.
३१ ऑक्टोबर २०१५
आमच्या एफ एम रेडिओला सिग्नल मिळायला सुरुवात झाली आहे. हल्ली रोज नॉनस्टॉप नॉनसेन्स प्रादेशिक चॅनेल लागतात. नक्की कुठल्या प्रदेशाचे कार्यक्रम चालू असतात ते नाही समजत, पण योग्य ती फ्रिक्वेन्सी पकडली की मध्येच एखादा मराठी शब्द निघतो
.
.
५ नोव्हेंबर २०१५
बाथरूम ही आपल्याला पर्सनल स्पेस देणारी प्रायव्हेट जागा असते असा एक समज आहे. पण आमच्याकडे ते सुखही नाही.
तिला त्या क्षणी जगातली तीच व्यक्ती सर्वात लाडकी होते जी बाथरूममध्ये असते. मग ती मम्मी असो वा पप्पा, दारावर थडाथड लाथाबुक्के बसायला सुरुवात होते.
काल मात्र ही थडथड दोन्हीकडून अनुभवली. परी बाहेरून 'मम्मा मम्मा' करत दरवाजा ठोठावत होती आणि आतून मम्मा 'परीचे पप्पा, परीचे पप्पा' करत दार वाजवत होती. बराच वेळ झाला यांची ही जुगलबंदी थांबायचे नाव घेत नव्हती, म्हणून नक्की काय प्रकार चालू आहे बघायला गेलो तर...
परीने आज उलटा गेम केला होता. बाथरूमच्या दरवाजाची कडी बाहेरून लावली होती. म्हणजे आता तुम्हीही बसा बोंबलत
आधीच या पोरीला एकट्याने सांभाळणे एक दिव्य होते, त्यात हे असले काही जमायला लागले तर विचारायलाच नको.
आता यावर उपाय म्हणून एकतर दरवाज्याची बाहेरची कडी कायमची काढून टाकायला हवी, किंवा आमच्या या अभिमन्यूला कडी लावण्याबरोबर कडी काढावी कशी हे देखील शिकवायला हवे
.
.
६ नोव्हेंबर २०१५
साम दाम दंड भेद.
हे चार उपाय वापरून मुलांना सांभाळता येते असे ऐकलेय. पण आमच्याकडे मात्र हे चार उपाय परी वापरते.
पहिले साम.
निरागस चेहर्याने विनंती करते. मान्य नाही झाली तर चेहरा केविलवाणा करत विनवण्या करते. पण आपण नकार देतो.
मग दाम.
थेट गळ्यात येऊन पडते. मिठी मारते. ऊमम्मा आवाज काढत स्वताहून पा घेते. आपण तरीही तिला बधत नाही.
नंतर दंड.
हा ती स्वताला देते. बेंबीच्या देठापासून ओरडत, अशी काही रडते की आपले आतडे वात्सल्याने पिळवटून निघाले पाहिजे.
आपल्यावर त्याचा काही फरक पडत नाहीये हे लक्षात आल्यास त्या रडण्याची तीव्रता वाढवली जाते. अधूनमधून आरश्यात बघून आपला रडण्याचा अभिनय कमी तर नाही ना पडत, हे चेक केले जाते. आपला नकार मात्र ठाम असतो, कारण ती जे मागत असते ते तिच्या भल्याचे नसते.
आणि मग सर्वात शेवटी भेद !
पप्पांकडे डाळ शिजत नाही हे कळून चुकल्यावर पप्पांचे नाव सांगत मम्मी किंवा आजी आजोबांकडे जायचे. ते देखील असं काही रडत रडत की पप्पांचा धपाटाच खाऊन आलीय
.
.
७ नोव्हेंबर २०१५
त्या दिवशी परीने मम्माच्या बाथरूमला बाहेरून कडी लावली म्हणून खुश होत होतो... आज माझा गेम झाला
बहुतेक तिचे मम्मीपप्पांवर, सेम प्रेम आणि सेम खुन्नस आहे
.
.
८ नोव्हेंबर २०१५
काही गोष्टी पण कमाल असतात,
जसे घरी नवर्याचा उंदीर करणारी बायको स्वत: मात्र झुरळाला घाबरते,
तसेच आपल्या किंचाळण्याने ईतरांच्या कानठळ्या बसवणारी परी स्वत: मात्र फटाक्यांच्या आवाजाला घाबरते.
थोडक्यात, दिवाळी जोरात आहे आमची यंदा
.
.
९ नोव्हेंबर २०१५
यंदा आमच्या दिवाळीवर दहशतीचे सावट आहे. समोरच्या घरातील रांगोळी पाच मिनिटात साफ झाली आहे. ते बघून परीच्या मम्मीने रांगोळी काढायचा विचार बदलला आहे. आता दिवे तरी कसे लावायचे हा प्रश्न पडलाय. लावलेच तर सोबत माझीही ड्यूटी लागणार आहे. फराळही मोठ्या मुश्किलीने बनतोय. लाडू ती दुपारी झोपल्यावर वळले जाताहेत तर चकल्या मध्यरात्री तळल्या जाताहेत. साफसफाईतल्या लुडबुडीला झेलण्यावाचून पर्याय नाही. आणि लोकं म्हणताहेत ही दिवाळी तुम्हाला शांततेची आणि समाधानाची जावो
.
.
१० नोव्हेंबर २०१५
हिंदू पंचांगाला गंडवत आज आम्ही दिवाळीच्या दिवशी रंगपंचमी साजरी केली.
RIP मम्मीची रांगोळी ! जिची आज राखरांगोळी झाली.
सकाळी "पहिली आंघोळ" झाल्यावर आठ तासांच्या आत दुसरी करायची वेळ आली.
.
.
१३ नोव्हेंबर २०१५
बाप्पांचे नाव भूतांची भिती घालवते तर फटाके काय चीज आहे.
फटाके वाजले रे वाजले की आपण "बाप्पा आssले" म्हणून ओरडायचे..
भिती राहिली बाजूला, एक हात वर करून नाचायला सुरुवात
.
.
२२ नोव्हेंबर २०१५
जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला.
जे आवडे परीला, तेचि आवडे सर्वांना.
याआधी "गढूळाचं पाणी" म्हणजे अगदी अभिरुचीहीन की काय म्हणतात त्यातलं गाणं वाटायचे.
पण आता ऐकावेही लागते आणि त्यावर नाचावेही लागते.
ते देखील कंबरेला बनियान वगैरे गुंडाळून नागीण डान्स.
न आवडून सांगतोय कोणाला, आमचे नागाचे पिल्लू खवळायची रिस्क कोणीही घेऊ शकत नाही
.
.
२९ नोव्हेंबर २०१५
आज परीचे केस कापले. पहिल्यांदाच चकोट. झोपेतच काम उरकले. एवढी क्यूट ती आजवर दिसली नव्हती. पण हे तिला कसे समजवायचे आणि जाग आल्यावर आरसा कसा दाखवायचे हे टेंशन होतेच. संपता संपता तिला स्वताहूनच जाग आली. काहीतरी संशयास्पद वाटले म्हणून डोक्यावरून हात फिरवू लागली. मस्त गोल गरगरीत गोटा हाताला लागताच हास्याची एक खळी पडली. ईथे आमचाही जीव थोडा भांड्यात पडला. ईतक्यात आरशाचे काम खिडकीच्या काचेने केले आणि आपले रूप बघून ती चक्क हसू खिदळू लागली.. मग काय वाजत गाजत, नाचत गात शेजारपाजारच्या घरांमध्ये तिची वरातच काढली
.
.
आणि आता मी सलूनमध्ये बसलो आहे. माझ्या टर्नची वाट बघत.
कंपनी तर दिलीच पाहिजे ना
.
.
९ डिसेंबर २०१५
आंघोळ करताना डोक्यावरून सुर्रकन ओघळणारे पाणी पहिल्यापेक्षा जास्त आनंद देऊ लागलेय..
केसाला साबण चोळताना आणि ओले केस पुसताना होणार्या चीडचिडीपासून आता आम्ही मुक्त झालो आहोत.
घरात दुडूदुडू धावताना आता आम्ही पहिल्यापेक्षा जास्त क्यूट दिसू लागलो आहोत..
कधी लाडात येताच गालाला गाल लावावेत, तसे डोक्याला डोके लाऊ लागलो आहोत.
येताजाता पप्पांच्या टपल्या खाऊ लागलो आहोत..
आणि "टकल्या" हाक ऐकताच ओ देऊ लागलो आहोत.
पप्पा घरी आल्यावर एकमेकांच्या डोक्यावरून हात फिरवू लागलो आहोत. आणि एकदा का पासवर्ड मॅच झाला, की डोक्याला डोक्याची टक्कर..
पण कधी एखादा जुना केसाळ फोटो पाहिला, तर मात्र त्याच डोक्यावरून हात फिरवत आम्ही भूतकाळात रमू लागलो आहोत..
फिलींग हलके हलके.. एंजॉयिंग टकलूपनती
- तुमचा अभिषेक
मस्त आहे हे पण.
मस्त आहे हे पण.
Last kiti cute
Last kiti cute
Awww!! very cute!!!
Awww!! very cute!!!
मस्तच..
मस्तच..
छान आहे ऋन्मेष
छान आहे ऋन्मेष
Abhi, congrats, I can easily
Abhi, congrats, I can easily correlate with your words as I am also going through the same phase
मस्तच !!
मस्तच !!
(No subject)
मस्तच. सो क्युट
मस्तच. सो क्युट
मस्तच..
मस्तच..
आठवणी सर्व घरात थोड्याफार
आठवणी सर्व घरात थोड्याफार फरकाने नेहमी घडणार्याच, पण तुम्ही खूप क्युट पद्धतीने लिहीता.
मोठी झाल्यावर परीला हे सर्व दाखवण्यासाठी ठेवा व्यवस्थित वयानुसार लावून.
खुप मस्त !
खुप मस्त !
धन्यवाद, लोक्स श्रीमत,
धन्यवाद, लोक्स
श्रीमत, तुम्हालाही शुभेच्छा ..
निनाद,
Aww! So cute
Aww! So cute
गोड आहे तुमची मुलगी. आनंद
गोड आहे तुमची मुलगी. आनंद घ्या ह्या क्षणांचा. धरून ठेवता येत नाहीत हे क्षण. आणि मुलं पट्कन मोठी होऊन जातात.
अधूनमधून आरश्यात बघून आपला
अधूनमधून आरश्यात बघून आपला रडण्याचा अभिनय कमी तर नाही ना पडत, हे चेक केले जाते. >>
माझ्या भाच्याचीही हिच तर्हा. जाम हसायला येत ही नाटकं बघून.
९ डिसेंबर तर अगदीच मस्त!