शेवग्याच्या शेंगांची भाजी

Submitted by दिनेश. on 8 April, 2016 - 07:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांना पुरेल
अधिक टिपा: 
माहितीचा स्रोत: 
माझेच प्रयोग आणि अर्थात आईने दिलेले प्राथमिक धडे
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश, काल दिवसभर "शेवगा' मनात रुंजी घालत होता. कारण असं की माझ्या कडे शेवग्याची ३ झाडं आहेत. तीनही सध्या फुलांनी बहरलेली आहेत. अगदी पहिला बहर आहे. फुलांची भाजी करतात असं ऐकून होते म्हणून काल तूनळीवर रेसिपी शोधली. मग झाडावरुन बरीच फुलं खुड्ली. आता आज फुलांची भाजी करणार.

आज तुमची ही शेंगाची रेसिपी वाचली. ह्याभाजीचा प्रयोग करायला शेंगा येण्याची वाट पहायला लागणार.

काय हा अत्याचार दिनेशदा ........

अशी भाजी खाल्ली नाही. पण शेवग्याची शेंग म्हणजे चवीची अद्भुत अनुभूती. तिखट डाळीत, वांगे बटाटा सुकट या रस्यात अहाहा. .......

बादवे काही ठिकाणी याला डांब म्हणतात.

छान असावी रेसिपी.
' आज काय बेत करावा ?', या गृहिणीना सतावणार्‍या प्रश्नाचं टिपीकल कोकणी उत्तर - भरपूर कांदा घालून केलेलं कुळीथ-शेंगाचं 'पिठलं' !!!

मस्त! शेवगा प्रिय, ही भाजी नक्की केली जाईल आता.

भाऊ, शेवगा-कुळथाचं पिठलं! काय जबरी आठवण काढलीत. शेवग्याचं साधं पिठलंही कसलं बहारीचं लागतं Happy

छान! शेवग्याची शेंग सांबार - आमटी - कढी - पिठले यांमधे वापरतात. परंतु याखेरीज ती स्वतंत्र भाजी म्हणूनही वापरली, खाल्ली जाऊ शकते हे माहीत नव्हते.

काही झाडांच्या शेंगा मूळातच गोड चवीच्या असतात. तशा मिळाल्या तर गोडासाठी काही वेगळे घालावेही लागत नाही. माझ्या आठवणीत मुरुडला अश्या शेंगांची खुप झाडे आहेत. ( आपल्या जागू च्या परसातही आहे. )

<< काही झाडांच्या शेंगा मूळातच गोड चवीच्या असतात. >> मालवण-देवबाग परिसरात रेताड जमीनीतल्या झाडांच्या शेंगाना सुंदर स्वाद असतो.

हो भाऊ, मालवणला बहुतेकांच्या परसात हे झाड असायचेच. कृष्णाष्टमीला याच्या पानाची भाजी करायची, मग मात्र नाही करायची, ती थेट नवीन पालवी येईपर्यंत. असा दंडक होता.

<< कृष्णाष्टमीला याच्या पानाची भाजी करायची, >> कोकणात आमच्याकडेही करत. कधींतरी खायला त्याची तुरट-कडवट चव छान लागायची, मुंबईत आतां दादरच्या कबुतरखान्याकडे बसणार्‍या भाजीवाल्यांकडे दिसते ही पालेभाजी. कधीतरी आणून बघायला हवी.

भाऊ, आपण विसरलो या भाजीला. पण याच पानाची पावडर, मल्टी व्हीटॅमीन पावडर म्हणून विकतात. मी चक्क विमानतळावर विकत घेतली ती !

इथे सिंगापुरात तमिळ स्त्रिया शेवग्याचा शेंगा, फुले, पाने/पाला सगळ काही वापरतात. पाने/पाला ओरपायला मला अजून नाही जमत.

मी ही भाजी तमिळ सांभार असतो तशी करतो. कुळथाची कल्पना मस्त आहे.

शेवग्याच्या फुलांचीपण पीठ पेरून भगरा भाजी करतात आमच्या सासरी. मी खाल्ली नाही अजून. पण पानांची नाही करत सासरी. मी सांगितलं तीपण करत जा.

छान! शेवग्याची शेंग सांबार - आमटी - कढी - पिठले यांमधे वापरतात. परंतु याखेरीज ती स्वतंत्र भाजी म्हणूनही वापरली, खाल्ली जाऊ शकते हे माहीत नव्हते.>>>>> अरुंधती, माझ्या साबा या शेंगांची भाजी करतात. शेवग्याच्या शेंगांचे आधी छोटे तुकडे करुन घ्यायचे. ते थोड्या पाण्यात मीठ घालुन शिजवुन घ्यायचे. एक मोठा कांदा गॅसवर साला सकट भाजुन घ्यायचा. ओले खोबरे नसेल तर सुक्या खोबर्‍याचा तुकडा पण तसाच भाजुन घ्यायचा. नंतर भाजलेला कांदा, खोबरे ( ओले खोबरे असेल तर तो चव चमचाभर तेलात कढईत भाजुन घ्यायचा ), ३-४ लसुण पाकळ्या घालुन मिक्सरमध्ये वाटुन घ्यायचा. तेलाची नेहेमीसारखीच फोडणी करायची. त्यात आधी वाटण घालुन मग शेंगा घालायच्या, परतायच्या. मग बेतास पाणी घालुन उकळावे, त्यातच तिखट, मीठ,( आधी शेंगा शिजताना घातलेले असल्याने जपुन घालावे) साखर चवीनुसार घालावी. ( साखर ऑप्शनल आहे) रस्सा तयार!

सॉरी दिनेशजी इथे याची कृती दिल्याबद्दल. पण मला त्या वाटणापेक्षा तुमची पद्धत जास्त आवडली, कारण सोपी आहे. आणी डिश मध्ये सजलेली भाजी पण तोंपासु आहे.

बी, शेवग्याच्या शेंगाची मूळे पण खातात तामिळ लोक. लांबट तूकडे करून सुकवून ठेवतात.

रश्मी.. मी पण करुन बघेन हि. कोकणात भरपूर ओले खोबरे घालूनही करतात.