प्रेम व दास्यत्व

Submitted by अपरिचित on 3 April, 2016 - 02:53

प्रेम करणे वा एखाद्या व्यक्तीचे दास्यत्व स्वीकारणे ह्यात मुलभूत किती असा फरक आहे...

प्रेमात सगळं काही करायची तयारी असते. सगळं काही निभावण्याची कुवत आपसूकच येते. मानापमानाचे नाट्य नसते. रुसवा-फुगवी असली तरी तात्पुरतीच असते. जोडीदाराला सांभाळून घेत राहण्याची कसोटी असते.

दुसरीकडे, दास्यत्व स्विकारलेल्या ठिकाणी सगळं काही करावं लागतं. कुवत असो वा नसो, सगळं निभवावंच लागतं. मानापमानाच्या नाट्यावर ब्र सुध्दा काढायची सोय नसते. राग आला तर गपगुमानं गिळावा लागतो.

ह्याउलट, ज्या व्यक्तीवर प्रेम केले त्याच व्यक्तीने "प्रेम" ऐवजी दास्यत्व करावयास लावले तर... वा जिथे दास्यत्व स्वीकारावे लागले तिथे त्या व्यक्तीने प्रेम केले तर...

बहुतेक प्रेमासाठी झिजणे म्हणजे दास्यत्व नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषाला दास बनवायचा स्त्रियांकडे असलेला एकमेव मार्ग म्हणजी प्रेम.
त्या प्रेमाचे प्रेमविवाहात रुपांतर झाले तर खेळ खल्लास !

दुर्दैवाने मला माझे भविष्य त्याच वाटेला जाताना दिसतेय. अनुभवाने आणखी भर टाकू शकेन या धाग्यात.

ओके सातीताई, तसेही मला या विषयावर व्यक्तीगत आयुष्याशी संबंधित एक सार्वजनिक सल्ला हवाच होता. त्यासाठी नवीनच धागा काढावा लागणार.

बहुतेक प्रेमासाठी झिजणे म्हणजे दास्यत्व नाही.>> प्रेमामध्ये आपखुशीने दास्यत्व स्वीकारावेसे वाटले तर?? आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीसाठी काहीही करायची तयारी असेल तर? याच विषयाचा शोध घ्यायचा प्रयत्न करतेय. 50 sheds वाचल्यानंतर आधी काहीच पटले नाही. पण असा माणसाचा स्वभाव असू शकतोच असे वाटते. या विषयावर मते वाचण्यास उत्सुक

लाडु
प्रेमामध्ये स्वतःहून दास्यत्व स्वीकारणे हे मला एकप्रकारे "सदर व्यक्तीने आपणास सोडून जाऊ नये" म्हणुन स्वीकरलेली लाचारी आहे. प्रेम करणारे कधीही एकमेकांना सोडत नाही. त्यांच्यात ताटातूट होत नसते.

प्रेमामध्ये स्वतःहून दास्यत्व स्वीकारणे हे मला एकप्रकारे "सदर व्यक्तीने आपणास सोडून जाऊ नये" म्हणुन स्वीकरलेली लाचारी आहे.
>>>>>>

एक्झॅक्टली!

प्रेमात एकमेकांना बिनधास्त घालून पाडून बोलायची मुभा हवी. आणि तरीही नाते तुटणार नाही हा विश्वास हवा.

जे काही गुलूगुलू बोलायचे असेल ते कंपनीतील बॉसशी बोलावे आणि प्रमोशन मिळवावे. प्रेमात मात्र असा कसलाही स्वार्थ नसावा.

आपण जर मुळातच्ब एक वाह्यात आणि डांबरट व्यक्ती असलो तर प्रेमासाठी भाबडेपणाचा बुरखा ओढण्यात काय अर्थ आहे.

प्रेमाखातर दास्यत्व ही एक उपमा असू शकते.
म्हणजे मी तुझा/तुझी दास/दासी झालोय / झालेय. स्वेच्छेने तुझी सेवा करेन, मला काही नको.

पण यात खरे दास्यत्व - गुलामगिरी या अर्थाने अजिबात नसते.

प्रेमाखातर दास्यत्व ही एक उपमा असू शकते.
म्हणजे मी तुझा/तुझी दास/दासी झालोय / झालेय. स्वेच्छेने तुझी सेवा करेन, मला काही नको. >>>
हो. असं पटतय. बाहेरुन हे नातं बघणार्याला ती गुलामी वाटू शकते. पण त्यातुन त्या दोन्ही माणसांना आनंद मिळत असेल कदाचित.

प्रेमात एकमेकांना बिनधास्त घालून पाडून बोलायची मुभा हवी.>>>>> हे मस्तच Happy

आपण जर मुळातच्ब एक वाह्यात आणि डांबरट व्यक्ती असलो तर प्रेमासाठी भाबडेपणाचा बुरखा ओढण्यात काय अर्थ आहे.>>>>. +१
आपण जसे आहोत तसे स्विकारणारी व्यक्तीच खरं प्रेम करते. Happy

<< पण यात खरे दास्यत्व - गुलामगिरी या अर्थाने अजिबात नसते.>> एकतर्फी प्रेमात असूं शकते. अशीं उदाहरणे पहाण्यात येतातही .

आपण जसे आहोत तसे स्विकारणारी व्यक्तीच खरं प्रेम करते.

============

गुणदोषांसकट स्विकारत एखादी व्यक्ती निस्सीम प्रेम जर करत असेल तर मग एकमेंकासाठी बदलणे, वा एकमेंकास परिपूर्ण करणे कसे काय शक्य होईल?

परिपूर्ण करणे म्हणजे एकमेंकास त्याचे चुका/दोष दाखवून त्या दुरुस्त करणे असा अर्थ अभिप्रेत आहे.

अहो असं कुणी बदलत नसतय. दुसर्यासाठी आपल्या स्वभावला/वागण्याला मुरड घालतात, अ‍ॅडजस्ट करतात. थोडं आपल्या माणसाच्या मनासारखं वागायचा प्रयत्न करतात. हेच प्रेम.

परिपूर्ण करणे>>> जगी परिपूर्ण असा कोण आहे? Happy

एकमेंकास त्याचे चुका/दोष दाखवून >>>> इथपर्यंत सहमत. Wink Happy

त्या दुरुस्त करणे>>> हे प्रत्येकावर अवलंबुन.

परिपूर्ण करणे म्हणजे एकमेंकास त्याचे चुका/दोष दाखवून त्या दुरुस्त करणे असा अर्थ अभिप्रेत आहे.

>>>>>

सफेद झूठ;:)

परिपुर्ण करणे म्हणजे जर एखादी गोष्ट आपल्या जोडीदाराला जमत नसेल आणि ती आपल्याला जमत असेल तर ती त्याच्यासाठी, किंबहुना दोघांसाठी करणे. त्याला ती चूक तशीच करत राहू देणे आणि दुरुस्त करायचे काम आपण करणे Happy

आधी मला वाटायचे की माझ्यात आणि माझ्या गर्लफ्रेंडमध्ये काहीच साम्य नाही तरी आम्ही कसे एकमेकांकडे आकर्षित झालो. फसलो का दोघेही भावनेच्या भरात. टिकत नाही आपले हे नाते आता फार काळ ..

पण आज बघा,
आज मला आमच्या जोडीबद्दल कमालीचा अभिमान आहे की आम्ही एकमेकांना अनुरूप आहोत. मेड फॉर ईच अदर आहोत. कारण आम्ही एकमेकांच्या कमतरता पुर्ण करतो.

आमच्या परिपुर्णतेची उदाहरणे लिहायला बसलो तर लेख बनेल. आणि तो मौका मी सहजी सोडणार नाही. नोंद करून ठेवतो. तुमच्या या एका धाग्यात प्रतिसाद देता देता मला तीन नवीन धागे सुचले याबद्दल धन्यवाद Happy

जोडीदाराच्या दोषांवर अंथरुण घालणे म्हणजे जोडीदारास फसवण्यासारखेच आहे.
समोरील व्यक्तीस त्याच्या चुकांची जाणीव करु देणे आवश्यक असते. ते कश्या प्रकारे जाणीव करून दिली जाते हे व्यक्तीपरत्वे बदलत जाणार.
उदा. पत्नी चहात साखर नेहमी जास्त टाकत असेल तर फिल्मी स्टाईलने "तेरे हातोमें बहोत मिठास है" असे म्हणणे वा तिला जोपर्यंत हे कळणार नाही तोपर्यंत गपगुमानं तो अतिगोड चहा पित राहणे चुकीचेच आहे.

तिला प्रेमाने हीच बाब सांगितली तर दोघांमधील सामंजस्य तेच राहील किंबहुना काकणभर वाढेल.

चुकताय, अंथरूण पांघरून टाकायचेच नाहीये. तर तिला उशीत, प्रेमाने कुशीत घ्यायचे आहे.
तुम्हीच दिलेल्या उदाहरणात तिला चहा करता येत नसेल तर आपण करावी. तिथे तुमचा पुरुषी अहंकार आडवा आला, की चहा करणे हे पत्नीचेच काम असे वाटले, तर मग तिथे प्रेम नाहीये समजावे. जर आपल्याला चहा बनवता येत नसेल तर गपगुमान दोघांचे कप विसळून घ्यावेत.

अर्थातच वरील उदाहरणानुसार पुरुषी अंहगड न बाळगता तिला चहा नक्कीच करुन द्यायला हवा. आणी तो सुध्दा व्यवस्थित साखर टाकुनच. पण जर तिला चहा गोडच हवा असेल तर दोन वेगळे चहा करण्याऐवजी तिच्या आनंदासाठी तो गोड चहा पिणे म्हणजेच प्रेम. पण तुम्ही आनंदाने पिताय म्हणून चुकून एकवेळ गोड झालेला चहा,तुमच्या खुशीसाठी तीसुद्धा आनंदाने पिणारच. जेव्हा की दोघांनाही तो गोड चहा नकोय.
येथे समोरील व्यक्तीस सांभाळून घ्यायचंय म्हणुन न आवडणारी बाब सांगु नये असे थोडी ना आहे.

जेव्हा की दोघांनाही तो गोड चहा नकोय.
>>>
म्हणजे प्रेमाची ती लेव्हल पार झाली नाहीये असे समजायचे जिथे काही न सांगता समोरच्याची आवड निवड समोरच्याच्या मनातले समजते Happy