स्थलांतर (कथा) भाग 3

Submitted by मी प्राजक्ता on 14 May, 2016 - 01:24

स्थलांतर : भाग 3

अशोक घाईघाईने मशीन रुमला आला. स्क्रीन नॉर्मल होती. म्हणजे सावली वापस येण्याची चिन्हं होती. त्याला बरं वाटलं. तोपर्यंत तो कंमांड्स चेक करू लागला. पाच कमांड बरोबर रिसिव केल्या होत्या. त्यातल्या चार कमांडचे रिप्लाय अपेक्षित होते. पाचवा रिप्लाय बघून अशोक ला धक्का बसला. SHADE OUT OF VIEW. सावली स्क्रीनला दिसत नव्हती. ती खरंच गायब झाली होती.

कुठं होती सावली ?

मशीनच्या किरणांच्या कमीअधिक फ्रीक्वेन्सीमुळे हवेतल्या वायुंच्या रेणुमधील स्पेसमध्ये जाऊन अडकली होती ती.

साध्या भाषेत :

नरेंद्राचे वडील राजगुरुंकडे पोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. सुर्यबिंब तारुण्यातला उग्रपणा सोडून एखाद्या वानप्रस्थी राजासारखे शांत वाटत होते. थोडा वारा चालला होता. लांबून आश्रमाची तटबंदी पहात येणारा राजा आश्रमात गेला. नीरव शांतता. झाडेच झाडे. साफसुफ आवार. मनाला प्रसन्न वाटलं.
गुरुजी एका झाडाखाली मृगाजिनावर ध्यान करत होते. राजा घोड्यावरुन उतरून शांतपणे गुरुंकडे निघाला. शेणाने सारवलेल्या गुळगुळीत जमिनीवर एक आसन टाकले होते. राजा जवळ पोचताच गुरू म्हणाले " राजन, आपण आसनस्थ व्हावे. उद्या सुर्योदयापर्यंत सगळे ठीक होईल. "
" गुरुदेव, प्रणाम !!! आपल्याला हे कसे काय माहीत झाले ? "
" राजन,तुझा मित्र विक्रमादित्य तुझ्यासारख्या महापराक्रमी राजाशी संबंध तुटू नयेत म्हणून खोटे बोलत आला. त्याची कन्या जयागौरी कधीच कालवश झाली. पण त्याने तुला सांगितले नाही लग्नाआधी दोन दिवस त्याने सर्व व्यवस्थित व्हावे म्हणून कालीमातेची पूजा केली. वापस आल्यावर खजिनदाराने त्याला कळवलं. कि एक काळी मानवी आकृती कोषागारात बेशुद्धावस्थेत मिळाली. त्या काळ्या तरुणीला कालीमातेचे स्वरुप समजून विक्रमादित्याने तिची पूजा केली. ती हळूहळू उजळत चालली होती.

तर राजन, काय आहे . तुला हे जग, हे जड पदार्थ सगळं स्थिर वाटतं. पण हे स्थिर नसून अतिशय वेगवान आहे. पदार्थ कितीही जड असला तरी त्याच्या मुलकणात पोकळी आहे. तो पोकळ आहे. थोडक्यात अणुमध्ये प्रोटॉनभोवती ईलेक्ट्रॉनस वेगाने फिरतात. त्याने अणुचा आकार मोठा होतो. वास्तविक पहाता अणु पोकळ असतो. पदार्थाचा मुलकण पोकळ असल्याने पदार्थ हे दोन तृतीयांश( 2/3 ) पोकळ रहातात. या पोकळीमुळे एकाच जागेवर रहाणा-या दोन समांतर जगात कधीकधी दार तयार होते. पण इथे समांतर जगातल्या कन्येची फक्त सावली आली. त्या सावलीला विक्रमादित्य कालीमातेचा प्रसाद समजून बसला.
ही सावली नंतर नंतर कन्येचे रूप धारण करून स्वतःला जिवंत समजू लागली आणि तिने नरेंद्राशी लग्न केले. पण गुप्तहेरांकरवी मला सर्व समजल्यानंतर मी माझ्या विद्येने समांतर विश्वातले दार शोधले. ते दार एका सुवर्णकाराच्या एकुलत्या एका मुलीच्या महालात होते. त्या सावलीला त्या दाराशी पिंज-यात बंद करून नरेंद्र माझ्या शिष्यांसोबत अस्रे वापरून त्या जिवंत कन्येला त्या दारातून आपल्या जगात आणायचा प्रयत्न करतोय. ती कन्या समांतर विश्वाच्या दाराशी उभी असेल तरच हे शक्य होईल.
जर त्या सावलीला हे समजलं तर ती परत सावली होणं पसंत करणार नाही. त्यापेक्षा आहे त्या जागी ती परत सावली होईल अशी काळजी घेणं आवश्यक.राजन, त्या सावलीच्या मालकिणीच्या मृत्यूनंतर त्या सावलीची शक्ती कमी होत जाईल आणि ती लुप्त होईल.

संध्याकाळ झाली आहे. मी स्नानसंध्या करून येतो. अपेक्षा आहे कि अस्त्रांच्या उपयोगाने ती कन्या आपल्या जगात यावी.

ईश्वराच्यामनात मानवाचे कल्याण असते."

शुभा तिथेच उभी होती. अशोक धावत आला. शुभा अशीच रहा उभी. ती थकली होती हळूहळू गळून चालली होती. पण उभी होती. रात्र झाली. अशोकने शुभाला तिथेच झोपण्याची विनंती केली. सकाळी शुभा उठली तेव्हा ती पिंज-यात होती. खिडकीतून प्रकाश येत होता आणि जमिनीवर तिची सावली पडली होती.

नरेंद्राचा प्रयोग यशस्वी झाला होता. जिच्या छायेशी लग्न केलं, ती समोर होती.

समांतर दुनियेत जोडीदार असणारं हे जोडपं परत एकदा विवाहबद्ध झालं.

And they lived happily everafter..

समाप्त.

Written by kshamayermalkar

science fiction story.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिले दोन भाग वाचून वाटलं होतं एक रहस्यमय कथा वाचत आहे. पण ही कथा लगेचच संपली. शेवट नीट समजलाच नाही. त्या अशोकचं काय झालं?