लाल अडवाणी

Submitted by satishb03 on 15 May, 2016 - 14:35

लाल अडवाणी

लाल अडवाणी चिरुट पिताना
चावायाचा नुस्ताच चोथा
म्हणायचा अन् मनाशीच की
प्रधानसेवक होईल सोता

कचकावुनी कासरा रथाचा
आणि थोपटून झ्या झ्या घोडे
दंगल मंगल सांडीत जाता
रामाचे मंदिर बांधीन थोडे

चोथा लाल अडवाणीने जो
चावुनि चावुनि फेकून दिधला
संसंदेमधल्या जाजमास तो
सदैव रुतला सदैव रुतला

स्वप्नांवरती धूर सांडणे
लोकसभेचा विधानसभेचा
चिभन जळक्या खासदारांना
वाचवी गाथा भागवताचा

लालु अडवाणी चिरुट बापडा
वडता वडता खंगून गेला
चावी फिरवत पत्ते काटूनी
फेकू बाबा सेवक झाला

कवी : रॅम्बो वाघमारे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भेष्ठ...