तू भले करशील माझे

Submitted by वैवकु रीटर्न्स on 27 April, 2016 - 03:04

तू भले करशील माझे , मानतो आहे
अन तुझ्या मर्जीप्रमाणे वागतो आहे

ज्यांमुळे झाली मनाची राखरांगोळी
मी अश्या सार्या अपेक्षा जाळतो आहे

केवढ्या दिवसात नव्हतो या इथे आलो
हा इलाका आज परका वाटतो आहे

जेवढा सांडून द्यावा कागदावरती
तेवढा कचरा मनावर साचतो आहे

जोसुद्धा रस्ता तुझ्यासाठी धरू जावा
तो मला माझ्याचपाशी आणतो आहे

ही धरा,आकाश,पाणी,ऊन हा वारा
मी तुला सगळ्या ठिकाणी पाहतो आहे

~वैवकु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

Nice