यंदाचा (२०१६) वर्षाविहार हा आपला १४वा ववि आहे.. गेली १३ वर्ष उत्साहात साजर्या झालेल्या या उपक्रमात नवीन कल्पना पाहिजेत. या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक..
तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा. आपण साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही वर्षासहल आयोजीत करतो.
संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्या नावडणार्या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.
***********************
माहिती इंद्रधनुष्य यांनी दिली आहे. यांत जसं जमेल तसं जुन्या समिती सदस्यांनी भर घालावी.
अंदाजे ५० ते ७५ मायबोलीकर ववि साठी येतात... त्या अनुशंगाने लिहित आहे.
१. सुरुवात कशी होते. >>>
१.१ मे महिन्याच्या अखेरीस पुणेकर आणि मुंबईकर संयोजक ववि स्थळ शोध मोहिम आखतात.
१.२ दोन्ही संयोजक टिम आपले फिडबॅक संयोजकाच्या BBवर देऊन चर्चा करतात.
१.३ शक्य असल्यास फोनवर/मेलवर/प्रत्यक्ष भेटूनही स्पॉट बद्दल चर्चा करतात.
२. ठिकाण कसं निवडलं जातं.>>> ववि योग्य ठिकाण निवडण्यासाठी खालिल बाबिंचा विचार केला जातो.
२.१ पुणे-मुंबईला मध्यवर्ती ठिकाणाचा पर्याय शोधणे... (लोणावळा, खंडळा, खोपोली, कर्जत)
२.२ मागिल वविच्या ठिकाणाची पुर्नरावृत्ती टाळणे...
२.३ ववि साठी निवडलेल्या रिसॉर्टचे एका दिवसाचे भाडे प्रत्येकी रु.२५० - ३५०/- च्या दरम्यान असावे.
२.४ रिसॉर्टच्या भाड्यात लहान मुलांसाठी ५०% सूट आहे का ते पहाणे.
२.५ रिसॉर्टवर इलेक्ट्रिसिटीला बॅकअप सिस्टम असावि जेणे करून सांसकृतिक कार्यक्रमाच्या वेळी स्पिकर मधे वत्यय येऊ नये.
२.६ खुर्च्या, स्पिकर व माईकची सोय रिसॉर्टवर आहे का ते पहाणे.
२.७ रिसॉर्टवर २ चेंजिंग रुम असव्यात. (चेंजिंग रुमचे भाडे गृपच्या संखेनुसार negotiate करावे)
२.८ रिसॉर्टवरील जेवण, नाष्ट्याच्या मेन्यूची विविधता तपासणे.
२.९ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एखादा हॉल किंवा शेड उपलब्ध आहे का ते पहाणे.
३. पैसे कसे गोळा केले जातात. >>>
३.१ वविची दवंडी पिटल्यावर पैसे गोळा करण्याचे ठिकाण आणि तारिख त्या दवंडीत नमुद केली जाते.
३.२ वविच्या १ आठवडा आधी नोंदणीकृत सभासदांची वर्गणी जमा करण्यासाठी पुणे संयोजक बाल गंर्धवच्या स्पॉटवर तर मुंबई संयोजक शिवाजी पार्कातील स्पॉटवर भेटायची जागा निश्वित करतात.
३.३ जमा झालेल्या पैश्यातून रिसॉर्टला काही अनामत रक्कम द्यावि लागते.
३.४ वर्गणीची वर्गवारी खालिल प्रमाणे करावि
A. रिसॉर्टचे भाडे प्रत्येकी
B. बस भाडे प्रत्येकी
C. सांस्कृतिक कार्यक्रमांची वर्गणी प्रत्येकी
D. चेंजिंग रुमचे भाडे
E. स्पिकर, माईक आणि खुर्च्यांचे भाडे
४. तिथले कार्यक्रम कसे ठरतात? >>> सांस्कृतिक समिती तेथिल कार्यक्रमांची जबाबदारी पार पाडते... सां.स.ने याबाबत मार्गदशन करावे.
५. जाण्याची सुविधा? त्याचं संयोजन कसं होतं >>>
५.१ जाण्याची सुविधा बसने केली जाते.
५.२ स्वतःच्या गाडीने येणार्या सदस्याकडून बसची वर्गणी घेतली जात नाही.
५.३ संयोजकांनी बसची योग्य ती व्यवस्था करण्यासाठी खालिल गोष्टी पडताळून पहाव्यात...
a. गृपच्या नोंदणी नुसार १८ सिटर, २२ सिटर, २६ सिटर की ५४ सिटर बस सोईची पडेल ते ठरवणे.
b. बसची रक्कम Lumpsum ठरवली असेल तर त्यात Toll include आहे का ते पहाणे.
५.४ वविच्या २-३ दिवस आधी वविच्या BBवर बसची खालिल माहिती पुरविणे.
a. बसचा रुट (pickup points)
b. pickup point वरील वेळ
c. शक्य असल्यास बस क्रमांक, बसचा रंग, बसचा प्रकार याची माहिती देणे.
६. त्या दिवशी करण्याच्या गोष्टी. >>>
६.१ सगळ्या सदस्यांना फोन करून बसच्या ठरलेल्या वेळेवर pickup point वर येण्याची आठवण करणे.
६.२ म्युझिक सिस्टम, सांस्कृतिक कार्यक्रमाच सामान, बसमधील उपहार, First Aidच सामान इत्यादीची योग्य ती सोय करणे.
६.३ रिसॉर्टच्या वाटेवर शक्य असल्यास चहापानाचा कार्यक्रम पार पाडणे.
६.४ रिसॉर्टवर पोहचल्यावर चेंजिंग रूमचा ताबा घेऊन सभासदांची योग्य ती सोय करणे.
६.५ रिसॉर्टवर सांस्कृतिक समितीला म्युझिक सिस्टमची सोय उपलब्ध करून देणे.
६.६ रिसॉर्टवरील नाष्टा, जेवण, चहापान योग्य त्या वेळी पार पाडणे.
६.७ रिसॉर्टचे भाडे चुकते करून रीसिट घेणे.
६.७ संध्याकाळी ५च्या दरम्यान सगळे कार्यक्रम आटोपून एक गृप फोटो काढून परतीच्या प्रवासाला लागणे.
७. काही विशेष सूचना: ज्या पाळायला कींवा टाळायला हव्यात.
७.१ वविच्या ठिकाणी मद्दपान / धुम्रपान टाळणे.
७.२ सगळ्यांना छत्री, रेनकोटची सक्ती करणे.
७.३ रिसॉर्टवर स्विमिंग पूल असेल तर जलक्रिडा करणार्या सभासदांनवर लक्ष ठेवणे आवश्यक.
७.४ बसची सोय शक्यतो माहितीतील ट्रॅव्हल्स वाल्याकडूनच करणे... (ट्रॅव्हल्सवाले ऐन वेळी बस बदलतात)
७.५ वविचा हिशोब त्या नंतरच्या आठवड्यात पार पाडून अॅडमिनकडे सुपुर्द करणे.
थँक्स गो! मी यावर्षी
थँक्स गो! मी यावर्षी बॅकस्टेजवरून जी काही मदत करता येईल ती करेनच! इथं राहावतंय कोणाला?!!
अगदी पहिला वर्षाविहार सोडला,
अगदी पहिला वर्षाविहार सोडला, तर नंतर कधीही मला ते जमले नाही. त्यामूळे मला मत देण्याचा अधिकार नाही.
तरीपण लिहितोय.
रिसॉर्ट, पूल वगैरेचा हट्ट न धरता एखादा वेगळा प्रकार नाही का करता येणार ?
जेवणासाठी तयार जेवण किंवा काही गरजू स्त्रियांना सोबत नेले तर त्या काही पदार्थ आधी करतील व काही तिथे गेल्यावर करतील. खाण्यासाठी पत्रावळ्या वगैरे नेता येतील.
एखाद्या अनाथाश्रमातील मुलांना सहभागी करून घेता येईल. किंवा त्या आश्रमातच जाता येईल. त्यांची करमणूक करता येईल. तिथे तर बेसिक सोयीदेखील मिळतील. बरेच पैस वाचतील आणि देणगीची रक्कम वाढवता येईल.
असे अनेक आश्रम, किंवा निसर्गरम्य जागांबद्दल इथेच तर वाचलेय मी.
अगदी रिजॅाट नसेल तर कशेळे -
अगदी रिजॅाट नसेल तर कशेळे - जामरुग रस्त्यावर आंबिवली ( पेठचा किल्ला फेम ) गावानंतर वनविहार फलोद्यान आहे.
१) डीजे नाहीये
२) रिजोर्ट असा नाही( एंट्री फी नाही )
३) पुल त्यांचा नाही परंतू बाजुलाच नदी आहे.फेब्रुवारीपर्यंत पाणी असते.
४) नदीकाठी खुप मोठी गुहा आहे।
५) व्हेज नॅान व्हेज जेवण ( चुलीवरचे ) मिळते.
६) तीन रूम्स आहेत सेल्फ कंटेण्ड
दोन कॅामन टॅाइलेट.( ६५०रु /)
७) गप्पाटप्पांसाठी जागा
८) भरपूर पार्कींग.
९) रुम न घेता फक्त जागा वापरली तर रु वीस /प्रत्येकी.
१०) हौशी लोक तिथे राहून पेठचा ट्रेक करू शकतात
११) पेठचा किल्ला ,नदी आणि गुहा हे खास आकर्षण.
१२) अगदी वर्षा विहार नाही केलात तरी तीनचार कुटुंबाना जाण्साठी चांगली जागा.अवश्य पाहून या. पक्षी आहेत.
फोन संपर्क : शिवाजी / वनविहार
9226093034
नेरळ स्टेशनपासून २४ किमी,कर्जत पासूनही २४ किमी.मुंबईपुण्यापासून सोयिस्कर.
वनविहारला रेल्वेनेही स्वतंत्र
वनविहारला रेल्वेनेही स्वतंत्र जाता येते.नेरळ स्टेशनला प्लॅटफॅार्म १ वर मागच्या बाजूस बाहेर पडले ( माथेरानची विरुद्ध बाजू )की पाच मिनिटांवर बस डेपो / ओटो नाका आहे.शेअर ओटो सतत असतात त्याने कशेळे येथे उतरा. गुरुवारी बाजार असतो.मुरबाड- कर्जत स्त्यावरच आहे कशेळे. खांडस आणि जामरुग च्या रिक्षा इथूनच जातात.जामरुगच्या रिक्षाने वनविहार ( दहा किमी ) आहे.आंबिवली ९ किमी.
वनविहारला संध्याकाळी साडेपाचला कर्जत एसटी असते.त्याने कर्जतला जाऊन पुण्याकडे जाता येते.
( हे स्वतंत्र जाणाय्रांसाठी लिहिलंय )
उत्तम वाटतय हे
उत्तम वाटतय हे
तुमच्या चकाचक रिझॅाटशी तुलना
तुमच्या चकाचक रिझॅाटशी तुलना करू नका पण मोकळेपणाची ग्यारंटी.मी २००० सालापासून अधूनमधून जातो.
नमस्कार ..
नमस्कार ..
अॅडमिन आणि इतर संयोजकांना
अॅडमिन आणि इतर संयोजकांना विनंती, शक्य असल्यास , मलाही संयोजनात यायला आवडेल.
मैत्री ते संयोजनाच्या बैठकीचे
मैत्री ते संयोजनाच्या बैठकीचे ठिकाण कळवता येइल का...
संयोजक ग ट ग ची आतुरतेने वाट
संयोजक ग ट ग ची आतुरतेने वाट पाहात आहे.
नवनवीन स्थळांची (पक्षी- भेट देण्यायोग्य ठिकाणांची ) माहीती येत आहे.
ववि फिवर छा रहेला है भिडु!!!
मुंबई मधील संयोजना साठी
मुंबई मधील संयोजना साठी ईच्छुक सभासदांची पहिली मिटिंग उद्या २९ मे २०१६ सायं. ५.०० वा. गडकरी रंगायतन, ठाणे येथे असणार आहे , संबंधितांनी नोंद घ्यावी
छान, छान! जोरात होऊ देत
छान, छान! जोरात होऊ देत मीटिंग.
>>पक्षी- भेट देण्यायोग्य
>>पक्षी- भेट देण्यायोग्य ठिकाणांची
म्हणजे पक्षी निरिक्षण पण आहे की काय ?
भिडे... मी मुंबई आणि पुणे
भिडे...
मी मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणी असणार(च)...
मस्त..एक्साय्टेड
मस्त..एक्साय्टेड
सद्ध्या संयोजकांची बस फुल्ल
सद्ध्या संयोजकांची बस फुल्ल भरली आहे ...
अरे वाह छानच..
अरे वाह छानच..
मला पण एक सुचना करावीशी
मला पण एक सुचना करावीशी वाटते.
तुम्ही तिथे खेळ खेळता पण सर्व वेळ खेळ खेळण्यातच जातो. त्याऐवजी थोडे खेळ आणि थोडे इतर उपक्रम करता येतील. जसे:
१) मायबोलिवर जे साहित्य चांगले आहे ते तिथे वाचता येईल.
२) जे लिहितात त्यांना तिथे आपले लेखन वाचता येईल.
३) आवडलेल्या पुस्तकाबद्दल बोलता येईल.
४) जे गातात, त्यांना गाण्याची संधी देऊ शकता.
५) एक विषय घेऊन, त्याविषयावर बोलता येईल.
६) एक विषय घेऊन, त्याच विषयावरचे साहित्य वाचता येईल.
मायबोलिवर जे साहित्य चांगले
मायबोलिवर जे साहित्य चांगले आहे ते तिथे वाचता येईल.>>
....
....
....
....
....
बी, अहो पण मग मायबोलीवर काय करणार?
यंदा वर्षाविहार २०१६ कुठे
यंदा वर्षाविहार २०१६ कुठे आहे?
वैयक्तिक (आणी कौटुंबिक पण)
वैयक्तिक (आणी कौटुंबिक पण) अनुभव-
संयोजक म्ह्णून आणी अटेंडी म्हणून पण. नक्की जा लोकहो.. खूप खूप मस्त मज्जा येते,
३ वर्षांनंतर पहिल्यांदाच मिस करणारे
निलापी, दवंडी होईल लवकरच
निलापी, दवंडी होईल लवकरच वर्षाविहाराची! तोवर धीर धरा.
अवांतरः श्री अतुल ठाकुर
अवांतरः श्री अतुल ठाकुर यांच्या योगाच्या अतिसुलभीकरणाच्या धाग्यावरील हा फोटो पाहुन मनात कल्पना उद्भवली की ववि मधे पोहोण्याच्या तलावात पोहोताना/डुंबताना, अशी काहि गुलाबाच्या पाकळ्यांचि पखरण करण्याचे आयोजक मनावर घेतिल काय?
लिंबुदा ... तुम्ही काय काय एक
लिंबुदा ... तुम्ही काय काय एक एक बघता ... आणि संयोजकांचे व्याप वाढवता
तुम्हीच घेउन या की पाकळ्या ...
त्यात काय? हौसेला मोल
त्यात काय? हौसेला मोल नसते.......
पाकळ्या आणतो टोपलीभर, रिसॉर्ट वाल्यांची "परमिशन"घ्यायचे तुम्ही बघा...
कधी आहे ववि? १६ -१७ नंतर असेल
कधी आहे ववि? १६ -१७ नंतर असेल तर मी थेट येणार.
लिंबुदा ... तुम्ही काय काय एक
लिंबुदा ... तुम्ही काय काय एक एक बघता ... आणि संयोजकांचे व्याप वाढवता>>>>
आता धाग्याच्या शिर्षकातच लिहलय नविन कल्पना कळवा बिच्चार्या लिम्बुला सुचली कल्पना!
तो पूल नंतर स्वच्छ करून
तो पूल नंतर स्वच्छ करून द्यायला लागेल ना? या हौसेचं हे मोल असू शकेल!
पाकळ्याच आणा लिंबुदा
पाकळ्याच आणा लिंबुदा
>>> पाकळ्याच आणा लिंबुदा
>>> पाकळ्याच आणा लिंबुदा फिदीफिदी <<<<
हो हो तर तर.... गुलाबाच्या(च) फुलांच्या(च) पाकळ्या(च) आणतो....
उगाच चुकुन माकुन कडुलिंबाची पाने नाय घेउन येणार.... हो ना, नैतर "आयुर्वेदिक डुंबणे" व्हायचे सगळ्यांचेच...
Pages