ऊन

Submitted by जाई. on 13 April, 2016 - 02:45

ऑफिसातला एक नेहमीचा दिवस . कटकट करणारे सीनियर्स , नेहमीच्या डेडलाईनची रडारड , एसीची गोठलेली हवा , या सर्वात डोक्यात प्रश्नांचं भेंडोळ जमलेल असताना चेहऱ्यावर दिसू न देण्याची कॉर्पोरेट कसरत करत असलेले आपण . एका क्षणी डोक्यातल काहूर चेहऱ्यावर पसारायला सुरुवात होते. स्क्रीन धूसर दिसू लागते . डोळे जड होतात . पटकन फ्रेश होऊन येण्याच्या नावाखाली पाऊले वॉशरूमची वाट चालू लागतात . पण तिथून येऊनही काही होत नाही . सुरुवातीचं लो फिलिंग आता सिंक होऊनच थांबणार काय इतपत प्रकरण येतं .

आणि तेव्हाच टिंग टॉंग होतं .

फोन आपल्याच मातोश्रींचा असतो जीच्याबरोबर सकाळी पेल्यातल्या वादळाची नांदी झालेली असते . ह्म्म्म असा मनाशीच बोलून फोन उचलला जातो . पलीकडून प्रेमळ आवाज येतो . पेल्यातल वादळ अजूनही आपल्या डोक्यात असतंच . त्यामुळेच पलीकडच्या आवाजात एक आर्जवयुक्त सावधानता असते . ( इतक्या वर्षात माता आपल्याला ओळखू लागलेली असतेच . शेवटी तिचीच नाळ वगैरे ) आपल्या धुमसत्या बाळाने परत राख घालून घेऊ नये म्हणून योग्य ती खबरदारीने बोललं जातं . त्या मूळच्या प्रेमळ आवाजामुळे आपल्याही चेहऱ्यावर हळूहळू दुधाची साय पसरत जाते . एकदम झाले मोकळे आकाश फिलिंग येतं . नकळत बर वाटायला लागत . हवं असलेलं विचारून फोन ठेवला जातो.
इथे मात्र आपल्या मनात श्रावणाच मोकळं , स्वच्छ , लख्ख ऊन पसरलेलं असत ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sundar!!!! Sanhat anubhav! Anubhav ha kiti vela ghetlela aahe. Aaicha awaj phone wr aikla ki sagla thik aahe as watta. Happy

छान!

स्वीट टॉकर , छान प्रतिक्रिया .. आवडली >>> +१

जाई आवडलंच. अगदी वाक्य अन वाक्य रिलेट व्हावं, आपलं वाटावं प्रत्येकाला.. या पेक्षा लेखिकेने जिंकावं तरी किती?
जियो! मैत्रिण वर आधी वाचलं मग इथे. तू टाकल्यापासून कितीदा वाचलंय ते आठवत नाही. प्रतिक्रिया काय द्यावी ते कळत नव्हतं नुसत्या छान पेक्षा जास्त काही तरी वाटत होतं म्हणून इतके दिवस प्रतिक्रिया दिली नव्हती. आज दिलीच ! Happy