"काय झालं प्रिन्सदादा?"

Submitted by जव्हेरगंज on 8 May, 2016 - 06:50

खरंतर त्या 'उपट्या'चं चुकलंच म्हणा, एक 'आळापणं' जन्माला घातलं, वरुन त्याला शिकवलबी. आन खुशाल दिलं सोडून तुमच्यावर उडायला. ते पण तुमच्यावर आसं काय उडालं की तुमाला उपटायला काय शिल्लक ठेवलं न्हाय. मग तुमी बसलात त्याच्या घराबाराचीच उपटत.

पण त्या लंगड्याला तुमी का सोडलं कळलं नाय, पाय काढायचा कनाय गुडग्यातनं, आन त्या 'सल्या'ला कापून फेकायचा उसात. तेवढंच जिवाला बरं वाटलं असतं.

आन आर्ची, कुणाला इचरुन बुलट न्हीलती तिनं, माज आलाय आयघालीला, घरादारावरनं नांगुर फिरवून, पोरांना पळवून घीऊन गेली.

टॅक्टरचं त्वांड घीऊन थेट शेतात जाणार म्हणली, पण थेट हायद्राबादेत पोचली. थेट तुमच्या डोळ्याम्होरं, घराण्याची इज्जत मातीत मिसळली.

जगणं सोपं वाटलं काय आयघाल्यास्नी. खायप्यायचे वांदे झाले. कुठं ती मऊमऊ गादी, आन कुटं ती कुबट वासाची गोधडी. किड्यामुंग्यासारखं खोपट्यात जगत राहिले वो.
वाघिणीसारखी पाटलाची पोरगी मांजर होऊन जगायला शिकली हो. आख्ख्या जगाला फाट्यावर मारुन त्या 'आळापण्या'चा संसार फुलवत बसली.

त्या आळापण्याचं जावू द्या, ते आपल्या मौतीनं मेलं. पण मला एक खरंखरं सांगा, सख्ख्या बहिणीचं तुकडं करताना तुमचा हात जरा पण थरथरला न्हाय का वो?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण मला एक खरंखरं सांगा, सख्ख्या बहिणीचं तुकडं करताना तुमचा हात जरा पण थरथरला न्हाय का वो? >> हाच कळीचा प्रश्न आहे. बहिणीला फूला सारख जपा, तिच रक्षण करा. असे शिकवणार्‍या भारतीय संस्क्रूती मधे हे असे का व्हाव.

खोट्या अहंकाराची झिंग..

पण मला एक खरंखरं सांगा, सख्ख्या बहिणीचं तुकडं करताना तुमचा हात जरा पण थरथरला न्हाय का वो? >> हाच कळीचा प्रश्न आहे. बहिणीला फूला सारख जपा, तिच रक्षण करा. असे शिकवणार्‍या भारतीय संस्क्रूती मधे स्त्री तिचे निर्णय घ्यायला लागली की तुकडे करा असे सांगणार्‍या पुराणकथा आहेत की.

सैराटवर आधारीत आहे का कथा? पिक्चर पाहिलेला नाही पण इथे तिथे वाचून तसं वाटलं खरं.
कंसराज, भारतीय संस्कृतीचा काय संबंध इथे? Uhoh

>>असे शिकवणार्‍या भारतीय संस्क्रूती मधे स्त्री तिचे निर्णय घ्यायला लागली की तुकडे करा असे सांगणार्‍या पुराणकथा आहेत की.>> सकुराताई, कुठल्या पुराणकथांमध्ये असं म्हटलंय? लिंका, चोप्यपस्ते देणार का? (चिकटपट्ट्यांची गरज आत्ताच आहे तेव्हा संधीचा फायदा घ्या).

सायो, फक्त तुमच्यासाठी.

परशुराम भगवान विष्णु के आवेशावतार थे। उनके पिता का नाम जमदग्नि तथा माता का नाम रेणुका था। परशुराम के चार बड़े भाई थे लेकिन गुणों में यह सबसे बढ़े-चढ़े थे। एक दिन जब सब सब पुत्र फल लेने के लिए वन चले गए तब परशुराम की माता रेणुका स्नान करने को गई, जिस समय वह स्नान करके आश्रम को लौट रही थीं, उन्होंने राजा चित्ररथ को जलविहार करते देखा। यह देखकर उनका मन विचलित हो गया।
इस अवस्था में जब उन्होंने आश्रम में प्रवेश किया तो महर्षि जमदग्नि ने यह बात जान ली। इतने में ही वहां परशुराम के बड़े भाई रुक्मवान, सुषेणु, वसु और विश्वावसु भी आ गए। महर्षि जमदग्नि ने उन सभी से बारी-बारी अपनी मां का वध करने को कहा लेकिन मोहवश किसी ने ऐसा नहीं किया। तब मुनि ने उन्हें श्राप दे दिया और उनकी विचार शक्ति नष्ट हो गई।
तभी वहां परशुराम आ गए। उन्होंने पिता के आदेश पाकर तुरंत अपनी मां का वध कर दिया। यह देखकर महर्षि जमदग्नि बहुत प्रसन्न हुए और परशुराम को वर मांगने के लिए कहा। तब परशुराम ने अपने पिता से माता रेणुका को पुनर्जीवित करने और चारों भाइयों को ठीक करने का वरदान मांगा। साथ ही इस बात का किसी को याद न रहने और अजेय होने का वरदान भी मांगा। महर्षि जमदग्नि ने उनकी सभी मनोकामनाएं पूरी कर दीं।

http://religion.bhaskar.com/news/utsav--know-why-did-the-slaughter-of-pa...
माता रेणुका ची काय चुक होती.

अर्र, सकुरा, खरंच आहे की स्टोरी पुराणात. फक्त ते नदीवरचे संदर्भ तुम्ही म्हणताय त्यात आणि मी वाचलं त्यात वेगळे आहेत पण ते असो.
पुन्हा एकदा विचारेन, पुराणाचा काय संबंध? पुराणात जे काही चालू होतं ते सगळं आज चालू आहे का? सारासार विचारबुद्धी असते की नाही? माथेफिरु लोकांच्या डोक्याच्या वायरींगमध्येच बिघाड असल्यामुळे काही चालत नसावं. सुनेला हुंडा आणला नाही म्हणून जाळणं, ऑनर किलींग, नकार पचवता आला नाही म्हणून तोंडावर अ‍ॅसिड फेकणं वगैरे करणारी लोकं ह्याच लेबलाखाली येतात.
जाताजाता- जमदग्नी आजच्या काळात असते तर जेलमध्ये त्यांना अँगर मॅनेजमेंटचा कोर्स, थेरपिस्ट वगैरे सगळं करावं लागलं असतं.
असो, जव्हेरगंज यांच्या गोष्टीवर फाटे फोडायचे नाहीत.

तिकडे उत्तरेत जात पंचायती परिणामकारक आहेत. महाराष्ट्रात जात सोडुन लग्न लावलेल्या जोडप्याला दोन्हीकडचे लोक टाकतात हे वास्तव आहे. महाराष्ट्रात तरी ऑनर किलिंग दाखवाव अशी परिस्थीती नाही. अपवाद असतील पण ऑनर किलींग महाराष्ट्राच वास्तव नक्कीच नाही.

विठठला,

माझ म्हणण इतकच आहे की आजही महाराष्ट्रात जाती संपलेल्या नाहीत. महाराष्ट्रात खैरलांजी घडल किंवा अन्य अन्यायकाऱक घटना असतील पण सर्रास ऑनर किलींग महाराष्ट्र बेफाम नसावा. हे माझ प्रार्थ्मीक मत आहे. जाणकारांनी आकडेवारी दिली तर माघार सुध्दा आहे.

सर्रास माहीत नाहीत पण महाराष्ट्र मागे तर नक्कीच नाही. शाहू महाराजांचा वारसा मिरवणार्या आमच्या कोल्हापुरात सहा महिन्यापूर्वीच हे झालं होतं. सैराट्मधला सीन आणि ही घटना यात बरंच साम्य आहे.

खरोखर Sad

khupach sunder
आळापण्याचं.>>>>>>> ya shabdacha artha kalel ka pl.

सार्कॅजम छान उतरलं आहे.

>> हर्षि जमदग्नि ने उनकी सभी मनोकामनाएं पूरी कर दीं।

हे जर खरं तर ह्या गोष्टी आपल्याला ठाऊक कशा? Happy

शेवटच्या प्रसंगात आबाच्या चेहऱ्यावरचे हास्य, अगदीच नॉर्मल लेवलला चाललेले संभाषण, शामनानाचं "आनंद"! आणि "आयनं दिलयं ही" म्हणणारा प्रिन्स!

यासाठी नागराजला स्पेशल दंडवत !!!

आभार!

घराण्याच्या इज्जतीसाठी पोटच्या मुलांना आणि इतरांच्या मुलांना प्रेम केलं म्हणून ठार मारण्यापर्यंत हल्ली लोकांची मजल जाते. अतिशय दुख:द आणि भीतीदायक थराला गोष्टी गेल्या आहेत.

हिंसा आणि जबरदस्ती याच समर्थन नाहीच नाही पण अभ्यास करा, शिका, आयष्यात यशस्वी व्हा.
इतर अनेक गोष्टी आहेत आयष्यात. प्रेम हे सर्वस्व नाही आणि आयुष्याहून जास्त तर नाहीच नाही.

जिथे पराकोटीचा विरोध असेल आणि परिस्थिती पूर्णपणे आपल्या आवाक्या पलीकडे असेल तिथून वेळीच बाहेर पडा.
नाही होत काही वेळा आपल्याला हव तस, जाउ द्या

आपला जीव आणि उद्या आपल काही बरं वाईट झाल तर आपल्या आई वडिलांवर काय ओढवेल याचा विचार करा

हिंसा आणि जबरदस्ती याच समर्थन नाहीच नाही पण अभ्यास करा, शिका, आयष्यात यशस्वी व्हा.
इतर अनेक गोष्टी आहेत आयष्यात. प्रेम हे सर्वस्व नाही आणि आयुष्याहून जास्त तर नाहीच नाही. <<<<+१

नितीनचंद्र,

एका सिनेमात दाखवल्याने सर्रास कसे म्हणता येईल. सिनेमा मराठी आहे म्हणून लगेच त्याचा महाराष्ट्राशी संबंध जोडू नयेत. कलाकृती प्रतिकात्मक असतात. भाष्य मानवी प्रवृत्तीवर होत असावे, प्रांतवार वर्गवारी करणे अगदीच मर्यादीत स्वरूपाचे व्हावे.

धन्यवाद!

सिनेमा मराठी आहे म्हणून लगेच त्याचा महाराष्ट्राशी संबंध जोडू नयेत. कलाकृती प्रतिकात्मक असतात. +१

किमान इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र काहीसा सुधारला असे म्हणायला हरकत नाही पण काही शहरी भाग वगळला तर गावागावात आणि वस्त्यावस्त्यात जातीयतेच भूत मानगुटावर बसून शिमगा करतच आहे. ब-याचदा अशा हत्या जातीय वादातून कमी पण मुलीने घरच्यांचे न ऐकल्याने होतात, जूनाट रुढी,परंपरा याचा बोझा अंगावर मिरवणारा समाज, मुलगी पळून गेली म्हणजे घराण्याची इज्जत गेली असे म्हणणारा कोणत्याही जातीचा कट्टरवादी असतो त्यातूनच असे गुन्हे उदभवतात.

बाकी शिनेमा करमणूक म्हणून पाहिला पाहिजे ,प्रत्येक वेळी त्यातून का धडा घ्यायला हवा असे नाय ......

जाग्याव पलटी जी,

मी लिहले आहे की समाजात असे सर्रास घडत नाही तर सिनेमात प्रतिकात्मक का दाखवता ? सिनेमात सर्रास दाखवतात असे नाही लिहले.

मला इतकच म्हणायच होत की हुंडा बळी किंवा जातीची बंधने महाराष्ट्रात हरियाणा किंवा अन्य राज्यातील समाजाइतकी मजबुत नाहीत. ऑनर किलींग च्या घटना महाराष्ट्रात अगदी सहा महिन्यांपुर्वीच्या असतील तरीही त्या अपवादात्मक आहेत ( असे मला वाटते ). त्याच या सिनेमात विनाकारण ग्लोरीफिकेशन करण्यात काही खास गरज नाही. चित्रपट प्रभावी माध्यम आहे. समाजमनावर जसे या माध्यमाचे चांगले परिणाम होतात तसे वाईटही होतात. चित्रपटाच्यामुळेच समाजात अनिष्ठ गोष्टी घडतात असे नाही. पण चोरीच्या घटनात चोरीचे प्लॅन चित्रपटातुन घेतले गेल्याचा उल्लेख कधी कधी चोरीच्या तपासात येतो.

ऑनर किलींग आमच्या मराठी समाजात सर्रास नाही ते उद्या बोकाळेल अशी उगाच भिती वाटते इतकच.

>>चित्रपट प्रभावी माध्यम आहे. समाजमनावर जसे या माध्यमाचे चांगले परिणाम होतात तसे वाईटही होतात.

वाईट लवकर होतात आणि जास्त होतात.

महाराष्ट्रातल्या ऑनर किलिंगची माहिती युनिक फीचर्सच्या ताज्या अंकात वाचायला मिळेल . अगदी वसंतदादा पवार यांच्या पासूनच्या घटना आहेत. अलका धूपकर यांचा लेख आहे .

जातीय राजकारण आणि समाजकारण सुरु झाल्यापासून आणि त्यांना जास्त प्रसिद्धी मिळायला लागल्यापासून, जरा जास्तच तेढ निर्माण झालीय. ( त्या त्या समाजाचे मेळावे, शिबीरे, संस्था, शाळा..वगैरे )

आणि मला हे लिहायचा अधिकार आहे कारण, आमच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून आंतरजातीय विवाह झालेत. सर्व प्रेमविवाह नव्हेत. त्यांचे उल्लेख आमच्या घरात कधीही अपमानाने वा उपहासाने झाले नाहीत.

नितिनचंद्रजी, महाराष्ट्रात तुलनेने कमी होत असेल, पण म्हणून ऑनर किलिंगचे भयाण वास्तव आपल्या आजूबाजूलाही आहे, हे नजरेआड करता येत नाही. मंजुळेंनी शेवटच्या दृश्यात त्याचे उदात्तीकरण नव्हे, तर अशा बिनबुडाच्या अन खोट्या अहंकारापायी होणार्या हत्यांचे फोलपण दाखवले आहे.
केवळ प्रतिष्ठेच्या अनाग्रहापायी एका चिमुकल्याचे आयुष्य उध्वस्त होते , हे पाहून अशा प्रकारची कृत्याबद्दल झालीच तर घृणाच निर्माण होईल. यात कोणीही सरळ बुद्धीचा माणूस उदात्तीकरण शोधणार नाही.

हृदय हेलावणार्या त्या दृश्यामुळे एखाद-दुसर्या दुजाभाव जपणाऱ्या मनास पाझर फुटला, अन आपल्याच मुलांवर आपण विनाकारण किती अन्याय करतो, याची जाणीव झाली तरी त्या दृश्याचे सार्थक होईल. कदाचित हाच उद्देश मंजुळेंनी ठेवला असावा.

सैराट -इफेक्ट‬ पहा घ्या आदर्श... पळून गेलेल्या जोडप्यास बोलावून घेऊन लग्न लाऊन दिले...!!

आष्टी : (10 मे, मंगळवार) आष्टी तालुक्यातील 'आष्टा' या गावातील एक जोडपे (मुलगी मराठा- मुलगा मातंग) सुमारे सहा महिन्यांपूर्वी प्रेम संबंधातून गावातून पळून जाऊन पुणे येथे स्थाईक होते.. सैराट पाहिल्यानंतर मुलीच्या भावाने गावातील ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा शोध घेऊन त्यांना बोलावून घेऊन (09 मे रोजी) रीतसर लग्न लाऊन दिल्याची घटना घडली आहे.. पंचक्रोशीतून या घटनेचे कौतुक होताना दिसत आहे..

त्यासोबत त्याच गावातील आणखी एक जोडपे (माळी-मुस्लिम) मुंबईला गेले आहे, त्यांना बोलावून घेण्याचे प्रयत्न मध्यस्थांकरवी चालू असल्याचे समजते...

Post by.. Harshal Jadhav
सैराट_इफेक्ट
https://www.facebook.com/nilesh.kalaskar2/posts/1076517249089238?pnref=s...

धन्यवाद सकुरा. नेमक्या कुठल्या गोष्टीचे उदात्तीकरण होतय, हे या बातमीने स्पष्ट झाले .

सकुरा चांगली सकारात्मक बातमी शेअर केलीत.
हा चित्रपट बघून कोणी आपल्या आंतरजातीय विवाह केलेल्या पोरीचा, बहिणीचा जीव घेईल ही शक्यता कमी आणि एखाद्याचा राग मावळेल हीच शक्यता जास्त वाटते.

Pages