Disney world

Submitted by गंगी on 4 May, 2016 - 16:02

Hi we r leaving for disney world trip for 8 days on this saturday.. Baki booking zalay ... Pan khanyache kaay karawe samjat naiye.. 7 diwas roj pizza burger fries khaun potachi waat lagel ase watay...
Ajun kahi changle option aahe ka sobat muli aahet 10 ani 13 yrs chya.
Rice cooker nyawa asa sagle suchawat aahe .. Pan kadhi nela nahi .. Kunala anubhav aahe ka
Rice cooker cha .. Please suggest..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिस्ने वर्ल्ड्च्या बाहेर किसेमीला बरीच हॉटेल (खानावळी) आहेत. काही भारतीय दुकानेही आहेत.
गाडीची सोय असेल, किंवा टॅक्सीने जाण्याची तयारी असेल तर काहीच प्रश्न नाही.
Rice cooker कधी नेला नाही. पण तसं करणार असाल तर मग पॅक जेवणाची पॅकेट मिळतात इकडे (शिजवून तयार). गरम पाण्यात किंवा मायक्रोवेव मधे गरम करता येतील.. ती बरोबर घेऊन जा..

लंच चा काही प्रॉब्लेम यायला नको, कारण डीस्ने च्या आत एक चायनिज रेस्त. आहे, ते तिकडच्या भारतिय पेक्षाही चांगले आहे, असा अनुभव आला होता.
तिकडे क्लिअर सुप, राईस, फ्राईड राईस इत्यादी आहे. भारतिय पेक्षा चायनिज खाणे बरे, पोटाला त्रास नाही.
पण ८ दिवस जात असाल तर राईस कुकर घेऊन जा, त्यात बटाटे, भात इ. शिजवता येते, नूडल्स पण! आणि भारतिय हॉटेल जवळपास नसलेलं ठिकाण आजकाल खूपच दुर्मिळ Happy
हॅप्पी जर्नी!

घेउन जा rice cooker. it helps. आम्ही तर electric griddle ही नेल होतं .. त्यावर frozen पराठे, bagels भाजुन खाता येतात breakfast साठी :). . आम्ही by road गेलो होतो.

electric griddle ची युक्ती छान.
आम्ही खुप पुर्वी एकदा electric rice cooker नेला व भारतीय दुकानातुन कॅनमधे मिळणार्‍या तयार भाज्या नेल्या. त्या गरम करायला साधन नसल्याने भात तयार झाला की त्यावर कॅन कापुन भाज्या पसरल्या की गरम झाल्या. चालुन गेले ते. त्याचप्रमाणे नुसताच भात करण्याऐवजी तांदुळ व मूगडाळ थोडे मीठ व मसाला घालुन शिजवायचे व मग भाज्या शेवटी पसरायच्या. ते पण चालले. फक्त कॅनच्या भाज्या योग्यायोग्य ते ठरवावे.