यंदाची पाणी टंचाई एक समस्या - आयपीएलच्या निमित्ताने ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 April, 2016 - 13:37

खरे तर आयपीएल हा काही माझ्या फारसा आवडीचा प्रकार नाही. क्रिकेट बघायला आवडते म्हणून हा तमाशाही बघतो, क्रिकेटवर चर्चा करायला आवडते म्हणून या सर्कशीवरही चर्चा करतो. मागे माझ्या रंगपंचमीच्या धाग्यावर कोणीतरी क्रिकेटसाठी होणार्‍या पाण्याच्या नासाडीचा विषय काढलेला आणि मला यावरही धागा काढायला सुचवले होते. पण एक क्रिकेटप्रेमी म्हणून हा धागा काढण्यास मी मनापासून उत्सुक नव्हतो.

पण आज पेपरात हेडलाईन वाचली की याच कारणासाठी ‘लोकसत्ता मूव्हमेंट’ या संस्थेने आयपीएलविरुद्ध जनहित याचिका केली आहे. बातमीतले आकडे खरेच प्रचंड होते. यावेळी मुंबईसह पुण्याचा संघही असल्याने मुंबई, पुणे, नागपूरमध्ये मिळून तब्बल २० सामने महाराष्ट्रात होणार आहेत. आणि या सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करताना ६०-६५ लाख लीटर पाणी वापरले जाणार आहे. ईतर पाणी वेगळेच. एकीकडे स्विमिंग पूल आणि रिसोर्टमध्ये होणार्‍या पाणीवापराबद्दल सरकारला जाग आली असताना मनोरंजनाच्या या प्रकाराकडे केवळ यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा गुंतला आहे आणि मोठमोठी नावे यामागे आहेत या कारणास्तव सरकार कानाडोळा करत आहे. आम्ही गल्ली क्रिकेट खेळणारे असल्याने पाण्याचा एवढ्या वापराबद्दल कल्पना नव्हती. जर खरेच एवढे पाणी वाचणार असेल तर आयपीएलमध्ये वीस सामने कमी झाले तरी चालतील किंवा जर रद्द करणे जमत नसेल तर ते महाराष्ट्राबाहेर जिथे मुबलक पाणी आहे तिथे हलवण्याचा पर्यायही उपलब्ध आहेच. कारण यंदाही पावसाने पाठ फिरवली तर परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते. पाण्याने आपली किंमत दाखवायला सुरुवात केली तर कित्येकांचे क्रिकेटप्रेम क्षणात नाहीसे होईल..

संबंधित बातम्या -
http://www.loksatta.com/mumbai-news/hearing-on-ipl-matches-in-maharashtr...
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/ipl-water...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>तुमचं म्हणणं असं आहे कि रिसायकल्ड पाणी ग्राउंड साठी वापरलं जातं.
परत तेच..... बहुतांश शब्द विसरताय राव तुम्ही.... वानखेडेवर पण त्यांनी बोअर मारण्याचा प्रयन्त केला पण पाणी लागले नाही!

फारएंड..... उत्तम पोस्ट!

लोक इथे भावनेच्या भरात वाहून जाउन मोठमोठ्या पोस्टी चिकटवतायत पण मुळात सामने होवोत न होवोत मैदाने मेंटेन करायला लागणाऱ्या पाण्यात फारसा फरक पडत नाही हे या लोकांना कसे समजवावे..... आता मुळात मैदाने मैंटेनच करु नका असा आग्रह असेल तर मग आयपीएलच्या नावाने ओरडा करु नका!

धाग्याचे नाव बदला आणि चालू द्या चर्वितचर्वण!

पुढच्या वर्षीच्या स्पर्धेचे प्लॅनिंग त्यावरून आत्ताच करावे लागेल. >> प्लॅनिंगबाबत तिथेच लिहीलेले आहे. प्लॅनिंग करताना राज्याचे पाणी धोरण लक्षात घ्यावे लागेल हे न्यायालयाने नोंदवलेले आहे. तर या सीझनमधे राज्यात पाण्याचा दुष्काळ अस्सतो हे गेल्या कैक वर्षाचे रेकॉर्ड ध्यानात घ्यायला हवे असे मला वाटते.

प्लॅनिंग करताना यातले काहीच ध्यानात न घेता तारखा जाहीर केल्या तर त्यंच्या चुकीला इतर जबाबदार कसे ? नंतर या तारखा खूप आधी ठरलेल्या आहेत असा कांगावा करण्याला अर्थ नाही. गेल्या वेळीही२, बहुतेक २०१३ ला, असाच कांगावा केला गेला होता. आधी म्हटल्याप्रमाणे आयपीएल धोक्यात येते कि काय या भीतीने दुष्काळाकडे सरकारचे लक्ष गेले हा खरा आउटपुट आहे.

स्वरुप >> तुम्ही लोकांचा अभ्यास काढताना प्रोसेस्ड वॉटर वापरले जाते अशी माहिती इथे दिली होती. त्याबद्दल तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर दिलेत तर पुन्हा तुमच्यावर भावनेत डुबलेल्या मोठमोठ्या पोस्टी वाचण्याची वेळ येणार नाही. तुमच्यासाठी पुन्हा तेच इथे लिहीण्यात अर्थ नाही.

फारेंड, रोजगाराचा मुद्दा पटण्यासारखा आहे पण मग त्याचबरोबर आयपीएलमधील घोटाळे, ललित मोदींसारख्यांनी लावलेला चुना, यात गुंतलेला काळा पैसा, बेकायदेशीर बेटींग सारखे गैरप्रकार, मूठभर लोकांनी खोर्याने पैसा कमावणे, आयपीएलच्या नादाला लागून प्रेक्षकांची कमी होणारी प्रॉडक्टिविटी वगैरे बरेच गोष्टींचा उहापोह यात करावा लागेल. अर्थात माझे अर्थशास्त्राचे ज्ञान शून्यच आहे. याऊपरही आयपीएल ही फायद्याचीच असेल तर मुद्दा योग्य आहे.

बाकी पाकिस्तानशी वरचेवर क्रिकेट खेळण्यातही बरेच पैसा आणि रोजगार आहेच. म्हणून तर आपण राष्ट्रकुल स्पर्धांना महत्व न देता बीसीसीआयचा संघ म्हणत पाकिस्तानशी खेळणे पसंद करतो. पण आता मात्र ते बंद झालेय कारण पैश्यापेक्षाही महत्वाचा देशप्रेमाचा मुद्दा उपस्थित झालाय. तो देखील वादातीत नाहीये, कारण जेव्हा केव्हा भारतपाक आमनेसामने येतात तेव्हा ते सामने सारेच एंजॉय करतातच.

तसे नाही ऋन्मेष - फक्त रोजगाराचा प्रश्न नाही. तो ही आहेच पण फक्त तेवढाच नाही. आयपीएल शी संबंधित असलेल्या सर्व उद्योगधंद्यांच्या उत्पन्नाचाही प्रश्न आहे. वरती मी म्हंटलेच आहे की पाण्यापेक्षा मोठा नसेल, पण ती बाजूही आहे एवढेच.

रतन खत्रीचा मटका बंद करू नका कारण त्यामुळे अनेकांचे पोट भरते असा युक्तीवाद झालेला आहे हे आज खरे वाटणार नाही. डान्सबारच्या बाबतीत याच मुद्यावर डान्सबार असोसिएशन न्यायालयात गेली होती. रोजगार मिळणे हा मुद्दा असला तरी असे उद्योग चालवताना सामाजिक भान, परिस्थितीचे भान, संबंधित राज्याचे धोरण याची जाणीव ठेवण्याची जबाबदारी न्यायालयाची किंवा न्यायालयात जाणा-यांची असू शकते का ?

अशा इव्हेन्टचा कार्यक्रम आखताना जनतेला कल्पना थोडेच असते ? त्यामुळे कार्यक्रम आखताना किंवा स्पर्धेचे नियोजन करतांना काय चुका केल्यात हे जनतेला जेव्हां कळेल तेव्हांच त्याबाबत दाद मागितली जाईल. त्यामुळे बंदी (जी आली नाही) आलीच तर त्यासाठी जबाबदार हे पूर्णपणे संयोजक असले पाहीजेत. आयपीएल सारख्या स्पर्धांमधे ज्यांना कंत्राटं मिळतात ती काही खुल्या स्पर्धेत मिळत नाहीत. ओळखीने किंवा वशिल्यानेच मिळतात. स्टेडीयमच्या बाहेर काहीही विकण्यासाठी हात ओले करावे लागतात. पार्किंगचं कंत्राट माझ्या भावाने एकदा एकदा एका सुशिक्षित बेरोजगारासाठी मिळवून द्यायचा प्रयत्न केला होता. पण ते मिळाल्यावर एकदा सेनेचे लोक हप्ता मागण्यासाठी आणि एकदा दोन तीन नगरसेवक कंत्राट आमच्या माणसाला मिळायला पाहीजे हे सांगायला आले होते. ज्याला कंत्राट मिळायला पाहीजे असं त्यांचं म्हणणं होतं त्या माणसाचे पुण्यातल्या अनेक मॉल्स, हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस, बस स्टॅण्ड अशा ठिकाणी पार्किंग स्टॅण्ड्स आहेत. एक दिवसासाठीही इतर कुणाला हा धंदा मिळू नये यासाठी त्या पक्षाचे लोक जागरूक असतात.

तरी सुद्धा रोजगार महत्वाचा आहे हे कबूल. पण तो न मिळाल्याने कायमस्वरुपी व्यवस्था बुडते असे वाटत नाही. फेरीवाले सिग्नलला इतर दिवशी असतातच. एक दिवसाचे उत्पन्न बुडू नये म्हणून आयपीएलला कुठल्याही परिस्थितीत (राज्याचे पाणीधोरण, दुष्काळी परिस्थिती लक्षात न घेता पाण्याची उधळपट्टी सहीत) परवानगी मिळावी हा युक्तीवाद तितका सशक्त वाटत नाही.

फेसबुकवर नीलेश कमलकिशोर हेडा या तरुणाने पाणी , पाणीटंचाईला वाहून घेतलेले आहे. त्याच्या फेसबुक वॉलवर त्याने केलेले प्रयत्न, भरपूर शास्त्रीय माहिती वाचायला मिळू शकेल.

दुष्काळासंदर्भात चिंतन शिबीर आयोजित केलेले आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर हजेरी लावावी. या शिबिराशि संबंधित कुणी मायबोलीवर असतील त्यांनी अधिक माहिती इथे द्यावी ही विनंती.

https://www.facebook.com/photo.php?fbid=10208758002365621&set=a.11910847...

मराठीमधे

श्रमसंस्कार व युवक युवती चिंतन शिबीर – २०१६
विळेगाव, ता. कारंजा, जि. वाशिम
दिनांक – ६ – ७ – ८ मे २०१६
प्रिय नवयुवक मित्र आणि मैत्रिनींनो,
गेल्या तब्बल ३ वर्षांपासून महाराष्ट्रात सततचा दुष्काळ आहे. ह्या नैसर्गिक दुष्काळाला मानवी नियोजन अभावाची किनार सुद्धा आहे. सोबतच ग्रामीण जीवनातील बदलत्या संदर्भात ग्रामीण जीवनाच्या बाबतीत चिंतनाचा सुद्धा अभाव आहे. या दृष्टीने श्रमाच्या बाबतीत विधायकपणे विचार करण्यासाठी, प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आणि शेती, जंगल, गायराण, पाणवठे, नद्या, लोक आणि शासकीय पैलूंच्या बाबतीत शाश्वत धोरण ठरवण्यासाठी विदर्भातील एका दुष्काळी गावात ३ दिवसांचे एक निवासी शिबीर आयोजीत केल्या जात आहे. या दरम्यान एका अतीषय महत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला चिंतनाची सुरुवात सुद्धा करायची आहे (भारतातील वर्तमान चिंतनाची दिशा भरकटते आहे काय? आम्हाला अमूक प्रकारचा विचार करण्यासाठी बाधीत केल्या जात आहे काय? अशा वातावरणाचा ग्रामीण समस्यांच्या चिंतनावर काय विपरीत परिणाम होतो आहे? एक व्यक्ती म्हणून माझी भूमिका काय? इत्यादी).
या शिबीरात स्थानीक गावक-यांसोबत एका तलावाच्या निर्मितीचे कार्य आपल्याला हाती घ्यायचं आहे तसेच बदलत्या सामाजीक परिपेक्षात आणि देशात सुरु असलेल्या वेगळ्या प्रकारच्या चर्चेच्या वातावरणामध्ये नवयुवक युवतींसमोर असलेल्या आव्हानांवर सुद्धा चर्चा घडऊन आनायची आहे. यात सकाळी दिड तास आणि संद्याकाळी दिड तास श्रमदानाची अपेक्षा आहे. उरलेल्या वेळात चर्चा, सांस्कृतीक कार्यक्रमाच्या आयोजनाचे नियोजन आहे.
विळेगाव या १२०० लोकवस्तीच्या गावामध्ये निवासाची, भोजनाची साधी व्यवस्था आम्ही करणार आहोत, प्रवासाची व्यवस्था सहभागींनी करावी अशी अपेक्षा आहे.
सहभागींनी दिनांक ५ मे रोजी सायंकाळ पर्यंत (किंवा ६ मे ला सकाळ पर्यंत) पोहोचणे अपेक्षीत आहे आणि शिबीराचा समारोप दिनांक ८ मे रोजी दुपारच्या जेवनानंतर करण्यात येईल. शिबीरातील बौद्धीक सत्राकरीता विविध क्षेत्रातील विचारक, कार्यकर्ते इत्यादींना सुद्धा आपण आमंत्रीत करणार आहोत.
कसे पोहोचावे –
• बडनेरा रेल्वे स्टेशन वरुन येणा-या शिबीरार्थ्यांनी अमरावती कारंजा या बस ने कामरगाव येथे उतरावे. कामरगाव वरुन विळेगाव केवळ ३ कि.मी. आहे. कामरगाव वरुन विळेगाव येथे जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
• मुर्तिजापूर/अकोला रेल्वे स्टेशन वरुन येणा-या शिबीरार्थ्यांनी अकोला कारंजा/यवतमाळ या बस ने खेर्डा येथे उतरावे. खेर्डा वरुन विळेगाव केवळ २ कि.मी. आहे. खेर्डावरुन विळेगाव येथे जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
• सरळ कारंजा येथे येणा-या शिबीरार्थ्यांना नेण्याची व्यवस्था करण्यात येईल.
व्यवस्थेच्या दृष्टीने आपली नाव नोंदणी आगाऊ करावी. जे शिबीरार्थी आनलाईन नोंदणी करु शकतात ते खालील लिंकवर सुद्धा करु शकतात.
https://docs.google.com/…/1CL2v1uWzb3wCy4T4gaVgbls0…/prefill
अधिक माहिती साठी Log on करा – www.samvardhan.org.in
संवर्धन समाज विकास संस्था, कारंजा लाड, जि. वाशिम ४४४१०५
सहभागी होण्याकरीता संपर्क करा
• डा. निलेश हेडा (९७६५२७०६६६)
• गणेश सावरकर (९९२२६९२८२०)
• अरविंद कानकिरड (९७६७४५२२९८)
• ज्ञानेश्वर ढेकडे (७५८८७६२१०१)
• प्रविण ढेकडे (९७६५७७४८५१)
• जयश्री खाडे (९७६३६५४८८०)

नीलेश हेडा.

या तरुणाने एका गावात कोरड्या पडलेल्या विहीरीच्या पुनर्भरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी निधी पाठवला आहे. कुणाला पाठवायचा असल्यास त्याच्या वॉलवर पाहून पाठवू शकता. फक्त बोलणे यापेक्षा अधिक काहीतरी हे त्याचे वैशिष्ट्य. त्याच्या प्रयत्नांना साथ मिळत गेली तर दुष्काळाच्या आव्हानाचा सामूहीक रित्या करता येईल. एकट्या दुकट्याचे किंवा निव्वळ सरकारचे काम नाहीच हे.

लातुरात सरासरी ६६६ मी.मी. पाऊस पडतो. ६६६ मी.मी. इतक्या प्रचंड पावसाचं डोकं लाउन नियोजन केलं तर कधीच दुष्काळ पडणार नाही (एखाद्या वर्षी सरासरीच्या २५ टक्के जरी पाउस पडला तरी निभाऊन नेता येईल!). पण एकुणच वर्तमान महाराष्ट्राला पाण्याचं नियोजन जमत नाही. महाराष्ट्रातील नेत्यांच्या डोक्यात पाण्याचं नियोजन म्हणजे मोठी धरनं बांधनं किंवा अतितटीच्या काळात टॅंकर (आता रेल्वे!) ने पाणी पुरवनं. पाण्याच्या बाबतीत आपण अत्यंत माजोरडे लोक आहोत. आपल्याला मारवाड प्रांताच्या तुलनेत निसर्गानं भरभरुन दिलेलं असूनही आपण त्याची कदर करत नाही. दळणवळनाच्या सुविधांमुळे दिल्ली वरुन पाणी आनुन पाजण्याचा निकटगामी उपाय जरी स्तुत्य असला तरी हा पायंडा पडत जाणे महाराष्ट्रासाठी अतीषय घातक ठरणार आहे. मला माहित आहे पाउस पडला की आपण सगळे जुणे घाव विसरणार आहोत.
***********************************************************************************कारंजा शहरात जोरदार विकास सुरु आहे. मोठमोठे सिमेंट चे रोड बनत आहेत. असाच एक चौपदरी रोड पारंपरिक "सारंग तलावाच्या काठावरुन" बनवल्या जात आहे. अक्षरश: हजारो वर्ष जुना सारंग तलाव मात्र काही वर्षांचाच सोबती आहे. अतिक्रमणाचा मोठाच विळखा त्याला बसला आहे. ज्या समाजात तलावावर दुर्लक्ष करुन रस्ता हा विकासाचं प्रतिक बनतो त्या समाजाच्या प्राक्तनात केवळ आणि केवळ दुष्काळच लिहलेले असतात!
**********************************************************************************
अंगणात ताटात ठेवलेलं पाणी दिवसभरात ३ से.मी. ने कमी होतं असा काल प्रयोग केला. राजेंद्र सिंह साद्या भाषेत सांगतात, "सुरज पाणी का सबसे बडा चोर है, उस पाणी को जमीन के पेट में रखो (Aquifer), जमीन पेड पौधों से ढक दो तो सुरज चोरी नही कर पायेगा."
***********************************************************************************
काही वर्षांपासून महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेचा पूर्ण भर हा विहरींवर आहे. विहरीच्या खोदकाम म्हणजे वैयक्तीक लाभाची योजना. ही घेतांना प्रचंड भ्रष्टाचार केल्या जातो सोबतच भुरट्या नेत्यांचं सुद्धा भलं होतं. पण यात जलसंधारणाचा विचारच नसतो. सोबतच विहरींच्या कामावर केवळ पुरुषच असल्या कारणाने स्त्रि वर्गाला काम मिळण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्र हे राज्य रोजगार हमीच्या योजनेची जननी आहे आणि वर्तमान काळात आपणच या योजनेचा आत्मा काढून घेतला आहे.
**********************************************************************************
निलेश हेडा

Pages