'सैराट'मय कविता

Submitted by जव्हेरगंज on 11 May, 2016 - 11:41

====================================

स्टार्टींग विथ् चारोळ्या...

°°°°
झुडपात जाऊन तोंडाला
लय फासलाय साबण
चाललू हिरीत मुटका मारायला
तर आरची म्हणली " हु म्हागं"

- लंगडा प्रदीप

°°°°°°

केळीच्या बागा तुडवून
पाय दुखतात सारखे
आसं काय करती येड्यावणी
"घरची उठत्याल की आरचे"

- परश्या

==================================
"सैराट"मधल्या एक-दोन कविता (नोटीस बोर्डावर लावलेल्या, आठवतंय का?) जशाच्या तश्या खाली टाकतोय! मला तर आवडल्या !! तुम्हाला?
•••••••••

तू

तू वर्गात
मी सर्गात
तू गैरहजर
मी नर्कात

तू हसलीस
माझा सुकाळ
तू रुसलीस
माझा दुष्काळ

माझ्या जीवनात
आता फक्त तू
फक्त तू फक्त तू..

- प्रदीप बनसोडे (कवी)
(एफ.वाय.बी.ए.)

•••••••••

मुके पैजण

एकटेपणाचे हे जीवेघेणे तट
तू आता भराभर ढासळून टाक
पुन्हा कधीच न बांधण्यासाठी
फाटलेल्या आभाळाला
टाके घालून सांधण्यासाठी

कारण
आता मी माझ्याकडचा रस्ता
झाडून पुसून साफ केलाय
तुझ्या पायातल्या
मुक्या पैजणाला
मुक्त गाणी गाण्यासाठी !

- प्रशांत काळे
(एफ.वाय.बी.ए.)

====================================
हे झालं पहिल्या भागाविषयी! दुसरा भाग पाहूनही एक कविता मनात आली, ती खाली देतोय !
•••••••••••••••••••

आज पुन्हा हरायचंय
जीवाला सावरायचंय
दोन अश्रू ओघळले तरी
थोडं अजून जगायचंय

एका गोधडीचा संसार माझा
भुईवरच मांडायचाय
साजणाच्या संगतीत आता
धुळीतच स्वर्ग शोधायचाय

तांदूळ, डाळ, गोधडी, खाट
सोललेल्या लसणाच्या पाकळ्या
एक झाडू, भर्रर स्टो, ढेकणाचं औषध
अन बरंच काही....
बस्स,
थोडं अजून जगायचंय

- एक होती आरची

====================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages