आपण पाहिलेल्या / केलेल्या चांगल्या घटना, गोष्टी

Submitted by राजेश्वर on 2 April, 2016 - 06:41

आपण जे वाचतो त्याचा परीणाम आपल्या आचरणात / कृतित येतोच. म्हणुन चांगल्या गोष्टी, घटना साठी हा धागा.
आपण ऐकलेल्या, केलेल्या किंवा पाहिलेल्या चांगल्या घटना, गोष्टी आपण येथे लिहाव्यात ही अपेक्षा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरच अवघड होत माझ्यासाठी, मी आज काय चांगले केले याचा विचार करायला.
मग एक एक आठवायला लागले.

दोन दिवसापुर्वी मी मित्रासोबत बसुन एक कठीण निर्णय घेतला होता. किमान चालु एक वर्ष तरी खरे बोलायचे आणी आतापर्यंत तरी मी निर्णयास अनुसरुन आहे.

काल बस स्टॉपवर १ तास वाट पाहुन ही बस नाही आली.मग डायरेक्ट रीक्षा करण्याचा निर्णय घेतला.सोबत एक आजीही बराच वेळ ताटकळत उभ्या होत्या.त्यांना ही सोबत घेतल.विचार केला,,तिकीटाचे पैसे घेऊ फक्त. एन वेळेला वाटल २० रु काय असा फरक पडणार.पैसे नाही घेतले.बरं वाटल Happy

काल एकाने जिम मधून बाहेर येऊन गाडी काढताना उरलेली बिस्किट आणि खाऊ ची पिशवी थेट फुटपाथ वर भिरकावली.मी आजूबाजूला कचर्‍याचा डबा शोधत होते तो मिळाला नाही.शेवटी बाईकवाल्या मुलाला जाऊन 'अरे बॅग तू टाकली आहेस ना, ती प्लिज घरी जाऊन कचर्‍यात टाकशील का' म्हटले.त्याने काही न बोलता पिशवी उचलून बाईक ला लावून गेला(पुढे चौकात फेकली असेलच :)) गडी माझ्या उंचीच्या ६-७ इंच उंच आणि जिम केल्याचे पुरावे अंगावर बाळगून होता Happy

अनु, भारीच...
अंकु, लई ब्येस...
राजेश्वर, निर्णय घेतलाय, पण अंमलात आणणे महा अवघड आहे, तरीही प्रयत्न जरुर करा. Happy

मस्त अंकु
>> आवडले, माझ्याकडुन पैसे सहसा सुटत नाही. Sad
अनु, भारीच...

लिंबु भाउ. Happy

नक्कीच प्रयत्न तोच राहणार आहे.
Happy

सर्वांना शुभेच्छा Happy

महेशजी

चांगलेच आहे. चांगले धागे अधिकाधिक झाले तर Happy

मस्त अंकु
>> आवडले, माझ्याकडुन पैसे सहसा सुटत नाही. अरेरे>>>>>>>>>>. खरे बोलण्याची नक्कीच सुरुवात झाली म्हणायची Proud Wink