१४ मार्च २०१६
आज परीला घेऊन गार्डनमध्ये गेलो. गेल्यावेळी तिची मम्मा असल्याने थोडा तरी रिलीफ होता, पण आज मी एकटाच असल्याने समोर काय संकट वाढून ठेवलेय याची कल्पना होती.
गेल्यावेळी मी तिला घसरगुंडीत मदत करून तिचा अहंकार दुखावला होता. ते लक्षात ठेवून यावेळी माझा हात झटकून आपले आपणच घसरगुंडीची मजा लुटू लागली. कधी या घसरगुंडीने उतरायची तर कधी त्या घसरगुंडीने. त्याकडे लक्ष ठेवत तिथे पळत जात फिल्डींग लावायचे काम माझे. एकाच सेट अप मध्ये विविध घसरगुंड्या बनवायचे दिमाग कोणाचे काय माहीत. त्याला हे हाल दाखवायला हवे होते. मी तिला खाली झेलतो न झेलतो ते ‘अजून अजून’ म्हणत पुन्हा शिडी चढायला पळत सुटायची. ते देखील घसरगुंडीची राईड घेतल्याच्या आनंदात दोन्ही हातांचे विमान बनवत अश्या आवेशात पळत सुटायची जसे शोएब अख्तरसारखा एखादा वेगवान गोलंदाज विकेट घेतल्यावर दोन्ही हात पसरवून पळत सुटतो. तिचे ते ‘अजून अजून’ बागेतही ईतके फेमस झाले की आजूबाजुच्या एकदोन बायकाही तिच्यासोबत ‘अजून अजून’ करू लागल्या. तिचा टर्न येताच त्या देखील ‘बाबड्या आला, बाबड्या आला’ म्हणू लागल्या
घसरगुंडीची शिडी चढतानाही सवयीने ‘मी मी’ करत ईतरांच्या आधी जायला बघत होती. एके ठिकाणी तिच्यापेक्षा मोठ्या वयाची मुले तिच्या बाजूने जायचा प्रयत्न करत असताना हिने दोन्ही हातांनी त्यांचा रस्ता अडवून धरला. तसे तिच्या बिनधास्तगिरीला कौतुकाने न्याहाळणार्या एक आजीबाई म्हणाल्या, "जाऊ देणार नाही ती कोणालाही पुढे. हुशार आहे पक्की".. मी मनातल्या मनात म्हटले, अहो कौतुक कसले करताहात, उलट तिचा हाच दुर्गुण बदलायच्या प्रयत्नात आहोत आम्ही
झोका घेण्यासाठी नंबर लावून उभे असताना अगदी समोरच एक मुलगी हात सुटून धाडकन कोसळली. बरेच लागले बिचारीला. तिला रडताना कितीतरी वेळ ही बघत होती. दिदी पडली, दिदी रडतेय, स्वत:शीच चालू होते. पण स्वत:चा झोका घ्यायचा टर्न आल्यावर मात्र आम्हाला कसली पडायची भिती आणि कसले काय. तिथेही ‘अजून अजून’ म्हणत मला आणखी जोरजोरात झोका द्यायला लावत होती.
मेरी गो राऊंडमध्ये तरी त्या बदकाला धरून शांतपणे बसायचे तर ते ही नाही. त्यासोबत फिरतानाही मान वळवून, पुढे झुकून त्या बदकाची पाहणी चालू होती. तेव्हा आणखी एका बाईने आपले निरीक्षण नोंदवले, "हिला स्वस्थ बसायचे माहीतच नाही वाटते
ती शिडीसारखी एक गोलाकार कमान असते त्यावर चढतानाही ‘पप्पा नो, पप्पा नो’ करत माझी मदत झटकत होती. मी यावेळी परत तिचा अहंकार दुखवायच्या भानगडीत न पडता थोडे दूरच राहणे पसंत केले.
अगदी घरातल्या खुर्ची टेबलवर चढल्या उतरल्यासारखी त्या झोका आणि घसरगुंड्यांवर बागडत होती. कित्येकांनी मला विचारले, तुम्ही हिला रोज गार्डनमध्ये घेऊन येता का. आता काय बोलणार. घरी खिडकीच्या ग्रिलवर सरसर चढत जाणारीला, आणि खुर्चीवरून सोफ्यावर उडी मारायचे खेळ करणारीला, या बागेतल्या घसरगुंड्या म्हणजे बच्चोंका खेल होत्या. बस्स काय कसे खेळायचे एवढे समजायची खोटी.
तिथे एका जोडप्याचा दोन वर्षांचा मुलगा होता. त्याला घसरगुंडी तितकीशी जमत नव्हती. त्याच्या आईनेही मला हाच प्रश्न विचारला. तिने असे मुलांमध्ये तुलना करू नये, आणि तिला स्वत:चा मुलगा कश्यात कमी पडतोय असे वाटू नये या हेतूने मी पटकन म्हणालो, "तसे ईथे दुसर्यांदाच आणलेय, पण ती मुळातच अचरट आहे, त्यामुळे पटकन जमते तिला हे" .. नंतर स्वत:शीच जीभ चावली. अचरट सोडून दुसरा कोणताही शब्द मला सापडू नये मला
एवढे कौतुकाचे शब्द तिच्यासाठी ऐकल्यावर दोन कौतुक कम सहानुभूतीचे शब्द अखेर माझ्यासाठीही आले. एक काकू म्हणाल्या, "तुमचीही कमाल आहे हा. एका माणसाने हॅंडल करण्यासारखे प्रकरण नाहीये हे
सूर्य मावळला, चंद्र डोक्यावर आला, अंधार पडला, चांदण्यांच्या प्रकाशात गार्डन रिकामे होऊ लागले.. तरी तिचे मन काही भरत नव्हते. उलट पायाला बूटांचा त्रास नको म्हणून ते काढून फेकत अनवाणी पायांनी बागडायचा हट्ट धरून बसली. मग शेवटी रडत रडवतच तिला बाहेर काढले. पण तिच्या तीन तासांच्या खेळात तिने मलाही सहा तासांचे दमवले. माझे बालपण मला पुन्हा जगवले. स्साला सुख सुख म्हणजे काय असते ते आज पोरीने दाखवले
.
.
१६ मार्च २०१६
आजवर मी परीला बाबड्या हाक मारायचो, आता परी मला बाबड्या हाक मारू लागलीय.
बहुतेक तिला बाबड्या म्हणजे अरे मित्रा, अरे दोस्ता यासारखे संबोधन वाटले असावे जे दोघे एकमेकांसाठी वापरू शकतात
असे म्हणतात, मुले मोठी झाली की त्यांचे मित्र बनावे. आम्ही एकमेकांचे बाबड्या बनलो आहोत
.
.
२४ मार्च २०१६
आज मजाक मजाक मध्ये परीसाठी कॅरम घेऊन आलो,
जशी अपेक्षा होती तसेच उद्घाटन झाले..
उड्या मारून
.
.
२६ मार्च २०१६
तीन तीन दिवशी, तीन तीन वाढदिवस..
तीन वेगवेगळ्या घरात..
पहिला मॉडर्न कल्चर नुसार, आदल्या रात्री बारा वाजता, नाना-नानीच्या घरात...
दुसरा ईंग्लिश कॅलेण्डरनुसार, 19 मार्चला, मम्मी-पप्पांच्या घरात...
आज शिवजयंतीला मोठ्ठा वाढदिवस, तिथीनुसार आज्जी-आजोबांच्या घरात
Kindly consider this facebook status as Pari's personal invitation
.
.
२९ मार्च २०१६
गुरुची विद्या गुरूलाच फळतेय. तिला रंगाचे ज्ञान देणे आम्हालाच छळतेय.
आज तिने माझ्याकडे काऊ गोळी अका Gems ची गोळी मागितली. ती सुद्धा pink कलरचीच हवी झाली. पण त्या सतरा-अठरा गोळ्यांमध्ये pink काही सापडली नाही. बहुतेक दिवसभर तिनेच pink pink करून सर्व संपवल्या असाव्यात. मग एक रंग उडून फिकट झालेली लाल गोळी तिच्यासमोर धरली. तरीही तिचे pink pink चालूच होते. म्हटले, "ही पिंकच आहे बाबड्या" .. तसे म्हणाली पप्पा रेड नो .. मी कपाळावर हातच मारला..
शेवटी मग हार कबूल करत एकाच्या जागी तीन गोळ्या देत मांडवली केली
.
.
३० मार्च २०१६
रात्रीस खेळ चाले !
रात्रीचे एक वाजता बेडरूमचा दरवाजा किलकिला उघडतो. आतल्या डिमलाईटचा मंद प्रकाश हळूवार बाहेर पसरतो. मांजरीसारखे दोन डोळे त्या छोट्याश्या फटीतून रोखले जातात आणि नाजूकसा आवाज किणकिणतो... अभिषेss नाईक, ग्लासातून दूदूss ..
त्या आवाजासरशी बाहेर दिवाणखान्यात लॅपटॉपवर टाईमपास करत पडलेल्या अभिषेss नाईक उर्फ पप्पांना पटकन ग्लासभर गरम दूधाची सोय करावी लागते. लगोलग आजी आजोबांनाही आवाज दिला जातो. आजीला टीव्ही वरच्या मराठी मालिका सोडून तर आजोबांना झोप मोडून तिच्या बेडरूममध्ये हजर व्हावे लागते.. आणि मग सुरू होतो, रात्रीस खेळ चाले..
सर्वांनी आपापले डोळे घट्ट मिटायचे, आणि आमचा बोका लपक लपक दूध पिणार
.
.
१ एप्रिल २०१६
एव्हाना तिची 30-40 प्राण्यांशी गट्टी जमलीय. लायन, टायगर, लेपर्ड, चीताह हे वेगवेगळे कळू लागलेत. साधा बेअर आणि पोलार बेअर असे क्लासिफिकेशन जमू लागलेय. Rhino आणि hippo हे मला आजही गोंधळात टाकणारे प्राणी अचूक ओळखू लागलीय. याक कांगारू पांडा झेब्रा, यासारख्या अभारतीय प्राण्यांनाही नाही सोडलेय. रॅबिट उर्फ ससुल्याला ती लक्की या त्याच्या नावाने ओळखू लागलीय. खारूताईशीही अशीच गट्टी जमलीय.
हि सर्व टीचर मम्मीची कमाल आहे. पण आज पप्पा परीक्षा घेत होते. एकेका प्राण्यावर मी पटापट बोट ठेवत होतो आणि ती पटापट त्याचे नाव सांगत होती. एकेक उत्तरासह तिचा उत्साह उत्तरोत्तर वाढत होता. कॅटी डॉगी हम्मा बफेलो, फॉक्स कॅमल डॉन्की मन्की, असे सात आठ प्राणी ओळखल्यावर मी वाईल्ड बफेलो वर बोट ठेवले. बफेलोशी कन्फ्यूजन नको म्हणून या प्राण्याचे नाव आजवर तिला आम्ही सांगितले नव्हते. म्हणून तिला ते माहीतच नव्हते. पण एवढे प्राणी पटापट ओळखत पप्पांचे कौतुक झेलल्यावर आता आपला पोपट नको म्हणून त्याच वेगात ती लगेच म्हणाली .. ते जाऊ दे.. ते जाऊ दे
बोले तो ईंजिनीअर बापाची पोरगी, सिलॅबस ऑप्शनला टाकायला शिकली
.
.
३ एप्रिल २०१६
सब झूठ आहे ..
या जगात आईच्या प्रेमापेक्षा भारी काहीच नाही.
आईचे सर्वात जास्त प्रेम आपल्या मुलावरच असते.
आईचे आपल्या मुलावरचे प्रेम कधी आटत नाही.
आईच्या प्रेमाच्या कधी वाटण्या होत नाही.
सब झूठ आहे !!!
मुलाची मुलगी जन्माला आली. नात आली. आईची आज्जी झाली. की सारी समीकरणे बदलतात, हे आज अनुभवले
- तुमचा अभिषेक
परीकथा ० , परीकथा १ , परीकथा २ , परीकथा ३ , परीकथा ४ , परीकथा ५ , परीकथा ६
ते जाऊ दे.. ते जाऊ दे >>
ते जाऊ दे.. ते जाऊ दे >>
भारी.
परीला कोणाची नजर न लागो.
दृष्ट काढून टाका तिची.
सुरेख!
सुरेख!
हे खरंच खूप बोअरिंग आहे.
हे खरंच खूप बोअरिंग आहे.
आवडलं !
आवडलं !
छान. रात्री एक वाजता ची
छान.
रात्री एक वाजता ची मिस्टेक आहे का? कारण आजीच्या सिरेली रात्री एकला नसतात ना.
काय गोड बाळी आहे, एन्जॉय करा
काय गोड बाळी आहे, एन्जॉय करा अजून बाळपण तिचे.
मस्त लिहीताय. 
सुरेख लिहिले आहे. असे वाटते
सुरेख लिहिले आहे.
असे वाटते की डोळ्यासमोर सर्व घडते आहे.
सस्मित, नो मिस्टेक .. आजीच्या
सस्मित, नो मिस्टेक ..
आजीच्या सिरेली रात्रीच तर चालू होतात. निवांत तीनसाडेतीन वाजेपर्यंत चालतात. निशाचर फॅमिली आहे आमची
अमा, तो तो माझ्या लिखाणाचा दोष. पोरगी ईंटरेस्टींग आहे
सर्व प्रतिसादांचे धन्यवाद
खूप छान!
खूप छान!
आजीच्या सिरेली रात्रीच तर
आजीच्या सिरेली रात्रीच तर चालू होतात. निवांत तीनसाडेतीन वाजेपर्यंत चालतात. निशाचर फॅमिली आहे आमची>>>>>>>
"तुम्हारी साडी मेरे साडी से
"तुम्हारी साडी मेरे साडी से जादा सफेद कैसे?"अशा टाइप मधे पालक आपल्या पोराची तुलना करतात..तुमची सोळा महिन्यांची बेबी हँव टॉव करते मग आमची का करत नै बॉ