Submitted by हर्ट on 5 April, 2016 - 01:00
बर्याचदा असे होते की अमुक एक पाककृती करताना अमुक एक घटक पदार्थ आपल्याकडे नसतो, किंवा आपण तो खात नाही किंवा आपल्याला त्याची अॅलर्जी असते पण तो पदार्थ इतका महत्त्वाचा असतो की त्याशिवाय ती पाककृती आपले रुप, रंग, गंध दाखवतच नाही. इथे आपण अशाच पाककृतींबद्दल लिहिणार आहोत ज्यामधे आपल्याला नको असलेला घटक पदार्थ आहे आणि त्या नको असलेल्या घ.प. ऐवजी दुसरा घ. प. तुम्हाला सुचवायचा आहे.
सुरवात मी मजपासून करतो.
https://www.facebook.com/1555836164732868/videos/vb.1555836164732868/158...
ही एक लिंक आहे पटॅटो स्माईलीची. ह्या मैदा, बटाटे, एक अंड अस एकत्रित करुन त्याची टिकी बनवायची आणि मग ती तळायची. मला ही टिक्की करुन पहायची आहे पण मी अंडे खात नाही. मला अंड्याला पर्याय सुचवा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंड्याऐवजी काय वापरणार. साधी
अंड्याऐवजी काय वापरणार. साधी आलू टिकी होईल ती अंड्याबगर. अंड्यामुळे जो खमंगपणा, खुसखुशीतपणा अपेक्षित असेल तो येणार नाही.
टीपः लिंक घरी गेल्यावर पाहीन.
पर्याय माहित नाही पण रेसिपीची
पर्याय माहित नाही पण रेसिपीची आयडिया आणि प्रेझेंटेशन भारी आहे. १ मिनिटात बसवलंय पण मस्त!
अंड्याला पर्याय >> लिंक
अंड्याला पर्याय >>
लिंक पाहिली नाही.मला वाटत खमंग ,खुसखुशीत पणा प्ल्स बाईडिंग/कोटींग च काम कॉर्नफ्लेक चा चुरा / ब्रेड चा चुरा वापरु शकतो.पन मग ते आलु टीकी च वेगळ व्हर्जन होईल.
Bee,ande tala.Baki jasha
Bee,ande tala.Baki jasha tikya kelyat tasha karayala harkat nahi.kukuritpana sathi cornflour kinva tandalache pith vapara.
उकडलेले बटाटे घ्या आणि बारीक
उकडलेले बटाटे घ्या आणि बारीक किसा. आता 2 tbls.grated चीज, चवीनुसार मीठ, मिरची पावडर,हे एका वाडग्यामध्ये घेऊन मिक्स करावे. आता 2-3 टेस्पून कॉर्न फ्लोअर घालून मिक्स करावे. dough बनवुन फ्रीजमध्ये ठेवा अर्धा तास. आता समान भागामध्ये dough विभागून घ्या. प्रत्येक भागाचे लहान चेंडू मध्ये आकार बनवा आणि त्याच्या स्मायली बनवा.
(मला सापड्लेली रेसेपी)
धन्यवाद सर्वांचे. मस्त टिप्स
धन्यवाद सर्वांचे. मस्त टिप्स मिळालेल्या आहेत.
अन्ड्याला पर्याय म्हणुन
अन्ड्याला पर्याय म्हणुन फ्लक्स सीड्स वापरता येतात. मरथिमधे ह्याला जवस म्हणतात असे मला वाटते. हे बघा: http://www.veganbaking.net/recipes/egg-replacers/flax-seed-egg-replacer