यंदाची पाणी टंचाई एक समस्या - आयपीएलच्या निमित्ताने ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 April, 2016 - 13:37

खरे तर आयपीएल हा काही माझ्या फारसा आवडीचा प्रकार नाही. क्रिकेट बघायला आवडते म्हणून हा तमाशाही बघतो, क्रिकेटवर चर्चा करायला आवडते म्हणून या सर्कशीवरही चर्चा करतो. मागे माझ्या रंगपंचमीच्या धाग्यावर कोणीतरी क्रिकेटसाठी होणार्‍या पाण्याच्या नासाडीचा विषय काढलेला आणि मला यावरही धागा काढायला सुचवले होते. पण एक क्रिकेटप्रेमी म्हणून हा धागा काढण्यास मी मनापासून उत्सुक नव्हतो.

पण आज पेपरात हेडलाईन वाचली की याच कारणासाठी ‘लोकसत्ता मूव्हमेंट’ या संस्थेने आयपीएलविरुद्ध जनहित याचिका केली आहे. बातमीतले आकडे खरेच प्रचंड होते. यावेळी मुंबईसह पुण्याचा संघही असल्याने मुंबई, पुणे, नागपूरमध्ये मिळून तब्बल २० सामने महाराष्ट्रात होणार आहेत. आणि या सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करताना ६०-६५ लाख लीटर पाणी वापरले जाणार आहे. ईतर पाणी वेगळेच. एकीकडे स्विमिंग पूल आणि रिसोर्टमध्ये होणार्‍या पाणीवापराबद्दल सरकारला जाग आली असताना मनोरंजनाच्या या प्रकाराकडे केवळ यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा गुंतला आहे आणि मोठमोठी नावे यामागे आहेत या कारणास्तव सरकार कानाडोळा करत आहे. आम्ही गल्ली क्रिकेट खेळणारे असल्याने पाण्याचा एवढ्या वापराबद्दल कल्पना नव्हती. जर खरेच एवढे पाणी वाचणार असेल तर आयपीएलमध्ये वीस सामने कमी झाले तरी चालतील किंवा जर रद्द करणे जमत नसेल तर ते महाराष्ट्राबाहेर जिथे मुबलक पाणी आहे तिथे हलवण्याचा पर्यायही उपलब्ध आहेच. कारण यंदाही पावसाने पाठ फिरवली तर परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते. पाण्याने आपली किंमत दाखवायला सुरुवात केली तर कित्येकांचे क्रिकेटप्रेम क्षणात नाहीसे होईल..

संबंधित बातम्या -
http://www.loksatta.com/mumbai-news/hearing-on-ipl-matches-in-maharashtr...
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/ipl-water...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशूजी पॉपकॉर्न नको. असे काही नाही होणार. पण काही सिरीअस चर्चा नाहीच झाली तरी एक नक्की होईल, क्रिकेट आवडणार्या लोकांना क्रिकेटपुढे काहीच सुचत नाही असा जो क्रिकेट फारसे न आवडणार्या लोकांचा गैरसमज असतो, तो नक्की दूर होईन.

पाण्याची टंचाई असे पर्यन्त सामने घेऊ नयेत ..खेळाडुने ही सामाजीक जवाबदारीचे भान ठेऊन सामने खेळु नयेत....

जिथे सामने खेळले जाणार आहेत तिथे पिचेस तयार करायला लागणारे पाणी दुष्काळग्रस्त भागांमधे वापरण्याचा पर्याय उपलब्ध आहे का ? ऋन्मेऽऽष ह्याबद्दल काही लिहिले असतेस तर ह्या चर्चेला अर्थ येईल.

>>>> जिथे सामने खेळले जाणार आहेत तिथे पिचेस तयार करायला लागणारे पाणी दुष्काळग्रस्त भागांमधे वापरण्याचा पर्याय उपलब्ध आहे का ? <<<< योग्य मुद्दा असामी.
हाच मुद्दा होळीच्या/रंगपंचमीच्या वेळेस मांडायचा प्रयत्न केला होता.

क्रिकेट मॅच मधे पाण्याची नासाडी किती होते याबद्दल काहीच कल्पना नाही. नासाडी होत असेल तर बंदीच्या बाजूने.

मायबोलीवर का कुठे फोटोसहीत वाचलेली एक पोस्ट होती. पिंपरी येथील मिलेनियम स्कूल या शाळेत शाळा सुटताना मुलांच्या वॉटरबॅगेतील पाणी एका ड्रमात जमा केले जाते. तेच पाणी बागेसाठी वापरण्यात येते. उरलेले पाणी वाया जाऊ नये हा चांगला संस्कार यातून मुलांच्या मनात कायमचा कोरला जाईल. दुष्काळ असो काहीही असो, पाण्याच्या उधळपट्टीला प्रोत्साहन देणारे संस्कार टाळले तरी पुढच्या पिढीमधे संवेदनशीलता निर्माण होण्यासाठी उपयोग होईल .

मुंबईजवळच्या गावांना अगदी ठाणे जिल्ह्यालाही पाणी टंचाई जाणवतेय. मुंबईला पाणीपुरवठा करणारे पाण्याचे सहा स्त्रोत आहेत. यातले पाणी या गावांना देणे अशक्य नाही. उलट पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत स्विमिंग पूल आणि इतर कारणांसाठी वापरले जाऊन पिण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा वापर करण्याकडे कल वाढत चालला आहे. मराठवाड्यात भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत आटत चालले असताना तिथे पाण्याच्या बाटल्यांच्या उद्योगाला परवानगी देणे हे सुद्धा थांबवले पाहीजे. एकट्या कोका कोलाने केरळातले भूगर्भातील कित्येक झरे शुष्क केले.

ज्यांना पाणी नाही तिथले पाणी काढून बाटलीतून शहरात आणून तहान भागवता येत असेल तर शहरातून वाचवलेले पाणी टंचाईग्रस्त भागात नेणे अगदीच अशक्य नाही.

पाण्याने आपली किंमत दाखवायला सुरुवात केली तर कित्येकांचे क्रिकेटप्रेम क्षणात नाहीसे होईल. >> क्रिकेट प्रेम नाही नाहीसे होणार. क्रिकेटच्या सिंडीकेटबद्दलचे प्रेम केव्हांच नाहीसे झालेले आहे. तो बीसीसीआयचा संघ आहे भारताचा नव्हे हे सर्वोच्च न्यायालयात त्यांनी स्वतः सांगितले तेव्हांच !

गल्ली क्रिकेट मधे आपल्याला स्वतःच खेळता येते की !

लिंबूटिंबूजी होळीच्या धाग्यावर आणखी एक मुद्दा येत होता तो म्हणजे त्योहार नही व्यवहार बदलो. आम्ही रंगपंचमीच्या दिवशी पाणी वापरत असलो तरी ईतर दिवशी वर्षभर पाणी वाचवतो आणि त्याचा जपून वापर करतो. वगैरे वगैरे.

मग आता मला सांगा, ते पाणी तुम्ही नक्की कोणासाठी वाचवता?

मुद्दा खरंच गांभीरतेने विचार करण्याजोगाच.
[ तशी बंदी घातल्यास, पाण्याअभावीं फिरकी गोलंदाजांच भरघोस पीक या मोसमात निघेल ,हें मात्र नक्की. जलतज्ञ रवि शास्त्रीजीनी द. आफ्रिकेच्या इथल्या दौर्‍यादरम्यान हें सिद्ध करून दाखवलंच आहे ! :डोमा:]

कापोचे पाणी टंचाई बाबत सहमत. लोकं नेहमी थेट पाचशे किलोमीटर दूर दुष्काळी गावावर पोहोचतात आणि आपण वाचवलेले पाणी तिथे पोहोचेल की नाही अशी शंका उपस्थित करतात. पण आपल्यापासून 50 किलोमीटर दूर गावातही पाणी टंचाई आहे आणि ती आपल्या वर्तनाने येत्या काळात वाढतच जाईल हे नाही बघत.

आयपीएल तर कराच बंद, पण तेवढे वाडा वगैरेच्या कोकाकोलाच्या फॅक्टर्‍या बंद करायचेही बघा. दोन महिने थांबले तर कोणाचे काही जात नाही.

आयपीएल चे सामने एव्हढ्य़ा उन्हाळ्यात घेण्याची काय गरज आहे यावर का कुणी बोलत नाही ? हा सीझनच कुठल्याही खेळाचे सामने आयोजित करणे हा मूर्खपणा नाहीय्ये का ? काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी या सीझन मधे दौरा आयोजित करण्याला नापसंती दर्शवली होती. तुमचंच एव्हढंच अडलंय तर इतर ठिकाणी सामने आयोजित केल्याने क्रिकेटचा खेळ हा क्रिकेट न राहता गोट्यांमधे बदलेल का ? (सहजच पूना गेम, बॉंबे गेम, टिचपाणी, दहा वीस, घड्याळ ही नावे आठवली ).

या धाग्याचा विषय फक्त आयपीएल आणि पाणीबचत इतकाच न ठेवता पाणीटंचाईच्या व्यापक प्रश्नासाठी करता येईल का ?

हे म्हणजे मोरीला बोळा आणि दरवाजा उघडा असे झाले!
प्रश्नाच्या मुळात जायचे नाही.... ग्राऊंड लेव्हलला जाउन काही काम करायचे नाही.... आणि हे बंद करा ते बंद कराच्या फालतू घोषणा देत फिरायचे...... पुण्या-मुंबई आहे ना टंचाई..... मग बंद करा सगळी बांधकामे उद्यापासून..... मुबलक पाण्याची सोय होइपर्यंत नका वाढवू यंत्रणेवरचा भार..... पण ते नाही करणार.... ते केले तर यांचे टॅंकर कोण घेइल अव्वाच्या सव्वा पैसे देउन?
असेल हिम्मत तर त्यांना जावुन विचारा जाब!
नदीतला गाळ निघाला न निघाला, धरणाची कपॅसिटी घटली न घटली, नद्या एकमेकांना जोडल्या न जोडल्या कुणाला काह्ही फरक पडत नाही..... पण रंग खेळले आणि आयपीएल ला पाणी वापरले की आरडाओरडा करायला मोकळे

आयपीएल मधून जनरेट होणाऱ्या महसुलातुन एखादा नदी जोड प्रकल्प तडीस न्यावा ज्याने पुढच्या वर्षी पुन्हा हीच परिस्थिती येणार नाही वगैरे विधायक विचार कुणाच्या मनात येणार नाही.... उगाच लोकांच्या भावनांना हात घालुन मोर्चे काढायला सगळे पुढे!

आणि हे सगळे कधी तर स्पर्धा सुरु व्हायला २-४ दिवस राहीलेले असताना.... इतके दिवस काय करत होतात मग?
दुसऱ्याला कोंडीत पकडायचे टायमिंग साधत होतात?

सामने असोत नसोत.... मैदाने सुस्थितीत ठेवण्यासाठी पाणी घालावेच लागते.... अगदी इतक्या प्रमाणात नाही तरी घालावेच लागते.... आणि हे बहुतांशी रीसायकल्ड वॉटर असते..... अभ्यास नाही काही नाही..... आहे सोय करा निषेध!

गोष्टींवर बंदी घालून तात्पुरती उपाययोजना करण्यापेक्षा त्या गोष्टीचा फायदा करुन घेउन कायमचा उपाय करण्याची मानसिकता जेंव्हा लोकान्मध्ये येइल तेंव्हा खरे.... तोपर्यंत चालू द्या!

म्हणजे जे लोक कोर्टात गेलेत ते एरव्ही पाणीटंचाईविषयी जागरूक नसतात का ?

बांधकामे, उद्योग, शेती बंद करणे आणि आयपीएल, रंगपंचमी बंद करणे हे एकसमान आहे का ? शहरात पाणीपुरवठ्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वस्ती / उद्योग होऊ देणे थांबवावे असे सुचवले तर मान्य व्हावे ते.
खरे तर शहराचे ड्रेनेज नदीत सोडून पाण्याची जी नासाडी होते ती अक्षम्य आहे.

इतके दिवस काय करत होतात मग? >> मालक, लोकाभिमुख, दुष्काळी लोकांसाठी संवेदनशील असलेलं सरकार काय करत होतं हा प्रश्न नाही पडला का?? काँग्रेसनेही हेच केलं आणि त्याची फळं ते भोगताहेत.

आयपीएल मधून जनरेट होणाऱ्या महसुलातुन एखादा नदी जोड प्रकल्प तडीस न्यावा ज्याने पुढच्या वर्षी पुन्हा हीच परिस्थिती येणार नाही वगैरे विधायक विचार कुणाच्या मनात येणार नाही >> टाळ्यांसाठी झक्कास वाक्य आहे मालक.. एखादा प्रकल्प सोडा, पण वानखेडेचे नूतनीकरण करतानादेखिल पाण्याच्या पुनर्वापरीकरणाची काळजी घेतली नाहीये MCA ने.

आणि हे बहुतांशी रीसायकल्ड वॉटर असते. >> हो?? मग 'आम्ही टँकर विकत घेऊन पाणी घालणार' हे क्रिकेट असो. कसं काय सांगतंय??

आयपीएल सुरु व्हायच्या वेळेस बरी आठवली पाणी टंचाई.. हा मुद्दा खरंतर वर्ल्डकपच्या वेळेसच पुढे यायला हवा होता.. नागपूर आणि मुंंबईत मिळून १३ मॅचेस झाल्या.. तेव्हा पाणी टंचाई नव्हती वाटतं.. का त्या वर्ल्डकपच्या मॅचेस होत्या म्हणून तेव्हा पाणी कमी वगैरे लागलं..

>>म्हणजे जे लोक कोर्टात गेलेत ते एरव्ही पाणीटंचाईविषयी जागरूक नसतात का ?
असते तर इतके दिवस का थांबले? .... संघ दाखल झाल्यानंतर, तिकिटविक्री सुरु झाल्यावर इतकी का आरडाओरड? .... IPL सोडा पण इतक्या कमी नोटीसवर छोटासा घरगुती event तरी रिलोकेट होतो का?

>> बांधकामे, उद्योग, शेती बंद करणे
उद्योग, शेती वगैरे बंद करायला कोण सांगतय?.... उगाच आपला काहीतरी युक्तिवाद!

>>खरे तर शहराचे ड्रेनेज नदीत सोडून पाण्याची जी नासाडी होते ती अक्षम्य आहे.
हो ना? मग त्यावर काही उपाय योजले का?

विठ्ठल,
तुमच्या राजकीय धुळवडीत मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये!

>> पाण्याच्या पुनर्वापरीकरणाची काळजी घेतली नाहीये MCA ने.
मग काय केलत तुम्ही? खेचलत त्यान्ना कोर्टात?

>>मग 'आम्ही टँकर विकत घेऊन पाणी घालणार' हे क्रिकेट असो. कसं काय सांगतंय??
बहुतांश लिहलय ना तिकडे?.... खेळपट्टीला रिसायकल्ड पाणी आणि आउटफील्ड्ला रिसायकल्ड आणि टॅंकरचे पाणी अशी योजना आहे!

>>>> तेव्हा पाणी टंचाई नव्हती वाटतं.. का त्या वर्ल्डकपच्या मॅचेस होत्या म्हणून तेव्हा पाणी कमी वगैरे लागलं.. <<<
नै हो, त्यावेळेस रंगपंचमी/होळीच्या निमित्ते पाणी खर्चहोते म्हणून होळीच्याच नावाने शिमगा करुन लोक दमलेले होते.. Wink मग कसा आवाज उठविणार? अंगात तेव्हडे त्राण तर्नको? Proud
बायदिवे, आयपीएल वाल्यांनी योग्य त्या फुडार्‍यांना योग्य तो अभिषेक केलेला दिसत नाहीये...... :डोमा;

>>>> IPL is soft target for them! <<<<
ते सॉफ्ट आहेत की हार्ड आहेत ते नै सांगता येत, पण टारगेट आहेत हे नक्की...
आता तुम्ही अमुक तमुक करीत पैका करु पहाल, अगदी गल्लीत हातगाडी जरी लावाल, तरी कोणतरी येतेच, अन आपला टक्का वसुल करते, नै दिला तर तुमची गाडी हिथ कशी हुबी र्‍हाते बगतोच, हे ब्लॅकमेलिंग असते..... मग त्याकरता तेवेगवेगळ्या क्ल्युप्त्या वापरतात, त्याचे वर्णन करायची ही जागानव्हे, पण अशाच काहिशा स्वरुपाचे पाण्याबद्दलचे हे "ब्लॅकमेलिंगच" असावे असे माझे मत.
नैतर महाराष्ट्राचि एकुण लोकसंख्या अकराकोटी, दर दिवशी दरमाणशी अगदी एक लोटा प्यायला अन एक लोटा ढुंगण धुवायला अशा तिन लिटरचा हिशोब केला तरी तेहतीस कोटी लिटर पाणी रोज वापरले जाते, महिनाभरात नऊशेनव्वद कोटी लिटर .......!
आता या आकडेवारीमधे मैदानावर शिंपडले जाणारे पाणी नेमके किती हजार/लाख लिटर आहे कुणि सांगेल का? तुलना तरी होऊ शकते का?
अहो ही अकराकोटी माणसे रोज किमान एकदा तरी थुंकतातच...... वीस मिलि अंदाजे....
सकाळी तोंड धुताना एकदा, दिवसातुन दोनदा जेवल्यावर चूळ भरुन तीदेखिल थुन्कतातच, एकुण तिन वेळेस एकुण किमान १५० मिलि.

तर पन्नास माणसे थुंकली तर एक लिटर..... अकरा कोटी माणसे थुंकली तर 22 लाख लिटर..... अन ही माणसे दिवसातुन दोनदा थुंकली तर चव्वेचाळीस लाख लिटर.... एक टॅन्कर ८ ते १२ हजार लिटरचा असतो, म्हणजे २२ लाख भागिले १२ हजार = १८३ टॅन्कर भर थुंकी.....
चूळ भरण्याचा हिशोब असाच.... अकरा कोटी माणसे चुळ भरली तर १२० मिलि गुणील अकरा कोटी.... = 1,3२,00,000 लिटर... अबब...

तर मग आता दुष्काळ आलाय अमकीकडे तमकीकडे, तेव्हा थुन्कु नका, चूळा भरु नका हे पण सांगणार ना? नै हो, सांगायलाच पाहिजे....

मी तर आता आचमनावर बंदी घालण्याची मागणी कोण केव्हा करताहेत याचीच वाट बघतोय.. उगाच आपल केशवायनमः माधवायनमः नारायणायनमः म्हणत पाणी घटाळायच, अन गोविंदायनमः म्हणूण सोडुन द्यायच.... कित्ती ते वाया घालवतात "जलसंपदा".... Proud

स्वरुप, तुम्ही केलत का वगैरे प्रश्न तुम्ही इतरांना विचारताय म्हणजे तुम्ही स्वस्थ बसून प्रश्न विचारू शकतो हे तर कळालेच शिवाय कोर्ट, शासन, प्रशासन यांचे अधिकार माय्बोलीकरांकडे दिले गेले असावेत अशी शंका येतेय. ंमाबोप्रशासनाने दडवून ठेवले असावेत बहुधा. नाहीतर केलंच असतं.
बांधकाम हा उद्योग नाही ही एक मोलाची माहिती मिळाली त्याबद्दल आभारी आहे. आपल्या कडून आणखी माहिती मिळत राहावी हे त्या सर्वशक्तिमान पावरबाज शक्तीकडे प्रार्थना!

कोर्ट, शासन, प्रशासन यांचे अधिकार माय्बोलीकरांकडे दिले गेले असावेत अशी शंका येतेय.

इतके दिवस माबोवर वापरुनही अजुन तुम्ही शंकाच घेताय......... कमालेय...

अहो पण मी विरोध तर करत नाही!
काही न करता नुसता विरोध करणाऱ्यान्ना माझा विरोध आहे

मायबोलीला कशाला मध्ये आणताय?..... एव्हढा आक्षेप आहे तर MCA ला कोर्टात खेचायला कुठल्या विशेष अधिकारांची गरज नाही ..... हा सज्जड पुरावे मात्र लागतील.... ते नसतील तर मग असल्या आरोपांचा फक्त वाद घालायला उपयोग

बांधकाम हा उद्योग नाही असे कोण म्हणतय?..... उगाच काहीतरी सोयीस्कर अर्थ लावू नका.... यंत्रणेवर ताण न आणता खुशाल करा की बांधकामे!

जिथे सामने खेळले जाणार आहेत तिथे पिचेस तयार करायला लागणारे पाणी दुष्काळग्रस्त भागांमधे वापरण्याचा पर्याय उपलब्ध आहे का>>>>>

सांगली मधून रेल्वेने लातूर ला पाणी नेणार आहेत अशी तीन चार दिवसापूर्वी बातमी होती सकाळला.

http://m.firstpost.com/india/maharashtra-drought-railways-will-transport...

सांगली ला सामने नाहीत हे माहित आहे. पण जिथे पाणी आहे तिथून ते दुसरीकडे पाठवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

Pages