कोहळ्याची भाजी !

Submitted by दिनेश. on 25 April, 2016 - 11:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
४ जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत: 
पारंपरीक दाक्षिणात्य पदार्थ आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाजी फारशी उत्साहवर्धक दिसत नाहीये दिनेश. म्हणजे चवीला लागत असेल चांगली, पण अ‍ॅपिअरन्सवरून मेसमधल्या एकजात सगळ्या भाज्या आठवल्या Sad
शिजून अगदी मेण होतं का फोडींचं? त्याला हरभ-याचं व्यंजन का घालतात?
दुधी आणि कोहळ्याच्या चवीत फरक काय असतो?

वेगळा प्रकार. मस्त दिसतेय.

मी पीठ पेरून, चणा डाळ घालून केलीय पूर्वी किंवा कोहळा दुसऱ्या रस्सा भाजीत घुसवायचे, पण फार पूर्वीची गोष्ट. हल्ली कित्येक वर्षात आणलाच नाहीये. हा जरा चवीने पांचट असतो. पण हलवा मस्त होतो.

हो सई, उडपी हॉटेलच्या थाळीत बरेचदा असते हि भाजी. फोडी बेताच्या शिजवल्या तर मेण होत नाही.
कडधान्याने प्रथिनांची भर होते. दूधी ला जो एक प्रकारचा वास येतो, तो कोहळ्याला नसतो.

अन्जू, खरे तर कुठल्याही रसभाजीत तो ढकलावा एवढा गुणी आहे. कढीतही वापरता येतो.

इंटरेस्टींग वाटत आहे रेसिपी.

मी स्वतःहून कोहळा (कोहोळा की कोहाळा? :)) कधीच आणला नाही. माझी आई वड्या करायची कोहळा घालून त्या मात्र भारी आवडायच्या मला. ही वाटाणे घालून भाजी करायची आयडीया आवडली. करून बघेन पण बहुतेक गोडा मसाला घालून किंवा मग मँगलोरी धने, ओलं खोबरं, मिरची हे वाटण घालून.

दिनेशदा आता नक्की आणेन कोहळा, तुमच्या रेसिपीज वाचून आठवण झाली, आता कोहळा आणायलाच हवा. निदान खीर तरी करेन आणि कढीत नक्की घालेन.

कोहळ्याचा फोटो टाका ना.

मी ही भाजी (दुधीची) हरबर्याची डाळ घालुन करते. आवडली कधीच नाही पण २ आठवड्यात एकदा होते.

वर्षभर मिळणारी भाजी आहे ही.. खरेच खायला हवी,
आदिती..कोहळ्याची खीर लिहिलीय.. तिथे फोटो आहे कोहळ्याचा.
मला नक्की आठवत नाही, पण अश्या प्रकारे केलेल्या भाजीला कोदोल, असे काहीसे नाव आहे.