कॉफी पेंटींग्स

Submitted by अंतरा on 16 April, 2016 - 14:24

खूप दिवसांनंतर पुन्हा एकदा केलेले कॉफी पेंटींग्स
p1.jpgp2.jpgp3.jpgp4.jpgp5_0.jpg

आणि हे कॉफी पेंटींग हँड्मेड पेपर वर

p7.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा.. काय नजाकत आहे ... पहिल्या चित्रातून तर मला ब्रिंदावनी सारंग ऐकू आला !
अंतरा या चित्रांवर कृपया तूमची सही करा. आणि इथे टाकताना वॉटर मार्क टाकत जा.

फारच छान ! कमाल आहे !! पहिल्या चित्रातल्या रेषाही गतीमान आहेत !!
[ एक बालीश प्रश्न - फक्त कॉफीच्याच रंगाच्या वेगवेगळ्या छटा वापरतां येतात कीं इतरही कांहीं रंग मिसळणं शक्य व 'परमिसीबल'असतं ? ]

प्रतिसादा बद्दल सगळ्यांना धन्यवाद.

मी आतापर्यंत वॉटरमार्क बद्दल विचारच केला नव्हता. केला पण आता नक्की करेन.पण, वॉटरमार्क / सही चित्रावर कसे टाकायचे हे शोधायला लागेल.
कॉफी पेंटींग = कॉफी +पाणी इतकेच शिकले होते मी हॉबी क्लास मध्ये. पण कॉफी मध्ये पाण्या बरोबर दुसरे रंग मिसळता येत असतील . मी अजून तसा प्रयत्न नाही करून बघितला कारण कॉफी कलर खूप रॉयल / सुंदर वाटतो आणि मला खूप आवडतो.त्यामुळे कधी त्यात दुसरा रंग मिसळावा असे वाटले नव्हते . पण तसा प्रयोग करून बघावा असे आता वाटते आहे.

<< कारण कॉफी कलर खूप रॉयल / सुंदर वाटतो आणि मला खूप आवडतो.त्यामुळे कधी त्यात दुसरा रंग मिसळावा असे वाटले नव्हते>> सहमत. मीं फक्त कुतूहल म्हणून विचारलं होतं इतकंच.

अंतरा, या कलाकृती खुप म्हणजे खुपच सुंदर आहेत. नेटवर टाकल्यावर त्या इतर माध्यमातून शेअर केल्या जाणारच. अनेकांनी या बघाव्यात यात गैर काहीच नाही, पण त्यासोबत कलाकार म्हणून तूमचेही नाव जोडले जावे. असे मला मनापासून वाटते.
वॉटर मार्क तूम्ही अगदी पेंट ब्रश वापरूनही टाकू शकता. ( इथेही माहिती मिळेल ) पण ते कराच नक्की.

खूपच सुंदर कलाकृती..
वॉटरमार्क बद्दल सहमत. लवकरात लवकर करा.

वॉटर मार्क बद्दल सहज समझेल अशी माहिती कुठे मिळेल? त्यासाठी कुठले सॉफ्टवेअर वापरतात हे कोणी सांगू शकेल का?

Wow ! Beautiful is an understatement ......... Amazing.....Superb !

Pages