देसी नूडल्स

Submitted by सुलेखा on 14 May, 2016 - 03:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

देसी नूडल्स म्हणजे गव्हाच्या कणकेपासून तयार केलेल्या शेवयांचा उपमा.पोटभरीचा नाश्ता,डबा.मध्यल्या वेळेचे खाणे.क्वचित संध्याकाळचे लाईट जेवण म्हणून करता येईल.
साहित्य :-- २ कप कणकेच्या शेवया
१ कांदा बारीक चिरुन घ्यावा.
१ लहान गाजर मोठ्या भोका च्या किसणीने किसून घ्यावे.
२-३पानकोबीची पाने बारीक चिरुन घ्यावी.
१ लहान मिरची बारीक चिरुन घ्यावी.
अर्धी वाटी मटार दाणे
४-५ कढी-लिंबाची पाने.
अर्ध्या लिंबाचा रस
चवीपुरते तिखट-मीठ व साखर
फोडणी साठी --तेल्,मोहोरी,जिरे,हिंग, किंचित हळद
३ कप आधणाचे पाणी.
IMG_20160514_101854.jpgIMG_20160514_101908_1.jpg

क्रमवार पाककृती: 

एका पातेल्यात आधणासाठी पाणी तापायला ठेवा.
एका कढईत तेलाची फोडणी तयार करण्यासाठी तेलत्गरम करा.त्यात मोहोरी-जिरे-हिंग व हळद घालुन फोडणी करा. आता या फोडणीत कांदा-मटार दाणे- पानकोबी-हिरवी मिरची-कढीलिंबाची पाने व शेवया [ थोड्या हाताने चुरुन] घाला. साधारण ३ ते ४ मिनिटे हे सर्व मिश्रण मध्यम गॅसवर शेवयांचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परतुन घ्या.
त्यात चवीप्रमाणे तिखट , मीठ व साखर घालुन छान परता.आता किसलेले गाजर व टोमॅटो घालुन पुन्हा एकदा परतुन घ्या.
आधणाचे पाणी अंदाजे १ ३/४ कप घालुन पुन्हा एकदा मिष्रण ढवळा. कढई वर झाकण ठेवा. एक वाफ येऊ द्या. त्यासाठी २ ते ३ मिनिटे लागतील. झाकण उघडुन लिंबाचा रस घालुन मिश्रण परतुन घ्या .आवश्यकतेनुसार आधणाचे पाणी घाला.
खायला देताना त्यावर कोथिंबीर ,बूंदी, शेव घालुन द्या.
टोमॅटो सॉस ही घेता येईलIMG_20160514_104112_0.jpg
.

अधिक टिपा: 

कणकेच्या शेवयांऐवजी राईस नूडळ्स घेतल्यास त्या आधणाच्या पाण्यात छान शिजवुन रोळीत उपसुन त्यावर लगेच थंड पाणी घालुन वापराव्या.
बारीक शेवया असल्यास पाणी कमी लागेल.त्यामुळे लागेल तसे किंवा थोडॅ-थोडे पाणी घालावे.
सूपी नूडल्स हव्या असतील तर अगदी वाढायच्या वेळी गरम पाणी घालुन लगेच वाढावे.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ड्रॅगन ब्रँड राईस शेवयांचा तुम्ही लिहीलाय तसा बरेचदा करते. छानच होतो गव्हाच्या शेवया हा स्पेशल प्रकार आहे का ? त्या कुठे मिळतात ? की आपण खीरीसाठी वापरतो त्याच घ्यायच्या आहेत ?

मनीमोहोर गव्हाच्या शेवया जाड असतात. ह्याची खीर चवदार, खूप छान लागते. खीरी साठी वापरतो त्याच शेवया आहेंत ह्या..गव्हले खिर आपण नैवेद्याला करतो ना ! मशीन वर बनवितात. गृहोद्द्योग्,प्रदर्शनात तयार मिळतात. नेहमीच्या मैद्याच्या बारीक शेवयांपेक्षा ह्या कणकेच्या शेवया सर्वार्थाने चांगल्या.

अरे वा मस्तच Happy

पण ह्या शेवया इकडे अमेरिकेत मिळणं कठीण. काही एश्यन नूडल्स असतात बकव्हीट पासून केलेले ते वापरून बघायला पाहिजे फक्त त्यांची चव आपल्या उपम्यात कितपत सुट होईल कळत नाही.

सशल एशिअन स्टोर्सला मिळणार्‍या बकव्हीट पासुन केलेल्या नूडल्स.थोड्या चिकट होतात.. गव्हाची/ पीठाची चव ही अजिबात छान नाही. त्यापेक्षा राईस नूडल्स --चायनीज -ची चव छान आहे. पण त्या गरम पाण्यात छान मऊ होईपर्यंत शिजवुन घ्याव्या लागतात.शिजल्या कि चाळणीत ओतुन ते पाणी काढुन टाकायचे.