जे कधी घडलेच नाही....

Submitted by वैवकु रीटर्न्स on 5 May, 2016 - 10:34

जे कधी घडलेच नाही ते घडावे वाटले
मी तुझ्या काट्यांविना उमलू शकावे..वाटले

आज मी दारात तो जांभूळ नाही पाहिला
खूप काही दाटले धो धो रडावे वाटले

तू उद्या येशीलही पण या इथे नसणार मी
वाट मग बघशील..ये जर आज यावे वाटले

अन् मनाची तल्खली जोमात वाढू लागली
बस् तुझ्या याज्ञातली समिधा बनावे वाटले

एक माझा शेवटीचा शेर तू समजून घे
जर तुला त्या विठ्ठलाला ओळखावे वाटले

~वैवकु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम गझल वैभवजी!

त्यातल्या त्यात,काळ्या-निळ्या जांभळाची प्रतिमा,आणि एक (साक्षीदार) झाड म्हणूनही वापरलेला जांभूळ खूप-खूप आवडला!विशेष उल्लेख करावाच असा!

_/\_

_/\_

छान

गजल आवडली!

अन् मनाची तल्खली जोमात वाढू लागली
बस् तुझ्या याज्ञातली समिधा बनावे वाटले>>'याज्ञातली' ऐवजी 'यज्ञातली' असे आहे का ?