस्त गप्पा रंगवत होतों. मधेंच उठून आमच्या नागपुरच्या ज्येष्ठ सहकार्‍यानी खिशातून छोटी बाटली काढली व माझ्याकडे देत म्हणाले, " भाऊ सुरवात तुझ्यापासून. फक्त एकेक 'सीप' " .माझा अर्थात तत्पर प्रसिसाद. बाटली राऊंड पुरं करून परत माझ्याकडे आली तर सर्वजण उभे राहून त्यांचं "हॅपी बर्थडे " सुरूं ! माझाच वाढदिवस आहे हें माझ्या लक्षांत येण्याआधींच मला स्पष्टीकरण देण्यात आलं; मुंबई ऑफिसच्या माझ्या दोन खास दोस्तांचा त्याना फोन होता, ' अरे तो भावड्या शेवटीं योग्य जागीं पोचलाय. तिथंच रहा म्हणावं . आमच्या आजच्या दिवसाच्या शुभेच्छा उबवत !'

इतक्या अनौपचारिक, उत्स्फुर्तपणे, मनापासून व अशा वातावरणात साजरा झालेला वाढदिवस कुणाला नको असेल !!!

छान लिहिलं आहे.

पण हा शेवट >>>> >>>

तिच्यासाठी मी एवढे जरूर करणार ..

का माहितेय ..

कारण बदललेल्या फेसबूक सेटींगला चकवून, ठिक आदल्या रात्री बारा वाजता, माझा जन्म दिवस उजाडल्या उजाडल्याच.. त्याचे सार्थक करायला.. एक तिचाच तर फोन आला होता >>>>

एकदम बेस्ट ! क्युट ! स्वीट : Happy

धन्यवाद मनीमाऊ.
भाऊ मस्त अनुभव..
माझ्या कडेही आहे असा एक अविस्मरणीय अनुभव. लिहितो नंतर.

छान

ॠन्मेष, प्रश्न विचारलात की आपण वाढदिवस का साजरा करतो? आणि उत्तर् ही तुम्हीच दिलंत की शेवटी कारण बदललेल्या फेसबूक सेटींगला चकवून, ठिक आदल्या रात्री बारा वाजता, माझा जन्म दिवस उजाडल्या उजाडल्याच.. त्याचे सार्थक करायला..एक तिचाच तर फोन आला होता स्मित या वाक्यातून.

तर वाढदिवस हा माझ्यामते 'आपल्या माणसांसाठीच' साजरा करायचा. आपली म्हणजे, ज्यांना आपला वाढदिवस लक्षात ठेवायला फेसबूक व मोबाईलच्या रिमाइंडरची गरज लागत नाही, अशी आपली. एकदा लहानपण ओसरलं, की स्वतःच्या वाढदिवसाचं अप्रुप वाटणं ज्या पटीत कमी होतं त्या पटीत 'आपल्या माणसाचा' वाढदिवस साजरा करण्यास आतुर बनत जातं. त्यामुळे अशा आपल्यांसाठी तरी वाढदिवस साजरा करावा/करुन घ्यावा, असे माझे मत. कुणी कशा पद्धतीने करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न.

माझ्या सासर्‍यांना स्वतःचा वाढदिवस साजरा करणे, अगदी कुणी शुभेच्छा दिल्या तरी आवडत नसे. ते खूप वैतागत. यामागचे कारण माहित नाही.त्यामुळे त्यांचा वाढदिवस लक्षात असूनही कुणी त्या दिवशी काहीही वेगळे करत नसत, अपवाद एकच वर्षाचा, त्यांचा शेवटचा वाढदिवस. तो मात्र सर्वांनी मिळून साजरा केला होता. तो त्यांचा शेवटचा वाढदिवस असणार आहे हे त्यांच्या आजारामुळे त्यांच्यासहित सर्वांना माहित होते म्हणून कदाचित त्यांनीही परवानगी दिली होती त्या सेलिब्रेशनला. तेव्हा मलाच असे वाटले की जे काही कारण असेल यामागे ते असो, पण आजचा दिवस पाहून सासर्‍यांनाही नक्की वाटलं असणार की हा आनंद आपण आपल्या माणसांना उपभोगू दिला नाही आजपर्यंत.

@ ऋन्मेष - या धाग्यावर मा झ्या प्रतिसादातील वरचा परिच्छेद अगदी अवांतर असा सेंटी वाटत असेल, तर सांगा, मी एडिट करेन.

तर वाढदिवस हा माझ्यामते 'आपल्या माणसांसाठीच' साजरा करायचा. आपली म्हणजे, ज्यांना आपला वाढदिवस लक्षात ठेवायला फेसबूक व मोबाईलच्या रिमाइंडरची गरज लागत नाही, अशी आपली. एकदा लहानपण ओसरलं, की स्वतःच्या वाढदिवसाचं अप्रुप वाटणं ज्या पटीत कमी होतं त्या पटीत 'आपल्या माणसाचा' वाढदिवस साजरा करण्यास आतुर बनत जातं. त्यामुळे अशा आपल्यांसाठी तरी वाढदिवस साजरा करावा/करुन घ्यावा, असे माझे मत. कुणी कशा पद्धतीने करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न.

>> ज्जे बात !!!

अशिका यांच्या मताशी एकदम सहमत आहे..

वाढदिवस लिखाण चांगले आहे... पण कधी लक्षात ठवून आपल्या आई वडिलांचं वाढदिवस साजरा केला का? काही त्या दिवशी आपण काही वेगळे करतो का याकडे पण लक्ष द्यावे.. हि विनंती...

आशिका, एडीट करायची काही गरज नाही. आणि हो, शेवटी मी उत्तर दिले आहेच Happy

हेमंत,
हो, बरोबर आहे. खरे तर आईवडीलांचे वाढदिवस साजरे करणे जास्त एक्सायटींग असते. आपल्या वाढदिवसाला आपण गाव उंडारून रात्री घरी येतो. आईवडीलांच्या वाढदिवसाला मस्त आपल्या त्रिकोणी चौकोनी कुटुंबातच फॅमिली फंक्शन होते.

मी तर माझा 'वाढदिवस' दर आठवड्याला साजरा करतो (तो 'दिवस' - वार- आठवड्यात एकदा येतोच). कारण खुदखुशी (खुद की खुसाजरे:)

फेरफटका, माझाही जन्मवार सोमवार मी एके काळापर्यंत दर आठवड्याला साजरा करायचो. आईच्या मेथडोलॉजीनुसार. म्हणजे मांसाहार न करणे, शंकराच्या देवळात जाणे, त्यादिवशी नखं तसेच केस चुकूनही न कापणे ईत्यादी...

या पैकी नखं केस बाबत आजही आईच्या भावनांचा मान ठेवतो. अगदी दाढीही सोमवारची करत नाही.
पण मांसाहार मात्र 52 x 7 सुरू केलाय आणि नास्तिक झाल्याने देवळात मला आईच पाठवत नाही Happy

स्वता पेक्शा आइ, वदिल, बायको, भाउ, मुले, मित्र यान्चा वाधदिवस साजरा करने आनि त्यान्चा आनन्द बघने, यात जास्त मजा येते.